Skip to main content

चोरी आणि इतर कथा - हृषिकेश गुप्ते (सुधारित)

बर्‍याच लोकांकडून स्तुती ऐकल्याने "अंधारवारी" हे पुस्तक वाचायला सुरूवात केली.
त्यातली पाहिलीच कथा - "काळ्याकपारी" पूर्ण वाचली आणि आवडलीदेखील.
कर्मधर्म संयोगाने आमच्या आवडत्या कथालेखकाचं एक पुस्तक नुकतंच वाचलं होतं- Just After sunset by Stephen king
.
त्यातली "N" ही कथा आम्ही आधी वाचली होती. थोडसं शोधल्यास संपूर्ण कथा मिळायलाही हरकत नाही.

तर आमचा पॉईंट असा की गुप्तेंची "काळ्याकपारी" आणि किंगची "N" ह्या कथा एकदम सेम टू सेम आहेत.
कथेची सुरूवात, त्यातले संदर्भ, त्याची एकूण धाटणी आणि शेवट -सगळं अगदी हूबेहूब. फरक कसा तो नाहीच.
.
गुप्तेंच्या कथेखाली कुठेच आधारित/अनुवादित्/स्वैर अनुवाद अशी काहीच नोंद नाही. त्यांची काळ्याकपारी ही कथा त्यांच्यामते एकदम ओरिजिनल आहे.
हे आम्हाला अजिबात झेपलं नाही.
=====================================================================================

प्रमेय - काळ्या कपारी ही कथा स्टिफन किंगच्या "N" ची नक्कल आहे

काळ्या कपारी ही कथा स्टिफन किंगच्या "N" ची नक्कल आहे ह्याची सप्रमाण सिद्धता.

साहित्य -
हृषीकेश गुप्ते ह्यांचे अंधारावरी हे पुस्तक. (१)
स्टिफन किंग ह्यांचे " just after sunset: stories" हे पुस्तक (१)
स्वतःचा मेंदू (वापरला तर उत्तम)
plagiarism नामक संकल्पनेबद्दल माहिती असल्यास उत्तम. नसल्यास विकिपीडिया वाचावा.

सिद्धता -

आता आपण मूळ इंग्रजी कथा आणि गुप्तेंची मराठी कथा ह्यातली साम्यस्थळं पाहू.

१. मूळ इंग्रजी कथेतली पात्रं - Sheila , Johnny as Doctor, Charles as her childhood friend and N as patient.
काळ्या कपारी मधली पात्रं - अंजली नाडगौडा, विराज नाडगौडा-डॉक्टर, अवधूत- बालपणीचा मित्र, आणि ज्ञ हे पेशंट.

.
मूळ इंग्रजी कथेची सुरुवात - Sheila writes a letter to Charles.
पत्रात सुरुवातीलाच लेखिका सांगते की "I was sixteen and had a terrible crush on you." "I see you all the time on CNN, talking about Things Medical"

शिवाय पत्रात एक तळटीप आहे, ज्यात पत्रलेखिका म्हणते - "oy, such a crush I had on you!"

मराठी कथेची सुरूवात - अंजली नाडगौडा आपल्या बालपणीच्या मित्राला पत्र लिहिते.
हद्द म्हणजे मूळ कथेतल्या पत्रात असलेली तळटीप मराठी कथेतही आहे, थोडा फेराफार करून वाढवली आहे.
तळटीपेत गुप्तेंची अंजली लिहिते -
"तुला खूप वर्षांपासून सांगायचं होतं, पण राहूनच गेलं . मला तू आवडायचास. अगदी खूप खूप आवडायचास. माझं प्रेम होतं तुझ्यावर पण ते कळायच्या आताच तू आमच्य आयुष्यातून निघून गेलास."
पुढे अंजली लिहिते -
"आजही मी अगदी न चुकता तुझा नॅशनल टीव्हीवरचा "जनम पिछले जनम का" हा कार्यक्रम बघते.

दोन्ही पत्रांचा सारांश एकच आहे.

३. मूळ इंग्रजी कथेचा अंत - वर्तमानपत्रांतून Sheila ची आत्महत्या आणि एका पत्रातून Charlesचा पुढील तपासाचा निश्चय ध्वनित होतो.
मराठी कथेचा अंत - वर्तमानपत्रातून अंजली नाडगौडांची आत्महत्या आणि पत्रातून अवधूतचा पुढील तपासाचा निश्चय ध्वनित केला आहे.
दोन्ही कथांमधे Sheila/अंजली ही Charles/अवधूत ह्यांना आपल्या भावाच्या पत्रव्यवहाराकडे दुर्लक्ष करून तो जाळण्याचा सल्ला देते.

इथे गुप्तेंनी पत्र, बातमी आणि नंतर चं ईमेल हे तंतोतंत उचलले आहेत.

दुसऱ्या इमेलच्या शेवटी इंग्रजी कथेत आहे -
"there is nothing out there.
Just some rocks.
I saw with my own eyes.
I swear there's nothing out there, so Stay away."

मराठी कथेत -
"मी स्वत: गेले होते ना त्या काळोखदरीत.
भयंकर
पण भास होते ते
विसरून जा"

इंग्रजी कथेत "Woman jumps from bridge, mimics brother's suicide" अशी ठळक बातमी आहे

गुप्ते लिहितात - " डॉ विराज नाडगौडा ह्यांच्या बहिणीची आत्महत्या"
दोन्ही बातम्यांची तारीख आहे १२ जून.

इंग्रजी कथेत ईमेलची सुरूवात-
"Chrissy-
Please cancel all appointments for the next week. I know this is a short notice."

गुप्तेंच्या इमेलची सुरूवात -
"सारा, कॅन्सल ऑल शुटीन्ग्स प्लॅन्ड नेक्स्ट वीक रिगार्डिंग टू अवर प्रोग्रॅम. " (हे मराठी-इंग्रजी गुप्तेंचंच आहे).

इमेलची इंग्रजी कथेतली तारीख आहे १५ जून आणि गुप्तेंच्या इमेलची तारीख आहे १८ जून.
.
.
४.
मूळ इंग्रजी कथेचा गाभा - एक N नावाचा पेशंट त्याला आलेल्या विचित्र अनुभवांची माहिती डॉक्टरांना देतो.
मराठी कथा - ज्ञ नावाचा पेशंट त्याला आलेल्या विचित्र अनुभवांची माहिती डॉक्टरांना देतो.

इंग्रजी आणि मराठी कथेत पेशंट त्याला वस्तू सम आणि विषम अशी विभागायची सवय असल्याचं सांगतो. एक बूट मोजण्याचा तपशीलवार किस्साही डॉक्टरांना पहिल्या बैठकीत सांगतो. अर्थात इंग्रजी कथेत एकूणतीस बूट आहेत तर मराठी कथेत तेराच.
दोन्ही कथांमधे पेशंटला फोटोग्राफीची आवड असते.
दोन्ही कथांमधला पेशंट आपले उत्तम फोटो नातेवाईकांना आणि मित्रांना भेट म्हणून पाठवतो.
दोन्ही कथांमधला पेशंट फोटोग्राफी करायला म्हणून बाहेर पडतो आणि एका रानवाटेने गाडी चालवत शेतांतून पुढे जातो. अर्थात इंग्रजी कथेत Toyota 4Runner आहे तर मराठी कथेत महिंद्राची जीप!
दोन्ही कथांमधे पेशंटला काळे पाषाण दिसतात, ५-७ फूट उंचीचे आणि त्यांच्यावर वेगवेगळे क्रूर चेहेरे कोरलेले असतात.
दोन्ही कथांमधे पेशंट डोळ्यांनी पहातो तेव्हा त्याला ७ पाषाण दिसतात पण कॅमेऱ्याच्या व्यूफाईंडरने ८ पाषाण दिसतात, पुन्हा नुसत्या डोळ्यांनीही आठच दिसतात.
दोन्ही कथांमधे पेशंटला पाषाणांच्या मधोमध काहीतरी दिसतं, जे जिवंत वाटत असतं.

दोन्ही गोष्टींमधे डॉक्टर जेव्हा त्या पाषाणांमधे जातात तेव्हा त्यांना स्वत:च्या नावाचं एक पाकीट ठेवलेलं दिसतं.

बेसिकली कथानक तंतोतंत छापलेलं आहे.
-------------------------------------------------------------------
हे कथेच्या कथानकातलं, तपशीलातलं साम्य आहे.
आता कथेच्या वाक्यांमधलं साम्य बघूया.

इंग्रजी -
[He is silent for a long time. I notice he is trembling. He has broken out in a sweat. It gleams on his forehead like dew]

मराठी- कंसातच!, अर्थात गुप्तेंनी [] ऐवजी () वापरले आहेत.
(या ठिकाणी ज्ञंच्या शरीराला कंप सुटला होता. हिवाळा असूनही कपाळावर घामाचा एक पातळ थर तयार होत होता. बराच वेळ ते शांतच होते. )
-------------------------------------------------------------------

इंग्रजी -

... And decided, Time to leave. That's enough. Ifn something has mutated the bushes, some environmental condition that's poisoned the ground so be it. you have tested the world and found it as you hoped it would be, as you knew it would be, as it always was.
...
Now go back to your own life....
Go back to your life, Dr. B

मराठी -
शक्य आहे तोवर येथून निघायला हवं. माझ्या मनाने जणू निर्वाणीचा इशारा दिला होता. ते मला कळकळीची विनंती करत होतं की बाबा तुला जे पडताळून पहायचं आहे ते तू पाहिलं आहेस. आता नीघ.
-------------------------------------------------------------------

I felt an urge to turn and look again. Strong urge. I fought it and lost.
When I turned around I saw seven stones.

इतक्यात मनात ती इच्छा उफाळून आली. मागे वळून पहाण्याची तीव्र इच्छा.
मी मुळात मागे वळून पहायला नकोच होतंल पण मी पाहिलं.
सात. आता त्या पाषाणवर्तुळात सात पाषाण होते.
-------------------------------------------------------------------

नीट वाचलं तर अजून सापडेल, पण सिद्धतेसाठी एवढं पुरेसं आहे.

