बरळप्रहरी..

हातात आहे ग्लास आणि सर्वकाही सत्य आहे
बहरत्या या बरळप्रहरी सर्वकाही शक्य आहे

फेसाळती शाम-ए-गझल अन बेगडीसा सूर आहे
आज सच्ची काहीबाही वाहवाही शक्य आहे

अधभरा अन अधरिकामा जीवनाचा जाम आहे
याच प्रहरी भाडखाऊ फलसफाही शक्य आहे

और जामे-आरजू गर मुठ्ठिमध्ये घट्ट आहे
बाकी सारे मिथ्य कहेना या प्रवाही शक्य आहे

यकृताच्या गाळणीला कुछ पलांचे काम आहे
याचवेळी काव्य काही अर्थवाही शक्य आहे

field_vote: 
4.2
Your rating: None Average: 4.2 (5 votes)

प्रतिक्रिया

या ब्बात! असे अनेक बरळप्रहर आणि बरळक आठवून गेले...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मराठी शायरी ला बरे दिवस आलेत
भाउसाहेब पाटणकर व अरुण कोलटकरांना एकदमच वारस मिळाले.
भन्नाट गझल/कविता
मस्त भट्टी (शब्दांची) जमलीय,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाउसाहेब पाटणकर व अरुण कोलटकरांना एकदमच वारस मिळाले.

अरे बापरे!

(I hope that's meant to be a compliment.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहोत खूब !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे अविचार.

जबरी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

छानच!

गवि तुम्हाला काय लिहिता येत नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वा!

असे काही वाचले की म्लेंच्छभाषेचा अभ्यास करावयाची ख़्वाहिश अजून गहिरी होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

येथे म्हणजे, 'आना मेर्री जान, मेर्री जान, सण्डे के सण्डे' लिहावयास - नि समजावयास - आंग्लभाषेचा अभ्यास जितपत आवश्यक आहे, तितपतच म्लेंच्छभाषेचा अभ्यास प्रस्तुत कविता/गझल/जे-काही-असेल-ते लिहिण्यावाचण्यासमजण्यास आवश्यक आहे.

मला वाटते, प्रस्तुत कविता/गझल/जे-काही असेल ते त्याचा मुद्दा नेमका हाच असावा. फार काही नाही, अशा मूठभर म्लेंच्छयावनी शब्दांची उगाचच अधूनमधून पखरण शोभेसाठी पुरेशी आहे.

ती ('फलसफा'मागील) 'भाडखाऊ'ची (कष्टमरी-ऑब्लिगेटरी-पादपूरणार्थ) पेरणीदेखील चपखल, सुस्थानी (पर्फेक्टली प्लेस्ड) आणि मार्मिक. शिवाय, तो हातातला ग्लास, फेसाळती शाम-ए-गझल, जीवनाचा जाम (अधभरा अधरिकामा ऑर अदरवाइज़) वगैरे नेहमीचाच यशस्वी मालमसाला... मराठीतील भटोत्तरी गझल-कॉटेजइंडष्ट्रीवरील 'मुँह-में-ज़बान'-ष्टाइल टिप्पणी म्हणावी काय ही?

एकंदरीत, 'खुरच्यां'नंतर बर्‍याच दिवसांत मराठीत तसे काही घडले नव्हते. ती उणीव आज भरून निघाली. भरून पावलो. बहोत खूब!

(जाता जाता, गविंना उद्देशून: तेवढे त्या 'जामे-आरजू गर'बरोबर 'काजूगरा'चे यमक जुळवून काही करता आले नसते काय? नाही म्हणजे, फेसाळत्या ग्लासांबरोबर चखणा झाला असता. शिवाय, 'काजूगर' म्हणजेच 'जाम'/'जांब', हे ऑफ ऑल द पीपल तुम्हाला ऑफ ऑल द पीपल आमच्यासारख्या बिगरकोकण्यांनी समजावून द्यावयास हवे काय?)
...............................................................

अवांतर: हा म्हणजे साधारणतः 'वंटमुरीकर देसाई त्यांचा बोका'सारखा कॉन्स्ट्रक्ट झाला, नाही?

अधभरा अधरिकामा हीच खरे तर ग्लासाची आदर्श स्थिती आहे. कारण, ग्लास अधरिकामा केल्याशिवाय 'कवित्व' सुचणार नाही२अ, आणि अधभरा ठेवला नाही (बोले तो, पूर्ण रिकामा केला), तर गझल लिहिण्यासाठी 'कवी' शुद्धीत राहणार नाही. (तशीही ही कवीमंडळी नेमकी कधी शुद्धीत असतात, हा प्रश्न अलाहिदा.)

२अ 'गझल (जी-यू-झी-झी-एल-ई) केल्यावर सुचते, ती गझल' असे कोणीसे (बोले तो, आम्हीच२ब) म्हटलेलेच आहे.

२ब कवितेअखेरीस 'अनॉनिमस' असे छापून आले, की पाठ्यपुस्तकात कवितेचा भाव वधारतो, हे शाळेत इंग्रजीच्या तासाला शिकलो. अनॉनिमिटीची आमची दांडगी हौस ही तेव्हापासूनची. शेवटी नावात काय आहे, नाही का? (कवीमंडळी टोपणनावे, ते काय ते 'तखल्लुस' की काय म्हणतात ते, वगैरे म्हणूनच घेत असावीत बहुधा.)

