पाककृती हवी आहे: लसणाचं लोणचं

कोकण किनारपट्टीवर वेगवेगळ्या जातींत लसणाचं लोणचं करण्याच्या पारंपरिक प्रथा आहेत. उदाहरणार्थ गोव्यात ख्रिश्चनांकडे पोर्तुगीज प्रभावाखाली व्हिनेगर वगैरे घालून लसणाचं लोणचं करतात. सारस्वत, केरळी वगैरे पद्धतींनीही लसणाचं लोणचं करतात. कुणाला अशा पाककृती माहीत असल्या तर त्या द्याव्यात. धन्यवाद.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

इथे चौकशी करून पाहा. कदाचित मिळून जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरला दलाल यांची पाककृती पाहिली, पण मला निव्वळ पाककृती नाही तर त्यामागची सांस्कृतिक पार्श्वभूमीसुद्धा हवी आहे. म्हणजे अमुक जाती/प्रांताचं वैशिष्ट्य म्हणून लोणच्यात तमुक पदार्थ घालतात, किंवा काहीतरी वेगळी पद्धत अवलंबतात वगैरे. दलालांची पाककृती पारंपरिक असली तर तसा काही उल्लेख तिथे नाही. मेघनानं सांगितलेल्या दुव्यावर पारंपरिक दाक्षिणात्य पाककृती आहेत, पण लसणाचं लोणचं मात्र सापडलं नाही. वाचकांनी आपल्या घरच्या किंवा परिसरातल्या पारंपरिक पाककृतींविषयी लिहिलं तर अधिक आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्या दुव्यावर एका लोणच्याविषयीच्या सर्वंकष पुस्तकाचं परीक्षण आहे. त्या ब्लॉगलेखिकेकडे पुस्तकातली माहिती मिळू शकेल किंवा पुस्तक कुठे मिळेल त्याची माहिती तरी. त्या पुस्तकाची फार स्तुती ऐकली होती..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

चिंतातुराने ह्यावेळी लोणचे विषयावरच लोणचे घातले म्हणायचे!(विनोद केला हो चिंतातुरा.)
लसणाचे लोणचे मधल्या जाऊबाई करायच्या. त्यांना विचारून पाहीन.
(कैरी,लिंबु,माईन्मुळाचे लोणचे बनवणारी) रमाबाई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेघनाच्या दुव्यातले पुस्तक माझ्याकडे आहे. दाक्षिणात्य कृती त्यात जास्त आहेत, पण अन्य प्रांतातले ही आहेत. लसूण हे मुख्य पदार्थ (?) असलेल्या कृती १३ आहेत, पण दुय्यम असलेली ही पुष्कळ आहेत. पहिल्या "क्लासिक" प्रकरणात "स्वीट-सार गार्लिकः हॉट" म्हणून कृती आहे. चिंच गूळ युक्त हे लोणचं महाराष्ट्र कर्नाटकात अनेक ठिकाणी बनवलं जात असावं:
५०० ग्रॅम लसूण, सोलेलेले
१० ग मोहरी (फोडणी साठी)
१२५ ग चिंच (पाण्यात भिजवून बिया काढून तयार केलेली)
१००ग किसलेला गूळ
६०ग लाल तिखट
५ ग हळद
३ ग हिंग (तेलात भाजून पूड केलेले)
२ ग मेथ्या (")
१००ग मीठ
२०० मि तेल (जमल्यास तिळाचं वापरावं अस अन्यत्र लिहीलं आहे)

कृती:
१. लसूण थोड्याशा तेलात मऊ होईस्तोवर परतून बाजूला ठेवावे.
२. त्यात परातीत अजून थोडे तेल घालून मोहरीची फोडणी करावी.
३. चिंच, गूळ आणि मीठ घालून उकळी आणावी, आणि प्रखर अग्निवर दाट होईस्तोवर ठेवाठे
४. आता मंद आचेवर ठेवून तिखट, हळद, मेथ्या आणि हिंगाची पूड आणि लसूण त्यात मिसळावे
५. हळू हळू उरलेले तेल घालत अजून अर्धा तास शिजत ठेवावे
६. चिकटमिश्रण जॅमसारखे चिकट झाले, आणि तेल वेगळे दिसू लागले की उतरवावे
७. लोणचे तयार. २ महिने चांगले राहते

