पु . ल . तुमच्यासाठी!
महाराष्ट्राचे लाडके दैवत
मनापासुनी हा केला गौरव
‘आपुलकी’ ही साऱ्यांची
उदंड केले प्रेम तुम्हावरी
‘पुरचुंडी’ ही तुम्ही बांधली
‘खिल्ली’ कोटयानी उडवली
‘पूर्वरंग’ हा तुम्ही सजवला
‘वंग-चित्रे’ ना साज चढवला
‘जावे त्यांच्या देशा’ जेव्हा
‘गणगोत’ सारे जमते तेव्हा
‘बटाटयाची चाळ’ असो
वा ‘वाऱ्यावरची वरात’ असो
भेटले ‘व्यक्ती आणि वल्ली’
‘हसवणूक’ ही झाली न्यारी
आम्हास वाटे ‘अपूर्वाई’
फळास आली आमुची पुण्याई
शब्दरूपी हा खजिना तुमचा
भाग्य आमुचे आम्हा लाभला
अनंत या हो उपकारांची
होऊ कशी मी उतराई
ऋणात राहुनी तुमच्या मी
सदैव ‘गुण गाईन आवडी’
– उल्का कडले
(ही कविता मी एक-दीड वर्षापूर्वी केली होती. खास पु. ल. ना श्रद्धांजली म्हणून. पु. ल. आणि त्यांचे साहित्य याविषयी वाटणाऱ्या नितांत आदरातून ही कविता सुचली आहे.)
कारण माझा स्वभाव. जसा तुमचा
कारण माझा स्वभाव.
जसा तुमचा आहे. स्पष्ट मत नोन्दवण्याच्या नावाखाली तुम्ही काहीही लिहित असता. त्याला मर्मिक, विनोदी म्हणणारे पण आहेतच म्हणा. त्यामुळे आणि चेव येतो का?
आताच बघा फलतु वेळ वाया जातोय.
तेव्हा आता ह्यापुढे तुमची मर्जी. मला जे सान्गायचे आहे ते सान्गितले आहे.
चान्गले असेल तर चान्गले म्हणा आणि वाईट असेल तर सुधरायला वेळ द्या. आपल्याला इतके तरी येते का ह्याचा विचार करा. आणि येत असेल तर तेच कौशल्य दाखवा. आम्ही आनन्दाने वाखाणणी करू. पण माझ्या धाग्यावरील हे असले वायफळ प्रतिसाद थाम्बवाल तर बरे होइल.
फुल स्टॉप.
नको नको !
मनाने चान्गले असतील की. मी कधीही कोणाला वाइट समजत/म्हणत नाही. ;)
बॅटमॅन आणि माझी तर Quora वर चान्गलीच ओळख आहे. :) पण आज त्याचे ह्या धाग्यावरील विचार मात्र मला थक्क करुन गेले. ते त्याचे वैयक्तिक मत झाले हे मान्य. 'freedom ऑफ opinion'. असो. तुम्ही मजा करा.
अनुतै, तुमची तर्कक्षमता,
अनुतै, तुमची तर्कक्षमता, बुद्धीवाद वगैरे सगळ्यांचा आदर आहे
ही टिंगल आहे की कॉम्प्लिमेण्ट ?
बाकी कोणी काय लिहावे, पेटी वाजवावी की नाटक करावे की विदुषकी पणा करावा याचे सेन्सोरिंग बुद्धीवादी वगैरे म्हणवणाऱ्या लोकांनी करावे याची अंमळ मौज वाटली.
शिवाय एखाद्या माणसाच्या वैयक्तिक आयुष्यात घुसून 'अमक्या ढमक्याची पत्नी होती म्हणून निभावले' असली वैयक्तिक टीका केली आहे ती पाहून टीका करणारीचा बौद्धिक दर्जाही कळला.
शिवाय एखाद्या माणसाच्या
शिवाय एखाद्या माणसाच्या वैयक्तिक आयुष्यात घुसून 'अमक्या ढमक्याची पत्नी होती म्हणून निभावले' असली वैयक्तिक टीका केली आहे ती पाहून टीका करणारीचा बौद्धिक दर्जाही कळला.
हे काही पटले नाही.
"आहे मनोहर तरी" मधे याहीपेक्षा अधिक व्यक्तीगत बाबींचे प्रकटन करण्यात आलेले आहे. पुस्तक प्रकाशित केल्यानंतर त्यातल्या मजकूरानुरुप चर्चा झाली व प्रतिसाद दिले गेले तर त्यात वावगं काय आहे ?
