गेम ऑफ थ्रोन्स
२४ तारखेला गेम ऑफ थ्रोन्सचा सहावा सीझन सुरू होतोय. त्या निमित्ताने कालच आधीच्या पाच सिझन्सचे बिंज वॉचिंग करून संपवले. सलग पाच सिझन्स बघितल्यावर एक वेगळाच मूड निर्माण झालाय आणि सहाव्या सिझनची उत्सुकता आहे.
इथेही अनेक जण ही सिरीज फॉलो करतात असे समजते. त्यामुळे खफवर लिहिण्यापेक्षा त्यावर इथेच गप्पा हाणूयात म्हणून धागा काढलाय.
तुमची आवडती क्यारेक्टर्स, दर एपिसोडवरच्या गप्पा, आधीच्या सीझन्सवरील गप्पा, टिका, टिपण्या, पिंका, याचं चित्रीकरण, बिहाइंड स सीन्स गॉसिप, यातील तंत्रज्ञान, पुस्तक आणि सिरीजमधील केलेल्या फरकावर चर्चा, आगामी सीझनमध्ये काय होईल याचे अंदाज या व अश्या कशावरही इथे गप्पा मारू शकता.
====
डिस्क्लेमरः या पुढे पाचव्या सिझनच्या टर्निंग पॉइंटबद्दल बोलणार आहे. ज्यांना रसभंग नको असेल त्यांनी पुढे वाचू नये
गेल्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडनंतर जॉन स्नो खरंच मेलाय का? हा सध्याच्या चर्चेचा विषय आहे. अनेक ब्लॉगर्सने ट्रेलर्सचा अभ्यास करून जॉन स्नो जिवंत असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. काय ते कळेलच.
माझी यातील पहिल्या सीझनपासूनची आवडती पात्रे खलीसी, आर्या स्टार्क आणि टीरीयन लॅनिस्टर तिघेही जिवंत असल्याने माझा इंटरेस्ट अजून टिकून आहे :)
या सिरीजचे फॅनफिक मी अजून वाचलेले नाही. पण ते सिरीजपेक्षा भारी असेल असा अंदाज आहे. कोणी वाचलेय का?
भारतात ही सिरीज कुठल्या च्यानेलांवर दिसते का? ती ही अनसेन्सॉर्ड (कठिणच आहे ;) ).. बहुदा जालावरच पहावी लागेल.
या निमीत्त पुन्हा एकदा बिंडोक
या निमीत्त पुन्हा एकदा बिंडोक खलीसीला सिजन ६ भाग २ मधे नशीब पुन्हा एकदा कसे साथ देते ते बघावे म्हणतो. म्हणजे आता ती १००% कैदेत आहे, तिचे वस्त्रहरण नक्कि आहे. अन तेवड्यात एक नियम ऐनवेळी तिच्या मदतीला येतो तो म्हणजे खालच्या विडोंना स्पर्श केले जात नाही असा टोळ्यांचा नियम आहे म्हणे. हात तिच्या अंगावरु दुर होतो व तिला कोणीही स्पर्श करु नये असे फर्मान सुटते... बिंडोक खलीसी आज ऐसीवर असती तर नक्किच तिच्या विरोधी प्रतिसादाना खोडसाळ, निरर्थक श्रेणी द्यायचा अन खलीसीच्या बिंडोक प्रतिसादाना मार्मीक श्रेण्याच द्यायचा नियम वगैरे आपल्या समोर आला असता नाही ;)
Vampires diary, Teen Wolf,
Vampires diary, Teen Wolf, Flash वगैरेमधे गुंतायचे माझे वय नाही :( त्यामुळे माझा पास. विशेषतः ते फ्लॅश एव्हडं का पॉप्युलर आहे कळत नाही.. जरा काही अकल्पित समोर आलं की त्यांच एकच स्पश्टीकरन अस्तं त्यात देर व अ डार्क मॅटर दॅट क्रिएटेड धिस ऑल. बाकी प्रिजन ब्रेक पुन्हा सुरु होतयं असं कानावर आलं होतं, खरे खोटे माहीत नाही.
असो, कोण थ्रॉनवर असावे असे तुम्हाला वाटते आणी का ? (याचा कथेसोबत ताळमेळ असण्याशी संबंध नाही फक्त तुम्हाला कोण वैयक्तीक द्रुश्ट्या सुटेबल वाटतो इतकेच सांगा.)
मला वाटते टीरीअन चांगला राजा बनु शकतो. त्याने हँड ऑफ अ किंग म्हणून मस्त कामगीरी केली होती.
अजुन एक थिअरी अशी मांडली जात
अजुन एक थिअरी अशी मांडली जात आहे की
१) जॉन स्नो = हिम = व्हाईट वॉकर्स
२) खलीसी, टिरीअन = अग्नी = लॉर्ड ऑफ लाइट + इतर लॉर्ड्स + ड्रॅगन्स
३) हिम आणि अग्नी हे परस्पर विरुद्ध आहेत आणि यांच्यापैकी एखाद्या गोष्टीचा कहर झाल्यास दुसरी लगेच उभी ठाकते. त्यांच्यात तुंबळ फाईट होते आणि समतोल साधला जातो.
४) व्हाईट वॉकर्स हे सध्या बॅड गाइज जरी दाखवले जात असले तरी ती एक "विरुद्ध शक्ती" आहे. जीआरार म्हणतो त्याप्रमाणे व्हाईट वॉकर्स ही एका परीने उन्नत, अभिजात सभ्यता आहे.(जरी ती घातक प्रवृत्तीची असली तरी.)
५) जॉन स्नो म्हणून व्हाईट वॉकर्सच्या बाजूने जाईल. कदाचित तो प्रॉमिस्ड प्रिन्स असू शकेल जो वरील दोन्ही बाजूंचा मध्यस्थ म्हणून काम करेल.
सर्वांनी न भांडता खेळीमेळीने
सर्वांनी न भांडता खेळीमेळीने चर्चा करून धाग्याची शंभरीदेखील पार केल्याचं पाहून अंमळ मौज वाटली. :)
(बादवे, अजून अनालिसिस मध्ये इंटरेष्ट असल्यास "alt shift x" हा युट्युब चॅनल आहे. थोडा प्लेन आवाजात बोलतोय पण थिअरीज भन्नाट आहेत.)
जाताजाता, रामसे भाऊंना "मोस्ट हेटेड पर्सन ऑफ द इयर" नक्कीच मिळेल या वर्षी असं वाटतंय. हा आत्मा काय हा सिझन तरी लवकर मरत नसतोय बघा.. :)
सर्वांनी न भांडता खेळीमेळीने
सर्वांनी न भांडता खेळीमेळीने चर्चा करून धाग्याची शंभरीदेखील पार केल्याचं पाहून अंमळ मौज वाटली.
त्याचं असं आहे इथे धाग्यावर मुळात फक्त समजुतदार लोकांनाच तोंड उघडायची संधी आहे. कोणीही उचलला हात बडवला किबोर्ड तर ती व्यक्ती आहे त्यापेक्षा अजुन मुर्ख वाटु शकते. विषयच असा आहे की कोणालाच कोणता आव अथवा अजेंडा त्यात घुसडावा लागत नाही. परिणामी जे प्रतिसाद आले ते प्रांजळ व वस्तुनिश्ट असल्याने कोणालाच कसलीच ठसठस नाही.
जरा विस्कटुन सांगाल का ? आमी नवे का बरे ते ?
त्याचं असं आहे
ही सुरुवात आहे. आता माझा संपुर्ण प्रतिसाद सामजावुन घेउया.
इथे धाग्यावर मुळात फक्त समजुतदार लोकांनाच तोंड उघडायची संधी आहे.
गेम ऑफ थ्रोन्स, इट इज फन, येट इट इज काँप्लेक्स. कोणत्याही बिंडोक माणसाला माझे आव्हान आहे. त्याला सिरीअल दाखवेन आणी अतिशय सोपे प्रश्न विचारेन ( तुम्ही विचारा) तो समर्पक उत्तर देउ शकणार नाही. कारण गेम ऑफ थ्रोन्स समजणे बिंडोकांचे काम नाही. याचा अर्थ असा नाही की बिंडोक लोक गेम ऑफ थ्रोन्स बघत नाहीत ते बघतात कारण रिगार्डलेस ऑफ बिइंग बिंडोक देर इज अ कॉमन फँटसी लिवज अमाँग ऑल ( ऑर मोस्ट) ऑफ अस. अँड इट इज हाविंग अॅण अपोर्च्युनीटी टु सी एवरी हॉट पर्सन नेकेड ( ऑर डुइंग सेक्स) यु गॉट इंट्रोड्युस्ड. आयुष्यात आपण अशा किती लोकांना प्रत्यक्ष नग्न अथवा समागम करताना बघतो ज्यांच्याकडे आपण आकर्षीत होत असतो ? कधीच नाही इट ऑल इन द माइंड. असो वी गेट कॅरीड अवे इन द अॅनेलेसीस ऑफ फँटसी बिहेवीअर्स, लेट्स फोकस बॅक ऑन या धाग्यावर फक्त समजुतदार लोकांनाच तोंड उघडायची का संधी आहे ते.
कोणीही उचलला हात बडवला किबोर्ड तर ती व्यक्ती आहे त्यापेक्षा अजुन मुर्ख वाटु शकते.
आता स्टोरी न कळता विधाने केली तर हे होणारच ना ? पण तरीही ती व्यक्ती वाचकांना वाटते तेव्हडी मुर्ख असेलच असे नाही(वैयक्तीक मत), काही हुशारी त्या व्यक्तीत अजुनही शिल्लक असु शकते ( आयाम पोझिटीव पर्सन). देट्स वाय आय सेड शी मे अपिअर मोर फुलीश दॅन शी अॅक्चुअली इज.
विषयच असा आहे की कोणालाच कोणता आव अथवा अजेंडा त्यात घुसडावा लागत नाही.
इफ सान्सा इज स्टुपीड देन शि इज स्टुपीड, देर इज नो अदर वे यु कॅन मेक जिनीअस ऑटॉफ हर. त्यामुळे सर्वांची मते समान आपोआप ठरणे बांधील आहे, वादाला संधीच नाही. म्हणूनच यात कोणत्याही वैयक्तीक भावनेचे मिश्रण करुन वाढीव प्रतिसाद लिहता येणार नाही उदा. सकाळी आइने दोन रट्टे दिले असतील पोळी व्यवस्थीत भाजली नाही म्हणून तर त्याची ठसठस काढायला सिता पतीव्रता न्हवे तर एका व्हिक्टीम होती तिला अरण्यात स्वयंपाकाचे फार कश्ट पडत होते ज्यात तिच्या आत्मसंमानाची टोटल लागली आहे असा प्रतिसाद इतर कोणत्याही ध्याग्यावर कोणत्याही प्रतिसादाचा धागा पकडुन व प्रतिसाद दिलेल्या धाग्याच्या मुळ विषयाला बगल देउन बिंधास्त लिहता येइल, पण उगा कोनीतरी सकाळी डोके फिरवले आहे या कारणासाठी सर्सेइ फार इनोसंट आहे, एक स्त्रि म्हणून तिच्यावर जो अन्याय झाला त्यासाठी तिने वाकडे पाउल टाकले(यु नो व्हॉट शी डिड लास्ट समर) असा युक्तीवाद अथवा तिच्या त्या वागण्याचे समर्थन या धाग्यावर कोणीच करु शकणार नाही, टिकणार नाही. म्हणूनच वस्तुनिष्ठता हा या धाग्यावर चर्चेचा एकमेव उपाय आहे.
परिणामी जे प्रतिसाद आले ते प्रांजळ व वस्तुनिश्ट असल्याने कोणालाच कसलीच ठसठस नाही.
म्हणून जे प्रतिसाद आले ते प्रांजळ व वस्तुनिश्ट असल्याने कोणालाच कसलीच ठसठस नाही.
म्हणून बिंडोंक सदस्यांना या धाग्यावर राखावी लागलेली पुरेशी गैरहजेरीच या धाग्याचे खरे यश आहे, की कोणतेही वादविवाद घडले नाहीत. आणी असा विषय निवडल्याबद्दल धागाकर्त्याचे मी आधिच अभिनंदन केले आहेच आणि पुन्हा करतो. कारण तोच खरा या धाग्यातील यशाचा सुत्रधार आहे.
अहो निरर्थक श्रेणी मिळाली
अहो निरर्थक श्रेणी मिळाली तेव्हां माज्या लक्षात आले की श्रेणीबहाद्दरांना या विषयात आकलनक्षमता कदाचीत नसावी ( दे आर नॉट सुपर ह्युमन) परीणामी मला माझ्या मुळ प्रतिसादाचा विस्तार त्यांना समजेल असा करणे भाग होते. पण तुम्ही बुच लावले म्हणून मग तुमच्या प्रतिसादाचा संदर्भ देउन इथेच रिप्लाय दिला.
आता तुम्ही ऐसीवर नक्किच नवे नाही त्यामुळे बरेचदा निरर्थक श्रेणी मिळणे याचा अर्थ श्रेणीबहाद्दराला प्रतिसाद कळलेला नसतो हे काय मी स्पश्ट सांगायलाच हवे ? तरीही सांगतोच जरी ती गंमत संपत असली तरी.
अहो एक मिनिट, तुमचा प्रतिसाद
अहो एक मिनिट, तुमचा प्रतिसाद माझ्या प्रतिसादावर आहे आणि म्हणून रोख माझ्याकडे आहे असे गृहित धरुन प्रतिसाद देतोय. मी तुमच्या प्रतिसादाला "निरर्थक" श्रेणी दिलेली नाही. मला तो "निरर्थक" असे नाव असलेला श्रेणीप्रकारच आवडत नाही मुदलात (बरेचसे रोचक प्रतिसाद बाय डिफॉल्ट हाईड होतात राव उगी.).
बाकी लोकांना विंग्रजी वाक्ये देवनागरीत टंकली की लई गहन, विचारी वाटतं कै कोण जाणे. ;)
तुमच्या आधीच्या प्रतिसादाशी तितकासा असहमत नसल्याने कै बोललो नव्हतो पण तुमचा गैरसमज झाला असेल तर म्हणून सांगतोय.
बाकी आकलन क्षमता, बिंडोक लोक इ.इ. किती किती ते. असं वाटतंय काही लोकं स्वतःला इतरांनी बिंडोक म्हणू नये म्हणून अथवा राजरोसपणे "पोर्न" पाहता यावे म्हणूनच ह्या मालिका बघत असावेत की काय ते.
असो. धाग्यावर उगी विषयांतर नकोय. प्रतिसादात मजा अपेक्षित होती, जितकी उरली असेल तितकी राहू द्यावी.. :)
जास्त काही घडत नाही पण
जास्त काही घडत नाही पण पुढच्या घटनांसाठीची वातावरण निर्मिती जास्त वाटली या भागात. म्हंजे जॉनराव नाईट वॉच सोडतेत आणि रामसेभाव उत्तरेकडे युद्धासाठी यायचं ठरवतेत. म्हंजे तिथे काय होणारय याचा एक अंदाज येतोय. तिकडे सर्सीचा पत्ता काटू पाहणार्या आजीबाई मार्जरीला सर्सीसारखे चालवणार म्हटल्यावर बिथरतेय म्हटल्यावर सर्सीच्या चालीचा अंदाज येतोय. तेव्हाच या सगळ्यांच्यामध्ये हलक्या कानाच्या राजाचं प्यादं होणार हेपण दिसतंय.
ती ड्रॅगन्सची मम्मी तेवढी खूपच वैताग आणते आता. एखाद्याला "मी राणी आहे", "मी राजा आहे" किंवा "मी अमका/अमकी आहे" असं सारखं ओरडून सांगावं लागत असेल तर असं वाटतं कुछ गडबड है. ती ना नीट राज्य करु शकलीय, ना नीट लोक सांभाळू शकलीय, ना तिचे ड्रॅगन सांभाळू शकलीय. आता पण तिच्या मागावर असलेले तिचे दोन आशिक येणार आणि तिला सोडवायचा प्रयत्न करणार आणि सगळ्यांना "मै यांव हूं, मै त्यांव हूं, मुझे छोड दो (नै तो अंजाम लै बुरा होगा)" हेच म्हणत बसणार असे दिसतेय. बघूया.
स्टोरीलाईन पाहिली तर बर्याच ठिकाणी विनाकारण लॉजिकचा लोचा आहे असं वाटत राहतं, पण असो. :)
समदं
(स्पॉयलर्स)
तिसरा भाग जरी रटाळ आणि तोंडबडव्या असला तरी अतिशय म्हत्त्वाचा आहे. कसं?
कदाचित ही फॅन थियरी सांगू शकेल.
ही थियरी अतिशय वाईल्ड आहे पण माझ्या दृष्टीने प्रचंड इंट्रेस्टिंग आहे. ब्रॅन हा सगळ्याचा कर्ता करविता असावा असं हिचं मत आहे.
"एव्हरीथिंग": या तीनाक्ष कावळ्याच्या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आलेले आहे.
या भागात ब्रॅनला जाणवतं की तो लोकांना भूतकाळात जाऊन खुणावू शकतो. नेडला झालेला भास हा “R + L = J” पे़क्षाही महत्त्वाचा आहे. ब्रॅनच मॅड किंगच्या कानात गुणगुणतो आणि कदाचित त्यामुळंच मॅड किंग मॅड होतो. ब्रॅनची ही पॉवर सगळ्या महत्त्वाच्या क्षणी साक्षीदार आहे. कालप्रवास तर आलेला आहे आणि त्यामुळे त्याचे इतर परिणाम येतीलच!
आता यावर लोकांनी भर्पूर डोकं खर्च केलं आहे. आणि मला आवडलेले या पुढचं एक्स्टेंशन म्हणजे तीनाक्ष कावळा हाच म्हातारा ब्रॅन आहे.
१) इथे कालप्रवासाचा पॅराडॉक्स येऊ शकतो. पण लूप (आणि त्यात लूप) हा पॅराडॉक्स सोडवू शकतो.
२) मार्टिन हा हाडाचा सायन्स फिक्षन चाहता आणि लेखक आहे.
३) तीनाक्ष कावळा ओरडून सांगतो की भूतकाळ खोडता येत नाही. आणि ब्रॅन काहीही मंदपणे करण्या आधी त्याने त्याचं ट्रेनिंग पूर्ण करावं. कारण कदाचित त्याला त्यानेच केलेल्या चुका पुन्हा सुधाराव्या असं वाटत असावं.
मार्टिन सायबांनी काय लिवलंय
मार्टिन सायबांनी काय लिवलंय ते या सीझनपासून गुलदस्त्यात आहे.
यंदा पहिल्यांदाच वाचक आणि निव्वळ प्रेक्षक एकाच माहितीच्या लेव्हलवर आहेत (एरवी वाचकांना न वाचक-प्रेक्षकांपेक्षा अधिक माहिती असायची)
तो जिवंत होईल यात अनपेक्षित नव्हतं पण पब्लिक डिमांडपायी इतक्या लवकर ते झालंय. माझा अंदाज ९ व्या एपिसोडमध्ये ते होईलसा होता.
मिहिर परत (न?) आला...
एस. एन. एल. श्टायल..
पाहिला, पण तो खाल की खाल
पाहिला, पण तो खाल की खाल जलाने का प्रसंग कायतरच घेतलेला आहे. इतके डॉन खाल वगैरे लोक धड दरवाजाही उघडू शकत नैत म्हंजे काय? शिवाय तिला ते तेलाचे दिवे खाली टाकण्यापासून रोखताही येत नै म्हणजे जरा अतीच झाले. तिचा फॉर्म्युला ठरलेला आहे. लै अंगावर आले की सगळे जाळून मुजरे घ्यायचे. =))
त्या अनुषंगाने चर्चा झालेली मित्रासोबत, हल्क जर तिथे आला तर काय ड्वायलॉक्स होतील?
डेनेरिसः आयॅम डेनेरिस स्टॉर्मबॉर्न, अनबर्न्ट, मदर ऑफ ड्रॅगन्स, ब्ला ब्ला ब्ला...
हल्कः बट नॉट अनस्मॅश्ड *हल्क स्मॅशेस डेनेरिस*
आणि सोबतच ड्रॅगनचीही मुंडी मुरगाळून टाकतो. विषय कट. =))
अजूनेक जोक पाहिला तो म्हणजे शेवटी आयर्न मॅनच आयर्न थ्रोनवर बसेल- आफ्टरॉल- ही इज़ ऑल्सो अ स्टार्क. =))
खाल इतके मंद असतील असं वाटलं
खाल इतके मंद असतील असं वाटलं नव्हतं! असो.
कसला बंडल सिन घेतलाय तो. आणी बाकीच्या स्त्रिया( अन पुरुषही) तिच्यासमोर हजारोंच्या संखेने असुनही झुकतात ? मला तर प्रसंगच कळला नाही. चायला हे असलं काही बघण्यापेक्षा खलिसीला क्विन घोषित करा अन सिरीअल संपवा एकदाची. असो, ह्या सिजनमधे सांन्सा अन खलीसी डेथलिस्टवर आहेत, बघुया काय होतं ते.
साँसाच्या पत्रिकेत विचित्र योग आहेत
शानिने बुधाला ग्रासले असल्याने तिचा वरचा मजला खालिसीपेक्षा रिकामा होता, आता बुध शानिच्या कचाट्यातुन बाहेर येत असून सप्तमात राहु सोबत विचित्र युती करत आहे ज्याचे परिणामस्वरुप म्हणून तिला अन्पेक्षित लिटल फिंगर ची साथ मिळाली परंतु अजुन बुध संपूर्ण बाहेर पडायचा असल्याने पुन्हा काही काळ तिच्या भाळी दुर्दव व प्रतिकूल परिस्थिति आली, ही युती मिश्र व अकल्पित फ़ळे देते म्हणजे ती थ्रोनवर बसेल अथवा चालु सीजन एंडला गचकेल.
पाचवा एपिसोड बराच "जीओटी"
पाचवा एपिसोड बराच "जीओटी" होता. तिसर्या चवथ्यासारखी मराठी शिर्यल नै केलेली :प
आता ग्रेजॉय भाऊ बहिणी आधी खलिसीला गाठतात का पहायचं
पण या एपिसोडमध्ये नग्नतेच्या नावाखाली भ्स्सकन इतक्या क्लोजापमध्ये लिंगच डोळ्यात घातल्यावर किळसलो. बहुदा जीओटीत पहिल्यांदाच लिंगदर्शन घडले असावे
जीओटीत पहिल्यांदाच लिंगदर्शन
जीओटीत पहिल्यांदाच लिंगदर्शन घडले असावे
पहिल्या सीझन मधे पाहील्याचे आठवते, पण ते कोणा दुय्यम सैनिक्/नोकराचे होते. नंतरचे सिझन पटापटा संपवल्यामुळे आठवत नाही. ३ सिझन नंतर तर बघणेच बंद केले आहे.
आता इतकी जुनी गोष्ट मला का आठवते आहे वगैरे खवचट/खोडसाळ विचार मनात येऊ देऊ नका.
अगदी खरं आहे.
मुळात जादू प्रमाणाबाहेर घुसडून कथानकाची वाट लावताहेत.
म्हणजे स्नो जीवंत होणे, टाईम ट्रेवलिंग, व्हाईट वाकर्स, ड्रेग्नची माय, ब्रान स्टार्क, हाउस ऑफ़ ब्लैक & व्हाईट यात इतकं सारं जादू जादू बनत चालले की गेम ऑफ़ थ्रोन्स हे नाव इरेलेवंट ठरेल असे वाटत आहे. बट एज लोंग एज इट हाज हाय प्रोडक्शन वेल्यु अन सुपरकुल न्यूडिटी मी त्याचे पुढील पंचवीस सीजन फारवर्ड करत बघायला तयार आहे हम और कर भी क्या सकते है
हे शक्य आहे कारण ड्रॅगन्स
In reply to अजून एक म्हणजे Tyrion by सखी
हे शक्य आहे कारण ड्रॅगन्स त्याला काही करत नाहीत :) ;)