तेओतिहुआकन - मध्य अमेरिकेतील प्राचीन अवशेष

मेक्सिको सिटी ह्या मेक्सिको देशाच्या राजधानीच्या उत्तरेस ४० कि.मी. अंतरावर तेओतिहुआकन (Teotihuacan) हे अ‍ॅझटेक-पूर्वकालीन प्राचीन अवशेषांचे प्रसिद्ध स्थळ आहे.

क्र. १ आणि २) तेओतिहुआकन गूगल अर्थवरून आणि तेओतिहुआकन विहंगम देखावा.


 


 


 


 


 


 


 


 

कोंकीस्तादोर एर्नान कोर्तेजच्या नेतृत्वाखाली तेनोक्तित्लान (Tenoctitlan - स्पॅनिश विजयानंतर मेक्सिको सिटी ह्या नावाने ओळखले जाणारे आजचे शहर) येथील अ‍ॅझटेक राज्याचा १५२१त पाडाव झाला. त्यावेळी हे राज्य सुमारे १०० वर्षांचे जुने असावे पण त्याच्याबद्दलहि अगदीच तोकडी माहिती उपलब्ध आहे. अ‍ॅझटेक ह्या नावाने ओळखले जाणारे हे लोक जेव्हा आणखी कोठूनतरी तेनोक्तित्लान येथे आले तेव्हा त्यांना एका अज्ञात संस्कृतीने सोडून दिलेले हे अवशेष आढळले आणि त्या स्थानास त्यांनी ’तेओतिहुआकन’ म्हणजे ’देवांची जागा’ असे नाव त्यांच्या ’नहुआत्ल’ (Nahuatl) भाषेत दिले. तेथील मनुष्यनिर्मित आणि टेकडयांच्या आकाराच्या दोन पिरॅमिडना त्यांनी सूर्य आणि चन्द्राची नावे दिली आणि उत्तर-दक्षिण दिशेने असलेल्या दीड-दोन कि.मी. लांबीच्या रस्त्याला ’मृतांचा मार्ग’ असे नाव दिले. ही नावे अशामुळे दिले गेली असावीत की अ‍ॅझटेक श्रद्धेनुसार सूर्य आणि चंद्र हे बहुतेक अन्य सर्व श्रद्धांप्रमाणे विश्वाचा पसारा चालू ठेवण्यात महत्त्वाची कामे करतात. सूर्य रोज पश्चिमेकडे मृत्यु पावतो आणि त्याला नवे जीवन देण्यासाठी मानवी बळीची आवश्यकता असते. तसेच मृत व्यक्तीचा मार्ग ९ पातळयांमधून पाताळाकडे जातो. त्याच नहुआत्ल भाषेतील नावांनी ह्या जागांना आज ओळखले जाते. अ‍ॅझटेक आगमनापूर्वी सुमारे २ हजार वर्षे ह्या ना त्या स्वरूपात तेथे असलेल्या ह्या स्थळाचा मूळ उपयोग काय होता, ते बांधणारे लोक कोण होते, त्यांचा इतिहास काय होता ह्याबद्दल अ‍ॅझटेक लोकांना काहीच कल्पना नव्हती आणि आजचे पुरातत्त्ववेत्ते ज्या अटकळी बांधतात त्यापलीकडे तेओतिहुआकनविषयी आपल्यालाहि फारशी माहिती उपलब्ध नाही पण भव्य आकार, प्रमाणबद्धता आणि बांधकामात दिसणारे कौशल्य ह्यावरून कोणे एके काळी त्या प्रदेशातले ते एक महत्त्वाचे केंन्द्र होते ह्याबाबत शंका वाटत नाही. सूर्य पिरॅमिड २१० फूट उंच असून त्याच्या चौरसाकृति पायाची प्रत्येक बाजू ६५० फूट लांब आहे. ह्या भव्यतेवरून आणि तेथे उरलेल्या भित्तिचित्रांच्या अवशेषांवरून आणि दगडांच्या कोरीव शिल्पांममधून हे स्थान निर्माण करणार्‍या संस्कृतीच्या समृद्धीची कल्पना आपण करू शकतो. सूर्य आणि चंद्राच्या नावाचे दोन पिरॅमिड आणि मृतांचा मार्ग ह्याशिवाय केत्झालकोअ‍ॅत्ल प्रासाद (Palace of Quetzalcoatl), पंख असलेल्या शंखांचा प्रासाद (Temple of Feathered Conches), फुलपाखरांचा प्रासाद (Butterfly Palace), जाग्वार प्रासाद Palace of the Jaguars ह्या नावांनी ओळखली जाणारी स्थाने ह्या अवशेषांमध्ये आहेत. (केत्झालकोअ‍ॅत्ल हे नाव ह्या सर्व संस्कृतींमध्ये मानाचे स्थान असलेल्या आणि पंख असलेल्या सर्पाचे नाव आहे. हा सर्प सूर्याचे एक रूप आहे आणि जाग्वार हे अजून एक.)


