कविता समजुन घेतांना- भाग १

वाचनाचं वेड असल्याने आणि कविता हा प्रकार प्रचंड आवडता असल्याने अधाशासारखा मिळेल ती कविता वाचत सुटायचो. कधी फ़ार च सुंदर तर कधी फ़ार च टुकार कविता भेटायच्या. पण सुंदर ग्रेट कविता असा काही अनोखा आनंद देतात की ज्याची काही तुलनाच करु शकत नाही. याच नादातुन समीक्षा ही वाचु लागलो मग मात्र थोडा मुळ कविता वाचनाचा आनंद डीस्टर्ब झाला. विनाकारण एक नेणीवेच्या पातळीवर इव्हॅल्युएशन व्हायला सुरुवात झाली. मग कन्फ़्युज झालो मग थोडी चिडचीड ही होउ लागली. ती अशी की अरेच्च्या इतकी सुंदर कविता होती यावर विचार करण टाळुन नुसती फ़ीलींग लेव्हल वर च रेंगाळु दिली असती तर कीती छान झाल असत. पण ती फ़ीलींग कडुन थींकींग कडे नकळत सरकु लागली. मग मात्र ठरवल आपण समीक्षा वाचायची पुर्ण बंद करायची कुठलीही कविता अनकंडीशनल अनप्रीज्युडाइज्ड होउन वाचायची. आणि मग केवळ आपला स्वत: चा विचार त्यावर करुन बघायचा. अर्थात पुर्ण स्वतंत्र विचार करण कधीच शक्य नाही शेअरींग हवीच पण अगोदर तरी आपण बेसिक विचार करुन बघण्याचा प्रयत्न केला तर एकुण आकलन वाढण्यास मदतच होते. व ते एका अर्थी चांगलच आहे. मला आता एक फ़ार तीव्रतेने जाणवते की कुठल्याही कविता च नाही गोष्टीवर आपण स्वत: मुळातुन आपली जी काय पातळी असेल त्यावरुन जर प्रामाणिक चिंतन केल वा शेअरींग व चर्चा केली तर त्यानंतर जी क्लॅरीटी येते ती. आपल्याला वाचनाचा आनंद अनुभव अनेकपटीने वाढवुन देते. आपल्या आकलनाशी जितके आपण प्रामाणिक राहतो स्वत: चा ओरीजनल विचार वा चिंतन जितक आपण करतो तितक कलाकृती आपल्यासमोर छान उलगडायला लागते
तर कविता कवि व चांगली कविता आणि तीची प्रोसेस या विषयी मला जे काय वाटतं ते मी समीक्षा निरपेक्षतेने म्हणजे (कींवा मला काय वाटते पटते उमजते असे ) मांडण्याचा प्रयत्न करतो. विचार विस्कळीत च आहेत. पण हेतु असा आहे की तुमच्या बरोबर शेअर करता करता माझ्या विचारांमध्ये क्लॅरीटी येइल आणि त्याहुन महत्वाच म्हणजे तुमच्या विचारांतुन नविन काही मला मिळेल. कारण इथे बहुधा व्यावसायिक समीक्षक नसतीलच. तर रसिकच बहुतांशी आहेत, अशा रसिकांचे विचार वाचायला जाणुन घ्यायला फ़ार आवडेल.
तर कुठल्याही भाषेतील कविता म्हणजे नेमकी काय असते ? तर जो कवि म्हणुन माणुस असतो तो त्या विशिष्ट भाषेतील शब्द घेउन ( आता कविचा आपल्या भाषेतील शब्दसंग्रह नॉर्मल माणसापेक्षा संख्येने मोठा असावाच लागतो अगदीच प्राथमिक गरज कवि होण्याची ) म्हणजे शांतता आपल्यासाठी फ़क्त शांतता असेल मात्र कवि साठी ती निरव वा भयाण सिच्युएशन प्रमाणे असेल. वा तो वापरेल. अजुन एक म्हणजे कवि नेहमी शब्दाचा रुढ अर्थ च वापरेल असे नाही. किंवा तो रुढ अर्थ टाळण्याचाच अधिक प्रयत्न चांगल्या कवितेत करेल. कधी कधी अगदी साधा शब्द घेउन त्याला अगदी युनिक ट्रीटमेंट देउन आपल म्हणण मांडेल. उदा. अरुण कोलटकर आपल्या परंपरा कवितेच्या शेवटी परंपरा हा शब्द अनेक वेळा रीपीट करुन जवळपास पानभर मांडुन जसे ( प्रंप्रंप्रंप्रं परंपरं जशी लहान मुल एखादा शब्द तोंडात कधी कधी घोळवतात) करुन त्यांना अपेक्षीत असलेले परंपरा कशी निरर्थक रीपीटेशन असते माइंडलेस असते हा मुद्दा ते छान जोरकसपणे वाचकाच्या मनावर ठसवतात. तेव्हा तो परंपरा असा साधा शब्द च असतो पण कविच्या हातात लागल्यावर तो त्याला पुर्ण फ़िरवुनच टाकतो.
