शिव्या व साहित्य
व्यवस्थापकः या धाग्यावरील इथे दिलेल्या प्रतिसादाचे रुपांतर नव्या चर्चाप्रस्तावात करत आहोत. या निमित्ताने एकुणच शिव्या व त्याची विविध साहित्यातील योजना, त्यांचे सौंदर्य, केलेल्या चतुर वापरांची उदाहरणे, विडंबने इत्यादी संबंधित व/वा समांतर विषयांवर चर्चा करता यावी या उद्देशाने धागा वेगळा काढला आहे.
=========
वाक्य पुरे होण्याआधीच त्याला हुंदके अनावर झाले.
क्षणभर थांबलेला निसर्ग पुन्हा नाचू लागला.
भगवान म्हणाले, 'Fuck you Man.'
आणि त्यांनी परत नदीत उडी मारली.
पुन्हा जोरजोरात कर्कश रडगाणे सुरू झाले.
लाकूडतोड्या म्हणाला, 'सॉरी, ही माझी नव्हे.'
श्रीभगवान म्हणाले, 'तुझ्या आईची गांड',
आणि त्यांनी परत नदीत उडी घेतली.
भगवान स्वतःशीच पुटपुटले, 'Fuck you.'
बोले तो, शिव्यांचे आपल्याला वावडे नाही. अगदी देवाने दिलेल्या शिव्यांचेसुद्धा नाही. (नाहीतरी माणूस देवाला आपल्या प्रतिमेतूनच घडवितो, नाही का? म्हणूनच तर भटांच्या गणपतीला मोदकांचाच नैवेद्य लागतो, तर कोंकणातला मासळीसाठी अडून बसतो, म्हणतात. म्हणजे, असे ऐकलेले तरी आहे. तर ते एक असो. तर सांगण्याचा मुद्दा, शिवराळ माणसाच्या देवाच्याही तोंडून जर शिव्या निघाल्या, तर त्यात नवल किंवा वावगे ते काय मानायचे?) पण त्या शिव्या कशा, नैसर्गिकपणे स्रवल्यासारख्या, आपसूक आल्या पाहिजेत, वाक्यात चपखल बसल्या पाहिजेत. त्या ऐकून, ऐकणार्या त्रयस्थालासुद्धा त्यातून मजा आली पाहिजे. दाद द्यावीशी वाटली पाहिजे.
इथे म्हणजे कसे, हा देव, शिव्या दिल्याने आपण "कूल" भासतो, असल्या काहीतरी खुळचट समजुतीखाली ओढूनताणून मध्येच इंग्रजी, मध्येच व्हर्न्याकुलर शिव्या फेकताना दिसतो. त्यातून तो "कूल" वगैरे काही नाही, तर भंपक वाटतो, खुळचट वाटतो. त्याच्या तोंडातून येणार्या या शिव्या सहज वाटत नाहीत, प्रयासाने दिल्यासारख्या वाटतात. त्यामुळे मजा येत नाही.
तर मग ऐकणार्यास मजा येईल अशा, वाक्यात चपखल बसतील अशा, देवाच्या तोंडून सहजगत्या निघणार्या शिव्या असाव्यात तरी कशा? याच्या उदाहरणांचा विचार करत असता कॉलेजचे दिवस आठवले. टिपिकल हिंदी पट्ट्यातल्या वसतिगृहाचा माहौल. आमच्या उत्तरप्रदेशी, हरयाणवी, राजस्थानी वगैरे सहाध्यायांनी एकदा (खरे तर अनेकदा) एकंदरीतच उत्तरेत मौखिक परंपरेने प्रचलित असलेल्या काही अपौरुषेय वाङ्मयाचे नमुने ऐकवले होते. (त्यातील उत्तरप्रदेशी, राजस्थानी, हरयाणवी वगैरे स्थानिक मामूली पाठभेदांवरही त्यानंतर चर्चा-परिसंवाद वगैरे घडला होता, पण त्याचे तपशील आता तीसएक वर्षांनंतर साफ विसरलो.) एकंदरीत रामायणातल्या वनवासपर्वातील विविध घटनांना कव्हर करणारी काव्यमाला असावी. पूर्ण काव्यमालेची दीक्षा आम्हास न देता केवळ त्यातील तुटकतुटक वेचेच आमच्या तमाम गुरुवर्यांनी आम्हांस ऐकविल्याने ती पूर्ण माला काही आम्हांस अवगत नाही. परंतु जे काही थोडे अवगत आहे, त्यातील एक वेचा येथे उदाहरण म्हणून चपखल बसू शकेल, असे वाटल्याने वानगीदाखल प्रस्तुत करीत आहे.
