.
.
ललित लेखनाचा प्रकार
स्ट्रॅन्ड
स्ट्रॅण्ड बंद होण्याची दिलेली कारणे कितपत खरी हे तपासून पाहण्यासाठी माझ्याकडे पुरेसा डेटा नाही
स्ट्रॅन्डमध्ये २९ वर्षे काम केलेले एक दूरस्थ नातेवाईक गेल्याच रविवारी एका समारंभात भेटले. त्यांच्या मते, लोकांची वाचनाची आवड कमी झाली आहे किंवा वाचण्याची पद्धत (किंडल वगैरे) बदलली आहेत, ही कारणे नाहीत.
मुख्य कारण प्रचंड सवलतीत मिळणारी ऑनलाईन पुस्तक विक्री सेवा (उदा. अमेझॉन). दुसरे कारण म्हणजे मुंबईची बदलेली डेमॉग्राफी. उत्तर आणि पूर्व दिशांना दूरवर पसरलेल्या लोकसंख्येला, दक्षिणेतील एका टोकाला येणे तसे दूरापास्तच. आणि तिसरे कौटुंबिक कारण (मुलगा अमेरिकेत स्थायिक इ.)
मला स्वत:ला हे तिसरे कारण फारसे महत्त्वाचे नसावे, असे वाटते. पण पहिल्या दोन कारणांत तथ्य असावे.
या दोन नावांना एकत्र घेतल्याने ज्या स्ट्रॅण्ड प्रेमींच्या अस्मिता उफाळून आल्या असतील त्यांना आगाऊच फाट्यावर मारतो आहे
ह्या वाक्याचा अर्थ आणि प्रयोजन दोन्ही उमगले नाहीत.
एक व्यवसाय, ज्यात तुमचा स्वत:चा हिस्सा, एक ग्राहक वगळता, काहीही नाही. तो व्यवसाय सुरू राहण्यात (किंवा बंद पडण्यात), अस्मिता उफाळून येण्याचा (अथवा अस्मितेला धक्का बसण्याचा) काय संबंध असू शकतो?
काळाबरोबर न राहणारे जाणाराच. मग ती कोडॅक असो वा स्ट्रॅन्ड!
'स्ट्रँड'चं इच्छामरण/'पॉप्युलर बुक हाऊस' (PBH) बंद करावं लागतंय
‘स्ट्रँड’चं इच्छामरण' हा नीतीन रिंढे ह्यांचा लेख 'स्ट्रॅन्ड' बंद होण्यामागच्या कारणांचा ऊहापोह करतो.
--
‘पॉप्युलर बुक हाऊस’ (PBH) बंद करावं लागतंय…' हे मालकद्वयीचं निवेदन; ज्यात कसलीही कारणं दिलेली नाहीत. निवेदनातून -
पण ....
परिस्थिती बदलली... आवड बदलली, प्रायोरिटीज बदलल्या आणि एक वेळ अशी आली की, ‘पॉप्युलर बुक हाऊस’ बंद करावं लागणार या कटू सत्याला सामोरं जाण्यासाठी आम्ही मनाची तयारी केली…
--
अवांतर: मुंबईकरांसाठी PBH म्हणजे फोर्टातलं पीपल्स बुक हाउस. :)
ररा, बऱ्याच दिवसांनी इकडे
ररा, बऱ्याच दिवसांनी इकडे आलात ओ. बियर प्यायला या. सोबत चखणा (खारावलेले पिस्ते, काजू, मुर्गी) पण आहे.
पुस्तकाचं दुकान बंद झाल्यानंतर वाईट वाटतं. इकडे बॉर्डर्स नावाचं एक दुकान होतं. शृंखलाच होती. २००० ते २००६ च्या दरम्यान मी तिकडे नेहमी जायचो. आठवड्यातून किमान दोन वेळा तरी. २००२ मधे तिथे एक जण भेटला होता तो आजही झक्कास मित्र आहे. आम्ही एकत्र एम्बीए ॲडमिशन ची तयारी करत असू. बंद पडलं तेव्हा लई वाईट वाटलं. हजारों यादे लिपट कर रोती है .... जब कोई शख्स घर बदलता है - हे बदलून - हजारों यादे लिपट कर रोती है .... जब कोई दुकान बंद हो जाता है - असं म्हणावंसं वाटतं.
.
.
जहाँ ज़िदें किया करता था बचपना मेरा
कहाँ से लाऊँ खिलौनों की उन दुकानों को
.
आता ॲमेझॉन ने आपले स्वत:चे दुकान शहराच्या एका पॉश भागात थाटले आहे.
.
भावपुर्ण श्रद्धांजली !
पॉप्युलर "गेल्याने" निर्माण झालेली सांस्कृतिक "पोकळी" भरुन काढण्याची शक्ती पुणेकरांना लवकरच लाभो
या सदिच्छेसह
शोकाकुल मारवा
जानेवाले नही आते
उनकी याद आती है
ताजा कलम - ररा यांनी लेख लिहुन सांस्कृतिक पोकळी चे विवर भरण्यास स्रुरुवात करुनच दिलेली आहे. जसे सुभाष अवचट स्मिता,,,श्रीदेवी
असो
नववाचक
अमेरिकेतलं 'बॉर्डर्स' बंद पडण्याचा उल्लेख गब्बर सिंग यांनी केला आहेच. अमेरिका आणि भारत या तुलनेत मला एक मोठा फरक दिसतो, तो म्हणजे भारतातला नव-वाचकवर्ग. साक्षरता, आर्थिक पत, तरुणांची संख्या/प्रमाण यांचा विचार करता भारतात नव-वाचक-गिऱ्हाईकांची वाढती संख्या आहे.
श्रद्धा कुंभोजकरांनी या लेखात म्हटल्यानुसार, आंबेडकरी जनता मोठ्या प्रमाणात पुस्तकखरेदी करते. पण ही पुस्तकं फक्त आंबेडकरी दुकानांमध्येच दिसतात. उदाहरणार्थ, तीनेक वर्षांपूर्वी नागपूरला चैत्यभूमीच्या (बरोबर ना?) परिसरातल्या दुकानात जी आंबेडकर, फुल्यांची आणि त्यांच्याशी संबंधित पुस्तकं दिसली ती ठाण्या-पुण्यात सहज दिसलीही नाहीत.
त्यामुळे नव-वाचक फक्त तंत्रज्ञानामुळेच पुस्तकांच्या दुकानात येत नाहीत, हे मला तेवढंसं पटलं नाही. आंबेडकरी, ब्रिगेडी, अंनिस अशा निरनिराळ्या गटातटांच्या साहित्यविक्रीचे आकडे या संदर्भात कोणी तपासले तर आणखी काही समजू शकेल असं वाटतं.
कंटाळा आला असेल त्यांना
कंटाळा आला असेल त्यांना