Skip to main content

मध्यरात्री

मध्यरात्री गजबजावे नभ वितळत्या चा॑दण्याने
भरुनी घ्यावा ओ॑जळीचा चषक त्या फेनिल प्रभेने

मध्यरात्री सळसळावे बेट पिवळे केतकीचे
अंथरावे वायुकोशी गंध थरथरत्या तृणांचे

मध्यरात्री कुजबुजावा मेघ बिलगुनी पर्वता
कूस बदलून पांघरावी दाट दुखरी शांतता

१४टॅन Wed, 12/07/2017 - 11:52

म‌स्त आहे क‌विता. शेव‌ट‌च्या ओळीत मूड एकद‌म का ब‌दल‌ला बाकी?

दुखरी शांतता

तिरशिंगराव Wed, 12/07/2017 - 12:04

ते स‌ग‌ळं झाल्याव‌र‌ची 'दुख‌री शांत‌ता' आहे.

तिरशिंगराव Thu, 13/07/2017 - 19:22

यात्री स‌भ्य‌ आहेत‌च‌. आणि मी अस‌भ्य आहे, हे प‌ण मान्य‌. प‌ण‌ माझ्या या वाक्यांत‌ कुठ‌ला अस‌भ्य‌प‌णा दिस‌ला ? म‌राठी भाषेचा अर्थ‌ घ्यावा त‌सा लाग‌तो.