अनवट मराठी शब्द, वाक्प्रचार, संदर्भ
गविंनी काढलेला इंग्रजी शब्दांसाठी धागा वाचला. माझी समस्या उलट आहे, म्हणून हा मिरर धागा काढतेय - मराठीतले काही खास शब्द, जे इंग्रजी माध्यमात शिकलेल्यांच्या परिचयात फार उशीरा येतात, असे एकमेकांना सांगणार्यांसाठी. त्यांनी म्हटल्यासारखेच शब्दांपेक्षा शब्द समूह, वाक्प्रचार आणि कोलोक्वियल भाषा इडियमॅटिक लेखनात कशी वापरावी हा प्रश्न नेहमी मला पडतो. मराठी दहावीपर्यंत शिकले असले, आणि बोलता-वाचता चांगले येत असले तरी अलिकडेच सीरियस मराठी लेखनाला सुरुवात केली. त्याची अजून सवय व्हावी, सारखं सारखं शब्दकोशाकडे न धावता लिहीता यावं अशी खूप इच्छा आहे, आणि ऐसीवर पडीक राहून गेल्या दोन तीन वर्षांत बरीच सुधारणा झाली आहे. पण पारिभाषिक शब्दकोशही ठराविक विषयांवर भर देतात - कोलोकियल शब्दछटांचा सुरस अनुवाद नसतोच.
उदा: flag-waving patriots हे मराठीत इडियमॅटिकली कसे म्हणायचे? फॉर दॅट मॅटर इडियमॅटिकली चा चांगला मराठी शब्द काय आहे?
मराठीतली समाजशास्त्रीय परिभाषा इंग्रजीतून थेट अनुवाद करून तयार झाली आहे, आणि बोजड वाटते. अर्थपूर्ण, पण सुरस मराठीत लिहीणे जमायला पाहिजे.
irredeemable (इथे "मदतीच्या पलिकडे" अभिप्रेत आहे, पण शब्दकोशात बँकिंग शब्दावलीचे चेक रिडीम करण्याचे पर्याय दिसतात)
compromising position / in flagrante delicto (याचा अर्थ फ्रेंच/लॅटिन धागा-धुरंधर नंदन सांगेल)
cultural transmission (पिढ्यांपिढ्या सांस्कृतिक ज्ञानाला पास ऑन करणे)
kiss of death
असे बरेच आहेत, दुसर्यांनी ही भर टाकावी...
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
नेमकी गरज
हा (आणि गविंचाही) धागा वाचताना एक गोष्ट (काहीशा अस्पष्टपणे) जाणवते आहे.
जेव्हा आपण म्हणतो की इंग्रजी/अन्य भाषेत जाणवलेल्या गोष्टी माझ्या भाषेत व्यक्त करताना मला नेमके शब्दप्रयोग हवे आहेत, तेव्हा त्याचा काँटेक्स्ट जाणून घेणं आवश्यक ठरतं. हा संदर्भ फार महत्त्वाचा आहे - किंबहुना सर्वाधिक महत्त्वाचा आहेसं कुठेतरी जाणवतं. काही रँडम उदाहरणं मनात येतात.
उदाहरणार्थ, जर का शोभा डे यांच्या एखाद्या कादंबरीचं भाषांतर करत असेन आणि (डे बाईंच्या कादंबर्यांमधे बहुतांशी असतात त्याप्रमाणे) शहरी संवेदनशीलता असलेलं पात्र असेल आणि ते पात्र "बास्टर्ड, बिच !" वगैरे शब्द (डे बाईंच्या कादंबर्यांमधे बहुतांशी असतात त्याप्रमाणे) वापरत असेल तर तो मी बदलणार नाही. हां जर का एखाद्या पात्राने (डे बाईंच्या कादंबर्यांमधे बहुतांशी असतात त्याप्रमाणे) "Bloody Whore" असा शब्द वापरला तर बहुदा मी "रंडी साली" असं वापरेन. जे चपखल वाटू शकेल. याचं नेमकं स्पष्टीकरण मला सांगता येत नाही. पण हे असं वाटतं खरं.
दुसरं उदाहरण वर आलेल्या पडशीचं घेईन. सुरवातीला "रकसॅक" म्हणून उल्लेख केल्यानंतर "अमुकची स्वारी आपली पडशी पाठुंगळीला लावून मजल दरमजल करत पुढे गेली" हे मजेशीर/योग्य वाटू शकतं. (वाटेलच असं नाहीच. काही ठिकाणी अशा स्वरूपाचा हलकेफुलकेपणा अभिप्रेत नसतो.) मात्र त्याकरता आधी "रकसॅक" घेतलेली व्यक्ती "रकसॅक" घेऊन फिरण्याच्या काळात, संदर्भातली आहे हे प्रस्थापित व्हायला हवं.
