ऐसीअक्षरेमधील तांत्रिक व अन्य संभाव्य सुधारणा
सुधारणांचे स्वरुप काहीही असू शकते. सुधारणेची सूचना म्हणजे विद्यमान स्वरुपावरची टिका नव्हे. सुधारणेची सूचना म्हणजे पूर्ण करायलाच पाहिजे अशी अपेक्षा नव्हे. आणि अशा सूचना काही विशिष्ट लोकांनीच करायच्या/पार पाडायच्या गोष्टी नव्हेत. तांत्रिक सूचना म्हणजे घर बांधताना वा बांधल्यावर कुठे, काय, कसं, इ, इ. अन्य सूचना म्हणजे घरात काय व्हावं, काय नाही, कसं व्हावं, कोण यावं, कोण नाही, इ इ. संस्थळाचे व्यवस्थापन कोणत्या सुचना स्वीकार्य आहेत, कोणत्या राबवण्याच्या योग्यतेच्या आहेत, कोणत्यासाठी किती श्रम आणि द्रव्य लागेल हे ठरवेल. अर्थात या पानावर ते सगळं डोळ्यासमोर ठेऊन सूचना करायच्या नाहीत. सुचना, अपेक्षा, काय आवडले, काय असायला नाही पाहिजे, काय व्हायला पाहिजे होते, इतरत्र कुठे काय पाहि असते हे मोकळेपणाने सांगायचे आहे. सांगताना सांगणारा बुजला नाही पाहिजे. अर्थातच संस्थळाचे व्यवस्थापन ज्या गोष्टींना जबाबदार ठरवले जाऊ शकत नाही त्याचा इथे विचार करायचा नाही आहे. 'तुम्हाला' काय वाटते ते नोंदणे महत्त्वाचे, ते किती प्रत्यक्षात उतरेल हे नंतर पाहू या.
मी सुरुवात करतो.
१. अबाउट ऐसी - ऐसी अक्षरेबद्दल माहिती असे एक पान असावे. याचा सुर माहितीपर असावा, कायद्याच्या भाषेतला नसावा. स्थापना, व्यवस्थापन, उद्देश, इ इ त्यात यावेत.
२. सर्व लोक प्रतिसाद वाचत नाहीत. ( काही फक्त तेच वाचतात) तेव्हा संस्थळाबद्दलचे मार्गदर्शन मूळ लेखांत असावे.
३. ऐसीची काही विचारसरणी असेल, कोण्या तत्त्वज्ञानाला बांधिलकी असेल/नसेल तर तसे एक पान असावे.
४. सक्रीय सदस्य आणि त्यांचे जनरल आवडते विषय वा लेखनाचे प्रकार वा विचारसरणी यांची समरी एका पानावर असावी.
५. सदस्य बनताना चार महत्त्वाच्या गोष्टी ठळकपणे चारदा अॅग्री बटन क्लिक करून मान्य कराव्या लागाव्यात - जसे व्यक्तिगत आरोप वा चिखलफेक करणार नाही.
६. नवे लेखन करताना शीर्षकातील उकार एडिट मोड मधे दिसत नाही, तो textbox मोठा असावा.
७. वर जाण्याचा अॅरो/गोल स्क्रोल केल्याशिवाय प्रकट होत नाही. तो पहिलेपासूनच दिसत असावा.
८. असाच एक अॅरो थेट खाली येण्यासाठी पण असावा.
९. माझे खाते मधे माझे लेखन पहिल्यापासून असते, ते वेगळे लिहिण्याची गरज नसावी.
१०. प्रतिसाद १, २.१.१, २.१.२, ३.१, ३.२, ३.३ असे नंबर दिलेले असावेत
११. प्रतिसाद जसजसा उजवीकडे सरकेल, तसतसे त्याचे हेडिंगकलर बदलावा. पहिली लेवल लाल, दुसरी हिरवी, पांढरी, काळी, इ इ . त्याच्यामुळे नक्की कोणता उपप्रतिसाद कोणत्या प्रतिसादाला आहे हे कळेल.
