"Intimate kisses" पुस्तकातील काही erotic कविता - भाग २

भाग १
"Intimate Kisses" हे पुस्तक anthology या स्वरुपाचे आहे हे एव्हाना वाचकांच्या लक्षात आले असेलच. पुस्तक ५ भागात, विभागलेले आहे-
(१) Anticipation & desire
(२) Self awareness & discovery
(३) Admiration & Appreciation
(४) Union & Ecstasy
(५) Afterglow & remembrance
थोड्या अजुन कविता पाहू.
"A Simple Pleasure" या "Joseph H. Ball" यांच्या कवितेमध्ये, नायक सकाळी उठून तिची वाट पहात आहे. ती केव्हाची उठलेली आहे, अन त्याला माहीत आहे रोजच्यासारखी ती येईल, कदाचित त्यालाच उठवायला, कदाचित चहा घेऊन. तशी ती येतेही अन तो तिला जवळ ओढतो अन ती परत एकवार त्याच्याबरोबर दुलईत शिरते.अर्थात ...

When she eases the door quietly open again,
almost sunrise flows through a pale ribbon.
Her robe too is loosely tied.
I slide away the sheet to make her space.
She emerges from the falling robe
as gentle and sure as the morning sun
and I become the sky waiting on the day.


या कवितेमध्ये सकाळच्या वेळेचं, तिच्या लगबगीचं अन त्याने ओढल्यावर सगळी लगबग टाकून तिने तो क्षण कवेत घेण्याचं सुंदर वर्णन तर येतच पण काही fine details अर्थात वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडलेले आहेत. अन हेच "कविता" या साहीत्य प्रकाराचे सौंदर्य आहे. Reader fills in the blanks.

"The Night the Children Were Away" ही "Stephen Dunn" यांची अप्रतिम कविता, कितीदाही वाचा मनच भरत नाही. नावावरुन चित्र रंगवता येते की हे एक मध्यमवयीन, मुलं असलेले जोडपे आहे. मुलांमुळे बरेचदा spontanity चा कोंडमारा झालेले पण एकमेकांच्या गाढ प्रेमात असलेले, passionate जोडपे. आज मुलं जरा बाहेर गेलेली आहेत.
ही संपूर्ण कविताच वाचकाचा मूड हळूहळू build up करत अक्षरक्षः कड्यापर्यंत घेऊन जाते. त्यात वाईन, स्लाइस्ड चीज सजवून त्याने तिच्याकरता "तयार रहाणं", तिला त्याची वाटलेली गंमत, मध्यमवयीन आहेत अर्थातच तारुण्यातील अधीरतेची जागा संथ sensual surety ने घेतलेली आहे.

he wants to make love profanely
as if the profane
were the only way
.
to disturb, to waken, the sacred.
But neither is in a hurry.
They sip wine,

नंतर येते, "bacchanalia" ही "J. B. bernstein" यांची कविता रुपकातून उलगडणारी, "New moon mounts black sky" , "swallow" अशा उपमा-रुपकांतून क्षण टिपणारी, मीलन टिपणारी.

with your flame, I get drunk
from the blood of you, the flesh of you.
Then when the new moon mounts
black sky, I inhale your breath.
and pray to you - swallow me
alive

माझ्या या दुसर्‍या भागातील शेवटची कविता- "floyd skloot" यांची "touches" नावाची. या कवितेत एक प्रेमिक, दुसर्‍यास तीळाच्या तेलाची मालिश (मसाज) करत आहे. मसाज करवून घेणारी व्यक्तीच्या मुखातून अर्थातच समाधानाचे , आनंदाचे हुंकार-सुस्कारे (moans/groans) निघत आहेत. कशावरुन हे आदिम आवाज मीलनाचे गाणे नसतात. गाणं हे फक्त पक्षांनीच गावे काय? गाणं हे फक्त लोकांच्या मेहेफिलीतच ऐकावे काय?


The sound you make
is new to me and I
think of the sound, high
tide makes at the moment
it yields to the ebb,
current a sighing of sea
water under the tug
of a quarter moon

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

वाह.. आवडल्या कविता...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

धन्यवाद अनुप.

पूर्ण कविता वाचायला तर खूप मजा येते. हे पुस्तक वाचणे, अगदी आनंददायक अनुभव आहे. अन मुख्य म्हणजे हा अनुभव रेंगाळतो (linger), क्षितीजे विस्तारतो. अन सर्वच बेमिसाल कवितांप्रमाणे, It leaves a peculier after-glow.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान.
"एरॉटिक" आणि "सेन्शुअस" यांच्यात अर्थच्छटांचा फरक केला, तर दिलेली बहुतेक उदाहरणे "सेन्शुअस"कडे अधिक झुकतात. (वरील तिसरे उद्धरण "एरॉटिक"कडे अधिक झुकते, खरे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! हा फरक कळला नव्हता Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त कविता आहेत. धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0