तुमची तर्कक्षमता, बुद्धीवाद
तुमची तर्कक्षमता, बुद्धीवाद वगैरे सगळ्यांचा आदर आहे. पण जितेह तिथे बुद्धीवादातला तो कोरडेपणा आणलाच पाहिजे का ? सगळच जर असं रुक्ष रुक्ष, झालं तर चालेल का ? कोरडे तर्क आणि उच्चभ्रु चष्मे जिथे तिथे आवश्यक आहेत का ? "माझी आवड तेवढी श्रेश्ठ आनी बाकीचे पाण्चट,बाश्कळ/उथळ" हा न्याय सगळ्यांनीच एकमेकांना लावला तर कसं होइल ?
तसं तर तुमच्या प्रतिसादांना गांभीर्यानं घेणं मी कधीचच सोडलय तुमेहे हेच करत राहिलात तर नवीन सदस्यही तेच करतील.
काय ओ हे ??
१) कोरडे तर्क म्हंजे काय ?? ओले तर्क कसे असतात ?
२) उच्चभ्रू चष्मे म्हंजे काय ?? नीचभ्रू चष्मे कसे असतात ? असतात का ?
३) तसं तर तुमच्या प्रतिसादांना गांभीर्यानं घेणं मी कधीचच सोडलय ---- आजपर्यंत जे प्रतिसाद तुम्ही गांभिर्याने घेतलेत व त्याबरहुकुम स्वत:च्या कृति मधे बदल घडवून आणलात ते कोणते प्रतिसाद आहेत ? मग ते प्रतिसाद सोडून बाकीचे सर्व प्रतिसाद "गांभीर्याने न घेण्यासारखे" आहेत का ?
-------
"माझी आवड तेवढी श्रेश्ठ आनी बाकीचे पाण्चट,बाश्कळ/उथळ" हा न्याय सगळ्यांनीच एकमेकांना लावला तर कसं होइल ?
हे अभिव्यक्तीमधे बसत नाही का ? जो जे वांछील तो ते का न लाहो ?? किमान अभिव्यक्तीच्या बाबतीत ?
उल्काबाई - तुमची ही
उल्काबाई - तुमची ही प्रतिक्रीया अगदी चुकीची आणि उद्धट आहे. एकतर तुमच्या कवितेबद्दल शब्द पण नाहीये. त्यांना पुलं वद्दल जे वाटते ते अनुताईंनी लिहीले, तुम्हाला पटत नसले तर सोडुन द्या.
ह्यापुढे माझ्या धाग्यावर ही तसदी न घ्याल तर फार बरे होइल.
हे वाक्य अत्यंत चुकीचे आहे. तुम्ही पब्लिक फोरम लिहीता म्हणजे तिथे सर्व वाचायला येणारच. आणि त्यांना जे वाटेल ते मत देणारच ( खरे तर तुमच्य कचितेबद्दल काही मत दिलेले नाहीये अनुताईंनी )
कोहली नी मॅच खेळायची आणि म्हणायचे की माझ्या वर वाईट काँमेंट करायच्या नाहीत.
पु लना ही नाही सोडलत
म्हणजे काय? तुम्ही कोण ठरवणार उल्काबाई कोणी कोणाला धरायचे नि कोणाला सोडायचे ते? इतका अहंभाव बरोबर नाही.
उल्काबाई नशिब तुमच्या कवितेच्या दर्जा वर कोणी कॉमेंट केली नाहीये. फाडुन च खाल तुम्ही.
पॉलिटिकल करेक्टनेसचा आजार दूर
पॉलिटिकल करेक्टनेसचा आजार दूर ठेवणारे त्यांचे प्रतिसाद छान असतात. अनु राव तुम आगे बढो...
यही तो मै कह रहा हूं.
माझा सुद्धा अनु राव ला थेट, सहर्ष, व मजबूत पाठिंबा. स्वतःचं (प्रवाहाविरुद्ध असलेलं) मत सुद्धा candidly मांडते अनु. प्रत्येक बाबतीत गुळमुळीत भूमिका घेऊन - मी माझे स्वत्व तुमच्या/इतरांच्या परवानगीनेच टिकवून आहे - असं दाखवणार्या मानसिकतेपेक्षा अनु राव चे प्रतिसाद श्रेयस्कर.
पुलंची अख्ख्या महाराष्ट्राने स्तुती केलेली आहे. "महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व" असे शब्द वापरून. मग एखाद्याने टीका केली तर ती सुद्धा सहन होऊ नये ? इक्विटी मेंटॅलिटी ला इतका विरोध ?
अनु ने पुलंवर व्यक्तिगत टीका केली असा सुद्धा सूर आहे. पण "आहे मनोहर तरी" मधे बहुतांश व्यक्तीगत जीवनाचे चित्रण केलेले असल्यामुळे "अनु राव चे व्ह्युज ब्यक्तिगत जीवनात घुसखोरी करणारे आहेत" असे म्हणणे न पटणारे आहे. स्वतःचे व्यक्तिगत जीवन व्यक्ती इतरांसमोर (चरित्रस्वरूपात) मांडते त्यामागे काय हेतू असतो ? त्यावर चर्चा होऊच नये असा हेतू असतो ?? खरंच ?? अर्थात "आहे मनोहर तरी" हे सुनिताबाईंनी लिहिलेले आहे, पुलं नी लिहिलेले नाही असा प्रतिवाद केला जाऊ शकतो पण त्यात काही दम नाही. कारण पुलं ना त्यातला मजकूर संपादित करायचा असता तर त्यांनी केलाच असता.
प्रत्येक बाबतीत गुळमुळीत
प्रत्येक बाबतीत गुळमुळीत भूमिका घेऊन - मी माझे स्वत्व तुमच्या/इतरांच्या परवानगीनेच टिकवून आहे - असं दाखवणार्या मानसिकतेपेक्षा अनु राव चे प्रतिसाद श्रेयस्कर.
का सांगत नाही हे वाक्य कोणाला उद्देश्युन होतं? खरं. उगाच खोटं नाही खरं.
.
तुम्ही कोणाला श्रेष्ठ समजता म्हणजे अन्य कोणाला पाडलच पाहीजे का?
.
नाही दुसर्याची रेघ पुसल्याखेरीज, रेघ वाढवता येत नाही बरोबर?
तुम्ही कोणाला श्रेष्ठ समजता
तुम्ही कोणाला श्रेष्ठ समजता म्हणजे अन्य कोणाला पाडलच पाहीजे का?
नाही दुसर्याची रेघ पुसल्याखेरीज, रेघ वाढवता येत नाही बरोबर?
अमिताभ बच्चन हा चंकी पांडे पेक्षा श्रेष्ठ आहे म्हंजे चंकी हा कनिष्ठ आहे. यात चंकी ला पाडलेच जाते व ते च बरोबर आहे. मी या वृत्तीचा थेट समर्थक आहे.
उगीचच "सगळ्यांचंच योगदान महत्वाचं आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं पाहीजे" वगैरे गुळमुळीत पणाशी माझा थेट, स्पष्ट मतभेद आहे. (याचा अर्थ त्यांनी त्यांची मतं मांडूच नयेत - असा नाही.)
स्वतःचं (प्रवाहाविरुद्ध
स्वतःचं (प्रवाहाविरुद्ध असलेलं) मत सुद्धा candidly मांडते अनु. प्रत्येक बाबतीत गुळमुळीत भूमिका घेऊन - मी माझे स्वत्व तुमच्या/इतरांच्या परवानगीनेच टिकवून आहे - असं दाखवणार्या मानसिकतेपेक्षा अनु राव चे प्रतिसाद श्रेयस्कर.
काहीतरी वेगळे मत या हव्यासापायी एखादे वेगळे मत व्यक्त केले पण मतामागचा विचार तर्कशून्य असेल तर त्या वेगळेपणाला काही अर्थ उरतो काय ? वेगळं मत हा एकाच निकष लावायचा असल्यास राखी सावंतने निवडणुक लढवली तेंव्हा तिने केलेल्या प्रचार भाषणांचे सुद्धा कौतुक करावे लागेल.
अर्थात "आहे मनोहर तरी" हे सुनिताबाईंनी लिहिलेले आहे, पुलं नी लिहिलेले नाही असा प्रतिवाद केला जाऊ शकतो पण त्यात काही दम नाही. कारण पुलं ना त्यातला मजकूर संपादित करायचा असता तर त्यांनी केलाच असता.
तुम्ही 'आहे मनोहर तरी' नीट वाचले आहे काय ? त्यापलीकडे जाऊन हेही विचारतो की सुनीताबाईं सारखी 'करारी, स्वाभिमानी' स्त्री निव्वळ नवर्याने सांगितले म्हणून स्वत:च्या लिखाणात बदल करेल असे वाटते का ?
स्वत:ला उच्चभ्रू, स्त्री-पुरुष समानतावादी म्हणवून घेणार्यांना 'नवर्याचे मत हेच बायकोचे मत' असा बुरसटलेला विचार करताना पाहून मला आश्चर्य वाटते.
'आहे मनोहर तरी' हे सुनीताबाईंचे कथन आहे. पु. लं. चे नाही.
शिवाय सुनीताबाईंनी पु. लं वर टीका केली असली तरी 'मी होते म्हणून भाईचे निभावले' असे कुठे लिहिले असल्यास तसा संदर्भ द्यावा.
तदुपरी तसा संदर्भ मिळालाच तरी असे म्हणण्याइतके पु. लं चे व्यक्तिगत जीवन सुनीताबाईंना ठाऊक होते. 'अनु राव' यांना ते तसे माहीती असण्याची शक्यता आहे का ? म्हणूनच तसल्या कमेंट मधून त्यांचा 'बौद्धिक बाश्कळ' पणा दिसतो.
त्यापलीकडे जाऊन हेही विचारतो
त्यापलीकडे जाऊन हेही विचारतो की सुनीताबाईं सारखी 'करारी, स्वाभिमानी' स्त्री निव्वळ नवर्याने सांगितले म्हणून स्वत:च्या लिखाणात बदल करेल असे वाटते का ?
हा मुद्दा उचित आहे.
पण आता असं पहा की सुनिताबाई करारी होत्या हे तुम्हीच मान्य केलेले आहे.
हे माझ्या ऐकण्यात सुद्धा आलेले आहे.
सुनिताबाईं करारी असतीलही पण नम्रता हे मूल्य पाळणार्या नसतीलच असं कशावरून ?
मग त्यांनी असं लिहिलं नसेलही की पुलंचं त्यांच्यामुळे निभावलं. परंतु कदाचित "बिट्वीन द लाईन्स" करून ठेवलं असेल तर ?
---
तुम्ही 'आहे मनोहर तरी' नीट वाचले आहे काय ?
वा वा वा. अप्पासाहेब. तुम्हास माझे मत पटले नाही म्हणून माझ्या वाचण्यावर शंका ? अॅड होमिनिझम च्या आसपास जाणारे आर्ग्युमेंट. (म्हंजे एक्झॅक्टली अॅड होमिनेम नाही पण...)
नीट वाचणे म्हंजे काय ओ ? नीट वाचण्याचा अॅक्सेप्टन्स क्रायटेरिया बनवा व इथे मांडा. मग आम्ही आमचेच वाचन तुमच्या क्रायटेरियाप्रमाणे तपासून पाहतो की नीट वाचणे म्हंजे नेमके काय असते ते. मग बोलू. नैका ?
---
स्वत:ला उच्चभ्रू, स्त्री-पुरुष समानतावादी म्हणवून घेणार्यांना 'नवर्याचे मत हेच बायकोचे मत' असा बुरसटलेला विचार करताना पाहून मला आश्चर्य वाटते.
ऑ
ऐसीअक्षरे वर नवीन आहात का ? इथल्या कुणालाही विचारा ... ऐसी वर सहा महिन्यांपेक्षा जास्त काल उपस्थित असलेलं कुणीही सांगेल की गब्बर हा "समानतेच्या मूल्याचा" प्रखर विरोधक आहे हे.
आणि 'नवर्याचे मत हेच बायकोचे मत' - असा माझा मुद्दा नव्हता. पुस्तक "सुनिताबाईंनी लिहिलेले" असूनही पुलं वर मुख्यत्वे आहे. पुलंना असं वाटलं की "त्यांना मिस-रिप्रेझेंट केलं जातंय" तर ते व्यक्त करतीलच व सुनिताबाईंना पटलं तर त्या कात्री लावतीलच.
----
'आहे मनोहर तरी' हे सुनीताबाईंचे कथन आहे. पु. लं. चे नाही.
हा आक्षेप मी आधीच अँटिसिपेट केलेला होता.
---
शिवाय सुनीताबाईंनी पु. लं वर टीका केली असली तरी 'मी होते म्हणून भाईचे निभावले' असे कुठे लिहिले असल्यास तसा संदर्भ द्यावा.
हास्यास्पद मुद्दा.
त्यांनी तसा क्लेम केलाय असं कुणीच म्हणालेलं नाहिये.
पुस्तकावर आधारीत चर्चा व मत बनवले गेले व त्या मताचे प्रकटन झाले.
---
तदुपरी तसा संदर्भ मिळालाच तरी असे म्हणण्याइतके पु. लं चे व्यक्तिगत जीवन सुनीताबाईंना ठाऊक होते. 'अनु राव' यांना ते तसे माहीती असण्याची शक्यता आहे का ? म्हणूनच तसल्या कमेंट मधून त्यांचा 'बौद्धिक बाश्कळ' पणा दिसतो.
अनु राव यांना बौद्धिक बाष्कळ पणा म्हणणे (हे तुम्ही दोनदा केलेत) हे वैयक्तिक टीका कशी नाहीये ओ ? हे सांगाच.
---
तुम्ही अनेकदा अॅड होमिनिझम स्टाईल प्रतिसाद दिलेले असल्याने मी ही देतो.
काहीतरी वेगळे मत या हव्यासापायी एखादे वेगळे मत व्यक्त केले पण मतामागचा विचार तर्कशून्य असेल तर त्या वेगळेपणाला काही अर्थ उरतो काय ? वेगळं मत हा एकाच निकष लावायचा असल्यास राखी सावंतने निवडणुक लढवली तेंव्हा तिने केलेल्या प्रचार भाषणांचे सुद्धा कौतुक करावे लागेल.
तसं तर तुमच्या ऐसी अक्षरे वर येण्याला सुद्धा व इथे प्रतिसाद देण्याला सुद्धा "वेगळं मत मांडण्याचा हव्यास" - असं म्हंटलं जाऊ शकतं.
या विश्वातील तुमच्या अस्तित्वाला सुद्धा - "हव्यास" म्हंटलं जाऊ शकतं.
तुमच्या "अप्पा" या युजर आयडी ला सुद्धा "आपले वय जास्त आहे असे भासवून मोफत आदर मिळवण्याचा हव्यास" म्हंटलं जाऊ शकतं. कारण अप्पा हे साधारणपणे, अनेकदा - वयाने मोठ्या व्यक्तीस केलेले संबोधन असते.
पुलंची अख्ख्या महाराष्ट्राने
पुलंची अख्ख्या महाराष्ट्राने स्तुती केलेली आहे. "महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व" असे शब्द वापरून. मग एखाद्याने टीका केली तर ती सुद्धा सहन होऊ नये ? इक्विटी मेंटॅलिटी ला इतका विरोध ?
या तुलनेत 'अनु राव' यांची स्तुती करणारे फारच कमी असतील. मग जर एखाद्याने त्यांची लायकी काढली तर तीसुद्धा सहन होऊ नये.
बाकी तो 'शीशे के घर मी रहने वाले-------------------- ' वगैरे नेहमीचा डायलोग आहेच. इतका हळवेपणा बरा नाही असाच इथला नियम आहे ना ?
या तुलनेत 'अनु राव' यांची
या तुलनेत 'अनु राव' यांची स्तुती करणारे फारच कमी असतील. मग जर एखाद्याने त्यांची लायकी काढली तर तीसुद्धा सहन होऊ नये.
सहन अवश्य केली जाते व जाईल सुद्धा.
पण तुम्ही वैयक्तिक टीका करू नये हे सांगताना वैयक्तिक टीका केलीत. बौद्धिक क्षमता वगैरे शब्द वापरलेत - म्हणून तुमच्या निदर्शनास ती आणून दिली.
मराठी मनावर साम्राज्य करणारा
मराठी मनावर साम्राज्य करणारा साहित्यिक ( व एकंदरीत व्यक्तिमत्वच) अशी माझ्यालेखी पुलंची ओळख होती.
काही वर्षापूर्वी त्यांच्यावर अक्षरशः चिखलफेक करणारा मचकूर वाचनात आला. तेव्हा फारच धक्का बसला होता. या माणसाचा एवढा राग कसा काय येउ शकतो एकाला.. पण ते ब्रिगेडी रागातून असल्याचे नंतर समजले..
आता अनु रावांनी पुलंना एकदम साधारण ठरवले.. अर्थात माझ्या नजरेत त्यांचे स्थान तेच राहील.
पण आता एखाद्या क्षेत्रातील एखादी व्यक्ती सर्वांनाच प्रचंड आवडू शकते हा भ्रम मात्र दूर झाला..
आता भीमसेन, ब्रॅडमन वगैरे(सचिन मुद्दामच नाही लिहिलं, त्याच्याविषयी ऑलरेडी बरचं निगेटीव्ह ऐकलयं.. सर्वच पटलं नसलं तरी) यांच्याविषयीही असचं ऐकु आलं तर जास्त धक्का नाही बसणार
आणि हो .. ते त्यांच वैयक्तिक मत आहे त्यामुळे त्याला निरर्थक वगैरे श्रेणी देणं योग्य वाटत नाही. पण त्याला मार्मिक श्रेणी मिळू शकली म्हणजे माझ्या भ्रम दूर होण्याला दुजोरा मिळाला..
:-(
ह्या धाग्यावरील माझे शेवटचे स्प्ष्टीकरण...
मी खरे तर अनुच्या मागील सर्व प्रतिसादांकडे दुर्लक्ष करत आलेय. खरे तर कायम करायचे असेही ठरवले होते.
पण आज ह्या धाग्यावर पुलं विषयी जे काही लिहिले ते पाहून गप्प बसणे शक्यच नव्हते. तरुण पिढी 'freedom ऑफ expression' च्या नावाखाली त्यांच्या विषयी काहीही लिहिते आणि स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजते हे नाही सहन झाले मला.
आणि जे पुलंविषयी असे बोलू शकतात ते माझ्या विषयी माझ्या मागे का नाही बोलणार? कदाचित किंवा खात्रीनेच हे मुद्दामच लिहिले असेल. उकसावायाला हेही कळले पण प्रश्न माझा नव्हता. इथे पुलंचा होता. तोही माझ्या धाग्यावर.
एक काबुल करते की मी ही माझी आदरांजली चुकीच्या ठिकाणी प्रकाशित केली. मला वाटले होते की माझ्यासारखेच पुलंचे चाहते इथे खूप असतील पण तसे नाहीय हेही कळले. कुठुन दुर्बुद्धी झाली माहित नाही.
'जशास तसे' वागणे मला सहज शक्य आहे. पण मला त्यात काडीमात्र रस नाही. त्यांचे वागणे त्याना लखलाभ!
म्हणून असे वागायला का ते मुखवटे (आयडी) घालून येतात?
ह्यापुढे हवा तो प्रतिसाद दिला तरी आता मला फरक नाही पडत. मला जे सांगायचे आहे ते सांगितले मी.
Full Stop
एका पूर्वप्रकाशित लिखाणातून
आज इतक्या वर्षांनी पुलंच्या मृत्यूनंतर आलेल्या त्यांच्या प्रेमाच्या पुराची लाट किंचितशी ओसरल्यासारखी झाल्यानंतर त्यांच्या आपल्या आताच्या आयुष्याशी राहिलेल्या नात्याबद्दल आपल्याला काहीशा समतोलपणे बोलता येईल असे वाटते. त्यांच्याबद्दलचा "रेव्हरंस" लोपलेला नाही ; परंतु त्यांच्या "रिलेव्हन्स" बद्दल बोलावे इतपत काळ उलटला आहेसे वाटते.
माझ्या विचारांची दिशा थोडीशी तुमच्या आमच्या जगण्याशी संबंधित आहे. पु. लं. च्या लिखाणातून जगण्याची काही एक पद्धती, काही मूल्ये , यांचे दर्शन घडते. त्यांनी या तत्त्वांचा म्हणा , मूल्यांचा म्हणा , वेगळा असा उद्घोष कधी केला नाही. पण "तुझे आहे तुजपाशी" सारख्या कृतींतून उघडउघड तर अन्य ललित लिखाणांतून प्रच्छन्नपणे त्यांच्या जगण्यबद्दलच्या दृष्टिकोनाचे दर्शन घडले आहे. मराठी मनावर या वृत्तीचा नक्कीच प्रभाव पडत आला आहे. गेल्या काही पिढ्या याची साक्ष देतील.
नॉस्टाल्जियाचे दर्शन पुलंच्या जवळजवळ प्रत्येक लिखाणात दिसेल. त्यांच्या लेखक म्हणून ऐन बहरात असण्याच्या कालात या मुद्द्याचे अपील खूप मोठे होतेच ; पण ऐंशी-नव्वदीच्या दशकात जेव्हा पुलंनी जवळजवळ लेखनाच्या मुख्य प्रवाहापासून संन्यास घेतला होता, त्या काळातील पिढ्यांवर सुद्धा , या स्मरणरंजनाचा प्रभाव कमी नव्हता. बालगंधर्व, पुलंचे आजोबा, अगदी बोरकरसुद्धा ..... या साऱ्यांना कधीही न पाहिलेली मंडळी त्याना पहात होती पुलंच्या चष्म्यातून. वसंतराव देशपांडे , केसरबाई केरकर यांसारख्यांना या पिढीतील लोकांनी ओझरते पाहिले असेलही ; पण ते त्यांच्या उतारवयात , कारकीर्द आटोपताना. पण त्यांची व्यक्तिचित्रे अगदी अलिकडील पिढ्यांमढ्ये लोकप्रिय होती.
पुलंच्या अस्तानंतर या स्मरणरंजनाची जादू लोप पावत असल्यासारखी का वाटत असेल? माझ्या मते, त्याचे एक उत्तर असे असेल की, पुलंच्या अस्तानंतर जवळजवळ लगेच, त्यांना पाहिलेल्यांची, त्यांच्याबरोबर काम केलेल्यांची , त्यांचे कर्तृत्त्व घडताना ते अनुभवणाऱ्यांची पिढीच काळाच्या पडद्याआड गेली. हे संक्रमण जास्त जाणवले ते पुलंच्या एक्झिटमुळे. याचा अर्थ या पिढीतील सर्वच्या सर्व माणसे इतक्या थोड्या कालावधीत देवाघरी गेली, असा कुणी शब्दशः अर्थ काढू नये. पण ही पिढी जीवनाच्या क्रीडांगणातून निवृत्त होत गेली आणि पुलंच्या लिखाणातील स्मरणरंजनाच्या एका मोठ्या भागाचे संदर्भ विरल्यासारखे झाले असे मला वाटते.
भर
एकंदर प्रतिसादातल्या मुद्द्यांमध्ये भर घालावीशी वाटते ती नव्वदोत्तरीची. ज्या मध्यमवर्गाने पुलंना डोक्यावर घेतलं त्या घरांतली नवी पिढी मोठ्या प्रमाणात इंग्लिश माध्यमात जाणारी, १९९१ नंतरच्या काळात अक्कल फुटलेली, चाळ या प्रकाराशी लांबूनच संबंध आलेली आणि एकूणच निराळ्या जाणीवा असणारी आहे. व्यक्तिगत माझ्या बाबतीत, एकेकाळी पुलंचं लेखन आवडलं. आता माझ्या जाणीवा बदलल्या. ज्या काळात पुलंचं लेखन आवडत असे तेव्हाही दारिद्र्याने पिचलेल्या लोकांचं दुःख जरतारी भाषेत मांडलं की वाचायचा मला कंटाळा येत असे. आता चिमणराव वाचायला कितपत आवडेल माहीत नाही; पण चिं.विंचं 'लंकावैभव' नावाचं पुस्तक मी अजूनही हौसेने पुन्हा पुन्हा वाचते; ओसाडवाडीच्या गोष्टी आठवून आठवून हसायला येतं.
कदाचित असंही असेल की काही वर्षं पुलंची विनोदशैली वगळता इतर काही निराळा चांगला विनोद समोर आलाच नाही. आता अति तेथे माती झाल्ये. कदाचित त्या टिपिकल भटो वातावरणाचाच कंटाळा आला, जे मी माझ्यापुरतं कधीचंच दूर सारलंय; 'त्याची आठवणही नकोऽऽऽ' असं होतं.
प्रसिद्ध माणसांच्या कृतींची, कलेची, आणि आयुष्यांचीही चिकीत्सा होते. ती योग्य भाषेत असेल तर चिकीत्सा म्हणतात. बाकीच्या वाक्ताडनाला खिजगणतीतही धरायची गरज नाही.
चार शब्द
काही वैयक्तिक निरीक्षणं नोंदवतो:
१. तुमचा आवडता लेखक/कवी/संगीतकार/अभिनेता हा तुमच्या मते सर्वोत्कृष्ट ले/क/सं/अ असायलाच हवा असं नाही.
२. पुलं कोणत्या वयात वाचले, यावरही बरंच अवलंबून असावं. त्यांची कीर्ती ऐकून, मित्रांनी केलेली अफाट स्तुती ऐकून कुणी पुलंचं एक पुस्तक वाचलं आणि ते त्याला फारसं आवडलं नाही आणि परिणामी हा एकंदरीत हाईप केलेला मामला आहे, असं त्या व्यक्तीचं मत बनलं - अशीही उदाहरणं पाहिली आहेत. तर दुसरीकडे, पुलंच्या मर्यादा लक्षात येऊनही, प्राथमिक शाळेतल्या शिक्षिकांबद्दल आपुलकीमिश्रित आदर जसा बव्हंशी प्रौढ वयातही टिकून राहतो, तसा जिव्हाळाही अनेकांच्या बोलण्यात आढळत असतो. (पहा: पहिलं निरीक्षण)
३. आपल्या भाषेतलं एखादं प्रसिद्ध वाक्य, कवितेतली ओळ, ड्वायलाक हे संवादात काहीशी 'कल्चरल अफोरिझम'ची भूमिका बजावतात. पुलेतर आणि पुलोत्तर मराठीत याबाबत तसं दारिद्र्यच आहे हे कबूल, पण निदान 'वी विल ऑलवेज हॅव पुलं'१ म्हणायला काय हरकत आहे? :)
१. संदर्भ. सर्क्युलर रेफरन्स उद्मेखून.
आजकाल
आजकाल, नवीन पिढीचे विचार वेगळे आहेत. त्यामुळे, तुम्हाला तुमच्या काळात आवडलेले लेखक्, नट, गायक-गायिका इत्यादि... आत्ताच्या पिढीला आवडतीलच असे नाही. शिवाय सगळ्यांना सगळ्या विषयांत गति असतेच असे नाही. सबब, हळवेपणा सोडून द्यावा. मुंबईकरांचे वर्णन करताना पुलंनी जे म्हटले होते," की मुंबईला कुणी भिकार म्हटले तर अस्सल मुंबईकर, सात भिकार असं म्हणतात." आपणही तसंच धोरण ठेवावे. कारण कुणाच्या म्हणण्याने वा लिहिण्याने, एखादी व्यक्ति मोठी वा खुजी होत नाही. तिचे अॅबसोल्युट मूल्य, आहे तेवढेच रहाते.
गेल्या काही वर्षांत, लताबाईंना किंचाळणारी बाई, गावस्करला सुमार बॅटसमन, भीमसेनना, तारसप्तकांत गुळण्या करणारा गायक, असे शेरे कानांवर आले आहेत. पण आम्ही त्याने व्यथित होत नाही.
आयला तिरा, कालच तुम्हाला उषा
आयला तिरा, कालच तुम्हाला उषा खन्ना, महेंद्र कपुर ला नावे ठेवताना बघितले.
कोणाला भकास आणि कोणाला खलबत्ता पण म्हणालात.
पंकज भकास, मनहर भकास, अनुप खलबत्ता यांची कुठलीही गाणी.
उषा खन्ना आणि तत्सम दुसर्या दर्जाचे,यांना संगीतकार का म्हणावे, हा लहानपणापासून पडलेला प्रश्न.
महेंद्र कपूरच्या कुठल्याही गाण्यांत, त्याचा आवाज आपल्याला चिकटायला येतो आहे, असे वाटते.
कारण कुणाच्या म्हणण्याने वा
कारण कुणाच्या म्हणण्याने वा लिहिण्याने, एखादी व्यक्ति मोठी वा खुजी होत नाही. तिचे अॅबसोल्युट मूल्य, आहे तेवढेच रहाते.
बास बास.. या नंतर काही बोलायला उरतच नै!
पुलंच्या सगळ्या (प्रत्यक्ष/संभाव्य) मर्यादा/आक्षेप/तृटी वगैरे जमेस धरूनही त्यांचं लेखन मला आवडलं आहे!
पुलं इतके प्रचंड लोकप्रिय
पुलं इतके प्रचंड लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे ते फक्त लेखक नव्हते. अत्यंत कॅप्टिव्हेटींग पर्फॉर्मरदेखील होते. वर सुनील म्हणाल्याप्रमाणे त्यांच्या ऑडिओ कॅसेटी किंवा बटाट्याची चाळचा एकपात्री प्रयोग यांचा लोकप्रियतेमागे खूप मोठा हात आहे. ताकदीचे लेखन आणि एवढा पॉवर्बाज पर्फॉर्मन्स हे कॉम्बिनेशन खचितच कोणाच्या वाटेला येत असावं.

वर नाव नाही घेतले की लगेच आला
In reply to रुक्ष by adam
वर नाव नाही घेतले की लगेच आला व्रात्य प्रतिसाद.
तुझी व्यक्तीचित्र कीती खरीखुरी असतात मनोबा, त्यांना चांगलेच म्हणते ना मी.
पण असेलच एखादी गोष्ट सुमार तर त्याला का चांगले म्हणायचे कोणाला तरी बरे वाटावे म्हणुन.
बरं उल्काताईंना काही नावे ठेवली का मी? त्या कशाला स्वतावर ओढवुन घेतायत.
तू उद्या गाढवावर लेख लिहीलास आणि मी म्हणले की गाढवाचा आवाज काही चांगला नाहीये, तर तू वाईट वाटुन घेशील का?
़ॠ नेहमीप्रमाणे म्हणेल की हा प्रश्न औचित्याचा आहे, तसे म्हणले तर मी ह्या केस मधे एकवेळ मान्य करीन.