क्र. ३ आणि ४) सूर्य आणि चंद्र पिरॅमिड


 


 


 


 

क्र. ५ चंद्र पिरॅमिडजवळील धर्मगुरु प्रासाद. खांबावर केत्झालकोअ‍ॅत्ल पक्ष्याचे चित्र.                               क्र.६ मनुष्याला गिळणारा केत्झालकोअ‍ॅत्ल सर्प.

मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या प्राचीन संस्कृतींचे अभ्यासक असे मानतात की अ‍ॅझटेक आगमनाच्या वेळी, म्हणजे १५व्या शतकाच्या प्रारंभात हे स्थान त्याच्या मूळ निर्मात्यांनी सोडल्याला सुमारे ८०० ते ९०० वर्षे होऊन गेली असावीत. हे स्थान निर्माण करणार्‍या संस्कृतीचा काही अज्ञात कारणाने ह्रास होण्यास सन ६५० च्या सुमारास सुरुवात झाली पण तत्पूर्वी सुमारे २ लाख वस्ती असलेले आणि योजनाबद्ध पद्धतीने उभारलेले एक नगर असावे. त्याचा विस्तार सुमारे ८ चौरस मैल असावा आणि त्याच्या इतिहासाचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे असावेत:

१) १०० ख्रि.पू. - ० ख्रिस्ताब्द खेडेवजा वस्ती.
२) ० ख्रिस्ताब्द - १५० इ.स. पहिली नागरी वस्ती. ’मृतांचा मार्ग’ आणि ’सूर्य पिरॅमिडची’ निर्मिति.
३) १५० इ.स. - ३०० इ.स. दुसरी नागरी वस्ती, उभ्या-आडव्या रस्त्यांचे जाळे.
४) ३०० इ.स. - ६५० इ.स. समृद्ध काळचे शिखर. ’चंद्र पिरॅमिड’ चे निर्मिति. वस्ती ८५,००० ते २००,०००.
५) ६०० इ.स. - ७५० इ.स. उतरती कळा आणि विनाश. ह्या सुमारास कोण्या अज्ञात शत्रूंच्या हस्ते जाळपोळ होऊन ह्या संस्कृतीचा विनाश झाला.

हे अवशेष मागे सोडणार्‍या संस्कृति आणि लोकांबद्दल जरी काही माहिती उपलब्ध नसली तरी अवशेषांच्या रचनापद्धतीवरून आणि उत्खननामधून काही तर्क बांधता येतात. सूर्य आणि चंद्र अशी नावे दिलेल्या पिरॅमिड्सच्या शिरोबिंदूना जोडणारी रेषा ही मेरिडिअनशी (उत्तर आणि दक्षिण ध्रुव ह्यांना जोडणारे आणि खमध्यामधून जाणारे आकाशातील अर्धवर्तुळ) पूर्णतः संलग्न आहे आणि ’सूर्य पिरॅमिड’ तसेच ’मृतांचा मार्ग’ हे उत्तर-दक्षिण अक्षाशी १५.५ अंशांच्या कोनात अहेत. परिणामतः १३ ऑगस्टच्या दिवशी सूर्य पिरॅमिडच्या बरोबर पश्चिम दिशाबिंदूवर सूर्य मावळतो. माया संस्कृतीच्या श्रद्धेनुसार १३ ऑगस्ट हा दिवस जगाच्या निर्मितीचा दिवस आहे. अशा रीतीने तेओतिहुआकनमधील पिरॅमिड बांधणीचा मध्य अमेरिकन कालगणनापद्धतीशी काही संबंध आहे असे म्हणता येते.