माझ्यामते प्रतिशब्द योजताना, पर्यायी इडियमॅटिक/कोलॉकियल शब्दयोजना करताना हे असं सदंर्भांचं माहात्म्य आहे.
idiom साठी जुन्या (१९-२० वे
idiom साठी जुन्या (१९-२० वे शतक) मराठीत संप्रदाय हा शब्द वापरलेला दिसतो, आणि idiomatic साठी सांप्रदायिक. उदा. वा. गो. आपट्यांचे पुस्तक 'मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी'. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी idiom चं 'शब्दांचा किंवा वाक्यांचा प्रयोगविशेष' असं लांबलचक वर्णन केलंय. वाक्प्रचार म्हणजेच idiom का?
लॅटीन शब्द आणि त्याचे मराठी भाषांतर
शब्द लॅटीन मधून आले आहेत. पण इंग्रजी भाषेने ते तसेच्या तसे स्वीकारले. याला मराठी प्रतिशब्द आहेत का? आणि ते जसेच्या तसे भाषांतर केलेले आहेत का?
Ultra Vires - कायदाबाह्य? घटनाबाह्य? - याचे नेमके भाषांतर कसे केले जाते? कारण मी मराठी वृत्तपत्रांमध्ये आजपर्यंत जसाच्या तसा लॅटीन शब्द पहिला नाही
Prima Facie - प्रथमदर्शनी?
Habeas corpus - ?? - वकील इंग्रजीत बोलत असतील तर हाच शब्द वापरतात पण मराठी मध्ये याला काय भाषांतर आहे?
veto - नकाराधिकार
suo moto - ?? - हे नेहेमी बातम्यात वाचले जाते कि कोर्टाने सुओ मोटो कारवाई केली. पण याचे भाषांतर काय असू शकेल?
status quo - ??
in absentia - ?? - पदवीप्रदान समारंभाचा फॉर्म भरताना इन प्रेजेंस आणि इन अब्सेंसिया असे दोन पर्याय असल्याचे आठवते.
protem - हंगामी - या शब्दाचे उत्तम भाषांतर झाले आहे. :)
inter alia- ?? - हा शब्द बऱ्याच कायदेशीर लिखाणामध्ये येतो
de jure - ??
de facto - ??
locus standi - ??
bona fide - ??
mala fide - ??
pro bono - ??
ex officio - पदसिद्ध
obiter dictum - ??
persona non grata - ??
vide - ?? - बर्याच सरकारच्या नोटिफ़िकेशन मध्ये असते.
(हे उत्तर अवांतर असेल तर दुर्लक्ष करावे.)
suo moto - स्वयंप्रेरणेने
suo moto - स्वयंप्रेरणेने (केलेली कारवाई)
status quo - जैसे थे स्थिती
in absentia - (कोणाच्या तरी) अनुपस्थितीत
inter alia - (कशाच्या तरी) अंतर्गत
de jure - तत्त्वतः आणि de facto - वस्तुतः
bona fide - सद्(काहीतरी) उदा. सहेतुक
mala fide - दुर्(काहीतरी)
pro bono - नि:शुल्क? धर्मादाय?
persona non grata - नकोसा/नकोशी
vide - अनेक सर्कारी नोटिफ़िकेशनच्या भाषांतरात याचं "द्वारे" असं एक बावळट भाषांतर केलेलं असतं. उदा. द्वारे सर्क्यूलर क्षयझ
inter alia - (कशाच्या तरी)
inter alia - (कशाच्या तरी) अंतर्गत
नाह.
मंजे हे धरून.
उदा. अॅडमिनने नाईलला बॅन करायचे हे धरून अनेक मोठे निर्णय घेतले.
अॅडमिन टूक मेनी इंपॉर्टंट डिसिजन्स, इन्टर अलिया, बॅनिंग मेमंबरशिप ऑफ नाईल.
================================================================================
प्रयत्न
>>Ultra Vires - भाषांतर ठाऊक नाही पण याचा अर्थ केवळ कायदाबाह्य असा नाही. एखाद्याला नेमून दिलेले जे अधिकार आहेत त्याच्या बाहेर जाऊन केलेली कृती. (अधिकारातिक्रमण). उदा. सोसायटीच्या सभासदांना दंड ठोठावण्याचा अधिकार सचिवास नसताना त्याने तसा दंड लावणे. कंपनी कायद्यात अल्ट्रा वायर्स द अॅक्ट आणि अल्ट्रावायर्स द आर्टिक्ल्स ऑफ असोसिएशन असे दोन प्रकार असतात. जी कंपनी कायद्याने प्रतिबंधित केली आहे अशी कृती करणे म्हणजे अल्ट्रावायर्स द अॅक्ट. जे अधिकार संचालकांना आर्टिकल्समधून दिलेले नाहीत ती कृती संचालकांनी करणे म्हणजे अल्ट्रावायर्स द आर्टिकल्स
Prima Facie - प्रथमदर्शनी?
