Skip to main content

निबंध : माझा प्रियकर

मला निबंध लिहता येत नाहीय. गद्यपण जास्त लिहता येत नाहीय. मी कविता करते आणीक कविता वाचते. मला कविता खुप खुप आवडतात अणीक मला बक्षीस मिळणार आहे. आमच्या गल्लीत दरवर्षी गणेशोत्सवात आणि निरनिराळ्या जयंत्यांच्यावेळी त्या त्या जातीधर्मातल्या कविता करणार्‍यांना बक्षिसे देतात. माझा प्रियकर पण कविता करतो आणिक त्याचा संग्रह पण आहेय. ऐंशी रुपायला आहे आणि दुसरा दोनशे रुपायाला आहे. दोन्ही एकत्र घेतले तर तीस रुपये सुट मिळुन दोनशे पन्नास रुपयाला मिळते. एकुण एक हजार प्रति छापल्या आणीक अडीचशे गेल्या असे माझा प्रियकर सांगतो. ह्या सर्व अडीचशे लोकांना तो ओळखतो असाच त्याचा अर्थ घ्यावा लागेल. त्याला फेसबुकवर पाच हजार फ्रेंडस आणि दहा हजार पाचशे तेरा फॉलोअर्स आहेत. ह्यांमध्ये निदान दोन हजार लोक तरी कविता करणारे असावेत. माझ्या प्रियकराच्या कविता सगळेच वाचतात पण ह्या लोकांच्या कविता कोण वाचीत असेल? माझा प्रियकर हा इतका प्रसिद्ध असल्याने त्याच्या स्टेट्सवर खुप मोठ मोठे कवी कमेंट करीत असतात. कमेंट करणार्‍यां पुरुषांबद्दल आम्ही सर्व स्त्रीया नेहमीच बोलत असतो. आपल्या प्रियकराविषयी स्त्रीया काय बोलतात ह्यापेक्षा किती स्त्रीया बोलतात आणि कोणती स्त्री नेमके काय बोलते ह्यावरुन प्रियकराची किंमत ठरत असावी. म्हणजे ती शलाका आणि केशर माझ्या प्रियकराबद्दल कधीच चांगले बोलत नाहीत आणि हे मला प्रचंड आवडते कारण शलाका आणि केशर ह्या दोघिंविषयी बर्‍याच स्त्रीया वाईट बोलत असतात.

माझ्या प्रियकराला मी ऑर्कुटवर भेटले होते. आणीक तीन वर्षे आम्ही नुस्त्या ऑनलाईन गप्पाच मारायचो. मग मी एक दिवस त्याला भेटायला होस्टेलला गेले. त्याच्या होस्टेलवरच्या इतर मुलांपेक्षा त्याची रुम जास्त स्वच्छ वाटली. मला आवडली. मग मला तोही आवडायला लागला. परंतु तो इतका मोठा कवी आणि किती कवयत्री त्याच्यावर प्रेम करीत असतील ह्याचे मला कुतुहुल होते. ह्यापैकी त्याला कोण कोण आवडत असेल ह्याविषयी मला पण शंका होती. मी त्याला म्हटले की माझ्या एकटीवरच कविता कर. आम्ही मागच्या वर्षी दिवे आगार किनार्‍यावर गेलो होतो. आणीक आम्ही तिथे खुपसारे फोटो काढलेले. त्यातल्या एका फोटोत मी बिचच्या किनार्‍यावरच्या घोटाभर पाण्यात उभे राहुन छान फोटो काढलेला आहेय आणि त्याच बीचवर संध्याकाळी सुर्य बुडत असतांना सुर्य जणु माझ्या हातातच सामावलेला आहेय असा फोटो काढलेला आहेय. आगोदरचा फोटो सकाळी काढला होता ज्यात मी जीन्स आणि लोंग कुर्ती घातलेली होती. दुसरा फोटो संध्याकाळी काढला ज्यात मी शॉर्ट्स घातली होती. मी माझ्या प्रियकराला व्हॉट्सअ‍ॅपवर दोन्ही फोटो दाखविले आणीक म्हणाले आता ह्या फोटोकडे पाहुन कर कविता. आणीक ती दुसर्‍या कुणाला द्यायची नाही. त्याने कविता केली आणि मला पाठवली. ती कविता खुप सुंदर आहे परंतु ती माझ्या एकटीपुरतीच असल्याने ती इथे देता येणार नाही. इथे देता येत नसली तरी ती परवा मला व्हॉट्सअ‍ॅपवर आली. माझे प्रेम होउन दोन वर्षे झाली आहेत आणि आत्ता ती कविता व्हॉट्सअ‍ॅपवर आली म्हणजे ती दुसर्‍या कुठल्या मुलीला उद्देशुनही केलेली असेल आणीक आता तिचे कवीशी म्हणजे माझ्या प्रियकराशी बिनसले म्हणुन तीने ती व्हॉट्सअ‍ॅपवर लिक केली असेल. माझ्या प्रियकराने माझ्या एकटीसाठी आठ कविता केलेल्या आहेत असे तो म्हणतो आणि त्यातली एकच व्हॉट्सअ‍ॅपवर आली म्हणजे उरलेल्या सात कविता नक्की माझ्या एकटीसाठीच आहेत ह्यावर मी शुअर आहे. ह्याचाच अर्थ माझ्याशिवाय माझ्या प्रियकराच्या मनात दुसरे कुणी असेल तर ती एखाददुसरीच असेल.