खरे तर भटकृत-"गझलेची-बाराखडी"-उत्तरी. हा (पाणिनीतुल्य) ग्रंथराज लिहून भटांनी पुढील तमाम होतकरू गझलकुटीरोद्योजकांच्या पिढ्यांची चांगली सोय करून दिली.

मराठीत: 'टङ्गिन्चीक'. ("काश पूछो के मुद्द'आ क्या है...")

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रस्तुत शमा-ए-ग़ज़ल वाचण्यास म्लेच्छभाषेची तालीम करावी लागेल ऐसा आमचा दावा कुठेच नाही, हे साङ्गू इच्छितो. म्लेच्छभाषेचा अभ्यास करावयास काही एक इम्पेटस लागते, ते यथाशक्ती पुरवण्याचे काम या ग़ज़लेने केले इतकाच आमचा मुद्दा. डिमांड होतीच, सप्लायही होता. परंतु डिमांड असली म्हणजे सप्लाय ऑटोम्याटिकच होतो असे नाही. त्यांमधील कनेक्षन बनवावे ऐशी बुद्धी या निमित्ताने अजून बलवत्तर जाहली इतकेच.

तदुपरि, रोचक तळटीपांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल माफी चाहतो.

'वंटमुरीकर देसाई त्यांचा बोका' यासारखा कॉन्स्ट्रक्ट मिरजेत लै कॉमन होता आणि आहे. इनफ्याक्ट, पोष्ट २००५ हा शब्दप्रयोग आमच्याकडून जरा कमी वापरल्या जाऊ लागला. नपेक्षा जीवनातली पहिली १६-१७ वर्षे हा शब्दप्रयोग यथेच्छ वापरला आहे.

जऽरा विचार करता हा कॉन्स्ट्रक्ट कन्नड प्रभावामुळे बनल्याचे लक्षात आले. "देसाई औरदु मगा" इ.इ.

बाकी 'भटोत्तरी' इथे भट म्हणजे आडनाव की जात हे कळेपर्यंत जऽरा वेळ लागला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एक गरीब प्रश्नः

'वंटमुरीकर देसाई त्यांचा बोका' यासारखा कॉन्स्ट्रक्ट

यात काँट्रास्ट काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कॉ न स ट र क ट

कॉ न ट र आ स ट नव्हे..

-(गविज्या धना बो हो री ही क ह र)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बो हो री ही क ह र

यात बोका मधील बो नसून भो*** मधला भो आहे अशी येक णम्र सूचणा करू इच्चितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भरं. ( भॉर्र )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सरे अन्ना, टेन्शन कादु. अथवा तोंद्रे इल्ला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाकी या निमित्ताने तो वंटमुरे कॉर्नर आठवला आणि दुचाकीवरुन हिंडण्याच्या अन पोरीबाळींना अतिद्रुतफटफटीचालनाने चकित करण्याचा भास स्वतःस देण्याच्या दिवसांच्या आठवणीने अं ह झालो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वंटमुरे कॉर्नरापासून आमचे घर फार लांब नाही. Smile

या निमित्ताने जालावर त्याची दखल घेतल्या गेल्याचे पाहून अं.ह. झालो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे हो की! आंखे निकाल के गोटियां खेलायची वेळ झाली बहुतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हे काय आहे? :-S

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

he meant construct, not contrast.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद. ते आणि शिवाय खाली स्वाक्षरीत लिहिलेले वाचून कुठली कूट लिपी आहे की काय असे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'न'वी बाजूगर..आय मीन 'न'वी बाजूसर, काव्योद्देश अचूक समजल्याबद्दल आभार..!!

बाकी महत्वाचे : काजूगर म्हणजे जाम नव्हे हो.. जाम म्हणजे हे पहा (जाम, जाम्ब, जामफळ कोंकणात असे फिकुटलेल्या रंगाचे असते. अन्यत्र लालही असते. )

काजूगर म्हणजे हे:

जात, चव, कन्सिस्टन्सी आणि सर्वच बाबतीत पूर्ण वेगळी फळे.

चित्रे जालावरुन साभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोलकात्यातही जामफळ विकावयास ठेवलेले पाहिले आहे. काही ठिकाणी त्याची झाडेही होती. एक नंबर भारी फळ. लय आवडलेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रतिसादांप्रमाणेच पोष्टांनाही श्रेणी देण्याची व्यवस्था करता येईल काय?

रोचक, मार्मिक, विनोदी, खवचट, खोडसाळ आणि भडकाऊ एकसमयावच्छेदेकरून देईन म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कैच्या कै गझल(!) वाटली बॉ. (स्पष्टवक्तेपणाबद्दल क्षमस्व).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्पष्टवक्तेपणाबद्दल कशाला क्षमस्व.

कैच्याकै वाटली म्हणजे काय ? अहो कैच्याकैच आहे.

(भाईकाकांच्या "पौष्टिक जीवन"मधल्या "फॉर्म गुजराथीतच आहे" च्या चालीवर वाचावे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज कविता न कळण्याचा दिवस आहे बहुतेक Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अधभरा अन अधरिकामा जीवनाचा जाम आहे

ओहोहो ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गजल आवडली. उर्दू भाषेवर मदार टाकण्याची वेळ - किंवा वख्ते मदारत - ही काळाप्रमाणे यावी लागते. आणि एकाच वेळी कयामतो जहन्नम चा विचार आणि गुलेगुलिस्तॉंचा विचार यांत घर्षण टाळण्यासाठी काही ना काही वंगण-ए-मयाकत ची गरज पडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गमतीदार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0