Habeas corpus - ?? - वकील इंग्रजीत बोलत असतील तर हाच शब्द वापरतात पण मराठी मध्ये याला काय भाषांतर आहे?
veto - नकाराधिकार
suo moto - ?? - हे नेहेमी बातम्यात वाचले जाते कि कोर्टाने सुओ मोटो कारवाई केली. पण याचे भाषांतर काय असू शकेल?- स्वतःहून
status quo - ??
in absentia - ?? - पदवीप्रदान समारंभाचा फॉर्म भरताना इन प्रेजेंस आणि इन अब्सेंसिया असे दोन पर्याय असल्याचे आठवते.
protem - हंगामी - या शब्दाचे उत्तम भाषांतर झाले आहे. (स्माईल)
inter alia- ?? - हा शब्द बऱ्याच कायदेशीर लिखाणामध्ये येतो- अमंग अदर थिंग्ज- इतर गोष्टींबरोबरच.
de jure - ??
de facto - ?? वास्तवात (जरी अधिकृतपणे नसले तरी) Shastri was de facto PM during Nehru's illness.
locus standi - ?? संबंध
bona fide - ?? वैध
mala fide - ?? गैर
pro bono - ??
ex officio - पदसिद्ध
obiter dictum - ??
persona non grata - ?? नकोसा
vide - ?? - बर्याच सरकारच्या नोटिफ़िकेशन मध्ये असते.- नुसार - उदा. आयकर कायदा १९६१ च्या कलम ५४ नुसार
भाषांतर ठाऊक नाही पण याचा
भाषांतर ठाऊक नाही पण याचा अर्थ केवळ कायदाबाह्य असा नाही. एखाद्याला नेमून दिलेले जे अधिकार आहेत त्याच्या बाहेर जाऊन केलेली कृती. (अधिकारातिक्रमण). उदा. सोसायटीच्या सभासदांना दंड ठोठावण्याचा अधिकार सचिवास नसताना त्याने तसा दंड लावणे. कंपनी कायद्यात अल्ट्रा वायर्स द अॅक्ट आणि अल्ट्रावायर्स द आर्टिक्ल्स ऑफ असोसिएशन असे दोन प्रकार असतात. जी कंपनी कायद्याने प्रतिबंधित केली आहे अशी कृती करणे म्हणजे अल्ट्रावायर्स द अॅक्ट. जे अधिकार संचालकांना आर्टिकल्समधून दिलेले नाहीत ती कृती संचालकांनी करणे म्हणजे अल्ट्रावायर्स द आर्टिकल्स
मलाही याचे नेमके भाषांतर कसे करतात ठाउक नाही म्हणुन प्रश्नचिन्ह टाकले होते.केवळ कायदाबाह्य असे न म्हणता 'बाह्य' हा नवी बाजु यांनी सुचवलेला अर्थ योग्य वाटतो. तो ज्या संदर्भात वापरला जाइल तसे 'बाह्य' च्या आधी शब्द जोडले जातील.
प्रथमदर्शनी म्हणजेच सकृत्
प्रथमदर्शनी म्हणजेच सकृत् दर्शनी ऊर्फ सकृद्दर्शनी. सत्कृतदर्शनी नव्हे. सकृत् = एकदा. याबद्दल एक श्लोकही फेमस आहे.
यद्यपि बहु नाधीषे तथापि पठ पुत्र व्याकरणम् |
स्वजनो श्वजनो मा भूत् सकलं शकलं सकृत् शकृत् ||
स्वजन = स्वजन, नातलग, अपने लोग. श्वजन = कुत्रे.
सकल = सर्व, शकल = 'डोक्याची शकले' मधलं शकल.
सकृत् = एकदा, शकृत् = मळ.
बाप पोराला सांगतोय, जरी लै शिकला नाहीस तरी किमान व्याकरण तरी शीक, नैतर वरीलप्रमाणे गोंधळ होईल. (बंगाली असेल तर वैसेभी होणारच.)
...
Ultra Vires - कायदाबाह्य? घटनाबाह्य? - याचे नेमके भाषांतर कसे केले जाते? कारण मी मराठी वृत्तपत्रांमध्ये आजपर्यंत जसाच्या तसा लॅटीन शब्द पहिला नाही
कदाचित नुसतेच 'बाह्य'? कारण संपूर्ण वाक्प्रचार बहुधा ultra vires of the Constitution असा असावा, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
थोडासाच फरक आहे
+१.
घटनेने जे कायदे करण्याचे अधिकार संसदेला दिलेले नाहीत त्यावर कायदे करणे म्हणजे अल्ट्रा व्हायर्स द कॉन्स्टिट्यूशन उदा. राज्य सूचीतील विषयावर संसदेने कायदा करणे. किंवा केंद्र सूचीतील विषयावर राज्य विधानसभेने कायदा करणे.
मला वाटते घटनेशी सुसंगत नसलेल्या कायद्याला (म्हणजे घटनेच्या तत्त्वांचं उल्लंघन करणार्या कायद्याला) अल्ट्रा व्हायर्स न म्हणता अन-कॉन्स्टिट्यूशनल (किंवा कॉन्स्टिट्यूशनली इनव्हॅलिड) म्हणतात.
[पुलंच्या म्हैसमध्ये - आमाला पावर नाय- असं असताना पंचनामा केला तर तो पंचनामा- अल्ट्रा वायर्स].
अनकॉन्स्टिट्यूशनल हा तात्त्विक आक्षेप आहे
अल्ट्रावायर्स हा तांत्रिक आक्षेप आहे
सरकारी शब्द : आपण हे शब्द का
सरकारी शब्द : आपण हे शब्द का वापरतो हे सरकारी अधिकार्यांना सुद्धा माहित नसते. पण कुणा एका काळी एका बाबूने हा शब्द वापरला होता. तोच कित्ता आज पर्यंत कित्येक पिढ्यांपासून चालत आला आहे. कदाचित आज ब्रिटेन मध्ये सरकारी कामात हे शब्द कालबाह्य झाले ही असतील. पण आपल्या देश्यात ...
बाकी misunderstanding = सुंदरी खाली उभी आहे.
tactical ला मराठीत कसे
tactical ला मराठीत कसे म्हणावे? tactical decision च्या संदर्भात. म्हणजे tactical, जिथे एका निवडीला पर्याय असू शकतात, as opposed to natural, inevitable जिथे खर्या अर्थाने पर्याय नाहीत. "डावपेचात्मक निर्णय" फारच मिलिटरी वाटतंय.
"she made a tactical decision to change her name after marriage because her husband's name was less common than hers, and she thought it would make her stand out. Her sister in law, on the other hand, changed it because that's what all women did, and nobody told her otherwise."
tactical = तोलूनमापून/समजून-उमजून
she made a tactical decision to change her name after marriage because her husband's name was less common than hers, and she thought it would make her stand out.
.... तिने लग्नानंतर आडनाव बदलण्याचा निर्णय तोलूनमापूनच/समजून-उमजूनच घेतला कारण तिच्या नवर्याचे आडनाव विरळा होते (फारसे प्रचलित नव्हते) आणि त्यामुळेच ती चारचौघांत चटकन नजरेत येईल असा तिचा होरा (she thought) होता.
निदान या वाक्यात तरी
निदान या वाक्यात तरी 'उद्मेखून' किंवा 'मुद्दामहून' हे प्रतिशब्द चालतील आणि अधिक मराठी वाटतील असं वाटतं. निदान 'तोलून मापून' वा 'समजून उमजून'ऐवजी 'जाणून बुजून' तरी हवा.
एरवी 'धोरणी / धोरणीपणाचा' हे सहज, सन्दर्भाविना सुचले असते. पण नंदनच्या कावेबाजपणाशी सहमत.;-)
...
मलाही सुरुवातीस माखणे, इ. शी संबंधित काहीतरी वाटलं होतं.
माझ्या मनश्चक्षूंसमोर का कोण जाणे, पण फोडणी 'उदसते' म्हणतात, तेव्हा त्या फोडणीतील मोहरीचे जे काही भजे, राडा अथवा सत्यानाश होतो, तोच हा शब्द वाचला असता दर वेळेस उभा राहतो.
तमाम मराठी साहित्यसुधाकराचा (शब्द बरोबर वापरला ना?) जो काही अत्यल्पांश भाग आमच्या उभ्या आयुष्याच्या वाटेत कडमडला, त्यात हा शब्द अन्यत्र कोठे आमच्या तरी पाहण्यात आलेला नाही. आपण यांना पाहिलेत का?
'जाणून बुजून' अगदी
'जाणून बुजून' अगदी चपखल शब्द आहे ईथे. तू (पक्षी मेघना) वरती 'वावडं' बद्दल लिहिलं आहेस तेच ईथे पण लागू आहे - योग्य शब्द असतात भाषेत पण आपण वापरत नाही, दुसरे कमी समर्पक शब्द सरसकट वापरतो आणि नंतर मग मराठीत नीटसं 'एक्स्प्रेस' करता येत नाही म्हणून कुरकुरतो!
आणि 'उद्मेखून' हा काय शब्द आहे? तुला 'उन्मेखून' म्हणायचंय का?
+१
उन्मेखून बरोबर आहे. (तरीही, उद्मेखून असा उच्चारही काही ठिकाणी ऐकला आहे.)
उन्मेषचा तिसरा अर्थ - त्यावरून, हे उन्मेखून आलेलं दिसतंय.
उन्मेष [ unmēṣa ] m S Twinkling of eyelids; a blink or wink. उन्मेष as contrad. from निमेष is the movement upwards. 2 Opening (of eyes, a flower &c.) 3 fig. Opening of the mind; getting knowledge, or simply, knowledge (as acquired, pursued, desired).
(संदर्भ - मोल्सवर्थ)
ती अनिमीष नेत्रानी त्याच्याकडे पहात राहिली..
"ती अनिमीष नेत्रानी त्याच्याकडे पहात राहिली..." - अशा वाक्यातला अनिमीष शब्द अ+निमीष असा असतो हे उलगडलं. 'निमेष' शब्दाचा तु वर दिलेला अर्थ माहीत नव्हता. आणि असं अनिमीष बहुदा 'नेत्रानीच' कीवा 'नजरेनेच' बघतात. अनिमीष 'डोळ्यानी' अशा सिच्युएशनमधे फारच साधं होतं :)
BTW, तुझ्या प्रतिसादातला शेवटचा भाग थोडा 'बोजड' वाटला खरा!
(संदर्भ - ईथे पहा)
तोलून मापून चांगलं वाटतंय,
तोलून मापून चांगलं वाटतंय, आणि मुद्दामहून ही.
"तिने लग्नानंतर आडनाव बदलण्याचा निर्णय तोलून-मापून घेतला, कारण नवर्याचे नाव तसे विरळाच होते (फारसे ऐकिवात नव्हते?). तिच्या तुलनेने सामान्य नावापेक्षा याने चारचौघात ती उठून दिसेल असा तिचा होरा (अंदाज?) होता. तिच्या नणंदेच्या नाव बदलण्यामागे मात्र काही डावपेच नव्हता. सगळेच बदलतात म्हणून तिनेही बदलले, वेगळ्या निर्णयाबद्दल तिला कधी कोणी बोललंच नव्हतं."
टॅक्टिकल
सदर स्त्रीच्या कृतीत टॅक्टिकल म्हणावं असं फारसं काही नाही. सबब हा शब्दप्रयोग अस्थानी आहे.
----------------------------------
टॅक्टीकल हा शब्द काहीतरी चूक, वरकरणी मूर्खपणाचे, नुकसानकारक पण अंततः तसे करणाराच्या फायद्याचे असे निदर्शित करण्यासाठी आहे. उदा. चेसमधे टॅक्टीकली प्रधान देऊन दोन चालीत मेट करणे. फायनाशियल प्रोपोजल मधे टॅक्टिकल गणीतीय चूक ठेऊन मग बँकेशी निगोशिएट करत बसणे. शत्रूला टॅक्टिकली एक किल्ला घेऊ देणे. इ इ.
----------------------------------------------------
सदर उदाहरणात उल्लेखलेल्या स्त्रीवर नाव बदलच आणि बदलावेच लागेल असे भयंकर प्रेशर आले असेल, असे नाव बदलायचे नसते आणि तो आपला पराजय आहे अशी तिची धारणा असेल, तो मोठा इगो इश्श्यू असेल, इ इ तर तिने टॅक्ट्कली नाव बदलले म्हणणे सुयोग्य आहे. अन्यथा ती कोणाची ना कोणाची इप्सित बदनामी आहे.
tactical ला मराठीत कसे
tactical ला मराठीत कसे म्हणावे? tactical decision च्या संदर्भात. म्हणजे tactical, जिथे एका निवडीला पर्याय असू शकतात, as opposed to natural, inevitable जिथे खर्या अर्थाने पर्याय नाहीत. "डावपेचात्मक निर्णय" फारच मिलिटरी वाटतंय.
या शब्दाशी जुनी ओळख आहे ती नॅव्हिगेशन सिस्टीमच्या नावामुळे. TACAN "ऊर्फ टॅक्टिकल एअर नॅव्हिगेशन सिस्टीम". VOR + DME कॉम्बिनेशन वापरुन एअरलाईन्सची विमानं नॅव्हिगेशन करु शकतात. (व्हीओआर = व्हीएचएफ ओम्नीडायरेक्शनल रेडिओ रेंज, आणि DME = डिस्टन्स मेजरिंग इक्विपमेंट.. या दोन्हीविषयी जालावर पूर्वी लिहिलेलं आहे.) याच सिस्टीमच्या मिलिटरी व्हर्शनला टॅक्टिकल नॅव्हिगेशन सिस्टीम म्हणतात. त्यात अॅक्युरसी वाढीव असते. पण जी सिस्टीम नागरी वाहतुकीत साधी सरळ दिशा अन अंतर ओळखून प्रवास करण्यासाठी आहे, तिलाच पॉलिश करुन मिलिटरीत मात्र "टॅक्टिकल" म्हणतात. या शब्दामधे सरळसरळ मिलिटरी कॉम्पोनंट आहे. हल्ल्याच्या फोर्सपेक्षा रचनेला, प्लॅनला, काव्याला महत्व आहे. (उदा. शिवाजीराजेंच्या) गनिमी काव्याला हा सरळसरळ समानार्थी शब्द ठरावा.