तर प्रसंग असा आहे: राम, सीता आणि त्यांच्या मागेमागे लक्ष्मण असे तिघे वनवासास आलेले आहेत. दिवसा हिंडायचे, नि रात्री गुहेत निजायचे, असा त्यांचा वनवासातील परिपाठ आहे. अर्थात, राम आणि सीता गुहेत निजणार, आणि (त्यांना प्रायव्हसी मिळावी म्हणून म्हणा, किंवा गुहेत जास्त जागा नसल्याने म्हणा) लक्ष्मण गुहेबाहेर झोपणार, हे ओघानेच आले. (ते गिरगावातल्या चाळींत नाही का, जेमतेम खोली-दीड खोलीच्या खणात खच्चून माणसे भरलेली असत, नि मग त्यातली काही रात्री बाहेर ग्यालरीत झोपत, अगदी तस्से. तेवढीच आपली जंगली श्वापदांपासून, झालेच तर चोरांचिलटांपासून राखण! नाहीतरी हा काहीही कारण नसताना लोचटासारखा मागेमागे आलेलाच आहे, उपयोग काय याचा मग? तर तेही एक असो.)
आता, चौदा वर्षे वनवास म्हटल्यावर त्यात नेमेचि हिवाळा हा कधीतरी तर यायचाच; तो टळायचा कसा? आणि हिवाळा आला रे आला, की रात्री जाम थंडी पडायची. आता, रामभाऊ-सीतामाई तसेही गुहेत झोपत असल्याकारणाने त्यांचे काही बिघडत नसे, पण बाहेर झोपणार्या लक्ष्मणरावांची मात्र पंचाईत! तर अशा एका नेहमीपेक्षा जरा जास्तच कडाक्याच्या हिवाळ्यातल्या एका घटनेचे हे वर्णन आहे.
चित्रकूट के घाट पे पड़ी जोर की ठंड
राम बोले लक्ष्मण से, "मर, बहन के लंx!"
"मर, बहन के लंx, साथ में कंबल क्यों नहीं लाया,
चौदह बरस के वनवास में क्या गाँx मराने आया?"
आता, या शिव्या, भडकलेल्या रामभाऊंच्या तोंडातून कशा ओघवत्या आल्यासारख्या नाही वाटत? त्यातून त्यांचा सात्त्विक (की कसलातरी) संताप, ऐकणार्या त्रयस्थालासुद्धा कसा जाणवतो! शिवाय, धाकट्या भावाला शिव्या घालणारा टिपिकल उत्तर हिंदुस्थानी थोरला भाऊही हुबेहूब डोळ्यांसमोर उभा राहतो. नाहीतर वरच्या उदाहरणातला देव! आहे काही दम त्याच्यात?
(टीप: वरच्या अवतरणातील फुल्या या आम्हीच टाकलेल्या आहेत. काय आहे, शिव्या ऐकण्यावाचण्याचे आम्हांस जरी वावडे नसले, तरी आमचा पिंड मुळात वरण-भात-भेंडीची भाजी-टैप्सच असल्याकारणाने ("कारण शेवटी आम्ही" इ.इ. - पु.ल.) अखंड शिव्या टैपायला आम्ही अजूनही कचरतो. बोले तो, वरण-भात-भेंडीची भाजी-टैप्स लोक शिव्या देत नाहीत, असा आमचा दावा नाही. पण व.-भा.-भें. भा. हा एक ष्टीरियोटैप आहे, आणि हा टैप्स लोक हे व.-भा.-भें. भा.प्रमाणेच मिळमिळीत ("हाय कंबख़्त, तू ने भेंडीदेखील खायी ही नहीं!") असतात, असा एक लोकापवाद आहे. नव्हे, त्यांनी तसे असावे, अशी लोकापेक्षा आहे. असो चालायचेच.)
