फोनवरच संभाषण

"काय करतीयेस" पलीकडून त्याने विचारलं.
"हं!" तिने निश्वास टाकला. "म्हटलं सकाळपासून कसा फोन आला नाही. बिझी होतास का?"
"बिझी नव्हतो. असाच कुणाचातरी विचार करत होतो."
ती गप्प बसली. "कुणाचा" असं विचारलं तर तो काय बोलणार हे तिला पक्कं माहित होतं.
"कुणाचा असं नाही विचारणार?" त्याने तिकडून विचारलंच.
"नाही. मी तसलं काही विचारणार नाही. आणि तुही असलं फालतू काही विचारायचं बंद कर." तिने रागाने फोन आपटला.

अमेरिकेत आल्यापासून दररोज सकाळी तिला फोन करायचा त्याचं ठरलेलं होतं. सुहासची आणि तिची ओळख जुनी असली तरी तो तिचा खास मित्र वगैरे नव्हता. कॉलेजमध्ये असताना तिच्या तिच्या ग्रुप मध्ये असायचा एवढंच. दिसायलाही बेताचाच. काळा, स्थूल, नीटनेटक्या चेहऱ्याचा. एकदम कुणी प्रेमात पडावं असा नक्कीच नाही. गेल्या वर्षी फेसबुकमूळे नव्याने ओळख वाढली होती. तेव्हा तो भारतातच होता. अमेरिकेत येण्यासाठी त्याचा प्रयत्न चालला होता. ती उत्साहाने तिचे, तिच्या नवर्याचे आणि मुलांचे फोटो फेसबुकवर टाकायची. त्याच्याकडून लगेचच फीड बॅक मिळायचा. हा ड्रेस चांगला दिसतोय, साडीत सुंदर दिसतेयस किंवा अजूनहि काहीच बदल झाला नाही तुझ्यात असे कॉमेंट्स पाठवायचा. कधी कधी तोही त्याच्या मित्रांबरोबर गोव्याला वगैरे गेलेले फोटो टाकायचा. पण त्याने त्याच्या कुटुंबाचे फोटो कधी अपलोड केले नाहीत. तिनेही कधी विचारलं नाही. विचारावं असंही कधी वाटलं नाही.

फेसबुकमुळे तिच्या कॉलेजमधले कितीतरी मित्र मंडळ तिला ऑनलाईन भेटलं होतं. वीस वर्षापूर्वीच्या बऱ्याचशा मित्र मैत्रिणी तर तिला ओळखताही आल्या नव्हत्या, एवढ्या बदलल्या होत्या. बारीक, सडसडीत मुलींच्या आता केस पिकलेल्या, स्थूल बायका झाल्या होत्या. तोंडावर बावरलेले भाव असलेल्या अशक्त मुलांचे, आता ढेरीवाले सभ्य गृहस्थ झाले होते. बदलला नव्हता तो फक्त हाच. म्हणजे त्याला ओळखायला तिला काही अडचण आली नव्हती.

त्याचं अमेरिकेत येण्याचं नक्की झाल्यावर "कधी बोस्टनला आलास कि माझ्या घरी नक्की ये" असं तिने आवर्जून त्याला सांगितलं होतं. त्यात जुन्या मित्राला भेटण्याचा आनंद तर होताच पण ती आणि तिचे आदर्श आणि सुखी कुटुंब त्याला दाखविण्याचा मोहहि तिला झाला होता.

ती बोलून तर बसली होती पण तो लगेचच येईल असं काही तिला वाटलं नव्हतं. कॅलिफोर्नियात आल्यानंतर पहिला लाँग विकएंड बघून त्याने बोस्टन चे तिकीट बुक केले तेव्हा तिला आश्चर्य वाटलं. एअरपोर्टवर त्याला पिकअप करायला तिचं सगळं कुटुंब गेलं होतं. नवऱ्याशी त्याची ओळख करून देताना तिला संकोचल्यासाखे झाले होते. पण तिच्या नवऱ्याला त्यात काही गैर वाटलेले दिसत नव्हते. बायकोचा जुना कॉलेज मधला मित्र आहे, प्रथमच अमेरिकेत आलाय, तेव्हा त्याला बोस्टन दाखवायचं कामही नवऱ्याने उत्साहाने केलं होतं. तिच्या दोन्ही मुलांनी त्याला काका म्हणून त्याच्याशी जवळीक साधली होती. त्यांच्या पाहुणचाराची परतफेड तोही त्यांना तिच्या कॉलेज मधल्या गोष्टी सांगून करत होता. मुलांची चांगली करमणूक होत होती आणि तिला याच्या एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात कशा आहेत याचं आश्चर्य वाटत होतं. जाताना त्याने तिच्या १२ वर्षांच्या ओमला मार्केट मध्ये आलेला नवीन ipad-२ घेऊन दिला त्यावर काय बोलावे तिला कळेना. नवर्यानेही टोमणा मारलाच, तुझा मित्र काही तुझ्यासारखा कंजूस दिसत नाही म्हणून!