गंमत
वरील वाक्य "she made a tactical decision not to change her name after marriage because her husband's name was more common than hers, and she thought it would not make her stand out." असं असतं तर मी मोजून-मापून ऐवजी कदाचित सोयिस्कर शब्द वापरला असता कारण त्या वाक्याचा संकेत, 'केवळ सोयिस्कर होतं म्हणून नाव बदलण्याची प्रथा न पाळण्या'कडे होता असं वाटलं असतं.
या लेखातही फार उपयोगी चर्चा
या लेखातही फार उपयोगी चर्चा चालू आहे. अर्थात इथेही अधेमधे चर्चेच्या ओघात अवघड इंग्रजी शब्दांचे अर्थ येताहेत. ते उपयोगी ठरताहेत.
Deja vu हा शब्दप्रयोगही एकेकाळी मुद्दाम शोधून अर्थ लावून समजून घ्यावा लागला. एखादा घटनाक्रम घडत असताना हाच घटनाक्रम पूर्वीही घडून गेला असल्याची स्मृती भासणे याला देजावू फीलिंग म्हणतात असं कळलं. असा अनुभव कधीकधी नक्कीच आल्याचं आठवतंय. देजावू हा शब्द माहीत नसतानाही याविषयी एका मानसशास्त्रातल्या तज्ञाच्या बोलण्यातून असं समजलं होतं की समोर घडणार्या घटनेचे इंटरप्रिटेशन नेहमीच्या ठराविक चालू मेमरी लोकेशनकडून येण्याऐवजी पूर्वीच्या एखाद्या मेमरी लोकेशनमधून आल्यामुळे असा भास होतो. अर्थात हे माझं इंटरप्रिटेशन, त्याचे शब्द नेमके आठवत नाहीत.
Jamais vu किंवा तत्सम काहीतरी हा Deja vu च्या उलट इफेक्ट असतो. उच्चार माहीत नाही.
त्याचप्रमाणे anecdotal evidence हा शब्दही काहीवेळा ऐकला आहे. याचा परफेक्ट अर्थ माहीत नाही, पण अनडॉक्युमेंटेड किंवा ऐकीव पुरावा असा असावा असं शोधावरुन वाटलं.
जालावरच्या चर्चास्थळांवर
जालावरच्या चर्चास्थळांवर anecdata पण दिसतो आजकाल - अनुभवविश्वातले अनेक पुरावे एकत्र आणल्यावर मिळतो तो अनेकडेटा :-)
मला नवीन लॅपटॉप घ्यायचाय. कुठला घेऊ? हा मॉडेल कसा वाटतो? पंधरा उत्तरांपैकी ७-८ जणांनी फारच उत्तम आहे, चार वर्षं झाली काही त्रास नाही असे सांगितले, पण तिघा चौघांनी जरा गरम होतो, बॅटरी फार वेळ चालत नाही, सर्विस अगदी बाद असं सांगितलं तर एकूण माहितीला anecdata म्हणतात. काही संख्याशास्त्रीय नाही, पण रियल लाइफ अनुभवांचा साठा.
बोध
म्हणूनच मी उदा. म्हणून दिला. मी आधी म्हटल्याप्रमाणे मराठीत परिस्थितीनुसार शब्दछटा बदलतात. तुझ्याच 'व्हल्नरेबल'बाबत ते दिसेल.
आता इंग्रजीत नुसता 'मेटा' हा शब्द ऐकला असतास तर तुला कळला असता का ? तो संदर्भानेच कळला ना ? तसाच अधि हा देखील बोध न होणारा असला तरी संदर्भानेच समजून घ्यायचा पारिभाषिक शब्द आहे, असे माझे मत.
उदा. मेटाडेटा = अधिविदा म्हणू शकतो पण मेटामॉर्फसिस् = अवस्थांतरण. तिथे 'अधिबदल' वा 'अध्यवस्थांतरण'ची गरज नाही.
होय, अर्थछटा बदलतात ते
होय, अर्थछटा बदलतात ते बरोबरच. किंबहुना काही विशिष्ट संदर्भांमध्ये 'अधिविदा' वापरायला माझी अजिबात हरकत नाही. पण या धाग्यावर शब्दास अचूक प्रतिशब्द यापलीकडे त्या त्या भाषेच्या प्रकृतीला साजून दिसेल असं 'एक्स्प्रेशन' (अहं, अभिव्यक्ती वापरायचा नाहीय. :प) शोधायचा प्रयत्न चालू आहे, म्हणून मुद्दाम पुन्हा विचारला.