                                                                                                     क्र. ७) मनुष्यबलि

अलीकडच्या काळात चंद्र पिरॅमिडच्या खाली विवर खोदून त्याच्या बांधणीबद्दल आणखी माहिती मिळविण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यावरून असे दिसते की जुन्या पिरॅमिडवर नवा थर चढवून मूळच्याहून मोठा पिरॅमिड निर्माण करणे अशा मार्गाने चंद्र पिरॅमिडला सध्याचा आकार आला आहे आणि असे एकाच्या आत एक असे ७ थर मोजले गेले आहेत. ह्या थरांमधून वेगवेगळया ठिकाणी पिंजर्‍यात बंदिस्त अवस्थेतील जाग्वार आणि अन्य प्राणी, बंदी असलेले मनुष्यप्राणी आणि उच्च स्थानावरील अधिकारीवर्ग ह्यांचे बळी केल्याचे अवशेष मिळाले आहेत. ह्यावरून असे दिसते की हे पिरॅमिड निर्माण करणार्‍या लोकाच्या धार्मिक समजुतीत मनुष्य आणि अन्य प्राण्यांच्या बळी देण्याच्या प्रथेला महत्त्वाचे स्थान होते.

मध्य अमेरिकेतील माया, अ‍ॅझटेक अशा सर्व संस्कृतींमध्ये मानवी बळीला महत्त्वाचे स्थान होते. अ‍ॅझटेक समजुतीनुसार सूर्य शक्तिहीन झाल्याने प्रतिदिन सायंकाळी नष्ट होतो. तो पुनः दुसर्‍या दिवशी वर यायचा असेल तर त्याला मनुष्याचा रक्ताचा नैवेद्य द्यावा लागतो. बळी द्यायच्या व्यक्तीला पिरॅमिडच्या माथ्यावर असलेल्या देवळापर्यंत नेऊन त्याला बळी द्यायच्या वेदीवर उताणे धरून ठेवीत आणि धर्मगुरु ऑब्सिडिअन सुरीने एका घावात त्याची छाती उघडून त्याचे हृदय ओढून बाहेर काढी आणि सूर्याला त्याचे दर्शन देई. (हा सर्व विधि चित्रपटनिर्मात्याच्या नजरेतून पाहायचा असेल तर २००६ सालचा मायन पार्श्वभूमीवरील आणि मेल गिब्सनदिग्दर्शित ’अ‍ॅपोकॅलिप्टो’ हा चित्रपट पहा.) असे बळी बहुतांशी अन्य राज्यांशी लढाया करून मिळविलेल्या युद्धकैद्यांचे दिले जात आणि असे बळीसाठी कैदी मिळविणे हे त्या लढायांचे प्रमुख कारण होते. इतिहासकार असे मानतात की अशा लढायांमुळे अ‍ॅझटेक संस्कृति आतून पोखरली गेली होती आणि पुष्कळ अ‍ॅझटेक गटांनी ह्याच कारणाने तेनोक्तित्लानचा पाडाव करण्यात कोर्तेझला साहाय्य केले, ज्यामुळे केवळ ६०० स्पॅनिश सैनिकांच्या बळावर तो अ‍ॅझटेक राज्याचा इमला पूर्णतः ढासळवू शकला.

विशेष ध्यानात घेण्यासारखी एक गोष्ट अशी की इतके उच्च दर्जाचे स्थापत्यकौशल्य मिळविलेली ही संस्कृति काही बाबतीत अगदीच मागासलेली होती. त्यांचे धातुशास्त्राचे ज्ञान मर्यादित होते. लोखंड त्याना माहीतच नव्हते आणि अगदी मर्यादित प्रमाणात ते तांब्याचा उपयोग शस्त्रे आणि दागिन्यापुरता करीत असत. परिणामी दगडांमधून निर्मिलेले हे सर्व काम दगड आणि गारगोटीची उपकरणे वापरूनच करण्यात आले आहे. पशुपालनसंस्कृतीहि त्यांना ठाऊक नव्हती आणि सर्व कामे करण्यासाठी मानवी शक्ति हे एकच शक्तीचे रूप त्यांना ज्ञात होते. असे असूनहि त्यांच्याकडून अशा भव्य प्रकारचे आणि उच्च स्थापत्यकौशल्य दाखविणारे काम होऊ शकले ही आश्चर्याची बाब आहे.