आणखी एक म्हणजे कवि प्रतिकं वापरतो. म्हणजे एखादी गोष्ट तो सरळ नाही सांगणार की अशी अशी घटना घडली. तो अस वास्तव जसच्या तस कधी नाही मांडत. तस जर मांडणच पुरेस असत तर वर्तमानपत्रे जशी एखादी घटना वास्तव सरळ सोट मांडतात तेच ग्रेट साहीत्य झाल असत. पण सुदैवाने वर्तमान पत्र वा बातम्या हे काही ग्रेट साहीत्य मानल जात नाही व ते असतही नाही. जरी कीतीही वास्तव वा सत्य ते मांडत असले तरीही. चांगल्या कवितेने नेहमी सत्य वा वास्तव च मांडल पाहीजे हा आग्रह चुकीचा वाटतो. तर मग कवि एखाद वास्तव मांडतो त्यात वेगळ काहीतरी असत ते नेमक काय असत. तर तो ते वास्तव थोड तिरप करुन मांडतो. थोडा. इनडायरेक्टली थोड सुचवतो म्हणजे हिंट दिल्यासारख तुम्हाला थोड कामाला लावतो. तर तो शब्दांच सिलेक्शन करतो त्यांना एक सुंदर रीतीने अरेंज करतो. आणि जनरली नेहमीच नाही एक सिम्बॉलिकली तेच वास्तव प्रेझेंट करतो. आता काही सिम्बॉल्स अनेक वेळा अनेक कविंकडुन वापरले गेल्याने घासुन घासुन त्यांची धार पार बोथट होउन जाते. हा गुळगुळीत प्रतिकांचा अनुभव उर्दु शेरो शायरी त सतत येतो. शमा-परवाना, रकीब महफ़िल साकी इ. पण परत कुठलेही ठोस विधान कवितेविषयी करता येत नाही. पार गुळगुळीत झालेल प्रतिकं उदा. शमा जर एखाद्या गालिब च्या हातात आल तर तो त्याच सोनं करुन टाकतो. ( शमॉ हर रंग मे जलती है सहेर होने तक ) असच एक खलिल जिब्रान च कोट आहे ज्यात तो म्हणतो ज्या माणसाने सर्वप्रथम आपल्या प्रेयसीच्या ओठाला गुलाबाच्या पाकळी ची उपमा दिली तो खरच महान कवि होता त्या नंतर ती रीपीट करणारे सगळे बिनडोक आहेत अस काहीतरी तो म्हणतो.तर यात आता फ़रक कसा करावा एक न्युजरीडर वा बातमीदार जे वास्तव मांडतो व कवि जे कवितेच्या माध्यमातुन तेच वास्तव मांडतो त्यात फ़रक असतो. तो थोडा असा असतो की दोघे जरी समान वास्तव मांडत असले तरी कविच्या मांडणी त त्याची पर्सनल कॉमेंट देखील असते. त्याची टीप्पणी व्हॉट ही फ़ील्स अबाउट इट इन्टेन्सली हे असत.
आता हा चांगल्या कवितेचा आणखी एक घटक वा कविचा म्हणुया ही इज इन्टेन्स अबाउट व्हॉट ही वॉन्ट्स टु एक्स्प्रेस म्हणजे आग्रही या अर्थाने नव्हे वा फ़ार शोरशराबाच करुन नव्हे. एखादा तर अगदी उदास अगदी रेलक्टंट ही असेल काही सांगण्याविषयी पण पण त्यात ही अगदी त्या सांगण्या व्यक्त होण्याप्रतीच्या उदासीनतेतही एक इन्टेसीटी डेफ़ीनेटली असते. जसे. विलास सारंग यांच्या कवितेत कमालीचा अलिप्तभाव असतो पण त्यात ठासुन भरलेली इन्टेसीटी शब्दाशब्दांमधुन जाणवत असते. त्यांची निरुद्देशिका नावाची सुंदर कविता या संदर्भात वाचण्यासारखी आहे.
आणखी एक चांगला कवि हा जीवन इनफ़ भोगलेला हवा वा तो तसा असतो यात वयाचा संबंध नाही काहींना अगदी लहान वयातही प्रचंड जीवनानुभव येतो. वा मोजकेच अनुभव ही असतील व तरी ते एखादा कवि त्यातील एखादाच अनुभव ही छान व्यक्त करु शकतो. तस कवितेच्या बाबतीत खर म्हणजे कुठलेच ठोस विधान करता येत नाही. वा एखाद्या फ़िजीकल सायन्स प्रमाणे नियम लावता येत नाहीत. पण तरी कुठे न कुठे समजण्याच्या प्रयत्नात जनरलाय्जेशन टाळता येत नाही. त्या मर्यादेत वरील विधान घ्यावे की चांगला कवि हा जीवन इनफ़ भोगलेला असतो. मग या अनेक अनुभवातुन त्याला “ भिडलेला “ अनुभव तो विशिष्ट शब्द विशीष्ट रीतीने विशीष्ट प्रतिकांतुन आणि विशीष्ट शैलीतुन व्यक्त करतो. तो अनुभव जितका युनिक असेल तितका तो अनुभव जितका तीव्र असेल तितका तो व्यक्त करण्याची शैली जितकी युनिक असेल तितकी त्या प्रमाणात ती कविता मनाला भिडते.