१२. सर्च इंजिनने शब्द सर्च केला पाहिजे.
१३. सर्च मधे सर्च इन प्रकार, इन शीर्षक, जेथे लेखक क्षक्षक्ष आहे, इन कंटेंट हे सगळे असले पाहिजे.
१४. लेखन सॉर्ट केल्यावर (समजा लेखकाच्या नावाने) तर प्रत्येक पान नंबराखाली त ते प अशी अनुक्रमणिका दिसली पाहिजे.
१५. नविन लेखन सॉर्ट बाय नंबर ऑफ रेटिंग्ज आणि प्रत्यक्ष रेटींग असेही असले पाहिजे. त्यासाठी दोन कॉलम जास्त लागतील.
१६. sort by number of responses हे ही हवे.
१७. sort by date of creation हे ही हवे. आता जे जास्तीचे कॉलम आहेत ते लपवता देखिल यावेत.
१८. तारांकित मधे केवळ काही पंचतारांकित लेख दिसतात. सर्वच तारे (उदा. तीन ते चार) आणि बिनतारे लेखन शोधता यायला हवे.
१९. लेखन अप्रकाशित करून साठवता येत नाही. लिहायला फार स्टॅमिना लागतो. त्यामुळे शुद्धलेखन वैगेरे दुरुस्त करण्याची गोष्ट लांबते. लोक वाचत असतात आणि लेखक संपादन करून अद्ययावत कर्त असतो.
२०. ऐसी अमेरिकन आहे कि भारतीय आणि व्यवस्थापनाच्या निष्ठा, प्रेम, कायदेशीर बांधिलकी हे स्पष्ट व्हावं.
२१. वाचक, लेखक, प्रतिसादक कोणत्या कायद्याच्या कक्षेत येतात हे स्पष्ट व्हावं.
२२. नविन लेखन, कविता, कौल, चर्चा, इ इ या क्रमात एक लॉजिक असलं पाहिजे.
२३. ट्रॅकर मधील मुख्यपानाची छोटी फाँटमधली लिंक हटवावी. ती ज्यादा आहे, कुरुपही आहे.
२४. लेखन नंबर ऑफ रिडिंग्जने पण सॉर्ट करता यावे.
२५. एका विशिष्ट तारखेपूर्वीचे लेखन वा सलग १-२ महिने इनॅक्टीव राहीलेला धागा अर्काइव मधे जावा.
२६. सदस्याच्या लेखनाची वा प्रतिसादांची क्वालिटी यावर एक पान हवे.
२७. नविन लेखन पानावर पार्श्वभूमी हिरवी आणि फाँट निलसर हिरवा हा कॉम्बो डोळ्यास इतका चांगला नसावा. Contrast वाढवावा.
२८. नविन लेखन मधे धाग्यांना अनुक्रमांक देण्यात यावा.
२९. आजची activity पाहता यावे - नवे धागे आणि जुन्या कोणत्या धाग्यावर किती प्रतिसाद. आठवडा, महिना आणि वर्ष बद्दलही असे करता येईल.
३०. आयडींची activity पाहता यावी- एकूण किती आहेत, किती तास लॉग ऑन असतात, किती लेखन केले, किती प्रतिसाद दिले, इ इ. असले स्टेट असले कि जरा मजा येते.
३१. रँक पोलचे लोजिक सुधारून लिहावे. तो क्रम लावण्याचा प्रकार सुलभ असावा.
३२. ऐसीवर फाईल लोड करता यावी.
३३. एडीटर मधे डायरेक्ट चित्र पेस्ट करता यावे.
३४. इमेज कुठे आणि text कुठे त्याचे लॉजिक सोपे असावे. L img a picture of sunset R img हे शवटी असावे.
३५. कोणत्याही icon खाली हॉवर केल्यावर text येत नाही. ते आले तर क्लिक केल्यावर काय होईल ते कळेल. ऐसीवरच्या सहा सिरियला (काय पाहिले, इ) चे जे आय्कॉन आहेत ते देखिल असेच आहेत.