(अवांतर: उपरोल्लेखित काव्यमालेत आणखीही काही रोचक वेचे आहेत. उदाहरणार्थ, वर वर्णन केलेल्या प्रसंगाच्या थोडेसेच नंतर, रात्रीचे वेळी काही नाजूक प्रसंगी रामभाऊंना काही अडचण उपस्थित होते, त्याबद्दल ते निजल्या जागेवरूनच ओरडून बाहेर झोपलेल्या धाकट्या लक्ष्मणाजवळ तक्रारवजा खंत व्यक्त करतात. तर बाहेर झोपलेला लक्ष्मण तत्परतेने निजल्या जागेवरूनच त्यांना "रघुकुल रीत सदा चली आयी"च्या ष्टायलीत अडचणीच्या निवारणार्थ सल्ला देतो, असाही काही प्रसंग आहे. किंवा, इतरत्र, राम आणि सीता दिवसा पावसाळी आल्हाददायक वातावरणात हिंडत असताना त्यांच्यातील कामुक प्रेमसंवाद आहे. परंतु, ही सर्व वणने कितीही रसनिष्पत्तिजनक असली, तरी या सर्वांत नुसतीच अश्लीलता आहे, ओघवत्या (किंवा कशाही प्रकारच्या) शिव्या नाहीत, या कारणास्तव प्रस्तुत संदर्भात त्यांचे प्रयोजन नाही, अत एव ती उदाहरणे येथे उद्धृत करण्याचा मोह आवरलेला आहे. इत्यलम्|)
-----------------------------------------------------------------------------------------
(जाता जाता: वस्तुतः, आम्ही येथे उद्धृत केलेला छोटासा वेचा टंकावयास आम्ही प्रथम काहीसे कचरतच होतो. (कारण, मुळात आम्ही व.-भा.-भें. भा.-टैप्सच, त्याला कोण काय करणार?) परंतु मग प्रस्तुत कविता कोल्डप्रिंटात आलेली पाहिली, इतकेच नव्हे, तर तिची (का, कोण जाणे, पण) प्रशंसाही झालेली पाहिली, म्हटल्यावर म्हटले, की हे जर खपू शकते, तर व्हाय नॉट? मग आपणच काय घोडे मारले आहे? म्हणून मग मनाचा हिय्या की काय तो करून वेचा टंकून दिलाच, झाले. असो.)
===========================================================================================
(अतिअवांतर:
'Look at this Blue Jeans.
Guess. UK'
लाकूडतोड्याने जीन्स हातात घेतली,
निरखली व त्यांना, ती परत देत तो पुटपुटला,
'ही नव्हे माझी...'
वाक्य पुरे होण्याआधीच त्याला हुंदके अनावर झाले.
क्षणभर थांबलेला निसर्ग पुन्हा नाचू लागला.
भगवान म्हणाले, 'Fuck you Man.'
जीन्सचा, नि त्यातही यूकेचा, संदर्भ आहे, तर देवाने त्यापेक्षा 'fcuk you, man' म्हटलेले खपून गेले नसते काय? थोडे साटल्यही साधले असते.
असोच.)
आमचे २ पैसे
आक्षेप पटला नाही.
पण त्या शिव्या कशा, नैसर्गिकपणे स्रवल्यासारख्या, आपसूक आल्या पाहिजेत, वाक्यात चपखल बसल्या पाहिजेत. त्या ऐकून, ऐकणार्या त्रयस्थालासुद्धा त्यातून मजा आली पाहिजे. दाद द्यावीशी वाटली पाहिजे.
शिव्या ओघवत्या आल्या आहेत, पण बाकीची कविता बोजड झाली आहे त्यामुळे आक्षेप शिव्यांना नसुन बाकीच्या कवितेच्या भाषेला हवा होता.
वाक्य पुरे होण्याआधीच त्याला हुंदके अनावर झाले.
क्षणभर थांबलेला निसर्ग पुन्हा नाचू लागला.
भगवान म्हणाले, 'Fuck you Man.'
आणि त्यांनी परत नदीत उडी मारली.
च्या एवजी -
वाक्य संपायच्या आधीच तो हगला,
निसर्ग परत यडा झाला,
भगवान बोलला, 'Fuck you Man.' किंवा भगवान बोलला, 'तुझ्या आयची जय.'
अन परत गुल्लाट झाला.
वरील लेखावरुन तुकारामाचा मॉडीफाय एडीट केलेला अभंग आठवला
कोसला कार नेमाडे यांच्या एका पुस्तकात याचे वर्णन आलेले आहे.
ते म्हणतात की तुकारामाचा सध्याचा प्रचलित अभंग
भले तरी देउ कासे ची लांगोटी
पण नाठाळाच्या माथी हाणु काठी
हा मुळ अभंग
भले तरी देउ गांडी ची लांगोटी
पण नाठाळाच्या माथी हाणु काठी
ज्यांना तो शब्द पचला रुचला आवडला नाही त्यांनी त्याला त्याएवजी कासेची शब्द वापरला.
विठ्ठलाची ओळख तुकारामा थ्रु सांगणारे कोलटकर मात्र वाचले
अरुण कोलटकरांची कविता मात्र सुदैवाने वाचली नाहीतर कोणा श्री.पु. भागवत वा लोकल म.सं.स वा म.सं.पाणीनींच्या च्या हातात आली असती. तर कीती कट सुचविले असते याचा विचार करतो व कट केल्यानंतर मुळ कविते त कीती दम राहीला असता विचार केला तरी अंगावर काटा येतो. व तसे झाले नाही याने जीव सुखावतो.
उदा. चरीत्र या त्यांच्या कवितेचा ग्रॅन्ड क्लायमॅक्स
ट्रक अंगावर घालुन ड्रायव्हर म्हणाला
दिखता नही मादरचोद दिखता नही
कसा झाला असता ?
एडीट केल्यावर तो कदाचित असा झाला असता
दिसत नाही नतद्र्ष्टा दिसत नाही
किंवा
दिसत नाही चांडाळा दिसत नाही
बाकी चांडाळ एडीटर्स ना खुप आवडला असता बहुधा एक अंदाज आपला कारण चांडाळ तसा एक इंटरेस्टींग शब्द आहे
?
एडिट करावे, असे नेमके कोणी सुचविले आहे?
शब्दाला आक्षेप नाही; मात्र, हे जे काही छापून आलेले आहे (बोले तो, ते 'चित्रकूट के घाट पे' नव्हे. ते छान आहे. हे ते दुसरे.), ते भिकार आहे, एवढेच म्हणणे आहे.
(तुकारामबुवांच्या 'वरिजनला'स हा आक्षेप लागू पडू नये. त्यांनी त्यांच्या काळात जी प्रचलित भाषा होती, तशी वापरली. ते तर 'स्त्रिया' अशा अर्थी 'रांडा'सुद्धा म्हणतात. त्यांच्या काळची प्रचलित भाषा तशी होती, 'रांड' या शब्दाचा अर्थ तेव्हा वेगवेगळ्या संदर्भांत 'स्त्री', 'विधवा' किंवा 'वेश्या' यांपैकी कोणताही होऊ शकत असे, त्याला ते काय करणार? त्याचप्रमाणे, 'गांड' या शब्दाचा वापर चारचौघांत सभ्य संभाषणांत वर्ज्य नव्हता, त्यास अनुसरून त्यांनी तो केला, इतकेच.)
हे कसे वाटते?: त्या देहावर
हे कसे वाटते?:
त्या देहावर अग्निरथासी घालुन चालक वदला
मातृरता रे मूढ मनुष्या दृष्टि नाही का तुजला ?
किंवा
चालक वदला अग्निरथासि घालुनि वर त्या देही
मातु:श्रीरत जीवा तुजला दिसत नाही का काही ?
लगालगा केलीय कविता त्यामुळे ओढाताण नक्कीच झाली असणार ल आणि गांची.
देहिं तया अग्निरथा, घालुनी
देहिं तया अग्निरथा, घालुनी चालकू ऐसा वदला
मात्रागमनी मूढा, दृष्टि नाहीं जणों, का कडमडला? ||
किंवा
चालक वदला अग्नीरथासि घालुनी, त्याचिया देही
पाही मात्रागमन्या, नीट डोळे उघडुनी तरि काही ||
आधीचीही आर्या, जमली खरि होती जरि ती खास |
नापास तिज न करितां, धरिली परि जिल्बिनिर्मिती-कास |
कबिराचे दोहे
@ 'न'वी बाजू - या रामसीतालक्ष्मणाप्रमाणेच 'कबीरा बैठा झाड पे.... ' पासून सुरू होणारे काही दोहे आपणांस माहीत आहेत का ? आमच्या हाष्टेलगुरूंनी अशीच एक 'धबधबा आणि त्यासमोर उभा असलेला कुठलासा एक देव (बहुधा इंद्र)' वगैरे मसला भरलेली एक पौराणिक कथा आणि त्यावरचे कबिराचे काव्यविवेचन ऐकवून श्रोत्यांच्या कानाच्या पाळ्या गरम केल्या होत्या. त्यावेळी आम्ही फारसे लक्ष न दिल्याने ते ज्ञानकण कर्णसंपुटांत साठवू शकलो नाही. तुम्हांला माहीत असल्यास आम्हांला व्यनि करून उपकृत करावे ही विनंती.
अवांतर
भृसुंडी रामायणावर एकदा, आमची चर्चा चालू असताना, कंपनीत असलेला एक 'पांडे' मला म्हणाला," छी, छी छी, साब, कैसी बातें कर रहे हो ? आपको मालुम नाही? लक्ष्मणने सीता मैयाके सिर्फ पाँव देखे थे, इसलिये तो केवल वही आभूषण पहचान सका."
मी म्हणालो," अरे , वो खुले दिलसे सीतामाई की तरफ क्यूं नही देखता था? क्यों की उसका खुदके उपर भरोसाही नही था."
जिज्ञासूंनी भृसुंडी रामायण मिळवून वाचावे.
मूळ धागा : अरेरे, नवी बाजूंकडून अधिक अपेक्षा होत्या. त्यांच्या प्रतिक्रियांइतकाच त्यांचा धागाही खुसखुशीत असेल असे वाटले होते. असो. बाकीचे काव्य व्यनि करा, जमले तर!
वा! 'नाचू आनंदे!' धागा...
मोरोपंतांची एक आर्या वाचनात आली होती...
स्वस्त्री घरात नसता, कंडुशमनार्थ रंडी राखावी |
तीही घरात नसता, स्वहस्तेची बुल्ली दाबावी ||
खरा अर्थ असा आहे,
स्वस्त्री घरात नसता, कंडु (=खोकला)शमनार्थ रंडिरा (=खडीसाखर) खावी |
तीही घरात नसता, स्वहस्ते चीबुल्ली (=पडजीभ) दाबावी ||
:)
अतिवाचनाने कामातून गेलेला,
पिवळा डांबिस
निषेध
विकृतीचे ओंगळवाणे जाहीर प्रदर्षन आणि सम्र्थन करनार्या या लेखाचा तीव्र शब्दात निषेध
आन्तर्जालावरील मराठी सन्स्थळावर लिहिताना आपण स्सर्वजनिक फोरम वर काय बोल्तोय याचे भान असावे
हिन्दु देवता व सन्त याबाबत निन्दानालस्ती करनारे लेखन केल्याबाबत लेखकाची घ्रूणा वाटते
योग्य ती कार्यवाही करनेत यावी
भारतीय संस्कृतीत भक्ताच
भारतीय संस्कृतीत भक्ताच इश्वराशी नात हे बहुआयामी आहे. मटा वर हा एक लेख आढळला.
काँटेक्स्ट दुर्लक्षीत होण्याची शक्यता ?
मुळ धागा लेख प्रतिसादातून हा चर्चा विषय स्वतंत्र करण्याचा संपादकांचा उद्देश चांगला असला तरीही डायरेक्ट या लेखावर येणार्या वाचकांकडून मुळ काँटेक्स्ट दुर्लक्षीत होण्याची शक्यता वाटते. नांगी गळू लागलेले फुलपाखरू + लाकूडतोड्याची गोष्ट हे दोन मिळून एक अती प्रदीर्घ काव्य-लेख बनतोय. लाकूडतोड्याची गोष्ट हि कविता नांगी गळू लागलेले फुलपाखरू मधील लेखकाची भूमीका समजून न घेता वाचली तर खूप महत्वाचा आणि मोठा काँटेक्स्ट सुटून जातो. लाकूडतोड्याची गोष्ट हि कविता नांगी गळू लागलेले फुलपाखरू हे अतीच दिर्घ असल्यामुळे त्याचा संक्षेप करण्याचा मी या प्रतिसादातून प्रयास केला आहे. लाकूडतोड्याची गोष्ट येथे माझ्या प्रतिसादातून काव्याच्या माझ्या मतानुसार असलेला रसग्रहणाचा प्रयत्न केला आहेच.
...... त्याच्या तोंडातून येणार्या या शिव्या सहज वाटत नाहीत, प्रयासाने दिल्यासारख्या वाटतात. .......त्यामुळे मजा येत नाही......इथे म्हणजे कसे, हा देव, शिव्या दिल्याने आपण "कूल" भासतो, असल्या काहीतरी खुळचट समजुतीखाली ओढूनताणून मध्येच इंग्रजी, मध्येच व्हर्न्याकुलर शिव्या फेकताना दिसतो. त्यातून तो "कूल" वगैरे काही नाही, तर भंपक वाटतो, खुळचट वाटतो........
लाकूडतोड्याची गोष्ट या कवितेतील शिव्या (जिथपर्यंत माझा कयास आहे) मजा देण्यासाठी अथवा मजा घेण्यासाठी नसाव्यात. लाकूडतोड्याची गोष्ट कविने वापरलेली श्रीभगवान हि प्रतिमा आजच्या बदललेल्या भांडवलशाहीच्या काळात सर्वच समाजाला मार्केटफोर्सेसच्या कह्यात करणार्या व्यवस्थेचे प्रतिनिधीत्व करते अथवा व्य्वस्थाशरण झाली आहे हे दाखवण्यासाठी वापरली असावी. लाकूडतोड्याची गोष्टमध्ये शिव्यांच्या वापरांचा कवीचा मूळ उद्देश बदललेल्या व्यवस्थेच स्वरूप दाखवणे आणि शिव्या दिल्यानंतरही जाग न येणार्या आपल हरवणार स्वत्व थंड पणे स्विकारणार्या समाजाकडे लक्ष वेधणे समाजपुरुषाला जागे करणे असा असावा. (त्या संबंधाने लाकूडतोड्याची गोष्ट' समजून घेताना (माझ्या मते) २ या प्रतिसादात मी माझे विश्लेषण मांडले आहेच.) देव 'कूल' भासावा म्हणून कवीने तसा वापर केल्याचा आक्षेप बहूधा प्रस्तुत प्रतिसाद (धागा) लेखकाने काव्यातील प्रतिमेची पूर्ण पार्श्वभूमी समजून घेतली नसल्यामुळे त्यांची गल्लत होऊन तर घेतला जात नाही अशी साशंकता वाटते.
...... त्याच्या तोंडातून येणार्या या शिव्या सहज वाटत नाहीत, प्रयासाने दिल्यासारख्या वाटतात. ....
कवी संजीव खांडेकर म्हणतात "मी स्वतः कलेला समाजपरिवर्तनाच्या चळवळीपासून वेगळे मानत नाही." कविचा दृष्टीकोण कलेसाठी कला असा नसून प्रबोधनासाठी कला हि त्यांची भूमीका उघड आहे. बदललेल्या काळात रंजनाच्या क्षेत्रात केवळ कलेलाच मुल्य प्राप्त झालेलय अस नाही तर कलाकारालाही (व्यक्तीला) क्रयमुल्य प्राप्त झाल्याची संजीव खांडेकरांची तक्रार आहेच अर्थात हा वेगळा विषय आहे पण मुख्य म्हणजे त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश प्रबोधन असल्यामुळे कलामुल्य आणि त्यात कुठे उत्कटतेशी तडजोड झाली अथवा कृत्रीमता जाणवल्यास ते मुद्दे वाचकाने गौण गृहीत धरावेत हि कोणत्याही प्रबोधनवादी लेखकाची अपेक्षा असू शकते.
त्यामुळे "तोंडातून येणार्या या शिव्या सहज वाटत नाहीत, प्रयासाने दिल्यासारख्या वाटतात." या बाबीशी मात्र मी सहमत आहे परंतु हा कवी स्वभावतः शिव्या न देणारा पांढरपेशा कवि काही वैचारीक समाज प्रबोधनाच्या उद्देशाने शिव्या वापरत असल्याने तसे होत असावे.
शिव्या आणि शिव्यांमध्ये इंग्रजीशब्दांचा वापर हा बदलत्या काळाचेही द्योतक असावा असे वाटते. "अगं प्रोलेटॅरिएट, प्रोलेटॅरिएट...'' प्रोलेटॅरिएट येथे रोजंदारी कामगार हा शब्द वापरला असता तर त्यातून व्यवस्थेची कामगाराप्रती गरीबांप्रती असलेली तुच्छता कवितेतून प्रकर्षाने पुढे येणे कठीण झाले असते पण तीच तुच्छता "अगं प्रोलेटॅरिएट, प्रोलेटॅरिएट...'' या शब्दातून अधीक व्यवस्थीत व्यक्त होते. प्रोलेटॅरिएट = रोजंदारी कामगार हे जरी बरोबर असले, कवि स्वतः डाव्या चळवळींशी सहानुभूती राखत असला तरी काव्यातून तुच्छता स्वतःसाठी शिवी नसलेला शब्द सुद्धा शिवी समकक्ष वाटावा अशा पद्धतीने मांडतो म्हणजे तुच्छता दर्शक लेखनातून कविला शिव्यादेऊन टैमपास करायचा आहे असे नसावे.
नांगी गळू लागलेले फुलपाखरू मध्ये 'विठ्ठल' हे चळवळीत स्वतःस झोकून देणार्या कार्यकर्त्याच्या ध्येयाचे प्रतिक म्हणून मांडणी करणारा काव्य-लेखक श्रीभगवानाच्या तोंडी शिव्यांचा वापर उथळपणे करण्याच्या हेतुने करणारा बेजबाबदार साहित्यिक नाही हे , इतर टैमपास अश्लिलतेशी तुलना करण्याची घाई करण्यापुर्वी येथे लक्षात घेणे जरुरी आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे.
अर्थात नांगी गळू लागलेले फुलपाखरू ह्या लेखातील काव्य लेखकाची भूमीका समजावून घेतलेली नसल्यास माझे हे समर्थन हि ओढून ताणून केल्यासारखे वाटू शकते. एकुण काँटेक्स्ट दुर्लक्षीत होण्याची शक्यता दिसते आहे.
जीन्सचा, नि त्यातही यूकेचा,
जबरी.. तुमच्या असल्या प्रतिसादांसाठीच ते शेवटापर्यंत वाचणे भाग पडते.
बाकी प्रतिसाद आवडला असला तरी वरणभातापर्यंत ठीकाय (त्यात भात आंबेमोहोराचा आणि वरुन तूप लिंबू मीठ लोणचं हे महत्वाचे विसरलातच, कसली भटें तुम्ही).. पण अशा स्वर्गीय व.भा.तू.मी.लिं.लो. सोबत भेंडीची भाजी आपणांस आवडते हे ऐकून यक्क झाले. ती काय भाजी आहे? त्याऐवजी बिरड्या किंवा उकडलेल्या बटाट्याची भाजी, अळूचं फदफदं, किमान तोंडलीची भाजी नाही का चालणार?