गेम ऑफ थ्रोन्स
२४ तारखेला गेम ऑफ थ्रोन्सचा सहावा सीझन सुरू होतोय. त्या निमित्ताने कालच आधीच्या पाच सिझन्सचे बिंज वॉचिंग करून संपवले. सलग पाच सिझन्स बघितल्यावर एक वेगळाच मूड निर्माण झालाय आणि सहाव्या सिझनची उत्सुकता आहे.
इथेही अनेक जण ही सिरीज फॉलो करतात असे समजते. त्यामुळे खफवर लिहिण्यापेक्षा त्यावर इथेच गप्पा हाणूयात म्हणून धागा काढलाय.
तुमची आवडती क्यारेक्टर्स, दर एपिसोडवरच्या गप्पा, आधीच्या सीझन्सवरील गप्पा, टिका, टिपण्या, पिंका, याचं चित्रीकरण, बिहाइंड स सीन्स गॉसिप, यातील तंत्रज्ञान, पुस्तक आणि सिरीजमधील केलेल्या फरकावर चर्चा, आगामी सीझनमध्ये काय होईल याचे अंदाज या व अश्या कशावरही इथे गप्पा मारू शकता.
====
डिस्क्लेमरः या पुढे पाचव्या सिझनच्या टर्निंग पॉइंटबद्दल बोलणार आहे. ज्यांना रसभंग नको असेल त्यांनी पुढे वाचू नये
गेल्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडनंतर जॉन स्नो खरंच मेलाय का? हा सध्याच्या चर्चेचा विषय आहे. अनेक ब्लॉगर्सने ट्रेलर्सचा अभ्यास करून जॉन स्नो जिवंत असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. काय ते कळेलच.
माझी यातील पहिल्या सीझनपासूनची आवडती पात्रे खलीसी, आर्या स्टार्क आणि टीरीयन लॅनिस्टर तिघेही जिवंत असल्याने माझा इंटरेस्ट अजून टिकून आहे :)
या सिरीजचे फॅनफिक मी अजून वाचलेले नाही. पण ते सिरीजपेक्षा भारी असेल असा अंदाज आहे. कोणी वाचलेय का?
भारतात ही सिरीज कुठल्या च्यानेलांवर दिसते का? ती ही अनसेन्सॉर्ड (कठिणच आहे ;) ).. बहुदा जालावरच पहावी लागेल.
याची तर एक वेगळी सीक्रेट आहे
यातील कोणतेही पात्र घ्या जे नायकाच्या आदर्शीकरणाच्या जवळ जैल त्याची हमखास विकेट काढतात नायतर फ्लाव ठेवतात
जिमी लिनेस्तर - देखणा, शुर बट यु नो वाट ही दीड लास समर
जॉन स्नो - न्यायी, धाडसी अन गचकला बरोबर
नेट स्टार्क - जॉन स्नो सारखीच गत
रॉब स्टार्क - तिच गत
मग पुरून उरला तो टायरिओन लिनेस्तर... अर्र ही इज क्लेवर बट कांट से चार्मिंग दिड फुट्या आहे ना तो...
तुम्ही चार लोकात छातीठोक पणे म्हणुच शकणार नाही आय कैन रिलेट मायसेल्फ़ टू अमुक करैक्टर कोज ही गोट सम इश्यु ज ओर मोस्ट प्रोबेब्ली ही इज डेड. मायला तो पीटर बेलीश ज्याला त्याला घोड़ा लावत सुटलाय पन कोणी त्यावर अविश्वास दाखवत नाय अन ती खेलिसी प्रत्येकाकडून घोड़ा लावून घेता घेता सहीसलामत बाहेर पड़ते सुरुवातीला प्रकरण बरे वाटत होते पण आता सगळे कृत्रिम वाटत आहे. तगड़ी स्टारकास्ट, दर्जेदार अभिनय, अत्युच्च महागडी निर्मितीमुल्ये, दणकेबाज नग्नता या बाबी कमकुवत स्लाईड शो टाइप कथानक सादरीकरणावर मात करतात इतकेच.
एका कुठल्याशा साईटवर (बहुदा
एका कुठल्याशा साईटवर (बहुदा कोरावर) एका युजरचा प्रतिसाद मार्मिक होता. (भारतात ही सिरीज एनसेन्सर्ड का प्रक्षेपित होत नाही? असा काहिसा प्रश्न होता)
बरं झालं ही सिरीज जशीच्या तशी टिव्हीवर येत नाही. सत्तरीतल्या सास बहुमध्ये गुरफटलेल्या माझ्या घरातील अनेक मोठ्यांना हि सिरीज बघुन त्यांच्या "संस्कार व परवरीश" या शब्दांनाही फेफरं येईल. भारतात टिव्ही महातार्यांसाठी व इंटरनेट तरुणाईसाठी अशी ठाम वाटणी आहे तेच उत्तम आहे :प
माझे फेवरीट खालील क्रमाने १)
माझे फेवरीट खालील क्रमाने
१) मेलीसांड्रे द रेड वुमन - मला तिचा अॅटीट्यड, जादु, धोकादायकपणा आणी लाल केस प्रचंड आवडतात.
२) जॉन स्नो - प्रामाणीक, शुर, प्रेमळ आणी बराच माझ्यासारखा थोडक्यात "ही नोज नथिंग" :)
३) आर्या स्टार्क - ब्रेव अँड प्रॅक्टीकल. लाँग लीव यु डीअर.
४) टीरीअन लिनेस्टर - द गेम चेंजर. ज्याच्याशी कधीच शत्रुत्व घेउ नये असा.
५) प्रिन्स ओबेरायन - शस्त्रांची जाण, वापर असणारा उत्कृश्ट योध्दा. बट इन क्लोज काँबॅट विदाउट वेपन्स ही इज जस्ट नथिंग अँड दॅट्स द फॅक्ट वी आल शुड हॅव टु लिव वीथ.
आणखी एक पात्र आवडते आहे पण ते आवडणे माझ्यावर अथवा सर्वच प्रेक्षकांवर लादलेले आहे असे माझे प्रामाणीक मत आहे. म्हणून त्याबाबत दोन ओळी जास्त लिहाव्या वाटणे अस्वाभावीक नाही. ते पात्र म्हणजे खॅलिसी - हिच्यामधे घंटा काडीचे गुण नाहीत, एक्सेप्ट द फॅक्ट दॅट शी इज द बॉय हु लिव्ड थोडक्यात अशी व्यक्ती जिच्यात तिला वरचढ बनवणर्या नैसर्गीक शक्ती आपोआप असतातच तरीही ती व्यक्ती डोक्याने थोडी कमीच असते (स्लो लर्नर, डीस्लेक्सिया कांइंड ऑफ पर्सन) ज्याची हमखास भरपाइ अशा व्यक्तीला कथेत नेमकी योग्य माणसे मिळत मिळत होतच राहते. मग तो रानटी टोळीप्रमुख परंतु प्रेमळ नवरा असो ज्याला डॉग शॉट ऐवजी काउगर्ल पोजीशन शिकवुन ती त्याची आवडती बनते (व्हॅट अ क्रॅप) अन त्याच्या म्रुत्युनंतर ड्रॅगनची अंडी उबवुन त्याच्या कबील्याचा ताबा घेते. अ लॉट ऑफ बुल्शीट हॅप्पन वीथ हर बट शी सर्प्राइजींगली फाइंड्स हर वे. सो शी कॅन नॉट डाय इफ सिजन इज नॉट अबाउट टु एंड. येट आय लैक हर फॉर हर फेमीनीटी, सो डज एवरीवन. बिकाज शी इज क्युट दो. आय वुड से गॉड ब्लेस द क्वीन.
ही इज गुड. इंडीड.
पण खलिसीच्या समर्थकांना मी फार स्विकारत नाही. कारण आज तागायत कथेत सत्तेसाठी हुतुतु चालु असताना अनेक लोकांच्या विवीध चाली स्वभावांचे दर्शन सत्तेच्या खेळाच्या अनुशंगाने होत असताना, प्रत्येकजण खलीसीच्या प्रेमात पडुन तिचा समर्थक बनतो ही गेम ऑफ थ्रोन्स च्या द्रुश्टीकोनातुन भितीदायक बाब आहे. अर्थात बुटक्या मात्र स्वतःचा जिव वाचवायला तिला जॉइन झालाय बघुया पुढे काय होतय ते...
...तरीही खलीसीवर अग्नीचा प्रभाव चालत नाही म्हणून मेलीसांड्रे तिचे काही वाकडे करु शकत नाही आणी व्हाइट वोकर्स (उर्फ झोंबी) जे समग्र माणुसकीचे शत्रु आहेत त्यांना तिचे ड्रॅगनच वरच्यावर जाळुन संपवु शकतात या कारणाने तिच्यासमोर सर्वांना शरण जावेच लागेल हेच काय ते बघणे आपल्या नशीबी असेल तर गेम ऑफ थ्रोन्स हे नाव बदलणेच योग्य.
लेट्स सी, फिंगर्स क्रॉस्स्ड.
खलिसी हे पात्र मोठं रंजक
खलिसी हे पात्र मोठं रंजक काहिसे अवास्तव आहेच, पण साला कॅरेक्टरमध्ये काय माज ए! त्या माजावरच मी फिदा!
बाकी ती, आर्या आणि नेड स्टार्कची बायको ही स्त्रीपात्रे काय बनव्लीयेत.
त्याच सोबत सर्सी आणि मार्जरी या बायाही कहर उभ्या केल्यात. पाचव्या सीझनमधील सर्सीच्या न्यूड वॉकच्या वेळची एक्सप्रेशन्स कम्माल!
घंटा, काहीही.
खलीसीला कसला आलाय माज. माजबीज काही जमत नै तिला, यद्यपि तो अनिवार्य असला तरी. माज म्हणजे काय हे बघायचे असेल तर सर्सेई बघा. आर्या माजुरडी नाही, फक्त अॅसर्टिव्ह आहे. माजुरडी कोणी असेल तर सर्सेईच. न्यूड वॉक करायला लावले हे उत्तम झाले. माज बरा उतरला. नंतर भलेही एकेकाला तेलात तळून काढले तरी बेहत्तर, तूर्तास तरी तिचा माज उतरवला हे बेष्ट झाले.
माझे आवडते कॅरेक्टर हे अर्थात
माझे आवडते कॅरेक्टर हे अर्थात टिरियन. पण या शिवाय दोन लोक सगळ्यात महत्वाचे आहेत, पिटर बेलीश आणि लॉर्ड व्हेरिस. सगळ्यात नावडते कॅरेक्टर म्हणजे सॅन्सा स्टार्क अगदी पहिल्या एपिसोड पासुन मुर्खपणा चालु आहे हिचा. सहाव्या सिझन मधे बहुदा सॅन्सा चेच पात्र बदलणार असे प्रोमो बघुन वाटत आहे.
मला ओलेना टायरेलबद्दल
मला ओलेना टायरेलबद्दल उत्सुकता आहे .
टिरियन लॅनिस्टर बेस्ट आहे .तो नसेल तर काही इंटरेस्ट उरणार नाही .
आंधळी झाल्यावर आर्या स्टार्क काय करते ते बघायचय .
जॉन स्नो नाही मारायला पाहिजे राव .
तो नेड स्टार्कच्या बहिणीचा लिएनाचा आणि Rhaegar Targaryen चा मुलगा आहे असं spoilers म्हणत आहे .
रॉबर्ट नेट स्तार्कच्या
रॉबर्ट नेट स्तार्कच्या बहिणीला र्हेगारच्याच तावडीतून सोडवायला निघतो आणि एकुणच टार्गेरियन वंशाला (मॅड किंग सकट) संपवतो असा रॉबर्टपूर्व काळाचा इतिहास आहे.
हे पुस्तकात बर्यापैकी स्वच्छ आहे, सिर्यलीत पहिल्या सिझनच्या नेड आणि रॉबर्टच्या तळघरातील बोलण्यात फारच मोघम व इन्डिरेक्ट उल्लेख आहे.
होय बे, पण डेनेरिस आणि तिचा
होय बे, पण डेनेरिस आणि तिचा तो इन्सेस्टी भाऊ हेच काय ते दिसतात प्रथमपासून. र्हेगार दिसतच नै कधी प्रत्यक्षात.
बाकी, ते दोघे पहिल्यांदा ज्याच्या व्हिलामध्ये राहतात त्याचे नाव आणि त्यांच्याशी रिलेशन काय असते? खाल द्रोगो डेनेरिसला गुलामांच्या बाजारात पाहिल्यासारखे पाहतो त्या सीनच्या वेळचा व्हिला.
ठीक
सिरीज दोन वेळा पाहून झालीए. पाच पैकी अडीच पुस्तकं वाचून झाली आहेत. सिरीज एकंदरीत ठिकच. पुस्तकांत फार्फार लांबण आहे अन रिपिटीशन आहे. पण काही इंटरेस्टींग कॅरॅक्टर्सची श्टोरी सिरीजमध्ये बदललेली आहे.
खलिसीचं कॅरॅक्टर पुस्तक अन सिरीज दोन्ही मध्येही एकदीच रद्दड आहे. टिरीयनचं कॅरॅक्टर बरं आहे, ड्रिंकलेजनी त्याला चार चांद लावलेत सिरीजमध्ये.
इतक्या रामायणानंतर सैरावैरा सुटलेल्या गोष्टींना ग्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र मार्टीन वेसण कसं घालतो ते बघण्यात उत्सुकता आहे. तरी अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतील असं वाटतं. (इंटरनेटावरील ओव्हर अॅनॅलिसीसचा कंटाळा आला आहे. मार्टिननेही इतका विचार केला नसेल. त्यातल्या त्यात ह्या चॅनेलचे व्हिडीओ पहाण्यासारखे आहेत.)
इतक्या रामायणानंतर सैरावैरा
इतक्या रामायणानंतर सैरावैरा सुटलेल्या गोष्टींना ग्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र मार्टीन वेसण कसं घालतो ते बघण्यात उत्सुकता आहे.
+ १००
बादवे, तसं त्याला कंटाळा आला की तो ते पात्र मारून टाकतो तेव्हा इतकंही कठीण जाऊ नये ;)
तरी अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतील असं वाटतं
ते हवेतच. त्याशिवाय फॅनफिक कसे येणार?
महाभारत नाहि का आधी तुलनेने लहानच होतं, फॅन फिकची उपकथानके अॅड होत होत केव्हढं झालं!!
जॉण्सो विल्बी ब्यॅक...
त्याचे नाव ओपनींग क्रेडीट्स ला आहे, गेस्ट स्टार म्हणून न्हवे... त्यामुळे त्याचे दर्शन होतच राहील. लेट्स सी. प्रमाणाबाहेर सब प्लॉट तयार केले की एपीसोड कसे स्लाइड शो बनु लागतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे गेम ऑफ थ्रोन्स. थँक गॉड अंजावर फॅन्स कडुन प्रमुख पात्रांचे अख्या सिजनचे एपीसोड एडीट करुन सलग कथानक दाखवणारे विडीओ उपलब्ध्द आहेत. यु डोंट मिस द फन दॅट वे.
ओह! सो यु डोंट वांट टु मिस द फन ?
सुरुवात म्हणून ही लिंक बघा...!
https://www.youtube.com/playlist?list=PLAgV9yBW1uhe5ptPOEoCSnBXSzLcItIpZ
आणी शेवट याचीच एक आख्खी सलग फाइल (४० मिनीटांच्या तुकड्यात) कुठे आहे ते समजण्यात नक्कि होइल. आहे, नेट वर उपलब्ध्द आहे.
कव्हर्स
थीम कव्हर्सची ही लिस्ट जरूर ऐका!
http://time.com/3894017/best-game-of-thrones-theme-song-covers/
त्यातले पहिले फ्लॉपीज वापरून केलेले आहे!!!
मला आवडणारे हे पर्शिअन कव्हर -
मराठी अॅनालिसिस
हे दोन व्हिडीयो बघितले काय? मराठीत पहिल्यांदा बघतोय. ऐसीकर 'निखिल देशपांडे' पण दिसतोय यातः
http://www.bobhata.com/manoranjan/hivalayetoy-game-thrones-season-6-pre…
http://www.bobhata.com/manoranjan/hivalayetoy-part-2-gameofthrones-s06e…
हे असं मराठीत होतंय हे काय भारीये!
मस्त रे निखिल!
एपिसोड ३
या मध्ये बहुतेक R+L=J Theory ही फॅन थिअरी खरी ठरेल अशा आवया उठत आहेत. एकंदरीत प्रचंड मजा येत आहे!
Game ऑफ Thrones 5th
Game ऑफ Thrones 5th season बघतेय .