Skip to main content

पुढील पाच मिनिटात,

पुढील पाच मिनिटात,
"अ" अतिरेकी बधीर करतील आपला मेंदू
"ब" बलात्कारी झुकवतील आपली मान शरमेने खाली
"क" कोवळी बालपणं विकली जातील छुप्या बाजारात
"ड" डोकी फुटतील धर्म/सत्तामार्तंडांच्या एका भृकुटीभंगाने आपल्या डोळ्यादेखत
ई-पेपर्स रिफ्रेश करून थकतील "अ" "ब" "क" "ड" च्या मिनिटागणिक वाढत जाणाऱ्या किंमती

आपल्या जीर्ण-शीर्ण त्वचेच॑ रोम-रोम जळताना
हे उत्सवी फिड्ल आता मीच वाजवायला घेईन म्हणतो

१४टॅन Mon, 11/09/2017 - 17:41

खूप खूप छान. केऑस शब्दांत पकडता येणं इतकं सोपं नव्हे. आजच्या काळात ही कविता करायला धाडसही हवं.

anant_yaatree Tue, 12/09/2017 - 11:08

In reply to by १४टॅन

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

अवांतर: मिपा वर याच कवितेवर आलेली एक प्रतिक्रिया "याला कविता किंवा रचना म्हणणे मनाला पटत नाहिये. जे काही लिहिले आहे त्याला 'र' ला 'ट' जोडणे म्हणतात. ..."

१४टॅन Tue, 12/09/2017 - 17:38

In reply to by anant_yaatree

आणि आपल्या प्रतिक्रियेलाही दुजोरा/दाद मिळावा/वी ह्या अपेक्षेने लिहीलेली वेगळी.
कविता बाऊन्सर जाणं त्याहूनही वेगळं.
तरीही, असतात आवडीनिवडी आपापल्या. असो.
मिपावर ह्याच मुख्य कारणासाठी मी लिहीत नाही.

धर्मराजमुटके Tue, 12/09/2017 - 18:00

In reply to by anant_yaatree

ती प्रतिक्रिया मीच दिली आहे. मात्र आजच्या तुमच्या दोन्ही कवितांना "चांगला" प्रतिसाद दिला आहे. (तिकडच्या आणि इकडच्या !)

अवांतर सुचना : कोण कोठे काय म्हणाले ह्याच्या खतावण्या लिहिणे सोडा. आयुष्य सुख:मय होईल. तिकडची धुणी इकडे धुण्यात काही पॉईंट नाही. :)

anant_yaatree Wed, 13/09/2017 - 09:18

In reply to by धर्मराजमुटके

व सुखमय आयुष्यविषयक सूचनेबद्दल धन्यवाद.
आमच्या वस्त्रस्वच्छालयाच्या अनेक शाखा असल्या तरी तिकडची धुणी इकडे धुणार नाही. अगदी खतावणी शपथ. :)

तिरशिंगराव Mon, 11/09/2017 - 20:37

सर्व विचारवंत ज्याला नीरो म्हणताहेत त्याच्या हातचं फिडल का काढून घेता ? विचारवंत रागावतील ना ?