२. "सार गार्लिक-कोकोनट (सॉल्टी)" म्हणून प्रादेशिक कृतींमध्ये मंगळूर-कर्नाटक कडची अजून एक आहे,पण हे लसणाचा ठेचा किंवा चटणीवजा लोणचे वाटते:

५० ग लसूण, चिरलेले
२० ग लाल मिरच्या, बारीक चिरडलेल्या
२५ ग पाण्यात भिजवून बिया काढून तयार केलेली, आणि सुकी परतलेली
२०० ग सुके परतलेले ओले खोबरे
२० ग मीठ (देशी वापरल्यास उत्तम)

कृती:
१. पाणी अजिबात न घालता सर्व सामग्री एकत्र करून वाटून घ्यावी - फार बारीक नको.
२. लोणचं तयार. १ आठवडा फ्रिज मध्ये चांगलं राहतं.

या पैकी कुठले घालून पाहिल्यास अवश्य कळवा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या पैकी कुठले घालून पाहिल्यास अवश्य कळवा...

लोणचं मुरायला घातलं की आधी कळव. बरीच बाकी आहे वसुली. मग आपण मिळूनच रोचनाला कळवू. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचुनच चविष्ट वाटतंय
वेळ मिळताच नक्की करणार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माहिती पुरवणारे प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार. सर्वात रोचक पाककृतींकडे नेणार्‍या मेघना आणि रोचना यांचे विशेष आभार!
रोचनासाठी एक प्रश्नः '२५ ग पाण्यात भिजवून बिया काढून तयार केलेली, आणि सुकी परतलेली' यातला मिसिंग पंच म्हणजे चिंच असावी असं वाटलं, पण 'सुकी परतलेली' पाहून जरा गोंधळ झाला. ही चिंचच की आणखी काही?

खास मोडकांसाठी: तुम्ही वेळोवेळी घातलेल्या काही क्विंटल काड्यांचं लोणचं मुरून कधीचं तयार आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मीच पुरवलेल्या सामग्रीचा पदार्थ मी चाखत नसतो. तो तू इतरांसाठी ठेव. मी लसणाच्या लोणच्यापुरता असेन. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आहाहा!!
दोन सुगरण पक्षी (धाग्यात) कसे मोहक संचार करत आहेत मस्त पैकी!! नेमके कुठे गेले ते ऐसीचे तमाम प्रकाशचित्रकार? कुठे गेल्या त्या रमाकाकू कळसुंद्रीकर?

मोडकांच्या काड्या म्हणजे अगदी यष्टीमधूच जणू. तेही नर्मदेच्या खोर्‍यातल्या.. काय सांगावा हो त्याचा गोडवा, काय सांगावे* त्याचे औषधी गुणधर्म!! इतरत्र शोधूनही बिल्कूल सापडायचे नाही हो!! Smile

बर मग जेष्ठमधाचे लोणचे पाकृ कोण बरे टाकेल???

* = आमचे बिकाकाकाच शब्दबद्ध करु जाणे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो, चिंचच. आधी कोमट पाण्यात भिजवून,मग गाळून चोथा तेवढा सुका परतायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या इथे एक पाकृ सापडली..
http://www.webindia123.com/cookery/asp/item.asp?r_id=620&recipe=Garlic+P...
आधी लसूण वाफवून घ्यायचे अन मग ते Gingelly oil मध्ये परत परतायचे असे काहीतरी आहे.
पण त्यातील Gingelly oil म्हणजे नक्की कसलं तेल हे कोणी सांगू शकेल का ? हे बहुतेक गोवास्टाईल लोणचे असावे.
बाकी, लोणच्यांमध्ये आंध्रराज्याची सर कोणालाही येत नाही असे आमचे वैयक्तीक मत ..
~ वाहीदा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>Gingelly oil म्हणजे नक्की कसलं तेल हे कोणी सांगू शकेल का ?<<

