Skip to main content

स्वगत

आज तुझ्यात विसावूदे,
अव्यक्त तरीही राहूदे।
आज तुझ्यात रमलेले
प्रतिबिंब मला न्याहाळू दे।
फिरून कधी येईल ही
साजणवेळ ओंजळीत।
सुख दुःखाचे गान अंतरी
माझे मलाच गाऊ दे।

शांतादुर्गा Mon, 04/12/2017 - 10:05

नवीन लेखकासाठी feedback फार गरजेचा असतो. विशेषतः कवितेवर तर फारच. इथे नवख्याची कविता वाचली जाऊन ती आवडणे आणि तसे कळवणे म्हणजे विशेषच. तर मनापासून आभार. ज्यांनी कवितेला पाच चांदण्या दिल्या त्यांचेही :)