उदाहरणार्थः इथे दिलेल्या व्याख्येनुसार (A term, especially in art, used to characterize something that is characteristically self-referential) अधिविदा हा शब्द योग्य. पण तिथल्या उदाहरणातल्यासारखा त्याचा वापर करायचा असेल तर? ("So I just saw this film about these people making a movie, and the movie they were making was about the film industry..." - "Dude, that's so meta. Stop before my brain explodes.") त्याला मराठीत काही समांतर शब्दयोजना (प्रतिशब्द नव्हे) आहे का, असा प्रश्न.
सॉरी, नजरेतून पृच्छा सुटली.
सॉरी, नजरेतून पृच्छा सुटली.
विद्याबद्दलचा विदा म्हणजे अधिविदा अशी सोप्पी व्याख्या करून चालेल असं वाटतं. (हे पाहा, कदाचित कामाला येईल.)
पण उदाहरण दिल्याशिवाय समाधान पुरतावणे नाही. तर उदाहरणार्थः 'डीडीएलजे' हा सिनेमा. 'मेकिंग ऑफ डीडीएलजे' हा सिनेमाबद्दलची माहिती सांगणारा सिनेमा. म्हणून मेटा. 'लगान' हा सिनेमा. 'मेकिंग ऑफ लगान' हा सत्यजीत भटकळचा माहितीपट म्हणजे मेटा. 'मेकिंग ऑफ लगान' (का असंच कायसंसं नाव असलेलं) पुस्तक हाही मेटा. 'चाहूल' हे नाटक. 'कळा ज्या लागल्या जीवा' हे 'चाहूल'चे संदर्भ वापरून लिहिलेलं नवं नाटक. ते स्वतंत्रपणेही पाहता येतं. पण 'चाहूल' माहीत असेल, तर त्यातले अर्थ अजून गुंतागुंतीचे होतात. त्यामुळे ते मेटा. (अर्थातच, अर्थातच -) डॉयलबुवांचा होम्स मूळ अवतार. त्यावरचे निरनिराळे चित्रपट, कथा, रसग्रहणात्मक साहित्य, दूरचित्रवाणीवरच्या मालिका, त्या त्या आवृत्तीवर आधारित फ्यानफिक्शन, त्यासाठी काढलेली फ्यानार्ट.... हे सगळं मिळून म्हणजेही मेटाच. (बादवे, नेमाड्यांच्या मुलाखतींचं पुस्तक हे मेट्याचं उदाहरण ठरावं काय?)
अडचण अशी आहे की मेटा ही तुलनेनी नवी संज्ञा आहे. संकल्पना जुनीच असली तरीही. त्यामुळे तिची व्याख्या तितकी काटेकोर नाही. नाम म्हणून, विशेषण म्हणून - दोन्ही प्रकारे तिचा वापर होतो. नाम म्हणून होणार्या वापरातही पुन्हा पोटभेद (की पाठभेद?!). फ्यानफिक्शनच्या प्रेमापायी माझा तिच्याशी वारंवार संबंध येतो आणि खरंच जीव 'मेटा'कुटीस येतो.
***
इतकी उदाहरणं लिहिल्यावर मला वाटतंय, जो स्वतंच्या पायावर धडपणे उभा राहू शकत नाही, ज्याला कशाचा तरी टेकू लागतोच लागतो, असा विदा म्हणजे अधिविदा / मेटा. अशा विद्यावर आधारित गोष्ट असेल, तर तिला अधि / मेटा हे विशेषण लावून चालेल. या कोनातून काही वर्णन सुचतं का पाहिलं पाहिजे...
मला माहित असलेल्या संदर्भात
मला माहित असलेल्या संदर्भात सांगते - metalanguage: लेख लिहीत असताना, त्यातले "हा लेख अमुक-अमुक विषयावर आहे. पहिल्या भागात हे, दुसर्या भागात ते दाखवण्यचा प्रयत्न केला आहे" वगैरे वाक्य म्हणजे मेटालँग्वेज. मूळ मजकूरापासून एक पातळी बाहेर (वर?) येऊन, त्याची जाणीवपूर्वक (reflexive) चर्चा, म्हणजे मेटा पातळी.
metahistory: हेयडेन व्हाइट नामक इतिहासकाराचे प्रसिद्ध पुस्तक आहे. प्रसिद्ध इतिहासकारांच्या संहितांचा बारकाईने वाचून व्यापक इतिहासलेखनप्रक्रियेचा, तिच्यातील खोल दडलेल्या साहित्यिक स्वरूपाचा, मुळाशी असलेल्या नैतिक मूल्यांच्या मांडणीचा चिकित्सक अभ्यास.