=====================================================================================
.
मराठीत एका पुस्तकात कथा प्रसिद्ध करताना लेखकाने इतका मोठा खोटारडेपणा करावा?
लाज वाटली पाहिजे.
तर आता हे सगळं कळल्यावर आपण वाचक, गुप्तेंना किंवा मनोविकास प्रकाशनाला "ही कथा आधारित /अनुवादित आहे" असं पुढच्या आवृत्तीत लिहायला भाग पाडू शकतो का?
.
टीप- त्यांच्या बाकीच्या कथा ओरिजिनल असतीलही, पण विश्वास उडून गेलाय. तेव्हा पुन्हा त्यांचं पुस्तक विकत घेऊन वाचेन असं वाटत नाही.
आणि हे सगळं एका वेगळ्या धाग्यात मांडण्याचं कारण की कुणी आंतर्जालावर गुप्तेंच्या नावाने शोध केला, तर त्यात हे पानही सापडावं.
----------------
२०१५ उपदट१- मराठी नावाने सर्च केल्यावर पहिल्या चारात आता हे पान दिसतंय. इंग्रजीही अ‍ॅडकवून बघूया.
(#rushikesh gupte,#Hrishikesh gupte, हृषिकेश गुप्ते)

२०१८ उपदट२ - लोकसत्तेत इथला रेफरन्स दिलेला पाहिला. तेव्हा आणखी तपशील डकवले आहेत. कुणाला "काळ्याकपारी" कथेच्या उचलेगिरीबद्दल संशय असेल तर तो दूर व्हावा.

२०१८ उपदट ३- गुप्त्यांनी लोकसत्तेत उत्तर दिलं आहे.
त्यात ते कथा "आधारित" आहे इतकं तरी कबूल करताहेत आणि पुढल्या आवृत्तीत तशी नोंद करतील म्हणताहेत.

जयदीप चिपलकट्टी Tue, 16/06/2015 - 02:08

हा विषय मला सोपा वाटत नाही. इथे मी वादासाठी असं गृहीत धरतो आहे की स्टीफन किंगची कथा स्वतंत्र आहे (हे तितकंसं खरं नाही, खाली पाहा), गुप्त्यांनी तिची कॉपी मारलेली आहे पण तसं कुठेही कबूल केलेलं नाही. (मी स्वत: दोहोंपैकी एकही कथा वाचलेली नाही.)

१. ही कथा भाषांतरित/आधारित आहे असं गुप्त्यांनी त्यांच्या पुस्तकात लेखी मान्य करायला हवं इतपत पटण्यासारखं आहे. पण अवघड मुद्दा असा की किंग (किंवा त्याचा प्रकाशक) जर गुप्त्यांना म्हणाला की हे भाषांतर छापण्याआधी तुम्ही माझी परवानगी घ्यायला हवी होती, आणि आता या घडीला तुम्हाला पुस्तक मागे तरी घ्यावं लागेल किंवा रॉयल्टी तरी द्यावी लागेल तर मग काय? गुप्त्यांनी कबुली दिल्यामुळे किंगच्या दाव्याला बळकटी येईल हे उघडच आहे.

२. आता जर मराठी पुस्तकविश्वाची मरतुकडी तट्टाणी आणि स्टीफन किंगचा रत्नजडित ऐरावत यांची परस्परतुलना केली तर काही गोष्टी उघड आहेत. जर किंगने 'नेहमीच्या दराने' पैसे मागितले (म्हणजे त्याच्या फ्रेंच भाषांतराचे वगैरे तो मागत असेल तितके) तर गुप्त्यांच्या प्रकाशकाला ते परवडणं शक्य नाही. पण त्याला परवडतील इतके मागितले तर किंगसाठी ती अगदीच फालतू रक्कम असेल. मग त्याने किती मागावेत?

३. आणखी एक गुंतागुंत अशी की मराठी रहस्यकथा वाचणारे अनेकजण इंग्रजी रहस्यकथाही वाचू शकतात, आणि किंगची पुस्तकं भारतात मिळतातच. तेव्हा गुप्त्यांची कथा आणि किंगची कथा ही (निदान थोड्याफार प्रमाणात) competing products आहेत. तेव्हा किंग असं म्हणाला की माझ्या इंग्रजी पुस्तकांचा भारतातला खप कमी होऊ नये म्हणून मराठी भाषांतराला परवानगी नाकारण्याचंच धोरण मी ठेवीन, तर मग काय? यामध्ये इंग्रजी न येणाऱ्या मराठी वाचकांचं नुकसान आहे. त्यात किंगचा काहीच तोटा नाही, कारण मराठीतून (किंवा इतर भारतीय भाषांतून) त्याला मिळू शकेल ती रॉयल्टी फारच किरकोळ असणार.

४. आत्ताच मी विकिपीडियावर पाहिलेल्या माहितीनुसार किंगची कथा आर्थर मेकनच्या एका कथेवर बेतलेली आहे, पण किंगने हे ऋण मान्य केलेलं आहे. आता जर गुप्ते म्हणाले की चोरलेली वस्तू पुन्हा चोरण्यात काहीच चूक नाही तर मग काय?

या सगळ्यामागे वाङ्मयचौर्याचं समर्थन करण्याचा हेतू नाही, तर अशा प्रकारच्या बाबी व्यावहारिक दृष्ट्या किचकट ठरू शकतात हे मांडण्याचा आहे.

मिसळपाव Tue, 16/06/2015 - 02:46

In reply to by जयदीप चिपलकट्टी

"व्यावहारिक दृष्ट्या किचकट ठरू शकतात " ... "त्यामुळे जाउंद्या" असं जरी तुम्ही म्हंटलं नसलं तरी हे एव्हढं समजाउन सांगण्याचा दुसरा काय उद्देश आहे तो कळला नाही. आणि तुमच्या चौथ्या मुद्द्यातप्रमाणे गुप्ते म्हणाले तर मुळात ती "स्टिफन किंगने "चोरलेली" नसून व्यवस्थित ऋणनिर्देश करून लिहिलेली आहे" हे त्याना ठणकाउन सांगायचं. "तर मग काय?" हा प्रश्न का बुवा पडलाय तुम्हाला? You are dead right when you say "Its complicated" - its now complicated for Gupte!!

अस्वल Tue, 16/06/2015 - 03:56

In reply to by जयदीप चिपलकट्टी

व्यावहारिकदृष्ट्या किचकट असू शकतात, पण तो निराळा मुद्दा झाला ना?
मुळात ही कथा आधी एका दिवाळी अंकात प्रसिद्ध केली आहे, त्या नंतर पुस्तकात टाकल्या आहेत. दोन्ही वेळा स्वत:ची म्हणून.
उलट किंगची कथा ही आधारित (inspired) आहे हे त्याने पुस्तकातच लिहिलंय.
.
साध्या कॉलेजातल्या पेपरमधे जर अशा गोष्टी घडल्या तर त्याला plagiarism म्हणतात आणि शिक्षा होते. मग छापील पुस्तकांत अशी कॉपी करून स्वतःला लेखक म्हणून मिरवणार्‍यांना काय म्हणून सोडून द्यायचं?
ही वाचकांची फसवणूकच नाही का?

========================
आता ही चोरी पकडल्यावर मला उगाच त्याच पुस्तकातली "गानू आजींची अंगाई" ही "gramma" पासून inspired आहे असं वाटायला लागलंय. पण त्याबद्दल आक्षेप नाही,

अनु राव Tue, 16/06/2015 - 11:46

In reply to by जयदीप चिपलकट्टी

@जयदिप - लेखातले हे वाक्य लक्षात घ्या, आणि तरी पण तुम्हाला हा विषय सोप्पा वाटत नाही?

कथेची सुरूवात, त्यातले संदर्भ, त्याची एकूण धाटणी आणि शेवट -सगळं अगदी हूबेहूब. फरक कसा तो नाहीच.

---------

आत्ताच मी विकिपीडियावर पाहिलेल्या माहितीनुसार किंगची कथा आर्थर मेकनच्या एका कथेवर बेतलेली आहे, पण किंगने हे ऋण मान्य केलेलं आहे. आता जर गुप्ते म्हणाले की चोरलेली वस्तू पुन्हा चोरण्यात काहीच चूक नाही तर मग काय?

हे लॉजिक पार डोक्यावरुन गेले आहे. तसेही कींग नी कथा चोरली नाहीये. आणि गुप्तेंना जर तसेच वाटत असेल तर त्यांनी मेकन च्या कथेवर आधारीत असे लिहायचे.

--------
एकुणच तुमच्या मते एखादी गोष्ट "व्यावहारिक दृष्ट्या किचकट" असेल तर तिच्यावर सरळ डल्ला मारावा.
मला तर पैसे मिळवणे आणि ते सुद्धा भरपुर, ही गोष्ट स्रर्वात जास्त "व्यावहारिक दृष्ट्या किचकट" वाटते. मी कुठे आणि कसा डल्ला मारावा ह्या बद्दल काही मार्गदर्शन :-)

रोचना Tue, 16/06/2015 - 11:43

wow.
दोन्ही पुस्तकातले काही उतारे देता येतील का? खरेच असे असल्यास हे चूक आहे, प्रश्नच नाही. अजून कोणी दोन्ही कथा वाचल्या आहेत का? मेघना?

काही वर्षांपूर्वी एका बंगाली सिनेदिग्दर्शकाने कीस्लोव्स्की च्या रेड, ब्लू मालिकेतल्या काही कल्पना ढापून स्वत:च्या सिनेमात घातल्या. इथे काय कोणी ही मालिका पाहिली नसवी असे वाटले की काय कोण जाणे. लगेचच लोकांनी लिंक लावून आरडाओरड केली. मग "इथल्या जाणकार मंडळींना कळेलच की ही माझी किस्लोव्स्कीला वाहिलेली आदरांजली आहे, उगीच त्याचे नाव वेगळे कशाला घ्यायचे, माझ्यावर जळणार्‍या दुष्टांनी कारण नसताना हा बदनामीचा कट रचलाय" इत्यादी इत्यादी त्याने युक्तीवाद केला! काहीही म्हणजे काहीही.

plagiarism किती सर्रास आणि सर्व पातळींवर कसे चालते ते आम्हा शिक्षकांना विचारावे. आजकाल जालावर उपलब्ध .pdf आणि कॉपी-पेस्ट मुळे तर मुलांना असाइन्मेंट अगदी विचारपूर्वक द्यावी लागते, कारण हमखास मुलं उचलतातच. यात काही भाग अ‍ॅकॅडेमिक लेखनात रेफरेंसिंग कसे करायचे हे त्यांना एम.ए किंवा एम.फिल ला येईपर्यंत शिकवलेलंच नसतं, उलट "इंटरनेटवर शोधा की" असे सल्ले शिक्षकच देतात - त्यात नेमकं दुसर्‍यांच्या तर्कांना, शोधांना आपल्या लेखनात कसा वापर करावा याचा फारसा विचारच होत नाही. पण पकडलं जाण्याची शक्यता ही कमी असते हे मुलं जाणून असतात. मुलंच का, अगदी सीनियर प्रोफेसरांना देखील हे माहित असतं.

