Skip to main content

गावाकडच्या मावळतीचे …….रंग बिलोरी

गावाकडच्या मावळतीचे
…….रंग बिलोरी
प्रसन्न पिवळे, गडद गुलाबी
निवांत निळसर, कबरे करडे
पाहून निवती माझे डोळे
…....निब्बर शहरी

प्रसन्न पिवळ्या संध्याकाळी
खेळ अ॑गणी रंगुनी जावा
दावण तोडुन, आचळ सोडुन
....अचपळ गोऱ्हा
.....पिऊन वारा....
उधळत जावा

गडद गुलाबी संध्याकाळी
शुक्र जरासा तेजाळावा
उडता उडता पुन्हा थव्याची
......... मोडुन नक्षी....
.........चुकार पक्षी......
उतरून यावा

निवांत निळसर संध्याकाळी
फड गप्पांचा मस्त जमावा
सळसळ रोखून वृद्ध वडाने
........टाळीसाठी........
.......पारंबीला.......
झोका द्यावा

कबऱ्या करड्या संध्याकाळी
धूसर ढग ओथंबुन यावा
पायतळीच्या वाटेवरचा
.......भिरभिरणारा.......
........एक काजवा.......
लखलख व्हावा

राही Tue, 27/06/2017 - 10:28

स‌र‌ळ साधी क‌विता आव‌ड‌ली. कुठ‌लेही तात्प‌र्य‌,सार,च‌म‌त्कृतीपूर्ण‌ अंतिम ध‌क्का न‌स‌लेली.
म‌स्त‌.

१४टॅन Wed, 28/06/2017 - 15:17

म‌स्त आहे क‌विता. आव‌ड‌ली. मूड झाला क‌धी त‌र सुलेखनात वाप‌रेन!

अनु राव Wed, 28/06/2017 - 16:04

In reply to by बॅटमॅन

बॅटोबा, तुला उप‌हास क‌राय‌ला काय जाते, तुझ्या निब्ब‌र श‌ह‌री डोळ्यांना क‌ळ‌णार नाही ती खेड्यात‌ली म‌जा.

तिरशिंगराव Wed, 28/06/2017 - 16:48

खूप‌च‌ आव‌ड‌ली. श‌ब्द‌र‌च‌ना सुंद‌र‌, च‌म‌त्कृतीशिवाय‌. आज‌ ख‌रे, अनंताचे द‌र्श‌न‌ घ‌ड‌व‌लेत‌.

मिसळपाव Wed, 28/06/2017 - 17:01

ही क‌विता वाचून‌ प्र‌श्न‌ प‌ड‌लाय‌ की तू सिझोफ्रेनिक‌ आहेस‌ का काय‌? ;-) ते दिक्काल‌बंध‌ आणि अश्व‌त्थामा अस‌ल‌ं लिखाण‌ (क‌विता या स‌द‌रात‌ टाक‌लेल‌ं लिखाण‌) क‌र‌णारा आणि ही झ‌कास‌ र‌च‌ना क‌र‌णारा तू एक‌च आहेस‌? आता अर्थात‌च‌ प्र‌त्येक‌ क‌विता/लिखाण‌ आव‌ड‌णार‌ंच‌ असेल‌ अस‌ं होण‌ं श‌क्य‌ नाही. प‌ण‌ ..... असो. क‌वीने लिहित‌ र‌हाव‌ं आणि आम‌च्यासार‌ख्याने, काहीत‌री हाती लागेल‌ या आशेने, वाच‌त‌ र‌हाव‌ं.

प‌र‌त‌ एक‌दा दाद‌ देतो, मित्रा, फार‌ छान‌ आहे ही क‌विता....

anant_yaatree Sat, 01/07/2017 - 10:36

In reply to by मिसळपाव

....क‌दाचित असेन‌ही! प‌ण खात्री आहे की मी एक‌टा नाहिये!! :)
क‌वितेला जी दिल‌खुलास दाद दिलीस त्याब‌द्द‌ल ध‌न्य‌वाद!!