सारांश तर नाहीच, एकवेळेस
सारांश तर नाहीच, एकवेळेस सिंहावलोकन चालेल, पण अर्थ फक्त समरी किंवा सर्वेपुरता मर्यादित नाही. मेटा शब्दात reflexive (आत्मवाचक? आपल्या कृतीबद्दल आत्मभान असणे?) दृष्टीकोन महत्त्वाचा आहे. म्हणजे एखाद्या सृजनशील किंवा संशोधकीय कृतीचा जाणीवपूर्वक त्याच कृतीची किंवा शास्त्राची मूल्ये वा मेथडॉलॉजी तपासण्यासाठी वापर करणे, आणि तिचीच भाषा/शैली वापरून करणे. म्हणून इतिहासाचा इतिहास, साहित्यिकांबद्दल कादंबरी, बॉलिवुडवाल्यांवर बॉलिवुड सिनेमा, (डेटाबेसबद्दल डेटा?), इ.
सर्वांचेच आभार! अजुनही नीटसे
सर्वांचेच आभार! अजुनही नीटसे कळलेले नाही. पण आधीच्या लहानशुन्यापेक्षा हे मोठे शुन्य बरंच बरंय! :)
अधिक समजण्यासाठि काही प्रश्न
-- मुळातच सगळंच इतिहासलेखन हाच मेटा का नाही? तो ही घडलेल्या घटनांच्या टेकूवर उभा असतो, स्वतंत्र स्वायत्त साहित्य निर्मिती असं त्यात काही नसतं
-- रिसर्च पेपर्स, व्हाइट पेपर्स हे मेटा लेखन असतं का?
-- विविध विषयांवरील डॉक्युमेंटरी फिल्म्स या मेटाफिल्स म्हणता येतील काय?
मुळातच सगळंच इतिहासलेखन हाच
मुळातच सगळंच इतिहासलेखन हाच मेटा का नाही? तो ही घडलेल्या घटनांच्या टेकूवर उभा असतो, स्वतंत्र स्वायत्त साहित्य निर्मिती असं त्यात काही नसतं
उदा. मराठ्यांचा इतिहास हा मेटा नाही. इतिहासलेखनाचा इतिहास हा मेटा आहे.
रिसर्च पेपर्स, व्हाइट पेपर्स हे मेटा लेखन असतं का?
रिसर्च पेपर्स कसे लिहावेत वगैरे चर्चा करणारे रिसर्च पेपर्स हे मेटालेखन आहे.
विविध विषयांवरील डॉक्युमेंटरी फिल्म्स या मेटाफिल्स म्हणता येतील काय?
पुन्हा तेच - फिल्म कशा बनवाव्या वगैरे डिस्कस करणार्या फिल्म्स या मेटा फिल्म्स.
एखाद्या ज्ञानशाखेचा दृष्टिकोन त्याच ज्ञानशाखेला वापरल्यावर जे होतं त्याला मेटा म्हणावं असं वाटतं.
मेटाडेटा
इतिहासलेखन म्हंजे नेमकं मेटालेखन नाही.
कुणी इतिहासलेखनाचा इतिहास लिहिला, तर मात्र तो मेटाइतिहास होउ शकतो.
म्हंजे एखाद्यानं 'आजवर इतिहास कसा कसा लिहिला गेला. आधी कोणती साधनं वापरली, इतिहास ह्य शब्दाचा अर्थ काय मानला गेला' वगैरे पासून ते इतर तपशील दिले तर तो मेटाइतिहास.
जर डेटा = विदा असेल तर--
मेटाडेटा = पितृविदा
.
.
किंवा स्रोताचा स्रोत म्हंजे मेटा. 'स्रोताचा स्रोत' ह्याचं लघुरुप 'स्रोस्रोत' असं व्हायला हरकत नसावी.
--डेटाबेसप्रेमी
हिस्टोरिओग्राफी म्हणजे
इतिहासलेखनपद्धती. इतिहास कसा लिहितात याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास, एखाद्या इतिहासशाखेचा तशा वेगवेगळ्या पद्धतींनिशी अभ्यास- उदा. मराठा इतिहासाची हिस्टोरिओग्राफी म्ह. त्या इतिहासाचे चित्रीकरण कशाप्रकारे केले गेलेय? मिलिटरी हिस्टरी, सोशल हिस्टरी, इकॉनॉमिक हिस्टरी की अजून काही? मराठ्यांनी स्थापन केलेल्या राज्याचे पर्सेप्शन काय आहे? निव्वळ बंडखोर म्हणून आहे की संतपरंपरेने प्रभावित अशी थोर चळवळ वगैरे? इ.इ.
"रसलंपट तरि अवचित मजला
In reply to अगदी अगदी ब्रिटिश by बॅटमॅन
"रसलंपट तरि अवचित मजला गोसावीपण भेटे"
- कवी बा भ बोरकर.