३६. भाषा मधे language neutral म्हणजे काय?
३७. इतर भाषांचा (संस्थळाला भाषिक अस्मिता आहे कि वैषयिक आहे)उपयोग किती बरा किती वाईट?
३८. लिपी चे option पानाबरोबर सरकू नये. ते सतत दिसावे.
३९. 'नमस्कार अरुणजोशी' म्हणणार्याच्या खाली 'माझे खाते, माझे हे, ते' वाचणे चूक वाटते. नमस्कार तिथे नसावा.
४०. माझे खाते, लिपी, उपस्थित सदस्य च्या खाली इतर माहित असावी.
४१. चार पाच गोष्टी कॉपी करून ठेवणारा क्लिप्बोर्ड असावा.
४२. स्पिट समरी अॅट कर्सर म्हणजे काय?
४३. स्मायलीज फार कमी आहेत.
४४. इनपुट फॉर्म्याट म्हणजे नक्की काय ते मराठीत्ही लिहावे. बरेच लोक आय टी अज्ञ असतात.
४५. दिनविशेष पहिल्या पानावर/ वेगळ्या पानावर जास्त चांगल्यापैकी दिसेल असे पण असावे.
४६. लॉग न करता , इ-मेल देऊन प्रतिसाद देता यावा.
४७. उपप्रतिसाद देताना बाकी लेख, बाकी सगळे प्रतिसाद गायब होऊन नवीन जागी प्रतिसाद टायपाची गरज नसावी. श्रेणी दिली तसाच प्रतिसाद देऊन पुढे जाता यावे.
४८. नविन हे लाल अक्षरात नव्या प्रतिसादासाठी लिहिलेले असते ते मोठ्या अक्षरात असावे.
४९. समजा माझ्याकडे ५० प्रतिसाद एक पानावर अषी सेटींग आहे. दोन नवे प्रतिसाद आले. एक पहिल्या पानावरचा एक दुसर्या. पहिला वाचून दुसर्या पानावर जाताना तो लाल नविन तिथे नसतो. तो असावा.
५०. लाल नविन पुढे सगळीकडे 'पुढचा नविन' ही लिंक असावी.
५१. वाटचाल मधे धाग्याची लिंक न देता प्रत्येक प्रतिसादाची लिंक द्यावी. माणोस ओळखायला सोपे पडेल.
५२. नव्या आयडींना घाबरून सोडू नये. ते सभ्य असतील तर रुळेपर्यंत सांभाळून घ्यावे.
५३. अचानक कोणी नियम बनवला आहे असे वाटू नये. जुन्या आयडींना कोणाला काय आवडत नाही याची कल्पना असते. नवे आयडी निष्कारण एक समीकरण बनवून बसतात जे नंतर सुधारता सुधरत नाही. त्याकरीता आयडींना आपल्या नियमांची सवती प्रोफाई बनवावी.
आता तुमची बारी.
गूगलचा आगाऊपणा
>> गूगल किबोर्ड जास्त नॅचरल वाटतो.
नवशिक्यांसाठी पर्याय म्हणून गूगल कीबोर्ड द्यायला हरकत नाही, पण काय टंकल्यावर काय उमटेल ते स्वच्छ स्पष्ट असलेलं मला आवडतं. त्या दृष्टीनं गूगल कीबोर्ड मला अजिबात आवडत नाही, कारण वर थत्ते म्हणाले त्यानुसार तुम्हाला काय टंकायचं आहे ह्याचा आगाऊ अंदाज करायला तो जातो. माझ्यासारख्याला काय टंकायचं आहे ते स्वच्छ माहीत असतं. प्रसंगी मला मुद्दामहून भाषेशी खेळही करायचे असतात. त्यासाठी मुद्दामहून शब्दांची मोडतोड करायची असते. हे सगळं 'गमभन'मध्ये शक्य होतं, पण गूगलच्या स्बतःच्या अतिशहाणपणामुळे कटकटीचं होतं.
न मोडलेली गोष्ट दुरुस्त न करणं
न मोडलेली गोष्ट दुरुस्त न करणं, हे मलाही मान्य आहे.
दुसरं महत्त्वाचं. गूगल आणि ड्रूपालचं इंटिग्रेशन कोणी केलेलं नाहीये. त्यामुळे ज्यांना हवंय त्यांनी आपापलं, आपापल्या कंप्यूटरवर खेळावं एवढीच माझी पेग्रेड आहे. मी पण माझ्या कंप्यूटरवर बोलनागरी वापरते. 'गमभन'सारखं 'अ' टंकत बसावं लागत नाही. इन्शाल्ला, ड्रूपाल ७ वर गेल्यावर अधिक पर्याय मिळतील.
च्यामायला खफचा फॉर्मॅट सर्वात
च्यामायला खफचा फॉर्मॅट सर्वात नवीन पोस्ट वर ठेवण्याऐवजी सर्वात नवीन पोस्ट सर्वात शेवटी असा का नाही? दर वेळी खफ वरचे लेटेस्ट अपडेट बघायचे असतील तर मागच्या पानावर जाऊन खालपासूनन वरपर्यंत वाचत यावं लागतं. हे काऊंटर इंट्यूइटिव्ह नाही का वाटत? हे बदलता येईल का?
आणखीन एक गोष्ट, खफवर आपण आधी न वाचलेल्या खरडी 'नवीन' अशा ट्याग होऊन दिसतील का? प्रत्येक वेळी आपण आधी कुठपर्यंत वाचलं होतं हे शोधायला त्रास होतो.
खफचा फॉर्मॅट सर्वात नवीन
खफचा फॉर्मॅट सर्वात नवीन पोस्ट वर ठेवण्याऐवजी सर्वात नवीन पोस्ट सर्वात शेवटी असा का नाही?
तसे केले तर लेटेस्ट पोस्ट बघायला दर वेळी अंतिम क्लिक करावे लागेल. टोटल पाने पन्नास च्या वर आहेत, तुम्हाला नेहमी पहिले पान दिसत राहील, जे की तुम्ही ऑलरेडी वाचले आहे.
आपण आधी न वाचलेल्या खरडी 'नवीन' अशा ट्याग होऊन दिसतील का?
असे करता आले तर बरेच होईल.
उपाय
करता येईल का नाही, याबद्दल मी बोलू शकत नाही. तेवढी माझी पत नाही.
कधी लॉगाऊट झाल्यास तुम्ही म्हणता तसे, प्रतिसाद रिव्हर्स क्रॉनॉलॉजीने दिसतात. प्रायव्हेट ब्राऊजिंग सुरू करून, नवीन खिडकीत ऐसी उघडून लॉगिन न करता वाचता येईल (म्हणजे ब्राऊजरवरचे सदस्यनाम-पासवर्ड ही माहिती तशीच राहील). प्रत्येक धाग्याखाली डिस्प्ले-फ्लॅट असं निवडा. एकदा निवडलं की ते तसंच राहील.
गूगल किबोर्ड जास्त नॅचरल
In reply to बहुमत बलीयसी। by ३_१४ विक्षिप्त अदिती
गूगल किबोर्ड जास्त नॅचरल वाटतो. खालील शब्द गूगल किबोर्ड ला लगेच समजतात.
कृपया krupya
ऑन on
आंबा amba
उदाहरण म्हणून दिले. अजून बरेच आहेत. गमभन ला हि स्पेल्लिंग्स कळत नाहीत, उगाच जास्त टाईप करावे लागते.
नवीन येणारया लोकांना गूगल इनपुट कसे इन्स्टॉल करायचे माहित नसण्याची खूप शक्यता आहे, म्हणून डिफॉल्ट मधेच दिलं तर बरं होईल. (तसे टेक्निकली शक्य आहे का, हे मात्र मला माहित नाही)