माझ्याही मनात दुसरा एक कवी आहे. पण त्याच्या कविता समजत नाहीत आणीक स्त्रीयांमध्ये त्याच्या कविताविषयी कुणी काही बोलत नाही. तो नेहमी कविता करीत नाही, इतरवेळी गोष्टी लिहीत असतो. त्याच्या गोष्टीही कळत नाहीत पण गोष्टींविषयी थोडेफार बोलतात इतर मुली. त्याची कविता कुणी वाचली असेल ह्याबद्दल मला शंका आहे. कधीकधी त्याच्या कवितेला शुन्य लाईक्स येतात. मला ती कविता आवडलेली असली तरी मी लाईक देउ शकत नाही कारण माझ्या एकटीचीच लाईक त्या कवितेला असली तर ते बरे दिसणार नाही. शिवाय माझा प्रियकर ह्या दुसर्‍या कवीवर निरनिराळे आरोप लावतो आणीक तुच्छतेने बघतो. त्याला माझ्या एकटीचीच लाईक दिसली तर आमचे प्रेमप्रकरण तुटेल अशी भीती वाटते. प्रेमप्रकरण तुटले तरी हरकत नाही पण म्हणुन तो दुसरा कवी काय माझ्याशी प्रेम करेल असे वाटत नाही. तो कधी भेटेल असेही वाटत नाही कारण तो मॅसेंजरमध्ये मला रिप्लाय देत नाही. आणखी दुसरा एक कवी आहे पण त्याने कवितेतच सांगितले आहे की तो जगातल्या कुठल्याही स्त्रीपेक्षा त्याच्या कवितेचेच देणं लागतो. कवितेच देणं लागणे काय असते हे मला ठाउक आहे कारण मी कवितेचे कसे देणे लागते ह्या विषयवार मी स्वतः पाच कविता केलेल्या आहेत आणिक माझ्या प्रियकरानेही तीन कविता केलेल्या आहेत.