वर आमच्याकडे plagiarism चं नाव काढलं की how does one philosophically differentiate between inspiration and plagiarism वगैरे काथ्याकूट सुरू होतो. एकीकडे हिंदी गाण्यांचे उदाहरण, दुसरीकडे शेक्स्पियर आणि महाभारतातून लोकांनी घेतलेल्या प्रेरणांची उदाहरणं. पण दोन्हींमधे नक्कीच फरक आहे, किमान अ‍ॅकॅडेमिक लेखनात तरी आहेच, आणि ललित लेखनातही inspiration स्पष्ट करायचे नसले तरी त्याच्या खुणा लेखनाद्वारेच स्पष्ट करता येतात.

-प्रणव- Tue, 16/06/2015 - 12:04

आता हे सगळं कळल्यावर आपण वाचक, गुप्तेंना किंवा मनोविकास प्रकाशनाला "ही कथा आधारित /अनुवादित आहे" असं पुढच्या आवृत्तीत लिहायला भाग पाडू शकतो का?

का नाही. लिहा एक ईमेल आणि द्या पाठवून! बघू काय म्हणतात ते.

मेघना भुस्कुटे Tue, 16/06/2015 - 12:20

मी किंगची गोष्ट नव्हती वाचलेली. आत्ता वाचली. हद्द आहे ही. उचला ना. पण त्यावर रीतसर संस्कार करा. मूळ लेखकाला श्रेय द्या. कमाल आहे बाबा. का ही ही फरक नाही.

रोचना Tue, 16/06/2015 - 12:36

In reply to by मेघना भुस्कुटे

कमाल आहेच. पण फक्त त्याने उचलल्याची नाही. वाचकाला किती मूर्ख समजत असतील ही मंडळी. किंवा त्यांच्या इतकीच सिनिकल - त्यांना काहीही होणार नाही याची खात्री असावी.

बॅटमॅन Tue, 16/06/2015 - 12:23

बायदवे हा मुद्दा कुणी लावून धरल्यास गुप्ते यांना अंमळ जास्तच प्रसिद्धी मिळेल असे कुणास वाटते काय?

गवि Tue, 16/06/2015 - 12:40

संगीतातही हे खूप आहे. उचलणारे म्हणून प्रसिद्ध असणारे काहीजण सोडाच, पण अगदी तशी अपेक्षा नसलेलेही उचलताना दिसतात.
बरं उचलून अधिक चांगलं आणि बर्‍यापैकी वेगळं केलं तरी समजता येईल पण काही उदाहरणं तर .. अयायायाया..

ब्रिंग द वाईन

http://www.youtube.com/watch?v=8zC906x0c2k

हे गाणं ऐका. हिंदीतलं मी सांगत नाही.

कुलस्य Tue, 16/06/2015 - 12:42

धक्का बसला. कारण हे लेखक नवीन लेखकामधे माझे आवडते होते. आणि ते चांगल्या लेखाकानमधे नव कमवतील अशी आशा वाटत होती. त्यांची ही कथा मी दिवाली अंकातच वचली होती आवदली होती. आता त्यांच्या इतर आवडलेल्या बद्दल शंका येणारच.
आणि व्यवहार कीचकट आहे म्हणून चोरी कराची का सरल ? बरयाच गोष्टी बदलत्या आल्या असत्याच. आणि मूल काथेवरून स्फूर्ति घेतली असे म्हणता आले असते. पैन इथे म्हणल्यपरमाने सगलेच सारखे आहे. (मी किंग ची ही कथा वाचलेली नाहीं.)

बिटकॉइनजी बाळा Tue, 16/06/2015 - 13:16

हे आधीचं माहीत होतं! इथे कुणीतरी त्या कथा चांगल्या आहेत असं देखील म्हंटलं होतं. मागे मी त्याची चेष्टा देखील केली होती. गमंत म्हणजे मला या लेखकाबद्दल गणेश मतकरींच्या फेबु पोस्टवरून कळालेलं. आणि गणेश मतकरी स्वतः स्टीफन किंगचे चाहते असून त्यांच्या नजरेतून ही बाब कशी सुटली याचं कोडं वाटलेलं. असो.

कशाकशाचं म्हणून भय नाही बघा या लेखकाला! ढापायचं, लोकलज्जेचं! पट्टीचा भयकथालेखक आहे हा!

मी Tue, 16/06/2015 - 14:43

तसं बघितलं तर काय फरक पडतो वाचकाला किंवा 'किंग'ला, चांगला अनुवाद असल्यास काय हरकत आहे, ह्या चोरीमुळे किंग उलट लोकप्रियच होईल, इथे नक्की कोणाचा तोटा आहे?

मी Tue, 16/06/2015 - 14:58

In reply to by आदूबाळ

तो मनोमन रोज आभार मानतच असेल किंगचे, जाहिररित्या श्रेय न दिल्यास का फरक पडावा? निष्ठा, विश्वास वगैरे ह्या केसमधे ते फारसे महत्त्वाचे वाटत नाही.

आणि पायरेटेड सॉफ्टवेअर किंवा गुगल वापरणार्‍यांनी इतरांना दगड मारु नयेत ;)

आदूबाळ Tue, 16/06/2015 - 15:27

In reply to by मी

णो. गूगल वापरलं हे न सांगणं म्हणजे चौर्यकर्म. तुमचं लॉजिक ताणलं तर संदर्भग्रंथ वापरणंही चौर्यकर्म ठरेल.

.शुचि. Tue, 16/06/2015 - 17:22

In reply to by मी

असं काय म्हणताय मी? इथे आम्ही आमच्या जिलब्या टाकतो. कोणीही उचलाउचली करुन लेख टाकत नाही. उदाहरण द्या की संदर्भाशिवाय कोणी उचलून लेख टाकलाय त्याचे.

अनुप ढेरे Tue, 16/06/2015 - 15:11

In reply to by मी

पायरेटेड सॉफ्टवेअर वापरणार्‍यांनी इतरांना दगड मारु नयेत

अगदी! किंवा टोरेंटवरून सिनेमे आणि सिरियल डौनलोड करणार्‍यांनी देखील.

ऋषिकेश Tue, 16/06/2015 - 16:37

In reply to by अनुप ढेरे

अंशतः सहमत
जर अश्या माध्यमांतून डाउनलोड करणार्‍याला आपण गुन्हा करत आहोत हे माहित असेल आनि तरीही तो गुन्हा करत असेल/नसेल तर त्याला समोरचा गुन्हा करतो आहे हे सांगणे चुकीचे ठरू नये.

एका गुन्हेगाराने अन्य गुन्हेगारांना का पकडून देऊ नये वा त्यांच्याबद्दल का बोलु नये?

अनुप ढेरे Tue, 16/06/2015 - 18:19

In reply to by अनु राव

नैतिक गुन्हा

म्हणजे नक्की काय ते स्पष्ट करा.

एनीवे हा चाउन चोथा झालेला विषय आहे. सो जाऊ दे...

.शुचि. Sun, 11/10/2015 - 01:55

In reply to by अनुप ढेरे

नैतिक गुन्हा म्हणजे पकडले जाण्याची शक्यता ऑलमोस्ट नसलेला ;) स्वतःच्या शिस्तीतून टाळता येण्याजोगा पण पकडले जाण्याचे चान्सेस नगण्य असल्याने केला जाणारा गुन्हा.

अनु राव Tue, 16/06/2015 - 14:48

In reply to by मी

इथे नक्की कोणाचा तोटा आहे?

थियरॉटीकली ह्यात किंग आणि त्याच्या प्रकाशकाचा आर्थिक तोटा आहे.
मराठी पुस्तकांचा खप बघता त्यांनी अनुवादाचे अधिकार फुकट पण दिले असते.

पण हायपोथेटीकली, त्या कथेवर ( मराठीतल्या ) कोणी सिनेमा बनवायला घेतला असता तर?

प्रश्न लेखकाच्या वृत्तीचा आहे.

मी Tue, 16/06/2015 - 15:00

In reply to by अनु राव

थियरॉटीकली ह्यात किंग आणि त्याच्या प्रकाशकाचा आर्थिक तोटा आहे.

मान्य.

प्रश्न लेखकाच्या वृत्तीचा आहे.

त्याचा वाचकाला तोटा कसा होतो?

अनु राव Tue, 16/06/2015 - 15:09

In reply to by मी

त्याचा वाचकाला तोटा कसा होतो?

मटेरीयली नाही. पण बर्‍याच लोकांना फसवणुक झाल्याची भावना निर्माण होऊ शकते. वर काही लोकांनी तसे म्हणले पण आहे.

लेखकानी प्रकाशकापासुन ( मराठी ) पण ही गोष्ट लपवून ठेवली असु शकते. म्हणजे चुकुन किंग किंवा त्याच्या प्रकाशकानी केस केली तर हे बिचारे प्रकाशक गोत्यात.

बॅटमॅन Tue, 16/06/2015 - 15:11

In reply to by अनु राव

सहमत. स्वतः ओरिजिनल असल्याचा आव आणून, पुढे जर मग कळाले की हा तर लेखकी जुमला आहे तर वाचकाची जळणारच ना. कशाला घेईल मग तो बनावट माल? मूळ सोर्सकडेच जाईल.

मी Tue, 16/06/2015 - 15:22

In reply to by बॅटमॅन

तर वाचकाची जळणारच ना. कशाला घेईल मग तो बनावट माल? मूळ सोर्सकडेच जाईल.

वर्जिनल कळत असते तर अनुवाद कशाला खपले असते, आता एलोटिआर वाचणारे अनुवाद वाचणार काय किंवा उलटपक्षी? ;)

बॅटमॅन Tue, 16/06/2015 - 15:26

In reply to by मी

अनुवाद वाचणारे मूळ वाचतातच असे नाही, पण मुळात एलोटीआरसारख्या अनुवादांना किती मार्केट आहे याबद्दल लैच साशंक वगैरे आहे.

गवि Tue, 16/06/2015 - 15:09

In reply to by मी

त्याचा वाचकाला तोटा कसा होतो?

वाचकाचा पैशाचा काहीही तोटा होत नाही. इनफॅक्ट सगळे "तोटे" पैशाचे नसतात. त्याहूनही इनफॅक्ट सगळ्या अप्रिय किंवा दुरित भासणार्‍या गोष्टी हे "तोटे"च नसतात.

पण वाचक जेव्हा लेखकाचं लेखन पसंत करतो तेव्हा तो लेखकाचाही चाहता आपोआप होतो. त्या चाहते होण्यामधे लेखकाच्या स्वतःच्या प्रतिभेने त्याने ही निर्मिती केली आहे असं एक गृहीतक असतं. समजा फक्त अनुवादक असेल तर हा उत्तम अनुवाद करतो असंच गृहीतक असतं आणि अशीच स्पष्ट धरलेली गृहीतकं आणि त्या त्या गृहीतकांवर आधारित प्रत्येक कलाकाराची एक इमेज असते. त्यामधे एखादी मटेरियल फॅक्ट लपवणं हे प्रतिमाभंग करणारं ठरतं. लेखन पूर्णपणे स्वतःचं नसणे ही लेखक-वाचक नात्यातली नॉन्-फायनान्शियल पण मटेरियल फॅक्ट आहे.

तेव्हा तोटा हा गृहीतकभंगाचा असतो. लपवून एखादी गोष्ट केल्याने मनुष्य इतरांच्या मनात उणा ठरतो. पुढे त्या लेखकाचं काही वाचताना मनात किंतु राहतो. हे नुकसान. मोजता येईल का ते माहीत नाही.

मी Tue, 16/06/2015 - 15:17

In reply to by गवि

संभाव्य आक्षेप म्हणून आधीच यादी टाकायला हवी होती ;)

थोडाफार सहमत असलो तरी आर.डी.बर्मन वगैरे लोकांनी चोर्‍या केल्याच पण त्यांच्यामधे आणि अन्नुमलिकमधे फरक आहे आणि तो असला की झालं, मग कशाला वाईट वगैरे वाटेल?

गवि Tue, 16/06/2015 - 16:11

In reply to by अनु राव

आरडींच्या चाहत्याला अधिक वाईट वाटणार त्यांनी केलेली चोरी. अन्नू मलिकविषयी सर्वत्र तसेच नाव आहे, पण तसं नाव नसलेल्या संगीतकाराबद्दल असं कळलं की जास्त वाईट.

आरडींचं "चुरा लिया" किंवा ओपींचं "बाबूजी धीरे चलना" यांच्या मूळ धून्स ऐकल्या तेव्हा निश्चित प्रतिमाभंग झाला. त्यांनी मूळ गाण्यांना श्रेय दिलंय का माहीत नाही. पण नसावं.

भले या दोघांची गाणी मूळ गाण्यापेक्षा (भारतीय कानामुळे ?!?) मेलडीत सरस वाटत असली तरीही.

मी Tue, 16/06/2015 - 15:19

In reply to by मेघना भुस्कुटे

:प नाही ब्वा, उगाच मेनस्ट्रीमच्या विरुद्ध मत वगैरे नोंदवून आपण कसे बंडखोर आहोत असे भासवण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे.

मेघना भुस्कुटे Tue, 16/06/2015 - 15:23

In reply to by मी

हां! मग चालू द्या! तिकडे पलीकडच्या धाग्यावर गजेंद्र सिंह यांच्या नेमणुकीलाही पाठिंबा देणार आहात का मग? ;-)

मेघना भुस्कुटे Tue, 16/06/2015 - 15:55

In reply to by मी

नाही बा. त्याच्याशी मला काय घेणं नाही. तुम्ही प्रवाहाच्या किती नि कुठल्या बाबतीत विरोधात जाता त्याची चाचपणी.

विवेक पटाईत Sun, 11/10/2015 - 10:09

In reply to by मेघना भुस्कुटे

मेघना ताई, मला कळतंच नाही २० वर्षे सतत सिने सृष्टीत कार्य करणारा १२५ हून अधिक सिनेमे आणि २० हून अधिक मालिका मध्ये कार्य करणार्याला सीने सृष्टीचा (तुमच्या दृष्टीने B grade कलाकार असला तरी) भरपूर अनुभव असणारा, माणूस लायक नाही कारण त्याची विचारधारा वेगळी आहे. पण एक हि सिनेमात कार्य न केलेले लोक हि या पदावर बसलेले आहे. त्यांच्या कार्य अनुभव होता. तो आमच्या विचारधारेचा नाही म्हणून तो योग्य नाही. कधी कधी मला 'मानसिक बुद्धीची कीव येते'. आपण शिकलेल्या आहात न????

मेघना भुस्कुटे Sun, 11/10/2015 - 14:01

In reply to by विवेक पटाईत

अय्या! याचा शिक्षणाशी काय संबंध? मोकळा, प्रगल्भ आणि विवेकी विचार करू शकण्याच्या पात्रतेचा वयाशी, शिक्षणाशी, जातीशी काही म्हणजे काही संबंध नसतो हो काका!

-प्रणव- Tue, 16/06/2015 - 17:11

कुणी आंतर्जालावर गुप्तेंच्या नावाने शोध केला, तर त्यात हे पानही सापडावं.

पण त्यासाठी त्यांचं नाव english मधे लिहीले पाहीजे ना.. लो़कं देवनागरीत सहसा गूगल करत नसावेत.

मेघना भुस्कुटे Tue, 16/06/2015 - 17:28

आज एकूण खेदाचाच दिवस दिसतो आहे!

अस्वलानं गुप्तेंसारख्या होतकरू-उदयोन्मुख लेखकाचं चौर्यकर्म उघडकीला आणल्यावर मला धक्का बसला होता. मराठीसारख्या, जगातला बारावा (चूभूदेघे) क्रमांक मिरवणार्‍या, भाषेत प्रकाशित झालेल्या साहित्यवर्तुळात नवा-होतकरू-आशादायी समजला गेलेला लेखक आणि हे असं? छ्या. कसंतरीच वाटलं बा. पण इथे लोकांना निराळ्याच गोष्टींची पडलेली दिसतेय. मुळात तुम्हांला याबद्दल बोलण्याचा हक्क काय, यामुळे झाला तर मूळ लेखकाचा फायदाच आहे, मूळ लेखकानंही चोरीच केलीय की, कुठे आणि परवानग्या घेणार - किचकट की हो ते... असंच बहुतेकांचं म्हणणं.

खेद झाला.

-प्रणव- Tue, 16/06/2015 - 17:45

In reply to by मेघना भुस्कुटे

चर्चेशिवाय मतं कशी बदलणार. + फक्त एकाच बाजूने प्रत्येकाने बोलले तर ते कंटाळवाणे नाही का होणार ..

रमताराम Tue, 16/06/2015 - 18:20

लेखक ऋषीकेश गुप्ते हे माझे व्यक्तिगत मित्र आहेत आणि मी स्वतः ती कथा वाचलेली आहे.

सदर कथा ही 'नवल'च्या २००९ की २०१० (माझी स्मरणशक्ती जरा दगा देते आहे) च्या दिवाळी अंकात प्रथम छापून आलेली आहे. तिथे ती कथा स्टीफन किंगच्या कथेवर आधारित असल्याचा स्पष्ट उल्लेख केला होता. ती कथा कथा छापताना संपादकाने ती अन्य लेखनावर आधारित असल्याचा उल्लेख अनावश्यक समजून गाळून टाकलेला होता. . परंतु काळ्याकपारी ही हुबेहूब तीच कथा असल्याचे मात्र लेखकाला साफ अमान्य आहे. ती कथा ज्या ओसीडी या आजारावर आधारित आहे त्या आधारे आणि स्वतःचे अनुभव (लेखक स्वतः त्या आजाराला सामोरे गेलेला/जात आहे) याची सांगड घालून ती कथा लिहिली गेली आहे.

तेव्हा उल्लेख हवा ही अपेक्षा चुकीची नसली तरी थेट लेखकाच्या नावे शिमगा करण्याचे टाळून कदाचित त्याचीही काही बाजू असू शकते ही शक्यता ध्यानात घेऊन व्यक्त करणे शक्य होते अशी आमचीही अपेक्षा नोंदवतो नि थांबतो.

आदूबाळ Tue, 16/06/2015 - 18:35

In reply to by रमताराम

ती कथा कथा छापताना संपादकाने ती अन्य लेखनावर आधारित असल्याचा उल्लेख अनावश्यक समजून गाळून टाकलेला होता.

ओके.

आणि कथासंग्रहाचं काय? तिथे गुप्त्यांचीच पूर्ण सत्ता होती का प्रकाशकाचा हस्तक्षेप झाला?

बॅटमॅन Tue, 16/06/2015 - 19:09

In reply to by रमताराम

तेव्हा उल्लेख हवा ही अपेक्षा चुकीची नसली तरी थेट लेखकाच्या नावे शिमगा करण्याचे टाळून कदाचित त्याचीही काही बाजू असू शकते ही शक्यता ध्यानात घेऊन व्यक्त करणे शक्य होते अशी आमचीही अपेक्षा नोंदवतो नि थांबतो.

व्हेन वॉज़ द लास्ट टाईम जेव्हा उपदेशाविना तुम्ही काही लिहिले होते?

(साला मराठीत ही वाक्यरचनाच नाय. आलीच्च पायजे.)

प्रकाश घाटपांडे Tue, 16/06/2015 - 20:05

In reply to by रमताराम

यावरुन किमान हे तरी लोकांच्या लक्षात आले कि लेखकाचा हेतु संदर्भ वा श्रेय नाकारण्याचा नाही. स्पष्टीकरण दिले ते बरे केले.यावरुन एक आठवले.जुनी गोष्ट आहे. अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राने निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मी खालील मुद्दे मांडले
१) निरंजन घाटे हा ही माणूस च आहे
२) त्यांची त्या मागील भूमिका विचारुन न घेताच टीका करणे वैज्ञानिक दृष्टिकोनात बसत नाही व ते मला योग्य वाटत नाही.
३) एवढ्या एका कारणामुळे त्यांनी मराठी विज्ञान साहित्यात दिलेले योगदान लगेच विसरलात काय?
४) कुटुंबातील कुणाच्या तरी वतीने ते प्रतिनिधी या नात्याने पण आले असतील तर?
परिणामी मी निरंजन घाट्यांची वकिली करतो म्हणून मलाच वाळीत टाकायला सुरुवात केली. हा किस्सा मी निरंजन घाट्यांना एकदा भेटीत सांगितला. तेव्हा त्यांनी खुलासा केला की त्यांचे लहानपण तिथे गेले. अनेक कडु गोड आठवणींचा ठेवा शनीपाराशी निगडित आहेत. त्याचाच तो भाग आहे. मन:शांतीसाठी असलेला तो एक गतस्मृतीशी नाळ असण्याचा तो भाग आहे.

आदूबाळ Tue, 16/06/2015 - 20:29

In reply to by प्रकाश घाटपांडे

यावरुन किमान हे तरी लोकांच्या लक्षात आले कि लेखकाचा हेतु संदर्भ वा श्रेय नाकारण्याचा नाही.

खरंच?

"नवल"ला कथा देताना तसा हेतू नव्हता असं फार तर म्हणता येईल. नंतर कथासंग्रहात हा उल्लेख करणं सहज शक्य होतं, तरी तो केलेला दिसत नाही. "लखू रिसबूड" झाला आहे का?

प्रकाश घाटपांडे Wed, 17/06/2015 - 15:58

In reply to by आदूबाळ

नंतर कथासंग्रहात हा उल्लेख करणं सहज शक्य होतं, तरी तो केलेला दिसत नाही.

हे खर आहे. पण असे साहित्य कालक्रमणा करत तेव्हा ही अंग गळून पडतात.

अनामिक Wed, 17/06/2015 - 08:52

In reply to by रमताराम

ती कथा कथा छापताना संपादकाने ती अन्य लेखनावर आधारित असल्याचा उल्लेख अनावश्यक समजून गाळून टाकलेला होता.

कोण म्हणे तो संपादक / प्रकाशक ज्याला लेखनचौर्याचा शिक्का लागु शकतो हे माहित नाही? शिवाय, भले संपादक / प्रकाशक नाही म्हणतील, पण लेखकालाही हा उल्लेख अनावश्यक वाटल्याशिवाय का तो काढू दिला?

ऋषिकेश Wed, 17/06/2015 - 08:53

In reply to by रमताराम

लेखक स्वतः गप्प आहे, मित्रांकरवी काहीबाही गोलगोल निरोप धाडतो आहे हे बघून त्याची बाजु चांगलीच लंगडी आहे असा माझा समज झाला आहे!

(हे म्हणजे त्या दिल्ली केसमधील प्रत्यक्षदर्शीची आठवण झाली. तुम्ही सांगताय ते खोटंय पण मी समोर येऊन खरं काही सांगणार नाही! आणि मला तुम्ही काही बोलायचेही नाही! असं कसं चालेल?)

माझ्या मते हे प्रकरण पेपरात गेलं पाहिजे. मनोविकास किंवा लेखक यांपैकी ज्याने ही चुक केली आहे त्यांनी त्या चुकीचं पाकलत्व घेऊन ती निस्तरली पाहिजे व त्याबद्दल सध्याची पुस्तके बाजारातून परत मागवून नव्या प्रती काढल्या पाहिजेत.

===

जर चुक नाहीच अशी भुमिका असेल तर प्रकाशक/लेखक यांनी स्वतः समोर येऊन स्पष्टीकरण द्यायला हवे!

-प्रणव- Wed, 17/06/2015 - 09:40

In reply to by ऋषिकेश

मनोविकास किंवा लेखक यांपैकी ज्याने ही चुक केली आहे त्यांनी त्या चुकीचं पाकलत्व घेऊन ती निस्तरली पाहिजे

पण त्यासाठी आधी रीतसर पत्रव्यवहार तर झाला पाहिजे ना. त्यांना काय माहित इथे काय होत आहे. मला वाटतं अस्वल (किंवा इतर कोणी ज्याने दोन्ही कथा वाचल्या असतील) यांनी त्यांच्याकडे तक्रार केली पाहिजे.

ऋषिकेश Wed, 17/06/2015 - 12:19

In reply to by -प्रणव-

सहमत आहे. आधी पत्रव्यवहार/इमेल्स पाठवली पाहिजेत व त्यांना खुलाशासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे.
मात्र दखल घेतली न गेल्यास वृत्तपत्रांत याची माहिती आली पाहिजे

अस्वल Tue, 16/06/2015 - 20:51

@रमताराम - लेखकाच्या/प्रकाशकाच्या नावाने शिमगा करायचा अजिबात हेतू नाही, पण जे दिसलं तेवढंच मांडतो आहे.

परंतु काळ्याकपारी ही हुबेहूब तीच कथा असल्याचे मात्र लेखकाला साफ अमान्य आहे.

हा दावा खोटा आहे.
मी मूळ कथा आणि मराठी कथा ह्यातले उतारे इथे देऊ शकत नाही, पण पुढली काही साम्यस्थळं देतो-
१. मूळ इंग्रजी कथेतली पात्रं - Sheila , Johny as Doctor, Charles as her childhood friend and N as patient.
काळ्या कपारी मधली पात्रं - अंजली नाडगौडा, विराज नाडगौडा-डॉक्टर, अवधूत- बालपणीचा मित्र, आणि ज्ञ हे पेशंट.

२. मूळ इंग्रजी कथेची सुरुवात - Sheila writes a letter to Charles
मराठी कथेची सुरूवात - अंजली नाडगौडा आपल्या बालपणीच्या मित्राला पत्र लिहिते.
हद्द म्हणजे मूळ कथेतल्या पत्रात असलेली तळटीप मराठी कथेतही आहे, थोडा फेराफार करून वाढवली आहे.

३. मूळ इंग्रजी कथेचा अंत - वर्तमानपत्रांतून Sheila ची आत्महत्या आणि एका पत्रातून Charlesचा पुढील तपासाचा निश्चय ध्वनित होतो.
मराठी कथेचा अंत - वर्तमानपत्रातून अंजली नाडगौडांची आत्महत्या आणि पत्रातून अवधूतचा पुढील तपासाचा निश्चय ध्वनित केला आहे.
दोन्ही कथांमधे Sheila/अंजली ही Charles/अवधूत ह्यांना आपल्या भावाच्या पत्रव्यवहाराकडे दुर्लक्ष करून तो जाळण्याचा सल्ला देते.

४ मूळ इंग्रजी कथेचा गाभा - एक N नावाचा पेशंट त्याला आलेल्या विचित्र अनुभवांची माहिती डॉक्टरांना देतो.
त्यात त्याला वस्तू सम आणि विषम अशी विभागायची सवय असल्याचं सांगतो. एक बूट मोजण्याचा तपशीलवार किस्साही डॉक्टरांना पहिल्या बैठकीत सांगतो.
मराठी कथा - ज्ञ नावाचा पेशंट त्याला आलेल्या विचित्र अनुभवांची माहिती डॉक्टरांना देतो.
त्यात त्याला वस्तू सम आणि विषम अशी विभागायची सवय असल्याचं सांगतो. एक बूट मोजण्याचा तपशीलवार किस्साही डॉक्टरांना पहिल्या बैठकीत सांगतो.
अर्थात इंग्रजी कथेत एकूणतीस बूट आहेत तर मराठी कथेत तेराच.
शिवाय गुप्तेंनी मूळ कथेत आणखी वर्णनं वगैरे टाकून कथा वाढवली आहे.
.
असो. गरजूंनी दोन्ही कथा वाचाव्यात आणि तरीही जर त्यांना "काळ्याकपारी" ही कथा ओरिजिनल वाटली तर मग चर्चा करूच.

पैचान कौन Tue, 16/06/2015 - 21:07

In reply to by अस्वल

काव्या विश्वनाथनची अशीच एक केस. तिने How Opal Mehta Got Kissed, Got Wild, and Got a Life हे पुस्तक असेच ढापून लिहिले होते आणि ती पकडली गेली.

बिटकॉइनजी बाळा Wed, 17/06/2015 - 08:16

दोन प्रश्न :
१) ह्या चोरीमुळे मला मनोविकासला पुस्तक परत करता येईल का?
२) अविश्वासाखाली मला त्या लेखकाची सर्व पुस्तके परत करता येतील का? आणि त्याचे पैसे परत मिळतील का?

अनामिक Wed, 17/06/2015 - 08:55

In reply to by बिटकॉइनजी बाळा

मनोविकासला फोन करुन विचारा. तुमच्याकडे बिलाच्या पावत्या आहेत का? नसल्यास, तुम्ही पुस्तके चोरी केली नाहीत कशावरून?

प्रतिसादाला दिलेली श्रेणी: खोडसाळ!

adam Wed, 17/06/2015 - 17:15

ह्यावरुन आठवलं --
जालावर ह्यापूर्वी खूपच सारख्या कथा स्वतंत्रपणे लिहिल्या गेल्या होत्या ते आठवलं.
www.misalpav.com/node/25113 आणी http://www.misalpav.com/node/16319 ह्या त्या दोन कथा.
त्यातले माझे प्रतिसाद पहावेत. अर्थात, त्या स्वतंत्रपणे सुचल्याचं नंतर कन्फर्म करण्यात आलं होतं; दोन्ही कथांच्या लेखकांकडूओन.
.
.
आठेक वर्षापूर्वी मराठी संकेतस्थळे नुकतीच वापरात आली होती. तोवर ब्लॉग्ज जोरात होते.
त्यावेळी ट्युलिप ह्या आय डी च्या ब्लॉगच्या मजकुराच्या चोरीचं प्रकरण लैच गाजलं होतं.
.
.
अलिकडच्या काळात पहायचं तर कोणीतरी ऐसीकर विवेक पटाईत ह्यांच्याही लेखनाची चोरी केली होती.

विवेक पटाईत Sat, 20/06/2015 - 20:48

In reply to by adam

कुणी तरी नाही चक्क ८-१० लोकांनी माझा लेख 'प्रेम म्हणजे काय' चक्क एक अक्षर ही न बदलता उचलला होता. त्या पैकी पवारजी, युवराज मोहिते आणि अनिल कालगे (तुझी आठवण) यांनी खेद व्यक्त केला.

बाकी काही दिवस आधी कळलेले पण कंटाळून मी विचारणे सोडून दिले त्यात किरण खंडागळे (ठाण्यात राहतात) (http://marathikavee.blogspot.in/) यांनी तर चक्क तीन लेखांची उचलगिरी केली आहे.
योगेश (माझा एकटेपणा-फेसबुक), प्रसाद म्हैसे. या शिवाय पुरोगामी विचारांचे एकमत नावाच्या ई- पेपरात (याचे संपादक कोण आहे काहीच कळले नाही) यात २०.१.२०१५ला. आणखीन किती लोक असतील काही सांगता येत नाही.

विवेक पटाईत Sat, 20/06/2015 - 20:51

In reply to by adam

कुणी तरी नाही चक्क ८-१० लोकांनी माझा लेख 'प्रेम म्हणजे काय' चक्क एक अक्षर ही न बदलता उचलला होता. त्या पैकी पवारजी, युवराज मोहिते आणि अनिल कालगे (तुझी आठवण) यांनी खेद व्यक्त केला.

बाकी काही दिवस आधी कळलेले पण कंटाळून मी विचारणे सोडून दिले त्यात किरण खंडागळे (ठाण्यात राहतात) (http://marathikavee.blogspot.in/) यांनी तर चक्क तीन लेखांची उचलगिरी केली आहे.
योगेश (माझा एकटेपणा-फेसबुक), प्रसाद म्हैसे. या शिवाय पुरोगामी विचारांचे एकमत नावाच्या ई- पेपरात (याचे संपादक कोण आहे काहीच कळले नाही) यात २०.१.२०१५ला. आणखीन किती लोक असतील काही सांगता येत नाही.

ऋषिकेश Mon, 22/06/2015 - 18:19

In reply to by adam

'आजी आजोबांच्या वस्तु' एका संकेतस्थळावर चिकटवलेला दिसला. व्यनींना उत्तर येत नाही.
कायदेशीर भानगडी करण्याइतका उत्साह व वेळ नाही.

असो.

गवि Tue, 23/06/2015 - 13:53

In reply to by adam

त्या स्वतंत्रपणे सुचल्याचं नंतर कन्फर्म करण्यात आलं होतं; दोन्ही कथांच्या लेखकांकडूओन

हॅ हॅ.. खुद्द लेखकांकडूनच हे कन्फर्मेशन घेण्यात काय हशील आहे?

या दोन्हींपैकी एक माझीच असल्याने हे लिहीणे आले. कालानुक्रमे पाहिल्यास माझी कथा किमान वर्षभर आधीची आहे. शिवाय दुसरी कथा आणि पहिली कथा यात मला तरी साम्य दिसलेलं नाही.

उदा. प्रेमाचा त्रिकोण इतका ढोबळ मुद्दा समजा "ओरिजिनल कल्पना" या व्याख्येत घेतला तर ८०% सिनेमे एकमेकांची कॉपी होतील. तसंच मानसिक आघाताने आभासी जगात वावरणं ही कल्पना म्हटली तर शेकडो कथा त्यावरुन निपजल्या असतील.

adam Tue, 23/06/2015 - 15:18

In reply to by गवि

अं... तसं नाही हो. चर्चा भलतीकडेच जाण्यापूर्वी सांगतो.
माझ्या मूळ प्रतिसादात मला मुद्दा मांडायचा होता तो हा :-
दोन कथांत असणारं साम्य; त्याचे दोन प्रकार असू शकतात.
१. दोन कथा स्वतंत्रपणे सुचलेल्या असू शकतात; किंवा दोघांना कथेचा मूळ जर्म एकाच स्रोताकडून सुचलेला.(कथा बीज थोडंफार सारखं असणं)
२. दोघांपैकी कुणीतरी कुणाची तरी कॉपी केलेली.
.
.
पहिल्या केससाठी तुमच्या कथेचं उदाहरण दिलेलं. कारण त्यावेळी मला जे सांगण्यात आलं ते खरय/खरं असावं असं मला वाटलं; अजूनही वाटतं.
हे मला का वाटलं, ते मला ठौक नै.बाकीची उदाहरणं ही दुसर्‍या केसची म्हणून सांगितली.(पटाइत काका , ट्युलिप वगैरे.)
ती सर्रळ सर्रळ उचलेगिरी.
.
.
आणि गविकाका, तुम्ही खरडवही सुरु करा बरं. इथं सगळं सांगत बसणं ठीक वाटत नै. व्यनि लिहीत आहोत म्हणजे कैतरी लपवून कोणलातरी सांगत आहोत असं वाटतं. म्हणून मी व्यनि टाळतो. मग संवाद तुटतो.

.शुचि. Tue, 23/06/2015 - 18:02

In reply to by adam

गविकाका, तुम्ही खरडवही सुरु करा बरं

अरे बाबा मन, मी त्यांना पूर्वीच तसा व्यनि पाठवलेला त्याला उत्तर नाहीच.
परत एकदा मी मेन रुममध्ये जिक्र छेडला (वाह वाह!! काय शब्दरचना जमलीये) तरी उत्तर देत नाहीत ते :(

मिहिर Wed, 27/07/2016 - 02:24

ह्याचे पुढे काही झाले का? लेखकाची फेसबुक प्रोफाईल इथे आहे.

रेड बुल Thu, 28/07/2016 - 18:40

पायरेटेड सॉफ्टवेअर वापरणार्‍यांनी इतरांना दगड मारु नयेत
चुक.

कायदा स्पश्टपणे सांगतो पायरसी करणे म्हणजेच ओरीजन कंटेंट विनापरवानगी वितरीत करणे , वितरणासाठी साठा करणे गुन्हा आहे, वितरीत झालेले कंटेंट पहाणे न पहाणे याबाबत कायदा माझ्या अल्पमतीनुसार संपुर्ण तठस्थ आहे. थोडक्यात इंट्लेक्चुअल कंटेंट तुमच्याकडे देणारा पायरट अथवा संस्था (मोफत अथवा पैसे घेउन) शिक्षेचा निर्वीवाद अधिकारी होय. या न्यायाने मुळ कथा चोरुन त्याचे विनापरवानगी वितरीत करणारा दोषी आहे यात सर्वप्रथम मनोरमा पब्लिकेशन अडकु शकते आणी जर त्यांचा लेखकाशी कायदेशीर करार योग्य ड्राफ्ट केला असेल तर फक्त लेखकावर प्रकरण शेकु शकते.

थोडक्यात :- पायरेटेड सॉफ्टवेअर वापरणार्‍यांनी पायरटेडपुस्तके वाचणार्‍यांना दगड मारु नयेत इतकेच मी तत्वतः मान्य करेन. बाकी विधान सदरील केसमधे पुर्णपणे गैरलागु...

सैराट Thu, 28/07/2016 - 18:50

या चोरांना ( लेखक आणि प्रकाशक दोघेही ) शिक्षा झालीच पाहिजे. 'गानूआजीची अंगाई' ही कथा आवडली होती पण तीही चोरीचा माल नसेल कशावरून अशी आता शंका निर्माण झालीय.

पुंबा Sat, 06/10/2018 - 00:31

अरेच्चा!!
बरं झालं हा लेख वाचनात आला. हा चोर भलताच संभावितपणे नवनवी पुस्तके प्रकाशित करतो आहे की! आणि साहित्याच्या क्षेत्रातले ज्येष्ठ का कसले कसले लोक त्याच्यावर स्तुतीसुमने उधळताहेत. मजा आहे झालं!!

१४टॅन Sat, 06/10/2018 - 07:20

खटला आणि खटलं ह्या शिरीष कणेकरांच्या गाजलेल्या(?) पुस्तकाच्या उत्तरार्धात रहस्यवल्ली हा कथासंग्रह आहे. मी साधारण ३ वर्षांच्या गॅपनंतर हे पुस्तक दुसऱ्यांदा वाचलं. ह्या दुसऱ्या लायब्ररीत एक हिचकॉकच्या रहस्यकथांचा मराठी अनुवादही होता. प्रत्येक कथा तंतोतंत हिचकॉकची आहे. तिला फक्त देशी बाज दिलेला आहे. कणेकरांचं पुस्तक पूर्ण चाळलं असता तिथे हिचकॉकचा उल्लेखही नाही.

अमुक Sun, 30/12/2018 - 06:14

उजळ माथ्यानं मिरवणारं वाङ्मयचौर्य
- 'लोकसत्ता'च्या 'लोकरंग' पुरवणीत (३० डिसेंबर २०१८, पान क्र. ४) आलेला लेख. 'ऐसी'वरल्या चर्चेचाही त्यात काही तपशिलांसकट उल्लेख आहे.

बिटकॉइनजी बाळा Sun, 30/12/2018 - 22:54

In reply to by चिंतातुर जंतू

कमाल आहे.
सप्रमाण काय सिद्ध करा म्हणताहेत लोक, अस्वलाने ते केलंच आहे की.

जी कथा या धाग्याने उघडी पाडली त्यावर सिनेमाचीही तयारी सुरू होती. तपशील उघड करण्यास लाज वाटते पण ह्या ढापण्यातून आर्थिक लाभाची पुढची पायरी देखील गाठण्यास लेखक तयार होते.
इन्स्पिरेशन, ट्रिब्युट वायलं आणि हे वायलं.

'न'वी बाजू Sun, 30/12/2018 - 23:14

In reply to by बिटकॉइनजी बाळा

तपशील उघड करण्यास लाज वाटते पण ह्या ढापण्यातून आर्थिक लाभाची पुढची पायरी देखील गाठण्यास लेखक तयार होते.

ढापण्या कोण?

आणि त्यात एवढे लाजण्यासारखे काय आहे? विशेषतः आजकालच्या युगात?

(एवढीच लाज वाटत असेल तर लेसिक करून घ्यावी. ढापण्यांतून आर्थिक लाभाची ही पुढची पायरी उकळायला ऑप्थॅल्मिक सर्जन एका पायावर तयार असतातच.)

बिटकॉइनजी बाळा Mon, 31/12/2018 - 10:36

In reply to by 'न'वी बाजू

ढापणे क्रियापदाचे केलेले नाम आहे ते.
बाकी फालतू tangent मारायचा तुमचा प्रयत्न तुमच्या मते कितीही कूल असला तरी तो व्यर्थ गेलेला आहे हे नम्रपणे सांगून रजा घेतो. अर्थात की-बोर्ड कुणी, कुठे आणि किती बडवावा हे काही आमच्या हातात नाही. आमच्याइकडे एक वाकप्रचार आहे. बेवड्याचं त्वांड अन म्हशीची गांड! *(साधारण उपयोग : कोण कुठं काय पचकेल याचा नेम नसतो)

* हे खूपच मवाळ व्हर्जन आहे**
** शेवटी आम्ही भटे नाही

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 31/12/2018 - 00:05

In reply to by बिटकॉइनजी बाळा

प्रतीक पुरीनं अस्वलासारखं सप्रमाण लिहिलेलं नाही आणि अस्वलानं सिद्ध केल्याचं लोकसत्तात लिहिलंदेखील नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 31/12/2018 - 18:23

In reply to by अनुप ढेरे

लोकसत्तामध्ये आलेल्या लेखाची स्वतंत्र चिकित्सा होणं योग्य आहे.

अस्वल नक्कीच विषाद व्यक्त करत आहे. लोकसत्तेतल्या लेखात 'कसा सापडला' अशी भावना जास्त वाटत्ये.

अनुप ढेरे Mon, 31/12/2018 - 09:06

किंवा घिसीपिटी उपमा द्यायची तर अढीतील २ आंबे नासके निघाले , म्हणून सगळी अढीच नासके म्हणण्यासारखे आहे हे

एखादा माणुस खोटं बोलताना पकडला गेला तर तो पहिल्यांदाच खोटं बोलतोय याची शक्यता कीती?

'न'वी बाजू Mon, 31/12/2018 - 21:20

In reply to by अनुप ढेरे

एखादा माणुस खोटं बोलताना पकडला गेला तर तो पहिल्यांदाच खोटं बोलतोय याची शक्यता कीती?

या लॉजिकास (पुरावा म्हणून वगैरे) कायद्यात कितपत मान्यता मिळेल, याबद्दल साशंक आहे.

युधिष्ठिर 'नरो वा कुंजरो वा' बोलला. त्याबद्दल त्याचा हॉवररथ दाणकन जमिनीवर जो आदळला, तो परत उठला नाही, ही शिक्षा त्याला मिळाली. मामला खतम. त्यापुढे जाऊन, ही त्याची पहिलीच थाप असेल कशावरून, तो आयुष्यभर केवळ खोटेच बोलत आला नसेल कशावरून, वगैरे कयास मांडण्याची गरज आपल्याला भासत नाही. युधिष्ठिराचे सत्यवक्ता म्हणून रेप्युटेशन कितीही मोठे/इन्फ्लेटेड असले, आणि या इवल्याश्या पांढऱ्या थापेमुळे त्या रेप्युटेशनास कितीही अणकुचीदार टाचणी लागत असली, तरीही. ते तार्किकही होणार नाही. सबब, व्यक्तीच्या पकडल्या गेलेल्या गुन्ह्यांवर अवश्य बोला, परंतु त्या भांडवलावर वाटेल ती बिले/चलाने त्याच्या नावावर फाडू नका (पक्षी: वाटेल ते, सिद्ध न झालेले गुन्हे त्याने केलेच असतील, या गृहीतकावर/अपेक्षेने त्याला चिकटवू नका), हे आर्ग्युमेंट सयुक्तिक तथा रास्त वाटते. (हे माझे वैयक्तिक मत + ढुंगण. अर्थात, इथे ऐसीवरल्या चर्चेत तरी वाटेल ती बिले आरोपीच्या नावावर फाडलेली आहेत, असा माझा दावा नाही, परंतु आपल्या आर्ग्युमेंटाचा प्रतिवाद करण्याची आवश्यकता भासली, म्हणून हा प्रतिसादप्रपंच.)

..........

या शब्दाकरिता 'गांड' असा प्रतिशब्द (आणि तोही जाहीररीत्या) योजणे हे आमच्या आवाक्याबाहेरचे आहे, अशातला भाग नाही, परंतु (१) 'ढुंगण' आणि 'गांड' हे एक्झॅक्ट सिनॉनिम्स नाहीत, याची आम्हांस नम्र जाणीव आहे, तथा (२) श्री. नील लोमस यांजप्रमाणे 'आम्ही भटे नाही' असा दावा (अभिमानाने ऑर अदरवाइज़) करण्याची सोय दुर्दैवाने आम्हांजवळ नाही. (तसेही, भटे मवाळव्यतिरिक्त काही बोलत नाहीत वा बोलू शकत नाहीत, हा भटांवरील वृथारोप आहे. आमच्या मुडास तथा सोयीस अनुसरून आम्ही अनेकदा चारचौघांत मवाळ बोलणे पसंत करतो, इतकेच. परंतु हे अवांतर झाले. असो.)

अनुप ढेरे Thu, 03/01/2019 - 14:25

In reply to by 'न'वी बाजू

कायदेशीररित्या काय सिद्ध होईल तो मुद्दा नाही. कायदा गाढव असतो. पण ते एक असो.
मी बिलं फाडत नाहीये की याने इतर कथाही चोरी केल्यात म्हणुन. पण संशय येणं स्वाभाविक आहे की इतर उचलेगिरी केलेली असु शकते.

'न'वी बाजू Tue, 01/01/2019 - 10:18

टीप- त्यांच्या बाकीच्या कथा ओरिजिनल असतीलही, पण विश्वास उडून गेलाय. तेव्हा पुन्हा त्यांचं पुस्तक विकत घेऊन वाचेन असं वाटत नाही.

नॉट सो फास्ट!

इतःपर त्यांची पुस्तके तुम्ही (विकत घेऊन वा अन्यथा) वाचावीत किंवा नाही हा अर्थातच तुमचा प्रश्न अत एव वेगळा मुद्दा आहे. आणि, प्रस्तुत पुस्तकातील (जरी मी ते वाचले नसले, तरीही) उचलेगिरीसंबंधीचा तुमचा मुद्दा रास्त असूही शकतो. मात्र, अधोरेखितापुरतेच बोलायचे तर थोडे अती होत नाहीये काय?

आचार्य अत्रे यांच्या 'ब्रँडीची बाटली' या कथासंग्रहाचा हा दुवा. कृपया यातील 'जांबुवंत दंतमंजन' ही कथा वाचा.

आता, वुड्डहौससाहेबाच्या 'The Man Upstairs and Other Stories' या संग्रहातील 'Rough-Hew Them How We Will' ही कथा वाचा, आणि निघेल तो निष्कर्ष काढा.

आता, 'ब्रँडीची बाटली' संग्रहाचा उपरनिर्दिष्ट दुवा पुन्हा एकदा उघडा, नि अथपासून इतिपर्यंत चाळून पाहा. (वाचू नका. चाळा. मात्र, फक्त उपरोल्लेखित कथा नव्हे. अथपासून इतिपर्यंत छाननी करा.) कोठेही (प्रस्तावनेत वा अन्यथा) ही कथा आधारित असल्याचा उल्लेख आणि/किंवा श्रेय आढळते किंवा कसे, ते तपासा.

निदान मला तरी असा उल्लेख कोठेही आढळला नाही.

आणि हे,

ते आम्ही-परवाङ्मयांतिल करू चोरून भाषांतरें,
ते आम्ही-न कुणास देऊं अगदीं याचा सुगावा परी!
डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरीं!
त्याचें वाग्धन वापरून लपवू हीं आमुचीं लक्तरें!

या पंक्ती लिहिणाऱ्या केशवकुमारांकडून!

आता, 'अत्र्यांच्या बाकीच्या कथा ओरिजिनल असतीलही, पण (आमचा अत्र्यांवरचा) विश्वास उडून गेलाय' असे आम्ही म्हणावे काय? तेवढ्या एका कथेवरून?

अस्वल Tue, 01/01/2019 - 10:59

In reply to by 'न'वी बाजू

न.बा,
एखाद्या लेखकाचं पुस्तक पहिल्यांदाच हाती घ्यावं, त्यातली पहिलीचे दीर्घकथा वाचल्यावर ती आपल्या आवडत्या लेखकाच्या कथेवरून उचललेली आहे हे कळलं की मग ...
पुढली कथाही आपल्या आवडत्या लेखकाच्या कथेवर बेतलेली असावी ...
ऋणानिर्देश वगैरे प्रकार नाही - तोंडाची चव कडू नाही होणार?
.
ऋषिकेश गुप्ते उत्तम लेखक असतीलही- पण एक वाचक म्हणून माझं पहिलं इंप्रेशन फसवणूक झाल्याचं आहे तेव्हा ३ वर्षांनंतरही त्यांचं पुढलं पुस्तक वाचताना मनात शंका राहील.
.
(अत्र्यांबाबत म्हणाल तर त्यांनी केली तीही चोरी आहे. मराठीत (भारतात?) एकूणच plagiarism हा प्रकार अजूनही फारसा सिरीअसली घेतला जात नाही. म्हणूनच तर ५०-६० वर्षांपूर्वी सलील चौधरी मोझार्टची सिंफनी आपल्या नावावर खपवून "सुश्राव्य संगीतकार" म्हणवतात आणि अजूनही लोक "काय संगीतकार होता यार!" म्हणून उसासे टाकतात. असो, वेगळा विषय. इथे फक्त गुप्त्यांच्या "काळ्याकपारी" ह्या कथेपुरताच स्कोप आहे :))
.