पाककृतीबद्दल आभार. Gingelly oil म्हणजे तिळाचं तेल. दक्षिणेत हा शब्द वापरतात.
अवांतरः विकिपीडिआवर हेही कळलं की सिंधू संस्कृतीपासून भारतात तिळाचं तेल वापरण्याची पद्धत आहे आणि तैल हा संस्कृत शब्द 'तिल'शी संबंधित आहे आणि दाक्षिणात्य भाषांतले काही शब्दसुद्धा:

the word enne/enna/ennai that means oil in many Dravidian languages including Kannada, Malayalam and Tamil has its roots in the Dravidian words eL (ಎಳ್/ಎಳ್ಳು, எள்ளு) and nei (ನೆಯ್, நெய்), which mean sesame and fat respectively.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कसली मसत चविष्ट चर्चा सुरु आहे इथे! व्वा...लसणीच्या लोणच्याच्या चवीइतकीच मज्जा येतेय!
चिंतातूर जंतू... हे नाव उगाच धारण केले आहे असे वाटते.. इतक्या मनोरंजक माहितीच्या देवाण घेवाणीची ट्रेन ट्रिगर करणारी व्यक्ती चिंतातूर नसून हास्यातूरच असणार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेदिनी..

चिंतातूर जंतू... हे नाव उगाच धारण केले आहे असे वाटते..

नाही हो... चिंतातूर जंतू काहीही उगाच करत नसतात. त्यांच्या प्रत्येक कृतीला एक प्रयोजन असते. या नावामागंही काही प्रयोजन आहे. अर्थात, ते प्रयोजन त्यांनी स्वतःच सांगावं, हे बरं. नाही तर पुन्हा माझ्यावर काड्या केल्याचा आरोप करतील. Wink

इतक्या मनोरंजक माहितीच्या देवाण घेवाणीची ट्रेन ट्रिगर करणारी व्यक्ती चिंतातूर नसून हास्यातूरच असणार!

हां... वळखलंत तुमी... हेही ते नाव धारण करण्यामागचं एक प्रयोजन आहे. छुपेगिरी पुरेपूर करतो हा माणूस. Smile
चिंतातूर जंतू, आता काय कराल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>चिंतातूर जंतू, आता काय कराल?<<

चिंता कविता करतो...
उदा: ('बाजारात तुरी'च्या चालीवर)
बाजारात (चिंता)तूर मोडक काड्या करण्यात चतुर.

किंवा ('पिंजऱ्यामध्ये वाघ सापडे' च्या चालीवर) -
लोणच्यामध्ये जंतू सापडी मोडक करती काडीवर काडी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नाही जमली. थोडी मुरायला ठेवली असती तर बरं झालं असतं. घाई झाली. कल्पना चांगली आहे. त्याला काड्यांची जोड आहे. त्यातही दम आहे. पण कविताच जमली नाही. मग बाकी राहते ती फक्त चिंता. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>> नाही जमली. थोडी मुरायला ठेवली असती तर बरं झालं असतं.
याला कवितेची अचार-संहिता म्हणावं काय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संहिता कसलीही म्हण. माझी काही हरकत नाही. हरकत घेऊन जातो कुठं? सदस्यत्वच जायचं. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>नाही जमली. थोडी मुरायला ठेवली असती तर बरं झालं असतं. <<

'शेळी जाते'च्या चालीवर...
कडबा जातो जिवानिशी काड्या करणारा म्हणतो अर्धकच्चा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

काय करणार? सुग्रासाची सवय. कडबा अर्धकच्चाच वाटणार ना! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय हो गुर्जी, काय भानगड काय आहे? लोणची करून कोणाला इंप्रेस करताय? Wink

(च्यायला, एकेक गुर्जीं धक्के देताहेत सद्ध्या!) Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile