Skip to main content

ती हिंगाची ज्यादा चिमूट - ३

भाग - १ |

व्यवस्थापकः
अगदी प्रचलित पदार्थच, पण एखाद्या व्यक्तीच्या हातून इतरांपेक्षा अत्यंत जास्त चांगले बनतात. तेव्हा अशा काही खास क्लृप्त्या - टिप्स- इथे देण्याकरता या धागा आहे. या विषयावर अधिक अंगाने + पदार्थांवर चर्चा व्हावी, विविध पाककृती करताना वापरल्या जाणार्‍या गोष्टी (जणू खांसाहेबांच्या चिजा) या चर्चेतील प्रतिसादातून खुल्या व्हाव्यात या उद्देशाने तसेच भविष्यात शोधायला सोपे जावे म्हणून हा धागा सुरू केला होता. आधीच्या धाग्यात बरेच प्रतिसाद झाल्याने नवा भाग सुरू करत आहोत.

=========

मध्यंतरी कोणीतरी असे सुचवले की बाकरवड्या (विशेषतः चितळेंच्या) खाण्यापूर्वी मायक्रोवेव्हात मिनिटभर गरम कराव्यात म्हणजे जास्त खुसखुशीत आणि स्वादिष्ट लागतात.

हे खरंच आहे.

बर्‍याच पदार्थांना गरम केल्याने त्याचा स्वाद नाकात शिरायला मदत होत असावी, त्यामुळे पदार्थाला जीभ आणि नाक या दोन्ही सेन्सेसच्या द्वारे अधिक न्याय मिळत असावा.

पण मग काही पदार्थ आवर्जून थंडच का चांगले वाटतात ? हे एक कोडं आहे. अगदी आईसक्रीम, मिल्कशेक वगैरे मुद्दाम थंड केलेले बर्फाळ पदार्थ आहेतच, पण अतिथंड नसतानाही उदाहरणार्थ सुरळीच्या वड्या (खांडवी), ढोकळा, सलामी, बेसनलाडू, क्रीमकेक, शंकरपाळे, इडलीसोबतची खोबर्‍याची चटणी वगैरे हे पदार्थ रुम टेम्परेचरला जास्त चांगले लागतात, किंवा गरम केल्याने त्यांच्या स्वादात फारसा फरक पडत नाही, किंबहुना काही पदार्थांबाबत घट होऊ शकते.. असं का असेल?

थंड किंवा किमान रुम टेम्परेचरलाच जास्त चांगले लागणारे इतर पदार्थ कोणाला आठवताहेत का ? भाकरीसुद्धा कधीकधी गार चांगली लागते, आणि काहीजण पुरणपोळीही गारच खातात. पण हे दोन्ही पदार्थ गरमही चांगले लागत असल्याने ते या क्याटेगरीत येणार नाहीत.

गुलाबजाम, पाणीपुरी , रबडी (आटीव दूध, बासुंदी) हे पदार्थ गरम आणि गार अश्या दोन्ही व्हेरियंट्समधे मिळताना पाहिले आहेत. आईस कोल्ड पाणीपुरी ही टेस्टी असते आणि गरम पाणीपुरीत अजिबात मजा येत नाही हेही जाणवलं आहे.

घाटावरचे भट Thu, 04/12/2014 - 13:34

थंड किंवा किमान रुम टेम्परेचरलाच जास्त चांगले लागणारे इतर पदार्थ कोणाला आठवताहेत का ?

बहुतांश गोड पदार्थ (पाक नसलेले)- उदा. बर्फी, लाडू, सत्यनारायणाचा प्रसाद (दुसर्‍या दिवशी खाल्लेला) वगैरे

'न'वी बाजू Thu, 04/12/2014 - 16:18

In reply to by घाटावरचे भट

या सर्व पदार्थांचा 'हिंगाच्या ज्यादा चिमटी'शी नेमका काय संबंध आहे? नाही म्हणजे, या पदार्थांत हिंगाची ज्यादा तर सोडाच, पण मुळात एक चिमूटही कोणी घालत असेल, असे वाटत नाही. (चूभूद्याघ्या.)

(सत्यनारायणाच्या प्रसादात हिंगाची चिमूट!!! असल्या सॅक्रिलिजने ते करणार्‍याचे, साधुवाण्याचे जे काही झाले तसले काही व्हावे काय?)

'न'वी बाजू Thu, 04/12/2014 - 15:49

अतिथंड नसतानाही उदाहरणार्थ सुरळीच्या वड्या (खांडवी), ढोकळा, सलामी, बेसनलाडू, क्रीमकेक, शंकरपाळे, इडलीसोबतची खोबर्‍याची चटणी वगैरे हे पदार्थ रुम टेम्परेचरला जास्त चांगले लागतात,

सलामी??????

बोले तो, सामान्यतः डुकराच्या मांसाची असते, तसली??????

की हा काही वेगळा (मला माहीत नसलेला) प्रकार आहे?

गवि Fri, 05/12/2014 - 10:59

In reply to by 'न'वी बाजू

हो हो.. तीच ती. डुकराच्या, बकर्‍याच्या, बैलाच्या, कोंबडीच्या अश्या कोणत्याही मांसापासून बनते.

विशेषतः चिकन सलामी बेष्ट एन्जॉईड अ‍ॅज कोल्ड कट. काहीजण तीसुद्धा थोडी परतून किंवा भाजून घेतात, पण त्याने टेस्ट आणि टेक्स्चर जाते असे वाटते. पॅकेटवरही थॉ करुन तशीच खाल्ल्यास उत्तम असे रेकमेंडेशन असते.

राही Fri, 05/12/2014 - 10:19

सर्व प्रकारचे मधून मधून तोंडात टाकावयाचे पदार्थ म्हणजे शेव, चिवडा, चकल्या, फरसाण, तिखट पुर्‍या, बाकरवड्या हे सर्व.
ताजा पाव हा घटक असलेले (तळलेला किंवा कुसकरलेला नव्हे) सगळे पदार्थ. सब्जी-सँड्विच भाजले तर ते लगेच खायला हवे. जरा थंड झाले तर चिवट होते. म्हणून आवडत नाही. अपवाद एकच. इटालियन हॉटेलात मिळणारा मऊ लुसलुशीत गार्लिक ब्रेड. तो किंचित गरम असेल तरच छान.

वामा१००-वाचनमा… Sat, 06/12/2014 - 01:54

मध्यंतरी कोणीतरी असे सुचवले की बाकरवड्या (विशेषतः चितळेंच्या) खाण्यापूर्वी मायक्रोवेव्हात मिनिटभर गरम कराव्यात म्हणजे जास्त खुसखुशीत आणि स्वादिष्ट लागतात.
हे खरंच आहे.

पातळ पोहे देखील जर ३० एक सेकंद मायक्रोवेव्ह मधून काढले न नंतर त्याचा चिवडा केला ना की ख-ला-स!!!! मस्त होतो.

आदूबाळ Wed, 11/02/2015 - 18:13

उलट बेसनलाडू मायक्रोवेव्ह केल्यास तूप सुटून जास्त भारी लागतो. अर्थात मऊ होतो, आणि लाडुत्व जातं, पण तोफगोळ्यासारखे टणक लाडूही खाण्यात आले आहेत. त्यामुळे हे बरंच.

राजेश घासकडवी Wed, 11/02/2015 - 18:35

मलाई बर्फी गरम करून काय भारी लागते!
सोलकढी आणि ताक हे जितके थंड तितके छान लागतात.

मायक्रोवेव्हमध्येे गरम करण्याबाबत - वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे गरम होतात. म्हणजे ओले, तेलकट पण मुख्यत्वे पाणी भरपूर असलेले पदार्थ नुसतेच उष्ण होतात. कदाचित जळतात. याउलट जे पिठाचे बेक केलेले पदार्थ असतात त्यांच्या पोतात फरक पडतो. पाव मायक्रोवेव्हमध्ये फार भाजला तर गार झाल्यावर कडक होऊन बसतो. इतका की क्रूटॉन्स करण्याची सोपी युक्ती म्हणून मी मायक्रोवेव्ह वापरतो. बाकरवड्यांचंही तसंच आहे. त्या तळलेल्या असतात, पण तरीही कशामुळे कोण जाणे, मायक्रोवेव्हमधून काढल्यावर त्या थोड्या कुडकुडीत होतात. पण तो कुडकुडीतपणा जाणवण्यासाठी त्या गार व्हायची वाट बघावी लागते.

घनु Thu, 12/02/2015 - 12:58

In reply to by वृन्दा

मला फोडणीच्या पोळीवर लसणाची चटणी टाकून खायला जाम आवडतं. तसंच, कुठलाही चिवडा(पातळ्/भाजके/मुरमुरे/भडंग) कांदे-पोह्यात, फोडणीच्या भातात आणि पोळीत घालून मस्त लागतो.

गवि Thu, 12/02/2015 - 13:12

In reply to by घनु

जर्राशी ढळत्या हाताने फोडणी दिलेली बारीक चुरलेली किंचित कुरकुरीत फोडणीची पोळी (फोचीपो) आणि आंबट न झालेलं दही.

घनु Fri, 13/02/2015 - 11:53

In reply to by गवि

व्वा... तोंडाला पुर....

बादवे... आज-काल च्या शरातल्या पोरी मिक्सर वर पोळी बारीक करतात ते आज्याबात आवडत नाही ...पोळी कशी हाताने बारीक केलेली असावी :)

नितिन थत्ते Fri, 13/02/2015 - 12:00

In reply to by घनु

+१/-१
सहमत आहे.

हाताने करण्यापेक्षा याच्यावर अधिक चांगली बारीक करता येते.

नितिन थत्ते Fri, 13/02/2015 - 12:26

In reply to by ऋषिकेश

पण विळीवर का होईना; हाताने पोळी बारीक करण्याने जो जिव्हाळा पोळीत उतरतो तो मिक्सरला जाडे ब्लेड लावून कसा उतरणार? :P

ऋषिकेश Fri, 13/02/2015 - 12:49

In reply to by नितिन थत्ते

मुळात पोळी हातानेच बनवलेली असते.
त्यात आम्ही हाताने ब्लेड लावतो आणि हाताने पोळ्या चतकोर करून त्यात टाकतो. तेव्हढा जिव्हाळा आम्हाला पुरतो :) ;)

राही Fri, 13/02/2015 - 12:49

In reply to by नितिन थत्ते

हो आणि नखालगतच्या जिव्हाळ्या विळीवर कापल्या गेल्या तर ते जिव्हारी लागते शिवाय त्या जिव्हाळ्या पोळीत उतरतात ते वेगळेच.

घनु Fri, 13/02/2015 - 13:09

In reply to by राही

नखालगतच्या जिव्हाळ्या

आणि कधी कधी नखात अडकलेला 'जिव्हाळा' सुद्धा पोळी कुस्करताना त्या फो.पो. मधे उतरतो, त्या अमुल्य 'जिव्हाळयाची' किंमतच नाही ह्या आजकालच्या शरातल्या मुलींणा :P

घनु Fri, 13/02/2015 - 13:06

In reply to by नितिन थत्ते

+१

हाताने पोळी बारीक करण्याने जो जिव्हाळा पोळीत उतरतो

क्या बात बोली है.. रडवलत आज थत्तेचाचा तुम्ही....

-जिव्हाळ्याला मुकलेला घनु...

चिमणराव Fri, 13/02/2015 - 13:41

आमच्या आजीची आठवण आली हाताने कुसकरलेल्या पोळीने. आम्ही सुटीला गेलो की सकाळी पिवळे मूग ओंजळभर शेकणार. लगेच छोट्या जात्यावर दळायची तुपावर पीठ भाजून गुळ साखर टाकून लगेच लाडू करून देत असे. आवडतात म्हणून चार दिवसांनी पुन्हा व्हायचे परंतू एकाचवेळी जास्ती करून ठेवत नसे.

रवा लाडू मुरल्यावर चांगला लागतो. ताजा हा फारसी शब्द इथे मुरला आहे तरी चांगला मराठी शब्द कोणता?[ कुंभमेळयातले 'शाही' स्नान कधी सुरू झाले? अमृतस्नान हा पूर्वीचा शब्द]
ज्वारीची भाकरी मीठ न घालता केली तर दुसरे दिवशी निरशा दुधात(आता पिशवी फोडून न तापवता अथवा थेट तबेल्याचे)कुसकरून चांगली लागते.
पीठ २दिवस आंबवून केलेल्या जिलब्या(गुजराती कडक नव्हे) शिळ्या फार मधुर लागतात. अशा सकाळी खाल्ल्या तर अर्धशिशि थांबते.

ऋषिकेश Fri, 13/02/2015 - 14:05

In reply to by चिमणराव

निरशा दुधात(आता पिशवी फोडून न तापवता

हे दूधही नीरसं नसतं. पिशवीत पाश्चराईज करून भरतात.
बहुधा, थेट गोठ्यात धारेचं दूध मिळालं तर ते नीरसं असण्याची खात्री देता यावी.

बाकी 'ताजा'साठी 'पिव्वर' मराठी शब्द अगदी तोंडावर आहे. आठवताच सांगतो

नितिन थत्ते Fri, 13/02/2015 - 14:14

In reply to by ऋषिकेश

दूध निरसं असणं यात ते तापवलेलं नसणं हा पॉईंट नसतो.

(ट्रॅडिशनली) दूध तापवल्यावर त्यातली फॅट सायीच्या स्वरूपात वेगळी होते. त्यामुळे उरलेल्या दुधात फॅट खूप कमी असते. म्हणून निरश्या दुधात पीठ भिजवल्यास ती फॅट शॉर्टनिंग म्हणून काम करते आणि पदार्थ मऊसर होतो.

पाश्चराइज्ड दूध तापवलेले असले तरी त्यात ठराविक (३.५ किंवा ६%) फॅट मेन्टेन केलेली असते त्यामुळे तसे दूध वापरले तरी चालते.

घनु Fri, 13/02/2015 - 14:12

अशा सकाळी खाल्ल्या तर अर्धशिशि थांबते.

इंदोर ला गेलो असतांना सकाळी सकाळी नाश्त्याला पोहे खाल्ले तर 'ठेले'वाला जीलबीचा पण आग्रह करायला लागला. एवढ्या सकाळी जीलबी सारखा पदार्थ खायची इच्छाच झाली नाही. पण जरा बाजूला पाहिलं तर लोक (रहिवासी) अगदी आवडीने आणि 'असं कसं पोह्या नंतर जिलबी हवीच' ह्या थाटात जिलबी खात होते. अजबच वाटलं ते, कारण महाराष्ट्रात 'शिरा' हा एक प्रकार सोडला तर बहुधा लोक सकाळच्या नाश्त्याला गोड खात नाहीत (माझ्या माहितीत शिरा पण सकाळी खाणं फार लोक प्रेफर करत नसावेत).