Skip to main content

तरुणाई

कुणाच्याही समोर शरीर पसरतात , तरुणाईला कसली बंधने नसतात.
शरीराची भूक हाक देते ,मनाची कसली भिती नसते.
घरात आई असून नसते ..बाहेर बापाची आडकाठी नसते…
“ आजकाल सगळे असेच करतात “ अश्या शब्दांची ढाल असते.
मोह असतो पण प्रेम नसते ..मी आणि माझे या शिवाय काही दिसत नसते.
प्रेमातून प्रार्थना ...प्रार्थनेतून परमेश्वर ….असले काही अजिबात नसते...
कसल्या खुळचट कल्पना ! कसल्या बुरसटलेल्या विचारांचा पगडा !
आला क्षण महत्वाचा ...आत्ता मिळतंय ते ओरबाडा..
पैसा हवा. पैसा सोडला की हवे ते मिळते …
तरुणाईची नशा तुम्हा जुनाट लोकांना काय कळते ?

मारवा Thu, 29/03/2018 - 19:28

दिशाहीन तरुणाईच्या कानफडात वाजवणारी कविता !
शरीराच्या भुकांना भाळलेल्या भाग्यहिनांना आरसा दाखवणारी कविता !!
आईच्या मायेला बापाच्या धाकाला न जुमानणाऱ्या तरुणाईला धिक्कारणारी कविता !!!
मीपणाच्या मोहाच्या मायाजालात गुरफटलेल्या तरुणाईला प्रेमाच्या पवित्र मार्गावर पिटाळणारी कविता !!!!
प्रेमातुन पार्थनेपर्यंत प्रार्थनेतुन थेट परमेश्वरापर्यंत पोहोचवणारी महावेगवान कविता !!!
बुरसटलेल्या विचारांचा म्हणुन हिणवणाऱ्यांना हीनत्वाला नेणारी कविता !!
ओरीओक्रीम ओरबाडणारी तरुणाई झोडपणारी कविता !

आवाज दो हम एक है
महात्मा गांधी अमर रहे
इन्किलाब जिंदाबाद
जयहिन्द्
जयम्हाराष्ट्र्

मारवा Thu, 29/03/2018 - 19:44

तुमच काय म्हणण आहे ? आम्हाला कविता कळत नाही काय ?
तरुणाई म्हणजे तरुण आई अशी अश्लील फोड तुमच्या सारखे तरुणाईचे (तरुण वर्गाचे/ युथ )प्रतिनिधीच करु शकतात.
हेच हेच ते आहे ज्याला आक्षेप आहे.
तरुणाई म्हणजे युवावर्ग असा सरळ अर्थ सोडुन तरुण - आई असा भलता अर्थ घेतला तर तुम्हाला कवि

तरुणाईची नशा तुम्हा जुनाट लोकांना काय कळते ?


यातुन तरुण आईची नशा असला हिन अर्थ काढुन आव्हान देतोय असला आरोप तुम्ही करताय का?
यातुन काय अर्थ निघता ? कविला तसे अभिप्रेत आहे का ? याचा तरी विचार करा

पुंबा Thu, 29/03/2018 - 20:39

नाईक आजोबा, नसतं हो असं काही. आता, बघा असल्या नासलेल्या, वाया गेलेल्या, सग्गळ्ळं सग्गळ्ळं विकून खाणाऱ्या, पैशालाच केवळ महत्व देणाऱ्या वाईट्ट, वाईट्ट दुत्त दुत्त तरूणाईच्याच हातात असणारे की नै जग, मग तुमच्या रडण्या- भेकण्याचा काय उपयोग होणारै. त्यामुळे, टेक अ चिल पिल.
भोक्कात गेली ती तरूणाई..
ओक्के?

जयंत नाईक. Fri, 30/03/2018 - 10:08

In reply to by पुंबा

जरा जागे व्हा . आजकाल सगळे राज्यकर्ते आजोबा आणि पणजोबाच आहेत. गोवऱ्या मसणात गेल्या तरी खुर्चीचा मोह सुटत नाही ! मला जे दिसले ते सांगितले इतकेच. यात सुधारणा करावी अशी अपेक्षा आहे. ती अवास्तव असू शकेल. काय केले म्हणजे यात सुधारणा होईल ? माझ्याकडे याचे उत्तर नाही . आपल्यासारख्या विचारवंतानी याचे उत्तर शोधले पाहिजे . मी फक्त कवी.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 30/03/2018 - 03:27

(सं)भोग आणि प्रेम यांचा काय संबंध? गुण -५, अवगुण- हवेत तेवढे.

आता बघा, गेल्या रविवारचीच गोष्ट. शेजारच्या मैत्रिणीनं प्रेमापोटीच मला रेस्टॉरंटात नेलं. बळंच, माझा वाढदिवस साजरा करायचा म्हणून मला मार्गारिटा प्यायला लावली; केक खायला लावला. पोट फुटेस्तोवर तुडुंब जेवण घातलं. तिच्यावरच्या प्रेमापोटी मी ते सगळं जेवले. चारचौघांत, लोक माझ्या अंगावर 'हॅपी बर्थडे' म्हणून ओरडत-गात होते; ते ही सहन केले.

मग चार दिवस वजनवाढही भोगावी लागली मलाच. प्रेम आणि भोगाचा संबंध असतो तो असा. मार्गारिटा आणि केक बाकी झकास होते हो.

आता कोणी तरी मला गुण आणि अवगुण द्या बघू!

गवि Sat, 31/03/2018 - 15:51

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रेमापोटी मी ते सगळं जेवले. चारचौघांत, लोक माझ्या अंगावर 'हॅपी बर्थडे' म्हणून ओरडत-गात होते; ते ही सहन केले.

कोणीतरी काहीतरी केलं आणि तुम्हाला ते आवडलं, खुदकन स्माईल फुलली, मनमोर थुईथुई नाचायला लागला असं झाल्याचं उदाहरण आहे का एखादं?

(म्हणजे "कंटाळा" आला नाही, "बोर" मारलं नाही, लोकाला सहन करावं लागलं नाही, समोरचा टिप्पिकल इरिटेटिंग, ममव, एमएसीपी , चाकोरीतला, "शाम्या", निघाला नाही असा एखादा प्रसंग ?) ;-)

'न'वी बाजू Sat, 31/03/2018 - 20:29

In reply to by गवि

नाही म्हणजे, आम्हालाही रोचक श्रेणी द्यायचीच होती, परंतु त्या क्षणी आमची श्रेणीव्यवस्था चालू नसल्याकारणाने देऊ शकलो नाही; सबब ती पहिली रोचक श्रेणी आमची नव्हे.

आता तूर्तास आमची श्रेणीव्यवस्था पुन्हा चालू झालेली असल्याकारणाने, ती दुसरी रोचक श्रेणी आमची.

(याबद्दल 'माहितीपूर्ण' पायजेलाय!)

- (चाकोरीतला, 'शाम्या') 'न'वी बाजू.

गवि Sat, 31/03/2018 - 20:29

In reply to by 'न'वी बाजू

आय कान्ट कॉम्पेनसेट धिस फॉर एंटायर लाइफ इव्हन विथ मेकिंग शूज ऑफ माय स्किन लेदर अँड पुटिंग देम इन युअर फीट ..

चिमणराव Sat, 31/03/2018 - 20:58

In reply to by गवि

अस्स इतकं उघड करायला हे काय फेसबुक आहे?
( तरुणाईच्या भाषेत व्हेरी पझेसिव (=?) आणि तो प्रसंग कुण्णाशी शेअर करणार नाही)

तिरशिंगराव Fri, 30/03/2018 - 04:36

ये भोगभी एक तपस्या है
तुम त्यागके मारे क्या जानो
अपमान रचेताका होगा
रचनाको अगर ठुकराओगे

असं आपला साहिर म्हणून गेलाय! तेंव्हापासून आम्ही, प्रत्येक रचनेला आमचा समोर पसरायला सांगतो.

-तिमा पणजोबा

भांबड Sat, 31/03/2018 - 10:21

सैराट बघितला का?
आजकाल आईस्क्रिम/पाणीपुरी ई इ खायला जाताना तरुण लवक्रोज (बर्डस) नाहित ना हे बघूनच हिला अन् मुलीला घेऊन जातो. ह्या फालताड क्रोज ना कुठं काय बोलताहेत हे समजत नसावं. अवघडल्यासारखं होतं

१४टॅन Sat, 31/03/2018 - 13:11

तुम्ही खूप गोड आहात. जरा आयर्न मेडन, स्लिपनॉट वगैरे ऐकत जा स्वस्थ प्रकृती, मन:शांती आणि स्थिरचित्तासाठी.

गवि Sat, 31/03/2018 - 15:55

In reply to by जयंत नाईक.

हलकेच घ्या हो. तुमची तळमळ पोचतेय कवितेतून.

विनोदनिर्मितीचा एक क्षीण प्रयत्न करुन पाहिला इतकंच.

पण विषयाच्या गांभीर्याशी सहमत आहे.

'न'वी बाजू Sat, 31/03/2018 - 18:54

In reply to by जयंत नाईक.

काय ही खंत ? असे लोक आम्हाला का भेटत नाहीत ?

नाही. रादर, असे लोक तुम्हाला(च) कोठे भेटतात?

इन अदर वर्ड्ज़, खंत तुमच्याकरिता आहे; आमच्याकरिता (स्वादरार्थी बहुवचन) नव्हे.

- (आमच्यासमोर शरीर पसरणाऱ्या लोकांच्या शोधात न जाणारा, गांधीजींचा वॉनाबी एक तृतीयांश माकड) 'न'वी बाजू.

१४टॅन Sat, 31/03/2018 - 19:20

In reply to by 'न'वी बाजू

रादर, असे लोक तुम्हाला(च) कोठे भेटतात?

स्पा वगैरे मध्ये जावं, स्लीपर कोच ट्रेन/व्होल्वोबशीतून मस्त प्रवास करावा, योगासनं करावीत, जिममध्ये जावं...

(नाही, नाही, मन:शांती वगैरे शाबूत राहण्यासाठी आणि पर्यायाने असल्या कविता न स्फुरण्यासाठी नाही; आपल्यासमोर पसरणारे लोक (खासकरुन तरुणाई) पहाण्यासाठी.)

'न'वी बाजू Sat, 31/03/2018 - 19:55

In reply to by १४टॅन

पॉइंट नोटेड. हे आधी लक्षात आले नव्हते. (सांगितले ना, गांधीजींचा वॉनाबी एक तृतीयांश माकड ('बुरा मत देखो') म्हणून!) परंतु तरीही...

...त्या पसरणाऱ्या जनसंख्येत एक्स्क्लूज़िवली (किंवा स्पेसिफिकलीसुद्धा) तरुणाईचाच भरणा असतो, अशातला काही भाग नव्हे. नाईकआदिपूर्वजांचा१ रोख/आक्षेप स्पेसिफिकली/एक्स्क्लूज़िवली तरुणाईकडे दिसतो. का, ते कळत नाही.

(ऑल्सो, प्लीज़ नोट: नाही म्हणजे, आपल्या सूचनेचे स्वागतच आहे२, परंतु आम्ही लोकांसमोर शरीर पसरतो; लोकांची आमच्यासमोर पसरलेली शरीरे शोधण्यात आम्हांस रस नाही. धन्यवाद२अ.)
...........

१ आजोबा/पणजोबा थीमचे एक्स्ट्रापोलेशन/कल्पनाविस्तार म्हणून 'आदिपूर्वज' असा शब्दप्रयोग केला खरा, परंतु आता असे लक्षात येते की आपल्या आदिपूर्वजांना बहुधा कोणासमोर शरीर पसरण्याचा विधिनिषेध नसावा; मनाला येईल तेथे बिनदिक्कतपणे शरीर पसरू शकत असावेत. (मने स्वच्छ होती त्यांची.) ही विधिनिषेधाची खासियत बहुधा आपल्या आजोबा/पणजोबांच्या पिढीचीच. पण असू दे. आता खोडून करेक्ट करायचा कंटाळा आला.

२, २अ हे 'तुझ्या बैलाला घो, साल्या!'चे सभ्य मराठीतील ईक्विव्हॅलंट मानण्यास आम्हांस प्रत्यवाय नाही.

'न'वी बाजू Sat, 31/03/2018 - 22:15

In reply to by जयंत नाईक.

आपल्या अनुमतीच्याच प्रतीक्षेत होतो. आता (आपल्या आशीर्वादाने) निर्धास्तपणे चालू राहीन.

- (वडीलधाऱ्यांच्या शब्दाचा (सोयिस्करपणे) मान राखणारा) 'न'वी बाजू.

मारवा Sat, 31/03/2018 - 19:42

In reply to by 'न'वी बाजू

काय ही खंत ? असे लोक आम्हाला का भेटत नाहीत ?

नाही. रादर, असे लोक तुम्हाला(च) कोठे भेटतात?

अती मार्मिक प्रश्न अती नवीच बाजु
याचे उत्तर कवीवर्य देतील का ?

जयंत नाईक. Sat, 31/03/2018 - 20:33

मी काही कविवर्य वगैरे नाही . शिकाऊ कवी फारतर ... चुका दाखवा . स्वागतच आहे. जरूर सुधारेन . माझ्या परीने ...

'न'वी बाजू Sat, 31/03/2018 - 20:47

In reply to by जयंत नाईक.

माझ्या परीने ...

म्हणजे तुमची परी आहे? तीही पर्सनल परी? मजा आहे ब्वॉ!

बाकी, परी वगैरे बालपणात असते, हे ठाऊक होते. पहिल्या तसेच दुसऱ्याही, याची कल्पना नव्हती. (पण कवी बुवा तुम्ही! 'प्रौढत्वी निजशैशवास जपणे, बाणा कवींचा असे' असे कोणीसे (कोण्या कवीने) म्हणून ठेवलेलेच आहे.)

बिटकॉइनजी बाळा Sat, 31/03/2018 - 23:33

माणसाला वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षांपर्यंत व्हर्जिन ठेवू शकणाऱ्या एका क्रूर देशात जन्माला आलेल्या एका जवळच्या मित्राला ही कविता पाठवली. बघू काय होतंय आता

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 01/04/2018 - 17:26

In reply to by बिटकॉइनजी बाळा

कोणाचं काय होणार? मित्रानं कविता वाचल्यामुळे त्याच्यासमोर तुम्ही, इतर कुणी शरीर पसरणार!