माझा प्रियकर हा राजकारणाशी संबधीत नाही असे तो सांगतो पण मी त्याला निरनिराळ्या राजकीय पक्षांसाठी प्रचाराची स्लोगन्स आणि चारोळी व इतर कविता करतांना पाहिले आहेय. तो ग्रामपंचायतीपासुन तर लोकसभेच्या इलेक्शनसाठी कविता करतो आणि त्याचा उमेदवार निवडुन आल्यास त्याला खुप पैसे मिळतात. त्यातुन त्याने दोन कार, दोन फ्लॅट आणिक दोन टिव्ही घेतले आहेत. म्हणजे टिव्ही एकच आहे पण जुना अजुन विकला नाहीय आणिक तो बेडरुममध्ये बसवला आहे. मी त्याला भेटायला कधी फ्लॅटवर गेले तर बेडरुममधल्या टिव्हीवर माझ्या प्रियकराच्या कविता वाचनाचे व्हिडीओ बघतांना वेळ कसा गेला ते कळत नाही. मग मी बेडरुममधुन उठते आणिक आमच्यासाठी कॉफी बनवते. माझ्या कॉफीमुळेच तो जिवंत आहे असे तो कधीकधी म्हणतो तेंव्हा मला खुप इमोशनल व्हायला होतं.

माझा प्रियकर हा खुप मोठा सामाजिक कवी आहे. त्याचा रेबॅनचा काळा गॉगल घातलेला फुल लेंथ फोटो मला खुप आवडतो. तो फोटो आता प्रोफाईलपिक मध्ये नाहीय पण पुढच्या जयंतीच्या वेळी परत येईल किंवा नविन काढेल असे वाटते. माझे माझ्या प्रियकरावर मनापासुन प्रेम आहेय.

Node read time
4 minutes

ललित लेखनाचा प्रकार

4 minutes

चिंतातुर जंतू Sat, 25/03/2017 - 11:03

>>मी त्याला भेटायला कधी फ्लॅटवर गेले तर बेडरुममधल्या टिव्हीवर माझ्या प्रियकराच्या कविता वाचनाचे व्हिडीओ बघतांना वेळ कसा गेला ते कळत नाही. मग मी बेडरुममधुन उठते आणिक आमच्यासाठी कॉफी बनवते.<<

प्रिय‌क‌राला साडेतीन‌ मिन‌टं पुर‌तात किंवा क‌शी हे न‌ सांगून तुम्ही भ‌ल‌त्या उत्क‌ंठा वाढ‌व‌ताय. हे वाग‌णं ब‌रं न‌व्हं.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 25/03/2017 - 18:30

In reply to by चिंतातुर जंतू

प्रियकराला कविता वाचायला साडेतीन मिनीटं पुरतात का कसं, याबद्दल कुतूहल मला आहे. मला विदा जमा करायचा आहे.

मारवा Sat, 25/03/2017 - 21:40

फेसबुक ची काही झकास पाने वाचतो.उदा एक मराठी मालिका लेखिका ताई आहेत. त्यांचा एक गण आहे.मग त्यात मी कोणाला कसा काय पात्रतेवर प्रवेश देते. माझ. मन जिंकण कीत्ती गडे कठीण आहे. मला तुम्ही पसंत पडणं मी तुम्हास माझ्या गणात घेणं हा कीत्ती गडे मोठा राजयोग आहे. .सूमार मराठी डीश पण मी बनवल्यास केली ग्रेट्ट बयो. मी माझी माझे .रोजचे सुविचार रोजचा गणोपदेश. अधुनमधून गणशाळा. इतके जबर आत्मप्रेमात झिंगलेले बाजीचा ए अत्फाल झिंगे आयटम केवळ चेपू वरच सापडतात. गॅरंटी दर्जेदार सीरीयसली ह्युमरस. माझ्या ज्या मित्राने हा प्रांत दाखवला त्याकडे तर एक फारच सिलेक्टीव लिस्ट च आहे. हा एक सीक्रेट प्रक

१४टॅन Thu, 30/03/2017 - 17:29

In reply to by मारवा

आम‌च्या ओळ‌खीच्या एक ताई द‌ररोज 'लाईफ इव्हेंट' टाकाय‌च्या. फिलींग ५०% हॅप्पी इत्यादी. शिवाय विचित्र सेल्फी आणि य‌म‌कात फिट्ट केलेल्या क‌विता. आता त्या क‌विता इथे टाक‌णं म्ह‌ण‌जे identity disclose क‌र‌णंं होईल.
हेच प्राणी पुढे जाऊन म‌राठी मालिकालेख‌क/लेखिका होतात असा माझा क‌यास आहे.