धागे आठवणींचे...

Office ते Room म्हणजे हिंजेवाडी ते विमान नगर, Bus चा हा कंटाळवाणा प्रवास किंचितसा सुखकर बनविण्याचे एकमात्र विश्वासार्ह साधन म्हणजे Mobile मध्ये Radio ON करून, Ear Phone कानात टाकून मस्त गाणी ऐकत बसणं... पण आज-काल गाणी ऐकवण्यापेक्षा वायफळ Advertisements चा बढीमार करणाऱ्या FM channels change करून-करून आज खरंच खूप कंटाळा आला होता... ( त्या FM channels चाही तसा फारसा दोष नाहीये त्यात, करावं लागतं पोटा-पाण्यासाठी त्यांनादेखील...)

म्हणूनच एरवीचा कार्यक्रम (Radio चा) रद्द करून, म्हटलं Mobile मधली गाणी ऐकुया, त्या FM channels change करण्याचा त्रास तर कमी होईल...
मग असंच गाणी Search करता-करता एक जुनी आवडत्या गाण्यांची PlayList नजरेस पडली, म्हटलं चला आज ऐकूनच बघूया यातली गाणी...

एक-एक करून मग गाणी सुरु झाली...
"पिया बसंती रे, लागी तुमसे मन की लगन,..." पासून ते "सुरिली अखिंयों वाले..."
"तुझसे नाराज नही जिंदगी, कहीं दूर जब दिन ढल जाये,..." पासून ते "वो शाम कुछ अजीब थी..."
"गारवा, अताशा असे हे मला काय होते..." पासून ते थेट मुंबई-पुणे-मुंबई मधली "कधी तू..., का कळेना..."
खरं सांगायचं झालं तर, सारं काही विसरून मी ती गाणी ऐकत होतो, खूप छान वाटत होतं...
खिडकीतून मधूनच येणारी वाऱ्याची गार झुळूक मला वेडं करण्यात भर पडत होती...

अशी नवी-जुनी सारीच आवडती गाणी कानावर पडू लागली, अन त्या प्रत्येक गाण्यासोबत चिकटलेला आठवणीचा धागा नकळत ओढला गेला.... घरी पोहचायला तसा बराच अवकाश असल्याने, मी देखील त्या साऱ्या धाग्यांसोबत आपसूक वाहत गेलो... काही ठिकाणी पोहोचताच खुदकन हसलो, तर काही ठिकाणं टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला... काही धागे लहानपणीचे तर काही ताजे होते...

असा हा प्रवास सुरु असतांना माझा STOP कधी जवळ आला, काही कळलेच नाही... अन परतलो मग मी माझ्या जागेवर...

तसा हा प्रवास खूप छोटा असला तरी त्या एक-सव्वा तासात आत्ता पर्यंतच सारं आयुष्य पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटलं... रोजच्या Hectic Schedule ला कंटाळलेल्या चेहेऱ्यावर थोडसं हसू फुटलं...
छान वाटलं... पुन्हा त्याच Boring Routine ला सहन करण्याची हिम्मत तर मिळाली...

पूर्वप्रकाशित

- सुमित

field_vote: 
1.5
Your rating: None Average: 1.5 (2 votes)

प्रतिक्रिया

ऐसी अक्षरेवर स्वागत! Smile
जे वाटलं ते लिहित आहात हे कौतुकास्पद आहे.. लेखन प्रांजळ आहे..
आता याची पुढची पायरी गाठलीत, आणि आवडती गाणी -- त्यांचे शब्द त्यावरून सुचलेला प्रसंग असे खुलवत आम्हालाही सफर घडवून आणलीत तर मजा येईल
एकेका गाण्याविषयी वेगळे लिहिता आले तर खूपच छान!

मुख्य म्हणजे.. येत रहा लिहित रहा! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद...
मी नक्कीच प्रयत्न करेन, अजून लिहिण्याचा...

- सुमित

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

खरं आहे - Music transcends Time & place.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0