'न'वी बाजू Tue, 01/01/2019 - 19:30

In reply to by अस्वल

ऋषिकेश गुप्ते उत्तम लेखक असतीलही

ऋषिकेश (हृषीकेश?) गुप्ते यांचे मी काहीही वाचलेले नाही. (किंबहुना, हे नावसुद्धा या धाग्यावर मी प्रथमच वाचले.) त्यामुळे, त्यांच्या लिखाणाच्या बरेवाईटपणाबद्दल मला काहीच म्हणायचे नाही. लेखक म्हणून ते अतिभिकार ते अत्युत्तम या स्पेक्ट्रममध्ये कोठेही असू शकतील. मुद्दा तो नाही.

अत्र्यांबाबत म्हणाल तर त्यांनी केली तीही चोरी आहे.

अर्थात. (किंबहुना, वाङ्मयचौर्याबद्दल इतरांची खिल्ली उडविणाऱ्या अत्र्यांचा हा छोटासा गुन्हा या कारणास्तव कदाचित मोठाही ठरेल.) पण मुद्दा तोही नाही. मुद्दा एवढाच आहे, की एकदा एक चोरी सापडली म्हणजे बाकीच्याही बाय डीफॉल्ट चोऱ्याच असणार, या गृहीतकात कितपत तथ्य आहे. (cf. एकदा नाव कानफाट्या पडले की...)

(अर्थात, वारंवार असा अनुभव आला म्हटल्यावर असा ग्रह होणेही साहजिक आहेच.)

म्हणूनच तर ५०-६० वर्षांपूर्वी सलील चौधरी मोझार्टची सिंफनी आपल्या नावावर खपवून "सुश्राव्य संगीतकार" म्हणवतात

कुठले 'इतना न मुझ से तू प्यार बढ़ा'च म्हणताय ना? त्यात तरी बरे मोझ्झार्टचीच कॉपी मारलीय. 'एक मैं और एक तू'मध्ये तर (ज्याने कोणी मारली असेल त्याने) If you're happy and you know it, clap your hands या बालगीताची कॉपी मारलीय.

असो, वेगळा विषय. इथे फक्त गुप्त्यांच्या "काळ्याकपारी" ह्या कथेपुरताच स्कोप आहे Lol

ठीक. तूर्तास आवरते घेतो. :-)

सर्व_संचारी Tue, 01/01/2019 - 16:57

भारतीय ( खासकरून हिंदी ) पिक्चरातील संगीतचोरी हा एक स्वतंत्र आणि साहित्यातील चोरीइतकाच लाज आणणारा प्रकार आहे. फक्त याला -अज्ञानी - फिल्म रसिकांचा मिळणारा पाठिंबा, किंवा त्यांच्याकडून केले जाणारे जाणूनबुजून दुर्लक्ष हा अभ्यासाचाच विषय आहे. साहित्याच्या चोरीमध्ये बहुधा एकांडा लेखकच शामिल असतो आणि वाचकांपर्यंत ते साहित्य जाऊन त्याचं काहीएक रसग्रहण होईपर्यंत पुष्कळ वेळ जातो. पण फिल्मी संगीतचोरीमध्ये गीतकार , संगीतकार , दिग्दर्शक , अभिनेते, खुद्द वादक -गायक आणि कदाचित तंत्रद्न्य ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी असतात. तेव्हा ही संगीतचोरी फार मोठ्या प्रमाणावर असते. मला कधी कधी वाटतं, की जर मी रेडिओ प्रमुख वगैरे झालो तर अशा चोरलेल्या गाण्यांचा एकदाच राष्ट्रीय पातळीवर आधी मूळ गाणे लावून आणि नंतर ढापलेलं गाणं लावून कार्यक्रम करेन आणि त्यानंतर या ढापलेल्या धुनांना रेडिओवरून कायमचं हद्दपार करेन.

बिपीन सुरेश सांगळे Sun, 06/01/2019 - 21:50

नमस्कार .

तुम्ही एक खूप महत्वाचा विषय नमूद केला आहे.

माझाही एक ताजा अनुभव शेअर करतोय -

मी एक कथा- दगड या नावाची आपल्या साईटवर प्रकाशित केली होती .
मयूर सोनावणे या एका सद्गृहस्थाने , प्रतिलिपी या दुसऱ्या एका साईटवर
ती स्वतःची म्हणून प्रकाशित केलेली आहे .
कल्पना सोडाच- थेट थेट पूर्ण कथाच कॉपी पेस्ट करून चौर्यकर्म केलेले आहे .
आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत .

अस्वल Mon, 07/01/2019 - 10:11

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

१. प्रतिलिपीच्या संपादकांकडे किंवा तत्सम कुणाकडेतरी तक्रार करून चोरीचा मजकूर काढून टाकायला सांगणे
२. सुषमा स्वराज ह्यांच्याकडे तक्रार करणे - पण फक्त ट्वीटच्या रूपात.
३. मोदी असताना असं झालंच कसं? म्हणून मोदींवर खापर फोडणे.
४. एक पेग घेउन किंवा न घेता विसरून जाणे.
५. यापैकी नाही.

अस्वल Wed, 16/01/2019 - 00:55

In reply to by अमुक

थँक्स अमुक.
आता माझ्यामते हा धागा पूर्णत्त्वाला गेला आहे. ह्यापलिकडे चर्चेत अर्थ नाही.
लेखकाचा प्रतिसाद मूळ धाग्यात अपडेटवतो.

ओंकार Thu, 17/01/2019 - 14:17

In reply to by अमुक

ज्या दोन कथा जी एक दुसरीचे अक्षरक्ष: भाषांतर वाटते त्याबद्दल फक्त 'आधारित आहे' एवढे म्हणून बोळवण केली आहे.

- ओंकार.

चिंतातुर जंतू Fri, 18/01/2019 - 14:06

बरेच दिवस कार्यबाहुल्यामुळे हा धागा आणि लोकसत्तातले लेख वगैरे वाचायला वेळ मिळाला नव्हता. पण आताच प्रतीक पुरीचा लेख, त्यावरचं ऋषिकेश गुप्तेचं स्पष्टीकरण आणि इथली चर्चा वगैरे वाचली. बाकी सर्व चालू देत पण एका मुद्द्याबद्दल इथले लोक कदाचित अनभिज्ञ असतील म्हणून हा प्रतिसाद. प्रतीक पुरींच्या लेखातून -

जेव्हा या कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती २०१७ मध्ये प्रसिद्ध झाली तेव्हाही गुप्तेंनी प्रकाशकांना सांगून ही चूक सुधारली का नाही? उलट ते म्हणतात की, त्यांना वेळच मिळाला नाही आणि प्रकाशकांनी त्यांना न विचारताच कधीतरी ही आवृत्ती प्रकाशित केली.

ज्यांचा मराठी साहित्यव्यवहाराशी थोडा परिचय असेल त्यांना हे सहज लक्षात येईल की इथे गुप्तेंचा मुद्दा रास्त असण्याचीच शक्यता जास्त आहे. अगदी जुने, प्रस्थापित लेखकही ह्यातून सुटलेले नाहीत. लेखकाला न विचारता नव्या आवृत्त्या प्रकाशित करणं हा मराठी प्रकाशकाच्या बाण्याचाच एक अविभाज्य भाग आहे. एखाद्या पुस्तकाच्या किती प्रती कुठे शिल्लक आहेत आणि नवी आवृत्ती कधी काढायची अशा गोष्टींमध्ये लेखकाला आत शिरू न देताच हे व्यवहार मराठीत होत असतात.

चिंतातुर जंतू Fri, 25/01/2019 - 17:56

ज्याविषयी मला उत्सुकता होती ते अखेर पंकज भोसलेनं केलं आहे. 'लोकप्रभा'मधल्या ह्या लेखात त्यानं 'घनगर्द' आणि 'टॉम गॉर्डन'ची तुलना केली आहे आणि दोन्ही कथा न वाचताच (कदाचित आकसापोटी किंवा असूयेपोटी) गुप्तेंना व्हिलन / चोर ठरवणाऱ्यांना उत्तर दिलं आहे -

गुप्ते यांनी ‘..टॉम गॉर्डन’चा आराखडा उचलला, असे म्हटले, तर दोन-अडीचशे पानांच्या त्या कादंबरीचे ६० पानांमधले हे त्रोटक रूपांतर ठरू शकेल. आधारित म्हणावे, तर दोन्ही कथानकांचा आशय पूर्णपणे वेगळा असल्याचे जाणवते.

अस्वल Fri, 25/01/2019 - 23:07

In reply to by चिंतातुर जंतू

ते पुस्तक वाचलं नाही, माझा पास.
त्याच लेखातून-
"गणेश मतकरी यांनी थेटपणे गुप्ते यांच्याविषयी आपले मत स्पष्ट केले.

‘गुप्ते यांच्या सुरुवातीच्या कामावर परकीय प्रभाव आहे, याची मला कल्पना आहे. विशेषत: ‘काळ्या कपारी’ या कथेवर. जी बरीचशी स्टीवन किंगच्या ‘एन’ नावाच्या कथेवर आधारित आहे. या लेखनाचे श्रेय किंगला देणे, निदान मूळ कल्पना परकीय असल्याचा उल्लेख पुस्तकात असणे आवश्यक होते. पुढल्या आवृत्त्यांमध्ये ते करायला हवे. पण त्यामुळे गुप्तेंच्या सगळ्या कथांवर ठपका येऊ नये. कारण नंतरच्या काळात गुप्तेंनी भयकथांचा ढाचा वापरत वेगळे प्रयोग करायला सुरुवात केली आहे. ‘दंशकाल’नंतर ते आजच्या महत्त्वाच्या लेखकांमध्ये गणले जातात आणि ‘दंशकाल’ नक्कीच स्वतंत्र आहे,’ असे मतकरी यांनी सांगितले."

बिंदू घेतलाय, point taken.