Skip to main content

निबंध : भारतीय करव्यवस्थेचे पाणीपुरीच्या संदर्भात आकलन

मी एक पुरूष आहेय आणिक अर्थशास्त्रात पिएचडी केलेली आहेय. माझ्या बायकोला पाणीपुरी खुप आवडते. मला पाणीपुरी आवडत नाही. अजिबात आवडत नाही. पाणीपुरीवर सरकारने अव्वाच्या सव्वा टॅक्स बसवायला पाहिजे असे मला मनोमन वाटते.

पाणीपुरीवर टॅक्स हा प्रचंड गुंतागुंतीचा विषय आहे. एकतर ह्या व्यवसायात उत्तर भारतीय आणि बिहारी लोकांचा मोठा सहभाग आहे. उत्तर भारतीय हे बरेचसे हिंदुत्ववादी असुन बिहारी लोक समाजवादी आहेत. पाणीपुरीला लागणारे चने पिकविणारे लोक बरेचसे राष्ट्रवादी आहेत. पाणीपुरीला लागणारे मसाले पिकविणारे लोक मुख्यतः साम्यवादी आहेत. पाणीपुरीत वापरला जाणारा गुळ हा अर्धा साम्यवाद्यांच्या आणी अर्धा प्रजासमाजवाद्यांच्या मुलुखात बनविला जातो. काही प्रजासामाजवादी हे कधी काळचे सरंजाम असुन त्यांना एकाच वेळी परंपरांचे पुनरुज्जीवन करुन आपली आधुनिकतेची प्रतिमा बनवायची आहे. सरंजाम असुनही आजकाल तुम्ही मर्सीडीज बेंज एस क्लास ऐवजी घोडागाडीतुन फिरलात तर तुमचे हसु होउ शकते. पाणीपुरीचे पाणी स्टोअर करण्यासाठी वापरण्यात येणारी सिंथेंटीक मातीची मडकी बनविणारे लोक हे आधुनिक बलुतवादी आहेत. पाणीपुरीत वापरले जाणारे पाणी शक्यतो महानगरपालीकेच्या पाणीपुरवठ्यातुन केले जाते. महानगरपालीका हे पाणी शहरांपासुन जवळ बांधलेल्या धरणांमधुन आणते. धरणात पाणी अडविणारी यंत्रणा ही बरीचशी बहुतांत्रिक समाजवाद्यांच्या हातात असते.

धरणाच्या पाण्यात मासे असतात. वहात्या नद्या कमी झाल्याने आता फक्त धरणांमध्ये मासे सापडतात. मासे ह्या पाण्यात जगु शकतात, मोठे होउ शकतात. मासे ह्या पाण्यात सेक्स करतात. धरणात भरपुर प्रकारचे मासे असतात ते भरपुर सेक्स करीत असले पाहीजे.

मी नेहमी पाणीपुरी खातेवेळी ती तोंडात टाकल्यानंतर दातांनी फोडतेवेळी विचार करतो. जे पाणी आता माझ्या तोंडात आहे त्या पाण्यात कधीकाळी माश्यांनी सेक्स केला होता.

कधीकधी पाणीपुरी खात असतांना माझ्या तोंडात कुणीतरी सेक्सच करते आहे असेही वाटते.

मला पाणीपुरी आवडत नाही. तिच्यावर सरकारने अव्वाच्या सव्वा टॅक्स बसवावा म्हणुन मला आंदोलन करायचे आहेय.

Node read time
2 minutes

ललित लेखनाचा प्रकार

2 minutes

चिंतातुर जंतू Fri, 02/03/2018 - 18:52

मासे पाण्यात बरंच काही करतात. म्हणजे थुकतात, ओकतात, शू-शी करतात, त्यांचे अश्रू आणि त्यांचा घामही पाण्यात मिसळतो, वगैरे. तुम्हाला फक्त सेक्सच दिसतो :-)

भांबड Fri, 02/03/2018 - 19:42

चांगल्या सुरवातीनंतर...पीचडी, ट्याक्स,बिहारी...
कै च्या कै

'न'वी बाजू Sat, 03/03/2018 - 08:07

In reply to by भांबड

सुरुवातीत नेमके काय चांगले आढळले तुम्हाला?

भांबड Sat, 03/03/2018 - 10:12

In reply to by 'न'वी बाजू

पुर्ण केलेल्या व्यक्तींबद्दल मला खुप असुया व आदर आहे.

पिएचडी ने पिचलेला इंजनेर

तिरशिंगराव Sat, 03/03/2018 - 04:12

धावती गाडी यकदम 'डिरेल' झाल्यासारखं वाटलं बघा.

चिमणराव Sun, 04/03/2018 - 11:49

होळीत टाकलेला नारळ फासफुस होत भाजला जात असतो तेव्हाच काढला नाही तर काळाठिक्र पडतो. सगळे नारळ एकदम टाकायचे नसतात. भाजलेलं खोबरं चविष्ट आणि शेफसुद्धा.