डांगर

कधी कधी भाजी उपलब्ध नसल्यास माझी आजी डांगर-भाकरी असा आमचा प्रचंड आवडीचा मेनू बनवायची. हे डांगर आपल्यातल्या बर्‍याच जणांनी खाल्लंही असेल,

साहित्यः
उडीद डाळ, धणे, भाजलेले जिरे

कृती: (अत्यंत सोपी)
एकदम मंद आचेवर जाड बुडाची कढई ठेऊन त्यात उडीद डाळ खरपूस भाजायला घ्यावी. डाळ पाचेक मिनिटे भाजली गेली की त्यात धणे घालावेत. (धणे भाजले जाण्यास तुलनेने वेळ कमी लगतो म्हणून). डाळ खमंग भाजून झाली की गॅस बंद करुन त्यात भाजलेले जिरे घालावेत आणि उलथन्याने थोडे वर खाली करावे.

हे मिश्रण थंड झाले की मिक्सरला काढून बरणीत भरून ठेवा. ज्यावेळी खायचे असेल तेव्हा या डांगरात दही, फोडणी, कोथिंबीर, मीठ आणि उपलब्ध असल्यास तळलेली भरली मिरची असे सगळे घालून कालवावे.

हा भाकरी बरोबरचा बेत आवर्जून करुन पहाच. आणि मला सांगा आवडला तर.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

परवाच बचकाभर डांगर खाउन संपवलय.
कुटुंबातील मागच्या पिढीतील स्त्रिया हे मस्त बनवतात आमच्याकडे.
मला डांगर, पूडाचटणी अत्यंत प्रिय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

डांगर म्हणजेच मेतकूट असे मला वाटे. परत मागे जाउन, मुलीला गुरगुट्या मेतकूट भात खाउ घालावासा वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे एवढं सोपं असतं बनवायला?

भाकरी बनवणं कठीण आहे, पण मला दुपारी चरायला काहीतरी लागतं तेव्हा हे खायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोणत्याही कोशिंबिरी च्या ऐवजी हे तोंडीलावणे आमच्याकडे असते, खिचडी बरोबर झकास लागते.कांदा कच्चा किंवा फोडणीमध्ये पण घालतो आम्ही!

फक्त मला वाटतं, आमच्याकडे हरभरा आणि उडिद डाळ सम प्रमाणात असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

कोणत्याही कोशिंबिरी च्या ऐवजी हे तोंडीलावणे आमच्याकडे असते

टिपिकल देशस्थी फेवरिट, अ‍ॅमैरैट?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रैट्ट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

साहित्याच प्रमाण देणार का? डाळी धुवुन उन्हात वाळवून मग भाजायच्या ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाककृतीबद्दल आभार.
फोडणी नक्की कुठली ? तेलातली (मोहरी-हिंग-हळद), की तुपातली (जिरे-हिंग)? या फोडणीसोबत कढिलिंब असतो का ?
---
जालावर शोधले असता 'डांगर पचडी' किंवा 'उरद दाल रायता' या नावाने हा पदार्थ प्रसिद्ध आहे असे दिसते. (डांगर म्हटल्यावर पोह्याच्या पापडाच्या डांगराखेरीज दुसरे चित्र डोक्यात येत नाही) तंजावुरकडचा हा पदार्थ आहे. तुमची पाककृती थोड्याफार फरकाने वापरलेली आहे. दुवा , , . चित्रेही आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्याकडे डांगराची पाकृ थोडी वेगळी आहे, त्यात हरबरा डाळ, मिरच्या वगैरेही असतात. नंतर पाकृ. लिहेन.
चटणीपूड बनविताना आई त्यात गूळ, खोबरे वगैरे मिसळण्याआधी इतर जिन्नस भरडून, डांगरासाठी वेगळे काढून ठेवायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डांगर म्हंजे मला पापडाचे आठवले. हे रोचकेय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आई गं डांगराची लाटी बरोबर? काय क्लास लागते. टाळूला चिकटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टाळूला?

टाळूवर नेमके काय म्हणून थापता तुम्ही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टाळू की टाळ्याला? Sad
मराठी शब्द विसरले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की खात्री नाही.

पण उचलली जीभ तरी टाळ्यालाच लावण्याची प्रथा आहे. (निदान आमच्यात तरी.)

------------------------------------------------------------------------------

येथे 'आमच्यात'चा अर्थ हवा तसा लावावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्मि - दोन वाट्या उडीद डाळ असेल तर पाव वाटी धणे आणि पाव वाटी जिरे.
अमुक - फोडणी तेलाचीच घालावी. तेल, मोहरी, हिंग, कढीपत्ता

डांगर कालवताना आपण बर्‍याच गोष्टी वापरू शकतो, जसं की मेतकूट, कोथिंबीर किंवा सविता यांनी सांगितल्याप्रमाणे कांदा(कच्चा किंवा तेलावर भाजलेला).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या डांगरात दही, फोडणी, कोथिंबीर, मीठ आणि उपलब्ध असल्यास तळलेली भरली मिरची असे सगळे घालून कालवावे.
भाकरी बरोबरचा बेत
अरारा..हृदयात कालवाकालव झाली...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

हा प्रकार माझ्या बाबांना फार आवडायचा. पण आता फारसा होत नाही. पण आता परत या कृती प्रमाणे करुन बघायला पाहिजे.

यातील उडिद आणि भाजणे यावरुन वाटले की कोणितरी थालिपिठाच्या भाजणीची कृती टाकली पाहिजे. खरतरं बरेचजण टाकू शकतील कारण व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने घर तितक्या भाजणीच्या कृती इतकी भाजणीची व्हर्जन्स मिळतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सई

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टोमॅटो चे रायते (आईचा तोच शब्द होता. हे वेगळे रायते, पंजाब्यांचे दही-रायता नाही) करताना, त्यात मेथीदाणे टाकले म्हणजे करताना, टोमॅटो शिजवताना, लाल तिखट्+गूळ (सॉरी साखर नाही)+मीठ.व मेथीदाणे बस्स!! ओह माय गॉड प्रचंड सुंदर लागतं ते. कडू, गोड, आंबट आणि खारट सर्व चवींनी वर्णी लावलेला साधा पण मस्त पदार्थ आहे तो.
आनि हो कोथिंबिर, हिरवी मिर्ची असे स्वत:ची ठळक चव असलेले पदार्थ घालायचे नाहीत. फक्त ५ चवी लागल्या पाहीजेत - मेथीची कडू + गूळाची गोड +मीठाची खारट + टोमॅटोची आंबट + लाल तिखटाचीच तिखट्

मात्र मेथ्या (मेथीदाणे) अजिबात विसरायचे नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१)*१ भाकरी बनवणे/ करणे अजिबात अवघड नाही.
२) आम्ही भिजवलेल्या चणा/ उडिद/ किंवा मूग डाळींचं वाटून करतो.
---
*१ टवाळकी नाहिये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*१ टवाळकी नाहिये.

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0