एकंदर त्याला इम्प्रेस करण्याचा तिचा प्लॅन त्याने उधळून लावला होता. उलट तोच तिच्या घरातल्या सगळ्यांना आणि खुद्द तिलाही इम्प्रेस करून गेला होता. आता परत त्याचा फोन आला कि नक्की त्याला रागवायचे असं तिने मनाशी ठरवले. त्यासाठी तिला जास्त वेळ काही वाट पहावी लागली नाही. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसमध्ये पोहचण्याआधीच त्याचा फोन आला. "आता मी गाडी चालवतेय. मला नंतर फोन कर." तिने त्याला थोड्या अधिकारानेच सांगितलं.
ऑफिसमध्ये गेल्यावर थोड्या वेळाने तिने त्याला फोन लावला.
"मग पोहचलास का व्यवस्थित?" तिने विचारलं.
"हो. सात आठ तास लागले पण झोपून गेल्यामुळे एवढ काही वाटले नाही. आणि का गं, तुझ्याकडे ब्ल्यू टूथ नाही का?" त्याने पुढे विचारलं.
"नाही. का?"
"नाही अमेरिकेत सगळ्यांकडे असतो म्हणून म्हटलं! "
"असं काही नाही" जरा रागातच ती म्हणाली. "माझ्याकडे iPhone ही नाही आणि टॅबलेट ही तूच घेऊन दिलीस. आणि बाय द वे, मला तुझ्याशी त्याबद्दल जरा बोलायचे आहे. ओम ला टॅबलेट घेऊन द्यायची तुला काय गरज होती?"
थोडा वेळ तिकडून तो काहीच बोलला नाही. तिच्या रागाचा स्वर त्याने ओळखला.
"काही नाही, घेऊन द्यावासा वाटला."
"का?"
"सगळ्याच गोष्टींना कारण पाहिजे का?"
"ऑफकोर्स."
"कारण काही नाही. इतक्या वर्षांनी तुला भेटलो आणि तुझ्या मुलाला मला काहीतरी घेऊन द्यावेसे वाटले यात चूक झाली का?" थोड्या वाढत्या आवाजातच त्याने विचारले.
"अर्थातच. ते तू काय घेऊन दिलेस त्यावर अवलंबून आहे. एखादी छोटीशी गोष्ट घेतली असती तर मी काही म्हणाले असते का?"
"बरं बाई. चूक झाली माझी. आता माफ करशील? आणि ते ब्ल्यू टूथ बद्दल ही म्हणालो कारण त्याच्यामुळे तुला कार मध्ये हँड्स फ्री बोलता येईल म्हणून. खरच तो तू घ्यायला पाहिजेस."
"मी कारमध्ये जास्त बोलतच नाही आणि मला नाही वाटत मला त्याची गरज आहे म्हणून." आवाज जरा खाली घेत पण तरीही निर्धारान ती म्हणाली. "बरं चल आता. तुझं ऑफिस अजून सुरु व्हायचं असेल पण माझं ऑलरेडी झालंय." म्हणत तिने फोन ठेऊन दिला.
त्यानंतर एक दोन महिने गेले. सुहासबद्दल ती अगदी विसरून गेली होती. आणि एक दिवस तिचा नवऱ्याने तिच्या हातात एक पाकीट दिले. पत्र सुहासकडून होते. तिने उघडून पाहिले आणि तिला धक्काच बसला.

क्रमश:

पूर्वप्रकाशित: http://heteanisagale.blogspot.com/2012/03/blog-post.html

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

रोचक , उत्कंठावर्धक कथानक. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

+१
अगदी अस्सेच म्हणतो. उत्कंठा फार दिवस ताणू नका Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेखन या आधीच्या इतर धाग्यांप्रमाणेच कसदार आहे. फक्त एक शंका आहे. आयपॅडचा उल्लेख आहे म्हणजे कथेतील काळ नवीन दिसतोय. एखाद्या व्यक्तिपर्यंत थेट संदेश पोचविण्याचे इलेक्ट्रॉनिक मेल सारखे मार्ग उपलब्ध असतानाही या जमान्यात अजुनही लोक पत्र पाठवितात (जे आल्याचं घरातल्या इतरांनाही सहज समजतं)? अर्थात पुढील भाग वाचल्यावरच याचा उलगडा होइल म्हणा (म्हणजे पाकिटात पत्रासोबत अजुन एखादी वस्तु वगैरे आहे का? इत्यादी). तोवर काही ठाम प्रतिक्रिया देणं अवघड आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

एखाद्या व्यक्तिपर्यंत थेट संदेश पोचविण्याचे इलेक्ट्रॉनिक मेल सारखे मार्ग उपलब्ध असतानाही या जमान्यात अजुनही लोक पत्र पाठवितात (जे आल्याचं घरातल्या इतरांनाही सहज समजतं)?

बर्‍याचदा घरातल्या इतरांनी देखील वाचावे म्हणून मुद्दाम ईमेल ऐवजी पत्र पाठवले जाते गुगळे सर. या मागे कधी चांगला हेतू असतो तर कधी वाईट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

पुढच्या भागाची वाट पहातोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वाचतोय..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

छान लिहीलय
पुढचा भाग लवकर टाका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

हं! ओमला महागडया भेटवस्तू नव्या ओळखीच्या काकांकडून घेऊ नयेत असं आधीच शिकवायला हवं होतं ... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यान्चे आभार! पुढच्या भागावर काम सुरु आहे. विचार करतेय कि कथा भागांमध्ये पोस्ट करण्यापेक्षा, ती पूर्ण करूनच पोस्ट करावी. आख्खी कथा वाचल्यानंतरच खरा अभिप्राय मिळू शकतो. तेव्हा कृपया धीर धरावा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजकाल ग्रीटिंग कार्डे तेवढीच काय पोस्टाने पाठवतो मी.

काय बरे असेल या लेखी पत्रात?

(मीपण तसा कंजूषच आहे. मैत्रिणीच्या मुलाला आयपॅड-२! मी तर प्रियकराच्या मुलालासुद्धा आयपॅड-२ देणार नाही. स्वार्थीपणाने मस्का लावण्याकरिता फार त काय? जरा-हायफाय-हॉटेलात जेवण इतपत खर्चायची तयारी आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मीपण तसा कंजूषच आहे.

धनंजयशेठ कधितरी भारतात आले की भेटायला येतील, येताना एखादी छोटीशी बाटली वैग्रे आणतील हे आमचे स्वप्न चक्काचूर झाले म्हणायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

उलट भारतात आल्यावर माझा देशाभिमान अधिकच उफाळून येतो. स्थानीय द्रवे ही केवळ पाश्चिमात्यांच्या गर्विष्ठपणामुळे मागे पडली आहेत, वगैरे भाषण ऐकवेन. मग "पहिल्या धारेची मोहाची मिळवून द्या" वगैरे पिल्ले सोडीन.

(परंतु स्वार्थी फायद्यासाठी हॉटेलात जेवण वगैरे देण्यापर्यंत मजल आहे, असे सांगितले आहे की... तेवढ्याच्यात बसली बाटली म्हणजे झाले.)

अवांतर! अवांतर!! अवांतर!!! निषेध! निषेध!! निषेध!!! मला खुद्द माझ्या प्रतिसादाला श्रेणी देता येत नाही, म्हणून दुसर्‍या कोणीतरी श्रेणी देऊन टाकावी, ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्या धारेची मोहाची मिळवून द्या

धनंजयराव तुम्ही या तर खरे! पहिल्या धारेची सोय होउन जाईल Smile

- (सोयीस्कर) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमचे स्वप्न चक्काचूर झाले म्हणायचे

+१ आमचेही....खळ्ळ्ळ्ळ्...खट्याक....

- (हिरमुसलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान. कथा पुर्ण करुनच टाक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्कंठा वाढली आहे...

पुभाप्र, लवकर टाका.

- (फोनवर कमीच बोलणारा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पटापट पुढचे भाग टाका म्हणजे झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजेशीर आहे. पुभावाउ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

अजून पुढचा भाग आला नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचतोय..
पुढचा भाग ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरच उत्कंठा वढलिये...
लवकर पुढचा भाग प्रकशित करा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."