कवि हा तसा मॅन ऑफ़ फ़्यु वर्ड्स असतो. म्हणजे बघा तो अगदी थोडक्यात अगदी कमीत कमी शब्दात आपल म्हणण पोहोचवतो. हे म्हणजे इतर फ़ॉर्म च्या तुलनेत म्हणतोय. म्हणजे बघा एखाद्या पुरग्रस्त भागावर तेथील लोकांच्या लढाउ वृत्तीवर एखादा दिर्घ लेख वा रीपोर्ट लिहीता येउ शकतो वा एखादी कथा किंवा कादंबरी ही होउ शकते. पण एखादा कुसुमाग्रज अगदी थोड्या शब्दात तेथील लोकांच स्पीरीट पकडु शकतो ( पाठीवर हात ठेउन फ़क्त लढ म्हणा ) अर्थात मला कवितेची यात एक मर्यादाही जाणवते कविता म्हणजे कविने एखादी गोष्ट मोजकाच अनुभव हायलाइट केलेला असतो म्हणजे कादंबरी जसा विस्तृत अनुभव कवेत घेउ शकते ( तिच्या अंगभुत अवकाशा मुळे ) तसे कवितेच्या बाबतीत होत नाही. जास्त ताणली तर मग कविता आपला इम्पॅक्ट घालवुन बसते. म्हणजे कविता एकेक अनुभव वा मोठ्या अनुभवाचा एखादा कंगोरा वा तुकडा हायलाइट करते. जस एखाद जंगल आहे रात्रीचा गडद काळोख आहे. तर कवि आपल्या चॉइस ने आपल्या प्रतिभेचा सर्चलाइट टाकुन एखादीच गोष्ट एखादाच प्राणी पक्षी वा झाड वा फ़ुल आपल्या प्रतिभाप्रकाशझोतात उजळवुन टाकत असतो.मग ते रसिकानेही तेवढ्याच संदर्भात घ्यायला हवं नाहीतर मग त्यांना हे कुठे माहीत आहे ते कुठे माहीत आहे अशी विनाकारण कुरकुर सुरु होते.
आणि मला एक वाटते की कुठलीही कविता अगदी कीतीही रुक्ष जरी भासत असली अगदी पराकोटीच्या उदासिनतेने अलिप्ततेने व्यक्त होत असली तरी ती इमोशनल असतेच असते. तीचा जन्म हा इमोशन्स मध्येच होतच असतो व अपीलही इमोशनल च असते. चांगली कविता अभावनिक असु शकत नाही. उदा. रेग्यांची ही ड्राय कविता बघा ( शेवटी सर्व वस्तुमात्र पुसुन टाकल तरी शेवटी हात उरलेच नि हातातलं हे फ़डकं ! ) कीती इन्टेन्स इमोशन्स आहेत यात.
चांगला कवि हा इमानदार असण फ़ार महत्वाच असत. म्हणजे प्रत्येक पातळीवर हे इमान जर तो पाळु शकला जस अनुभव घेतांना तो मांडतांना त्याने कुठल्याही कविताबाह्य हेतुने तो प्रभावित व्हावयास नको. आपल्या कवितेशी तो डॅम ऑनेस्ट असलाच पाहीजे. म्हणजे त्याच कवितेतुन व्यक्त होण ही त्याची खरीखुरी आंतरीक गरज असली पाहीजे.मुव्हींग फ़िंगर्स राइट अस व्हायला हवं आता व्यक्त झालो नाही तर गुदमरुन जाउ अस वाटल पाहीजे मात्र जर तो इतर हेतुंनी वा प्रभावांनी प्रेरीत होउन लिहीत असेल तर चांगली कविता निपजणे अवघड होउन बसते.अस का होत तर समजा तो इम्प्रेस करण्यासाठी वा पैशासाठी लिहत असेल वा आणखी अशा कारणासाठी तर मग तो त्याला आलेल्या जिवंत अनुभवा ला न्याय देणार नाही तो प्रेशर फ़्रॉम आउटसाइड हीज सोल खाली येइल. मग तो इम्प्रेस करण्यासाठी लिहिणार एक्सप्रेस करण्यासाठी नाही. यात त्याचा मुळ अनुभव तो डागाळुन टाकण्याची शक्यता वाढेल. तो अनुभव मग तो मागणी प्रमाणे मॉडीफ़ाय करण्याची शक्यता वाढेल. जस एखादा विनोदी अभिनेता अनेक टाळ्या मिळवल्यानंतर हॅबिच्युअली मॅनरीझम्स प्रतिसादाच्या अपेक्षेच्या दबावात करत जातो तसे होते. दबाव कविवर नकोच नको. इन्फ़ॅक्ट कुठलीही चांगली कला ही स्वान्तसुखाय च परस्यु होत असेल तर च तिची क्वालिटी टिकुन राहते. आणि कविता मुळात इमोशन्स चा च मामला असल्याने जर या बाहेरील भावना हावी झाल्या तर तो सिलेक्टीव्हली वा डीसऑनेस्टली च व्यक्त होणार. तो शो करणार त्यात कॅल्क्युलेशन्स येतील. उदा पाडगावकर जेव्हा एक जिप्सी आहे माझ्या मनात दडुन म्हणतात तेव्हा आणि लिज्जत पापड साठी गाण लिहीता तेव्हा एक फ़रक पडत जातो. एक क्वालिटी कुठेतरी डॅमेज होत जाते. अशावेळी मग पुर्वपुण्याइ व क्राफ़्ट्समनशिप कामी येते.
याची अजुन एक बाजु देखील आहे. राजेंद्र यादव त्यांच्या एका अप्रतिम कांदबरीत ( नाव आठवत नाही ) जिचा सारांश असा आहे की कुठलाही कवि वा लेखक जो स्वत:च्या सर्जनशीलतेशी एकनिष्ठ असतो त्याच्यासाठी कुठलाही अनुभव हा सेंकंडरी होउन जात असतो.म्हणजे अस की त्याच्यासाठी प्रत्येक अनुभव नकळतपणे ( नेणीवेच्या पातळीवर ) स्वत:च्या कलेतुन व्यक्त होण्यासाठीचे रॉ-मटेरीयल होउन जात असते. त्याने निर्माण होणारी आत्मवंचना व वेदना ही त्या कादंबरीत अप्रतिम रीतीने दर्शवलेली आहे. म्हणजे एक माणुस म्हणुन अनुभव त्याच्यासाठी नितळ कोरा राहत नाही कविची मुद्रा त्याला डागाळुन टाकते. उष्ट करुन टाकते. त्यामुळे कवितील माणुस कोरडाच राहुन जातो. असे काहीसे त्यात होते.
क्राफ़्ट्समनशिप कारागिरी वा तंत्रावर पकड असणे ही पण एक आवश्यक बाब च आहे. पण मला वाटत चांगल्या कविच्या बाबतीत जस त्याच व्यक्त होण हे अतिशय नैसर्गिक असत तस च क्राफ़्ट्समनशिप जरी त्याने अर्न केलेली असली तरी तिचा वापर हा त्याच्या हातन नैसर्गिकरीत्या होत असतो. म्हणजे गरजेप्रमाणे त्याची कारागिरी त्याला कामी येत असते. आज अमुक एका वृत्तात वा मीटरमध्ये कविता बसवुनच टाकतो अशा जिद्दीने चांगला कवि दिवसाची सुरुवात करत नाही. मात्र दिवसाअखेर त्याच्या कवितेसारखच त्याला तिला अनुरुप असलेलं वृत्त वा छंद त्याला गवसतोच.
कविता ही त्या त्या भाषेचं तिच्या सौंदर्याच सेलिब्रेशन असतं चांगली कविता ही आपल्या भाषेचा सर्वात सुंदर अविष्कार करत असते. कविता ही त्या त्या भाषेची सर्वात सुंदर अभिव्यक्ती असते. वा भाषेचा सर्वात सुंदर वापर कवितेत होत असतो. कवितेतुन भाषा हायएस्ट पॉसिबल कम्युनिकेशन करत असते.
कविची नजर ताजी असते. चांगली कविता नेहमी फ़्रेश असते. आजपावेतो पेक्षा वेगळा अनुभव वा दृष्टीकोण एखाद्या घटने भावने कडे बघण्याचा कविता देत असते. चांगली कविता अर्थातच इफ़ेक्टीव असतेच असते. म्हणजे असे की मुलभुत मानवी भावना भय आनंद लज्जा इ. या सर्वांतच असतात. प्रत्येक माणसाच्या नेणीवेत अनेक भाव भावना खोलवर दडुन बसलेल्या असतात. प्रत्येक जण एक लाइफ़ इनसाइड लाइफ़ कॅरी करतच असतो. कधी कधी होत काय की कवि त्याच्या कवितेतुन सरळ वाचणारयाच्या आदिम भाव भावनांना वृत्तींना च हात घालतो. आवाहन करतो हलवुन सोडतो. यातली गंमत म्हणजे काही कवितांचा अर्थ अजिबात कळत नाही पण परीणाम त्या अगदी खोलवर करतात. आपल्या अगदी आतील अंतर्मन कविच्या शब्दांना अशावेळी प्रतिसाद देत असत तेही स्व च्या नकळतपणे. आदिम भयाची भावना जागवणारी ही सिल्व्हीया प्लाथ ची ही कविता बघा.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

आजच वाचलेल्या एका कवितेच्या पुस्तकाच्या ओळखॆमधून खालील भाषांतरीत उतारा लिहीला आहे -

लोक तक्रार करतात की कविता दुर्बोध असते, आम्हाला समाजात नाही. पण विचार करून पहा आपण रोज करतो त्या संवादांपेक्षा अनेक पटींनॆ कविता ही थेट असते. ऑफिस पार्टी किंवा आपल्या टीनेजर मुलीशी होणारा संवाद आठवून पहा, इतकेच काय आपल्या जोडॆदाराबरोबरचे संभाषण आठवा - आपण कोडेड बोलतो, संदिग्ध बोलतो, मूळ मुद्द्या ला बगल देतो,विचारांचे दमन करतो, उपहासात्मक बोलतो पण जे मनात असते ते ओठांवर कितीदा येते? कधीच आपण मनातील बोलत नाही. याउलट कविता ही थेट हृदयातून निघते अन हृदयाशी संवाद साधते.

Poetry is the last preserve of honest speech & the outspoken heart.

माझे वडील सुतार होते. त्यांचा अन माझा स्वभाव अतिशय भिन्न होता.अजूनही डोळे मिटले असता माझ्या अंत:चक्षूंसमोर त्यांची देखणी व केसात लाकडी भूस्सा भूराभूरलेली आकृती येते. त्यांच्या आयुष्यात एक कमालीची प्रामाणिकता अन कविता होती. जेव्हा कोंबड्याच्या तंगड्या पकडून कोयत्याने ते घाव घालून ..... whack .....त्याचे मुंडके उडवत, त्या क्रियेत एक प्रामाणिकपणा होता.

I hear that whack in poetry.

The meaning of poetry is to give courage. A poem isn't a puzzle that you a dutiful reader is obliged to solve. It is meant to poke you, get you to buck up, pay attention,rise & shine, look alive, get a grip, get a picture, pull up your socks, wake up & die right!

______________________

कवितेबद्दल अजून खूप अन भरभरुन येऊ द्यात. वाट पहाते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगलं लिहिलय पण थोडंसं विस्कळीत वाटलं.
कविता अनुभवण्यावर हा एक अप्रतीम लेख वाचनीय आहे.

याच नादातुन समीक्षा ही वाचु लागलो मग मात्र थोडा मुळ कविता वाचनाचा आनंद डीस्टर्ब झाला. विनाकारण एक नेणीवेच्या पातळीवर इव्हॅल्युएशन व्हायला सुरुवात झाली. मग कन्फ़्युज झालो मग थोडी चिडचीड ही होउ लागली. ती अशी की अरेच्च्या इतकी सुंदर कविता होती यावर विचार करण टाळुन नुसती फ़ीलींग लेव्हल वर च रेंगाळु दिली असती तर कीती छान झाल असत. पण ती फ़ीलींग कडुन थींकींग कडे नकळत सरकु लागली. मग मात्र ठरवल आपण समीक्षा वाचायची पुर्ण बंद करायची कुठलीही कविता अनकंडीशनल अनप्रीज्युडाइज्ड होउन वाचायची. आणि मग केवळ आपला स्वत: चा विचार त्यावर करुन बघायचा.

ही वाक्य पटली. हेच सिनेमालादेखील लागू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लेख आवडला. कविता माझा ही आवडता विषय आहे, मराठी कविता तश्या कमीच वाचल्या आहेत पण हिंदीत भरपूर वाचल्या आहे. मला सर्व प्रकारच्या कविता आवडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिल्व्हिया प्लाथ ची कोणती कविता म्हणालात?
_____________
सिल्व्हिया प्लाथ च्या त्या कवितेचा दुवा द्याल का? विनंती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या धाग्याचा विषय आणि विचार दोन्हीहि उत्तम आहेत आणि विचारप्रवर्तक चर्चा घडवून आणू शकेल असे त्याच्यात बरेच आहे.

तरीहि वाचतांना त्यातील अनावश्यक इंग्रजी शब्दांचा वापर अतिशय खटकला. उदाहरणार्थ पहिल्या पाचच ओळी पहा:

<वाचनाचं वेड असल्याने आणि कविता हा प्रकार प्रचंड आवडता असल्याने अधाशासारखा मिळेल ती कविता वाचत सुटायचो. कधी फ़ार च सुंदर तर कधी फ़ार च टुकार कविता भेटायच्या. पण सुंदर ग्रेट कविता असा काही अनोखा आनंद देतात की ज्याची काही तुलनाच करु शकत नाही. याच नादातुन समीक्षा ही वाचु लागलो मग मात्र थोडा मुळ कविता वाचनाचा आनंद डीस्टर्ब झाला. विनाकारण एक नेणीवेच्या पातळीवर इव्हॅल्युएशन व्हायला सुरुवात झाली. मग कन्फ़्युज झालो मग थोडी चिडचीड ही होउ लागली. ती अशी की अरेच्च्या इतकी सुंदर कविता होती यावर विचार करण टाळुन नुसती फ़ीलींग लेव्हल वर च रेंगाळु दिली असती तर कीती छान झाल असत. पण ती फ़ीलींग कडुन थींकींग कडे नकळत सरकु लागली. >

ह्या पाच ओळीत आठ इंग्रजी शब्द आहेत. त्यांपैकी कोठलाच असा नाही की त्याला समर्पक आणि रोजच्या वापरातला मराठी शब्द उपलब्ध नाही. असे असता हे इंग्रजी शब्द वापरायचा अट्टाहास का?

माझी खात्री आहे की तुम्ही एखाद्या पंचतारांकित जागेत गेलात तर तेथे आवर्जून तुमचे उत्तमातले उत्तम इंग्रजी तुम्हाला जमेल तितक्या ब्रिटिश/अमेरिकन उच्चारात वापरत असणार. तिथे मराठी शब्द चुकून वापरला गेला तर तुम्हास ओशाळवाणे वाटणार. आपण 'गावठी' दिसणार नाही ह्याची तुम्ही पुरेपूर काळजी घेणार. अन्य भाषिक सुशिक्षित लोक आपण आपली भाषा शंभर टक्के प्रमाणभाषा वापरतो ह्याची खात्री घेतात. आपणच मराठी आपली भाषा अशी बेवारशी का करतो? तेहि ह्या मराठी संस्थळावर जेथे त्याच्या नावातच ज्ञानेश्वरांचा मराठी अभिमान दिसून येतो?

(शुद्धलेखनाबाबत लिहीत नाही, तो एक वेगळाच विषय आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Arnab Chakladar: So it wasn't a source of alienation for you?

Kiran Nagarkar: Not in the least! While they went back to learn Tamil, Hindi or Gujarati, I never felt the need. I had a child's grasp of Marathi from my first 4 years of education but also I was not in the least unhappy with my divided state. I was born on the cusp of independence, so there was no point denying my colonial legacy as well as the new India. The only thing to do was to accept it and to make the most or the worst of it.

Arnab Chakladar: ...but it has been a problem other people have had with you...

Kiran Nagarkar: Yes, in the last 14 years, since I published Ravan and Eddie. Marathi papers and magazines and critics completely reject me because I switched to English; and in a very offensive kind of way. At that Festival of Indian writing that took place in 2002 in Neemrana... I was one of the people, who was asked to participate for reasons completely unknown to me, I mean I'm not published abroad... it was there that I first encountered the viciousness of the regional language writers...it came as a total shock to me. What really bothered me was that there was an equation in their minds and the equation was, if you wrote in the regional languages you were authentic and if you didn't, then you were a fraud. Now my partner at one time was Arun Kolatkar, we were together for 20 years doing advertising--and Arun was bilingual as well. So when we wrote in Marathi we were authentic, and when we didn't, we weren't? I was not able to resolve this, and I don't think Arun was able to either. And if we were valuable as Marathi writers neither of us received an overdose of recognition. I mean Arun might have had a small following, and so did I have a small following but let's not go into how small small is! And he is one of our best poets, there is no question about that. And so what I want to ask my Marathi media and critics, and I have asked them several times...of course they have no interest in my questions...when I got the prize for Cuckold, they came to interview me, the Marathi papers, all they could ask me was, "why have you stopped writing in Marathi". They never asked me, first of all, "how come you only write in two languages" when I am from India and it should be possible for me to write in 4 languages at the least. And they never could get around to the real question which is not why I stopped writing in Marathi but how come I began writing in Marathi in the first place, when only my first 4 years of schooling were in Marathi!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलाच्या अंगावर टंच टी-शर्ट आहे गडद
NIKE ही पांढरी अक्षर रंगविलेला;
टी-शर्टाच्या आत जानव्याची दीर्घ रेषा दिसते
पुराण वणासारखी

विलास सारंग ( उडुपी )

पोतड्यांमधुन संस्कृती
सरावान काढुन मांडली
राजस्थानी बाहुली हस्तिदंती हत्ती
चढवली इथल्या भिंतीवर
काली आणि गणेशाची निधर्मी पोस्टरं
कुठंही गेलं तरी...............(पृ. ७१ )

फ़ार काळ आम्ही प्रतिक्षा करत होतो रानवट माणसाच्या आगमनाची
आमचे राज्यकर्ते आमचे सेनापती आणि सचिव आमचे संत आमचे विचारवंत आमचे कलावंत,
आमचे वैज्ञानिक ,शिक्षक, प्राध्यापक ,एवढंच नव्हे तर साधे कारकुन अन मजुर
सारेच प्रतिक्षा करत होते अगतिकतेनं रानटी होण्याचा, आगमनांची, आक्रमणाची...
लवकरच आम्हाला कळुन आल की ते उत्सुक होते केवळ
आमच्याशी रोटी बेटी व्यवहार करायला आमची बेगडी मुल्य, आमची किडलेली संस्कृती
हुबेहुब आत्मसात करायला
रानवट माणसांनीही अखेर आमची निराशा केली.

विलास सारंग ( बिनमाणसाळलेला )

बेलीझ शहराच्या धुळकट रस्त्यात मी पाहतो चेहरयाकडॆ
रक्ताची सरमिसळ अजमावीत नीग्रो, ब्रिटीश, स्पॅनिश,
माया इंडीयन, हिन्दुस्थानी, आणि काही वेस्ट इंडीजमधुन आलेले हिन्दुस्थानी:
त्यांना ’कुली’ म्हणतात; मॅटिल्डाला अभिमान आपण ’कुली’ जातीचे याचा :
तिला ’कुली’ शब्दाचा अर्थ ही ठाउक नाही.

विलास सारंग (खेळ - २००७ )

गेले काही दिवस काढले अँग्लो सॅक्सन ’ सीफ़ेअरर ’ च्या खडबडीत
अक्षरावून बोटं फ़िरवण्यात मी ही तयार आहे. या क्षणी स्वदेशी विजनवास पत्करायला.

विलास सारंग ( १९७१ चा हिवाळा )

मग कशाला हा वांझ कीस ?
निशब्द विजेचा करंट तुटला
की तुझा माझा संबध तुटला

विलास सारंग (सडयावरुन उतरणीला )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदस्य मुग्धमयुर यांना प्रोत्साहन आहेच.

मुग्धमयुर यांच्या पहिल्या उतार्‍यात किरण नगरकरांच्या मुलाखतीत मुलाखतकार आणि नगरकर दोघेसुद्धा पूर्णतः इंग्रजी शब्द (विशेषनामे नव्हेत, तर सामान्यनामे, विशेषणे, क्रियापदे) वापरतात, असे दिसते. नगरकर ललित वाङ्मयात मात्र मिश्र भाषा वापरतात. वरून असे जाणवते, की "काही प्रसंगीं एकाच भाषेतील (प्रमाण-प्रचलित, घरगुती-प्रचलित नव्हे) कोशातील शब्द वापरणे शैलीदार असते, तर अन्य प्रसंगी मिश्र शब्दसंपदा वापरणे शैलीदार असते." किरण नगरकरांच्या मुलाखतीत त्यांनी मराठी वा अन्य ४ भारतीय भाषांमधील सामान्यनामांची पेरणी केलेली नाही, हे किरण नगरकरांचे लंगडेपण किंवा खोटारडा कृत्रिमपणा म्हणावे का? तर नाही.

मुग्धमयुर यांच्या दुसर्‍या प्रतिसादात मिश्र शब्दसंपदेचे काही ललित उतारे आहेत. त्यांचा निबंध तशा प्रकारची कृती आहे काय?

सध्या माझ्या हाताशी पुस्तक नाही, पण जमल्यास कोलटकरांच्या कवितांच्या पुस्तकाची प्रस्तावना बघायची होती. त्या प्रस्तावनेत प्रमाण-प्रचलित अशा एकाच भाषेतील कोशातील शब्द वापरलेले सापडतील असे मला नक्की वाटते.

लेखनाचे उद्दिष्ट्य काय? हे जाणून त्याकरिता सुयोग्य शैली निवडावी, आणि त्या शैलीकरिता योग्य अशी शब्दसंपदा वापरावी.

सदस्य अरविंद कोल्हटकर यांचा सल्ला मैत्रीपूर्ण आहे, असे जाणून तो ऐकावा, आणि वाटल्यास अंगीकारावा, जड वाटल्यास सोडून द्यावा. परंतु मुग्धमयुर यांनी उद्धृत केलेल्या प्रसिद्ध लेखकांना या दोन शैली कधी वापरायच्या त्याचे भान नव्हते, असा गैरसमज मात्र बाळगू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्लिज या पुस्तकाचे नाव व लेखक कोण हे सांगाल का ?
Poetry is the last preserve of honest speech & the outspoken heart. हे तर फारच आवडल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Good Poems for Hard Times - Garrison Keillor हे त्या पुस्तकाचे नाव आहे. ऑफीसमध्ये अजून एक अफलातून सुंदर पुस्तक आहे. त्याचं नाव आता २-३ तासात कळवते.
____________

The Language of Life - Bill Moyers ..... अप्रतिम पुस्तक आहे. मिळाल्यास जरुर वाचा.

पण ती फ़ीलींग कडुन थींकींग कडे नकळत सरकु लागली

वरुन आठवले,
याच पुस्तकातील, कवि गॅरी स्नायडर यांच्या कविता कशी सुचते याबद्दलच्या अतिशय सुंदर ओळी -

It comes blundering over the
Boulders at night, it stays
Frightened outside the
Range of my campfire
I go to meet it at the
Edge of the light

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्लिज या पुस्तकाचे नाव व लेखक कोण हे सांगाल का ?
Poetry is the last preserve of honest speech & the outspoken heart. हे तर फारच आवडल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'लाऊड थिंकिंग' आवडलं.

दुसर्‍या भागात दुर्बोध कवितांवर वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही "Myrna D Badgerow " या अंध कवियत्रीच्या कविता वाचल्यात का? खूप अलंकारिक अन तरल असतात. शब्दयोजना सुरेख असते. तिच्या मते कविता काय आहे-

Poetry Is....

how do I define, describe,
make it come alive so that you
might see what it is to me.....

poetry is an unfinished dream, a
thought given wings, and that
moment almost forgotten... it is

a reflection of self, a breath never
taken, and a memory I cannot
forget... poetry is a glimpse into

the past, vision of tomorrow,
and truth of today... it bleeds
sorrow and radiates joy, marks

time and remains timeless, is rich
tapestry and blank canvas, and
it is the music that fills my heart

and what it means to me is
....everything.

मुग्धमयुर अजुनी लिहा, खूप लिहा, आमच्यासारख्यांना कविता आवडतात पण तिचे सामर्थ्य व्यक्त करायला शब्दच सुचत नाहीत. तुम्ही लिहा. वाट पहातेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आदिम भय जागवणारी - सिल्व्हिया प्लाथ ची कविता कोणती??? प्लीज सांगाल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खाली उधृत केलेल्या कवितेहून पोटंट भीतीदायक कविता वाचली नाहीये. वाचायची तीव्र इच्छा आहे ....... म्हणून सारखी विचारते आहे. तुम्ही प्लाथ ची "Elm" कविता म्हणत असाल तर मला ती ठीक वाटली. खरच रॉ (आदिम) भावना जागवणार्‍या कविता ....अतोनात आवडतात.

____________________

मी आजवर वाचलेल्या सर्वोत्तम कवितांपैकी एका कवितेबद्दल हा धागा आहे. ल्युसिल क्लिफ्टन या कवयित्रीची पराकोटीची दाहक, इन्टेन्स कविता म्हणून मला "शेपशिफ्टर पोएम" ही कविता अतिशय आवडते. अतिशय वेगळ्या विषयावरील ही कविता वाचकाच्या हृदयात भीती, घृणा, वात्सल्य आणि करुणा यांचा कल्लोळ माजवते, या सर्व भावना एकाच वेळी उद्दीपीत करते.

या विषयावर मी वाचलेली ही पहीलीच कविता. माझा ल्युसिल क्लिफ्टन या कवयित्रीला , तिच्यातील प्रतिभेला कडक सॅल्यूट. विषय सांगत नाही. कविता वाचल्यावर उमगेलच.

the legend is whispered
in the women's tent
how the moon when she rises
full
follows some men into themselves
and changes them there
the season is short
but dreadful shapeshifters
they wear strange hands
they walk through the houses
at night their daughters
do not know them
2
who is there to protect her
from the hands of the father
not the windows which see and
say nothing not the moon
that awful eye not the woman
she will become with her
scarred tongue who who who the owl
laments into the evening who
will protect her this prettylittlegirl
3
if the little girl lies
still enough
shut enough
hard enough
shapeshifter may not
walk tonight
the full moon may not
find him here
the hair on him
bristling
rising
up
4
the poem at the end of the world
is the poem the little girl breathes
into her pillow the one
she cannot tell the one
there is no one to hear this poem
is a political poem is a war poem is a
universal poem but is not about
these things this poem
is about one human heart this poem
is the poem at the end of the world

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0