 


 


 


 


क्र. ७) अ‍ॅझटेक काळातील तेनोक्तित्लान - दिएगो रिवेराचे भित्तिचित्र.


 


 


 


 

(चित्रश्रेय: क्र. १ गूगल अर्थ, क्र. २,३,४ आणि ६ विकिपीडिया, क्र. ५ आणि ७ स्वत:)

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

चित्र क्र. ३ मध्ये अनेक छोटे छोटे पिरॅमिड दिसतात. तिथे काही होत असे की इजिप्शियन संस्कृतीप्रमाणे ती थडगी स्मारक सदृश काहीतरी आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्हाला ती लहान-लहान मंदिरं आहेत असं सांगितलं होतं. देऊळ-काँम्प्लेक्स असल्यासारखं. त्याच्या मधल्या मार्गाला 'Avenue of the dead' म्हणतात. बळींना तिथून मुख्य पिरॅमिडवर बळी देण्यास नेत असत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. मायन संस्कृतीबद्दल पण लिहावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. मेशिकोत जायला पाहिजे (पण ड्रग माफियांच्या युद्धाच्या फार कानावर बातम्या येतात. मागच्या महिन्यात तर एल पासो या अमेरिकेतल्या शहरातली एक स्त्री मेक्सिकोतल्या सिउदाद हुआरेझमधून आलेल्या गोळीने मेली. तुम्हाला तिथे अशी हिंसा जाणवली का?)

अ‍ॅपोकॅलिप्टोची डीव्हीडी बरेच महिने घरात पडून आहे. आता अजून काही काळ पडून राहिल असं वाटत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती, मी तिथे २ वर्षांपूर्वी गेले त्या वेळेलाही अशा बर्याच बातम्या होत्या, पण तसा काहीच वाईट अनुभव आला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेहिको (मेक्सिको म्हणा किंवा मेहिको म्हणा हे मेशिको काय आहे? Wink ) आणि अमेरीकेच्या सीमेवर बरेच प्रॉब्लेम्स आहेत पण आत मध्ये इतका प्रॉब्लेम नाही. शिवाय बहुतेक पुर्वी मेक्सिकोत जायला विजा लागायचा, आता लागत नाही असे नुकतेच कळले (ज्याची त्याने खात्री करून घ्यावी). परत अमेरीकेत येताना मात्र अमेरीकेचा वॅलिड वीजा आहे हे तपासले जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अमेरिकेचा कुठलही विसा असेल तर मेक्सिकोमध्ये प्रवेश मिळतो. मेक्सिको सिटी अतिशय सुरक्षित आहे पण काही राज्यात मात्र शासन पुर्ण हतबल आहे. तिथे फक्त माफिया राज चालते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेळेअभावी अधिक लिहू शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वाह! चांगली माहिती.
या प्रदेशावरचे मेक्सिकोपर्व हे मीना प्रभूंचे एकमेव वाचलेले पुस्तक (अवांतरः त्यांच्या काही 'मराठी पर्यटन गाईड' पद्धतीच्या विपरीत हे पुस्तक लालित्यपुर्ण वाटले होते - विकतही घेतले आहे)
तेव्हापासून याबद्दल कुतुहल होतेच.
लेख छान जमला आहे. नेमकी चित्रे माहिती समजायला मदत करतात.

आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छानच.(मी भेट दिली तेव्हा पिसे असलेल्या सर्पाचे चित्र डागडुजीकरिता झाकलेले होते.)

चित्रे छान आहेत. तेओतिउआकान संस्कृती ही गूढच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्र्चित्रे दिसत नाहित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars