Skip to main content

दादा कोंडके यांचे चित्रपट

मराठी चित्रसॄष्टीला सुवर्णकाळ दाखवणारे मराठी शोमॅन दादा कोंडके व त्यांचे अस्सल मराठी मातीशी इमान राखणारे गावरान भाषेतील इरसाल विनोदी चित्रपट हा एक अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या चित्रपटांइतकीच किंबहुना त्याहूनही सरस असणारी त्यातील गीते आज ५० वर्षानंतर देखील तितकीच श्रवणीय आहेत . अनेक रजत्/सुवर्णमहोत्सवी चित्रपट या गुणी कलवंताने दिले.

परन्तु त्यानी बनवलेले चित्रपट डीव्हीडी /डाउनलोड या माध्यमातून उपलब्ध नाहीत ,त्याचप्रमाणे मराठी टीव्ही चॅनेल वर देखील दाखवले जात नाहीत . यामागचे कारण नक्की काय आहे? कॉपीराइट संबन्धी किंवा त्यांच्या वारसाहक्कावरून काही वाद असल्याचे मागे ऐकिवात होते . परन्तु अशा कारणासाठी उत्तमोत्तम व सुपरहिट मराठी चित्रपटांचा खजिन्यापासून जनसामान्य प्रेक्षक वन्चित राहणे योग्य वाटत नाही .

यासंबंधी कोणास माहिती आहे का? व ते चित्रपट डीव्हीडी च्या माध्यमातून किंवा चॅनेलवर लावण्यासन्दर्भात काय करता येइल?

चिंतातुर जंतू Tue, 28/06/2016 - 13:16

In reply to by नितिन थत्ते

>> बेसिकली दादा कोंडके हे मेनस्ट्रीम मराठी 'संस्कृती'च्या नियंत्रकांच्या अभिजात कल्पनेत बसत नाहीत.

कोण बुवा हे मेनस्ट्रीम मराठी संस्कृतीचे नियंत्रक लोक? 'आवाज वाढव डीजे तुझ्या आयची...' वाले तर नाही? की 'तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे' म्हणणारे? अजून साजुक तुपातच राहिलेली आणि म्हावऱ्याचा नाद न लागलेली ही पोली आहे तरी कुणाची?

उपसंहार : प्रश्नाला उत्तर न देता 'निरर्थक' देऊन पळून जाणाऱ्याचे आभार. कारण त्यामुळे प्रश्नाविषयी स्पष्टीकरण देणं मला भाग पडलं आहे. माझ्या लहानपणी दादा कोंडकेंच्या कलेला नाकं मुरडणारे संस्कृतिनियंत्रक प्रामुख्यानं ब्राह्मण असत. इतरांना त्यांत काही अडचण नसे. मात्र, संस्कृतिनियंत्रकांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे-३०मधल्याच (पण नव्या पेठेतल्या!) अलका चित्रपटगृहात दादा कोंडकेंचे सर्व चित्रपट किमान सिल्व्हर ज्युबिली ठोकून जात. बाकी महाराष्ट्रभर तर ते धो धो चालतच असत. आता तर आपण ज्या काळात राहतो तो काळ ब्राह्मणांचीच माधुरी दीक्षित 'धक धक गर्ल' बनून गेली आणि गोविंदा-करिश्मा-कादरखान-शक्तीकपूर 'सरकायले खटिया' करून गेले त्याहीनंतरचा आहे. आताच्या काळात बालगंधर्व रंगमंदिरात सतत तमाशाचे कार्यक्रम असतात. 'टाइमपास', 'दुनियादारी'सारखे सिनेमे शासकीय आणि इतरही अनेक पारितोषिकं मिळवून जातात. आताच्या काळात 'पॉर्न विशेषांक'ही निघतो आणि कुणी फार स्कॅन्डलाइझही होत नाही :-) मग आताच्या ह्या काळात तसल्या दूध-भात-भेंडीचीभाजी छाप संस्कृतिनियंत्रकांच्या हातात फार काही राहिलेलं मला तरी दिसत नाही. निहलानी एकांड्या शिलेदारासारखे चित्रपट कापत राहतात पण त्यांच्याही हाती फार यश पडत नाहीच. त्यामुळे वर उद्धृत केलेल्या विधानाचा अर्थ ह्या अज्ञ जंतूला समजलेला नाही. ज्यांना तो समजला आहे, ज्यांना तो मार्मिक वाटतो आणि ज्यांना माझा प्रतिसाद निरर्थक वाटतो त्यांनी माझी ज्ञानवृद्धी करावी ही बालके जंतूची उदाहरणार्थ नम्र वगैरे विनंती.

नितिन थत्ते Tue, 28/06/2016 - 13:46

In reply to by चिंतातुर जंतू

(जुनाच पॉइंट) म्हणजे चल गवतात शिरून गंमत करू हे व्हल्गर आणि मालवून टाक दीप चेतवून अंग अंग हे अभिजात मानणारे

चिंतातुर जंतू Tue, 28/06/2016 - 14:33

In reply to by नितिन थत्ते

>> चल गवतात शिरून गंमत करू हे व्हल्गर आणि मालवून टाक दीप चेतवून अंग अंग हे अभिजात मानणारे

माझा प्रश्न हा आहे : अशा माणसांच्या हातात आता नक्की आहे तरी काय, की ज्यामुळे असल्या कोणत्याही (उदा. दादा कोंडकेंचे चित्रपट पाहायला न मिळणं) गोष्टीसाठी त्यांना जबाबदार धरता यावं? आताच्या जगात असं नियंत्रण त्यांच्याकडे राहिलेलंच नाही असा माझा उलट दावा आहे.

पक्षी, ब्राह्मणांची बदनामी थांबवा ;-)

नितिन थत्ते Tue, 28/06/2016 - 17:22

In reply to by चिंतातुर जंतू

नियंत्रण दादा कोंडकेंचे चित्रपट पहायला मिळतात/मिळू नयेत अशा स्वरूपाचं नियंत्रण नसतं. पण (सात-आठ चित्रपट ओळीने सिल्व्हर जुबिली झालेला) दादा कोंडके नामक इसम या फिल्म इंडस्ट्रीत होऊन गेला त्या माणसात चर्चा करण्यासारखं काहीच नाही इतपत वाळीत टाकणे हे चर्चा चालवणार्‍या वर्गात दिसून येते.

[अशीच उपेक्षा हिंदी चित्रपटसृष्टीबाबत 'राजश्री प्रॉडक्शन' - प्री मैने प्यार किया - दिसून येते]

चिंतातुर जंतू Tue, 28/06/2016 - 17:43

In reply to by नितिन थत्ते

मूळ प्रश्न हा होता :

>> त्यानी बनवलेले चित्रपट डीव्हीडी /डाउनलोड या माध्यमातून उपलब्ध नाहीत ,त्याचप्रमाणे मराठी टीव्ही चॅनेल वर देखील दाखवले जात नाहीत . यामागचे कारण नक्की काय आहे?

आणि ह्या संदर्भात हे विधान कळत नाही :

>> दादा कोंडके नामक इसम या फिल्म इंडस्ट्रीत होऊन गेला त्या माणसात चर्चा करण्यासारखं काहीच नाही इतपत वाळीत टाकणे हे चर्चा चालवणार्‍या वर्गात दिसून येते.

थोडक्यात, जो वर्ग अशा प्रकारे दादा कोंडकेंना वाळीत टाकत होता / आहे त्या वर्गाच्या हातात आता फार काही नाही. कोणते सिनेमे डीव्हीडीवर, टीव्हीवर वगैरे उपलब्ध व्हावेत हे तर अजिबातच नाही. (हे तुम्ही म्हटलंच आहे) इतकंच नव्हे, तर विद्यापीठीय पातळीवर संशोधन करणारा वर्गसुद्धा आता विविध वर्णां-वर्गांतून येतो. त्यामुळे तिथेही संशोधनाचा विषय निवडताना दादा कोंडके (ज्याला हवेत त्याला) निवडता यावेत. आणि लोकप्रियतेबद्दल तर विचारायचंच नाही. त्यामुळे साडेतीन टक्क्यांहूनही कमी संख्येच्या आणि सत्तादेखील हाती नसलेल्या एखाद्या अल्पशा गटाला दादा कोंडकेंना अशी (वाळीत टाकण्याची) गरज भासत असली तर तो त्यांचा व्यक्तिगत किंवा गटगत (पन नॉट इंटेंडेड) प्रश्न राहतो. त्यानं कुणाचं काहीही बिघडू नये असं मी म्हणतोय.

नितिन थत्ते Tue, 28/06/2016 - 18:54

In reply to by चिंतातुर जंतू

इथे ब्राह्मणांविषयी कोण बोलतंय ?

संस्कृती नियंत्रकांत सीकेपी, कुडाळदेशकर, सारस्वत, परभू येत नाहीत की काय?

चिंतातुर जंतू Tue, 28/06/2016 - 18:59

In reply to by नितिन थत्ते

>> संस्कृती नियंत्रकांत सीकेपी, कुडाळदेशकर, सारस्वत, परभू येत नाहीत की काय?

हा हा हा. अहो त्यांचा पगार किती? ते बोलणार किती? आणि त्यांचं कुणी ऐकतं? शिवाय, बाकी सगळे ब्राह्मणेतर तर त्यांना बामनच समजतात. थोडक्यात, सॅम्पल साइझ, न्युइसन्स व्हॅल्यू वगैरे पाहता त्यांना वेगळं कोण मोजत बसणार? आणि का?

बाकी, माझ्या प्रतिसादात ब्राह्मणांचा उल्लेख ज्यात आहे त्या वाक्याकडे पुन्हा एकदा निर्देश करतो :

>> माझ्या लहानपणी दादा कोंडकेंच्या कलेला नाकं मुरडणारे संस्कृतिनियंत्रक प्रामुख्यानं ब्राह्मण असत.

नितिन थत्ते Tue, 28/06/2016 - 19:23

In reply to by .शुचि.

हे ठाकर्‍यांच्या जातीपेक्षा त्या (आणि आजच्याही) काळातल्या अभिजनवर्गातील संस्कृतीविषयक कल्पनांचा परिपाक होता. ठाकरे सीकेपी होते म्हणून त्यांनी विरोध केला असे नाही.

चिंतातुर जंतू Tue, 28/06/2016 - 19:22

In reply to by नितिन थत्ते

>> व्ह्यालेंटाइन डे ला (आणि अर्थातच सखाराम बाइंडर वगैरेला) विरोध करून खळ्ळ खट्याक करणारे ...

>> अभिजनवर्गातील संस्कृतीविषयक कल्पनांचा परिपाक

आं? गल्ली चांगलीच चुकत्ये का? शिवसेनाच नाही, तर हिंदुहृदयसम्राट ठाकरेंचे गुरू असलेल्या (ब्राह्मण) अत्रे आणि प्रभृतींची कमरेखालच्या विनोदांची आवड अगदी उघड होती. इतकंच नव्हे, त्यांच्या लोकप्रियतेमागचा तो एक मोठा घटकच होता. अभिजनवर्गात हे कधीच मोडत नव्हते. त्यांचा मास बेस दादर-लालबाग-परळचा कामगारवर्ग होता. त्या वर्गात दादा कोंडके चांगलेच लोकप्रिय होते. मग त्यांच्या संस्कृतिनियंत्रणात दादा कोंडके कशापायी अडकतील? जर अडकले असतील तर अज्ञ जंतूच्या ज्ञानात भर घालावी ही पुनश्च नम्र विनंती.

नितिन थत्ते Tue, 28/06/2016 - 19:26

In reply to by चिंतातुर जंतू

हा हा हा. तसे बाइंडरच्यावेळी खळ्ळखट्याक करायला ठाकरे गेले नव्हते. प्रिं. मनोहर जोशी गेले होते.

तिरशिंगराव Sun, 26/06/2016 - 19:49

त्यांनी सगळेच सुपरहिट चित्रपट काढले पण त्यांच्या 'विच्छा' ची सर कशालाच नाही.

अतिशहाणा Mon, 27/06/2016 - 21:00

In reply to by तिरशिंगराव

विच्छा छान होतं. वसंत सबनीस, दादा कोंडके आणि राम नगरकर यांची अगदी जमून आलेली टीम. तितक्या चांगल्या दर्जाचा विनोद दादांना परत जमला नाही असं वाटतं. पण तरीही त्यांचे चित्रपट प्रचंड मनोरंजक होते. त्यांच्या उत्तरकाळात आलेल्या चित्रपटांतील विनोद फारच फालतू होते. पण आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, बोट लावीन तिथं गुदगुल्या हे चित्रपट अजूनही पाहायला आवडतील.

दादांच्या चित्रपटांतील गाणीही छान असत.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 28/06/2016 - 20:04

एक अंदाज - एकेकाळी ब्राह्मणांनी दादांच्या चित्रपटांना नावं ठेवली, ते चित्रपट अभिरुचीसंपन्न असल्याचं मानलं नाही. आज ब्राह्मणांच्या हातात सत्ता, स्थान नाही हे उघड आहे. पण ते एकेकाळचे का होईना, अभिजन असल्यामुळे त्यांची री ओढणं हे अभिजन असण्याचं लक्षण समजलं जात असेल. दुसरं, दादा कोंडकेंचे बहुतेकसे विनोद आता बाळबोध वाटतात. जिथे 'सरकाईल्यो खटिया'सुद्धा जुनाट वाटतात आणि 'पॉर्न ओके प्लीज' असं गिरीश बापट किंवा ऐसीच्या अंकांबद्दल म्हटलं जातं तिथे दादांचे सिनेमे आणि त्यातला चावटपणा बालिश वाटू शकतो. त्यात आजच्या तंत्रातून आलेला चकचकीतपणा नाही, स्त्री-पुरुषांनी केलेलं अंगप्रदर्शन नाही, मेट्रिक्स-छाप मारामाऱ्या आणि/किंवा नृत्यही नाहीत, तिथे जुन्या काळच्या खरबरीत पोताला विचारणार कोण?

आजचे अभिजन भले म्हणत असतील की खरबरीत पोत असला की त्यात काही भारदस्तपणा आवडतो. मग त्या हिशोबात दादांचे चित्रपटही भारदस्त ठरतात. आजचे अभिजन किंवा सेन्सॉरबोर्डवाले तो भारदस्तपणा नाकारतात.

फारएण्ड Tue, 28/06/2016 - 20:58

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

दादांच्या सुरूवातीच्या काळातील त्यांचा 'आवाज' म्हणजे जयवंत कुलकर्णी. सुरूवातीची हिट्ट गाणी - एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा चे संगीतकार प्रभाकर जोग. सुरूवातीचे त्यांचे 'विच्छा' चे साथीदार, व या काही चित्रपटांचे लेखक वसंत सबनीस. त्यांना चित्रपटात पहिला चान्स देणारे भालजी पेंढारकर. या सुरूवातीच्या चित्रपटांबद्दल लहानपणी अनेक लोकांकडून चांगले ऐकले होते.

मात्र नंतरचे चित्रपट भंकस होते. त्यामुळे नावं ठेवली गेली ती मुख्यतः त्या चित्रपटांना. बोट लावीन तिथं गुदगुल्या, आली अंगावर वगैरे.

दुसरे म्हणजे दादांचे चित्रपट ज्या ७० च्या दशकातील आहेत त्या काळातील इतर चित्रपटांच्या डीव्हीडीज फारशा उपलब्ध नाहीत. मला व्हीसीडीज मिळत तेव्हा सामना वगैरे बरोबर आंधळा मारतो डोळा ची ही मिळाली होती.

त्यामुळे यात ब्राहमणांचा काही स्पेशल आकस/उद्योग आहे असे नसेल.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 28/06/2016 - 21:49

In reply to by फारएण्ड

'ब्राह्मणांचा आकस/उद्योग' म्हणजे आजच्या काळातली परशुराम ब्रिगेड नव्हे. सोज्वळ, सुशिक्षित घरांतले ब्राह्मण स्त्री-पुरुष चारचौघांत दादांच्या चित्रपटांबद्दल बरं बोलत नसत. अमिताभच्या जंजीर, दीवार वगैरे चित्रपटांबद्दल माझे वडील बरं बोलत नसत तरीही ते चित्रपट मी टीव्हीवर बघण्याबद्दल फार आक्षेप नसे. दादांचे चित्रपट घरच्या सेन्सॉरमधून सुटले असते का, ह्याबद्दल मला शंका आहे.

लोळगे सायकल कंपनी Wed, 29/06/2016 - 09:27

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

खालील वाक्यात जनरलायझेशन झालं आहे -
"सुशिक्षित घरांतले ब्राह्मण स्त्री-पुरुष चारचौघांत दादांच्या चित्रपटांबद्दल बरं बोलत नसत."
सोंगाड्या, एकटा जीव, पांडू हवालदार, गंगाराम या सर्व चित्रपटांबद्दल आमच्या आसपासच्या ब्राह्मण कुटुंबात चांगलेच बोलले जायचे. बॉलिवूड्शी टक्कर घेवून सोंगाड्या रिलीज केल्याने दादांबाबत स्पेशल आदरही दिसायचा.
सह्याद्रीवर (तेव्हा नाव सह्याद्री नव्हते) शनिवारी दुपारी चार वाजता मराठी सिनेमे दाखवायचे त्या काळात, दादांचे चित्रपट लागत (ते हयात असताना). एकदा मराठी "क्लासिक" चित्रपट अशी सिरीज त्यांनी चालवली होती त्यात शेजारी, साधी माणसं, यासोबत सोंगाड्याही दाखवला होता.

दादा गेल्यावर, ट्र्स्ट आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यात झालेला वाद सर्वशृत आहे - त्यांच्या चित्रपटांच्या कॉपीराईटचे काहीतरी लफडे असेलच (त्यांची चरित्रेही दोन आहेत त्यातील एकाच्या वितरणावर ट्र्स्टने कोर्टातर्फे बंदी आणल्याचे स्मरते - बहुधा पाध्येंनी लिहीलेल्या). लेटेस्ट असे ऐकले होते की, उषा चव्हाणांच्या मते, दादांवर चित्रपट निघणार असेल तर तो परांजपेंनी लिहीलेल्या पुस्तकावरच बेतावा.

फारएंड व चिंजंशी सहमत आहे. (अभिजनांच्या इच्छा च्यानेलवाले लक्षात घेते तर आजकाल अभिजन अशक्यच सुधारलेत - नागिन, सिआय्डी, सूर्यवंशंम, दक्षिणी मारामारी सिनेमे संततधार सुरु असते)

अनुप ढेरे Wed, 29/06/2016 - 09:57

In reply to by लोळगे सायकल कंपनी

हेच बोल्तो.

सोंगाड्या, एकटा जीव, पांडू हवालदार,

हेच बोल्तो. मी देखील खूप कौतुक ऐकलं आहे लहानपणापासून आजूबाजूच्या लोकांकडून या सिनेमांबद्दल. तक्रारी नंतरच्या सिनेमांबद्द्ल ऐकल्या आहे, मुका घ्या मुका, बोट लावीन, अंधेरी रात मे दिया तेरे हात मे... वगैरे

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 29/06/2016 - 19:49

In reply to by अनुप ढेरे

माझं बालपण ठाण्यातल्या, मध्यमवर्गीय, पांढरपेशा, संघिष्ठ वातावरणात गेलं. मराठी ब्राह्मण एकजात असे सोवळ्यातले असत/असतील हे सरसकटीकरण झालं, हे मान्य.

अबापट Mon, 04/07/2016 - 15:52

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

दादा कोंडके ब्राह्मण वर्गात unpopular होतें का खरंच ? मी पुण्यात पेठेत आजूबाजूला संघी वातावरणात वाढलो . मी लहानपणी एकटा जीव सदाशिव आई वडील तसेच कोकणातून आलेल्या वयानी ६०+ असलेल्या दोन नातेवाईकांच्या बरोबर मंडई जवळच्या मिनर्व्हा थेटरात बघितला . हा असा अँगल कधी चर्चेत पण आल्याचे आठवत नाही. इन फॅक्ट , विच्छा वर तसेच राम नगरकरांवर आणि निळू भाऊंवर तर ही सगळी प्रौढ मंडळी भयंकर खुश होती

अनु राव Tue, 05/07/2016 - 12:29

In reply to by अबापट

दोन कोंडके असावेत. पहिले २-३ सिनेमा एकानी तयार केले आणि मग कोणीतरी त्यांच्या परकायाप्रवेश केला असावा.
कदाचित असेही असेल, पहिल्या २-३ सिनेमाच्या यशामुळे त्याचा मुळ स्वभाव/अभिरुची उफळुन आला/ली ( यशस्वी शिक्का लागायच्या आधी कदाचित ते जरा पेंढारकर वगैरेंना बिचकुन असावेत. )

-----------
वैयक्तीक रित्या, मला त्यांनी साकारलेला नायक (?) किळसवाणा वाटतो ( फक्त अ‍ॅपिअरंस आणि बोलण्या वरुन च ) आणि तश्या सारखा कोणी २ % जरी माणुस असेल तर मी त्याचा तिरस्कार करीन. बाकी बिभत्सता वगैरे खूप नंतरच्या गोष्टी आहेत.

-------------

अजुन एक, दादा कोंडके आवडणारी माझ्या घेट्टोतली बाई मी बघितली नाही ( तसा कोणी पुरुषही नाहीये, पण असु शकतात), पण माझा घेट्टो छोटा आहे.

.शुचि. Tue, 05/07/2016 - 16:41

In reply to by अनु राव

वैयक्तीक रित्या, मला त्यांनी साकारलेला नायक (?) किळसवाणा वाटतो ( फक्त अ‍ॅपिअरंस आणि बोलण्या वरुन च ) आणि तश्या सारखा कोणी २ % जरी माणुस असेल तर मी त्याचा तिरस्कार करीन. बाकी बिभत्सता वगैरे खूप नंतरच्या गोष्टी आहेत.

+१ किळसवाणाच.

.शुचि. Wed, 29/06/2016 - 00:14

कोंडकेंचा एकही सिनेमा मी तरी पाहीला नाहीये. आईबाबा शोले, नवरंग, झनक झनक पायल बाजे, नगीना व पेइंग गेस्ट ला घेऊन गेलयाचे स्मरणात आहे. बाकी कोंडक्यांच्या सिनेमाला कोणीहीच कधी गेल्याचे स्मरत नाही.

तिरशिंगराव Wed, 29/06/2016 - 17:32

तू नळीवर सोंगाड्या, पांडु हवालदार तर दिसत आहेत.