मनातले छोेटेमोठे प्रश्न आणि विचार - ९४
या बातमीबद्दल प्रतिक्रिया हव्यात.
जोशी आडनावाच्या व्हिलनची फारएण्डनं मागे टिंगल केली होती. पण फारएण्डा, जपून. आता तर स्वप्नील जोशी व्हिलन बनतोय, अशा बातम्या आहेत.
निव्वळ करमणुक्
http://www.tarunbharat.com/news/568261
किती तो बाळबोधपणा!
ऐसी अक्षरे ला सध्या काय झालेलं आहे ?
मी गेले अनेक दिवसांपासुन बघतोय (म्हणजे जाणवण्यासारखा एक ठळक काळ आता झालाय असे वाटले म्हणून म्हणतो ) की ऐसी अक्षरे संस्थळ हळुहळु कोमेजुन जात आहे असे जाणवते.
म्हणजे ऐसी अक्षरेवर सुरुवातीपासुन बहुधा संख्या महत्वाची नाहीच आहे, या संस्थळाची प्रकृतीच तशी नाहीये. हे एक अनियतकालिकं होती मराठीत तशी, ऑफबीट, निश वगैरे म्हणता यावं तशा प्रकृतीच संस्थळ आहे. हे सर्व मान्य आहे,
तरीही गेले अनेक दिवसांपासुन एकुण जुन्या सदस्यांची लेख/प्रतिसादीय (लेप्र) सक्रियता फारच कमी झालेली आहे. त्याचप्रमाणे नविन सदस्यांची लेप्र सक्रियता जी काही अंशी तरी जुन्यांच्या लेप्र सक्रियतेची मोहताज आहे. ती देखील पुरेसे पाणी न मिळाल्याने एखाद दोन अंकुर फुटुन कोमेजुनच जात आहे असे जाणवते.
क्वांलिटी चा बळी देऊन क्वांटीटी चा ओढा या प्रकाराचा एकुण ऐसी च्या अंगभुत प्रकृतीला तिटकाराच आहे. किंव क्वांटीटी वाढली तर " कुछ तो गडबड है दया " हा रास्त स्केप्टीसीझम जरी असला तरीही
तरीही
एकुण ऐसी अक्षरे कोमात गेले की काय इतक्या मंद गतीने श्वास घेत आहे ही
योगनिद्रा आहे की कोमात आहे की हायबरनेशन मध्ये आहे ?
"अजून जीव आहे...!!"
"अजून जीव आहे...!!"
गो हाथो मे जुंबिश नही तो क्या
आखो मे तो दम है
रहने दो अभी सागरोमीना मेरे आगे
मराठी अनुवाद
बोटांमध्ये दम नुरला म्हणुन काय झाले गडे
डोळ्यात तर अजुन जान आहे
ऐसी ची हिरवळ राहु दे डोळ्यापुढे
धागा विणु शकलो नाही म्हणुन काय झाले
प्रतिसादांत तर बागडु दे गडे !
ऐसीचा दिवाळी अंक सोडल्यास
ऐसीचा दिवाळी अंक सोडल्यास ऐसीला विरक्ती आली आहे. खफवर अण्णा हातात मुंडासं घेऊन एकटेच लढत असतात, फक्त तोफा कडाडायचा अवकाश. जंतूंचे प्रात:स्मरणीय दर महिन्याला मन की बात करत असले तरी एरव्ही जंतू मौन सोडत नाहीत. अदितीला अजगराने पुरते घेरलेले दिसते. बाकी मुसु, नंदन आजकाल ऑस्करविनर चित्रपटांचे फक्त ट्रेलरच बिंजवॉचत आहेत असं ऐकून आहे. आबा आता दिवाळी अंकांपुरतेच उरतात की काय अशीही भिती वाटू लागली आहे. मनोबालादेखील कुणी मधूसुदन भगवान भेटलेत आणि विश्वरूपदर्शन झाल्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तरं मिळालेली दिसतात. मेघना आणि ऐसीची सोडचिट्ठी आधीच झाली असल्यामुळे ऐसी काही डेसिबलने कधीच कमी झाली आहे. आता फक्त अनंत यात्रींच्या अनंत कविता वाचायचं नशीबी आलेले आहे.
आयला आमच्या वेळेला, म्हणजे ९२
आयला आमच्या वेळेला, म्हणजे ९२-९३ साली मी सहावीत असतांना, हा सुविचार बराच बदलला होता ना. संजय दत्त होता त्या सुविचारात. आणि ते यमक? अर्रर्र.... ते तर अजिबातंच राहिलं नव्हतं. केस वाढवायचं तेव्हढं बरोबर राहिलं.
पण जोश्यांच्या स्वप्नीलने असा रोल केलाच कसा? म्हणजे शारुक कान ने असा रोल केलाय का आधी? नाही तर साहेब टुकार नक्कल कोणाची करणार?
केस वाढवण्याचं माहिती नाही पण
केस वाढवण्याचं माहिती नाही पण शारुकचे सुरुवातीच्या अनेक पिच्चरमध्ये भिलनचे रोल होते.
डर्रर्र- विथ जूही चावला
अंजाम- विथ माधुरी दीक्षित
बाजीगर इ. (अर्ध भिलन) - विथ काजोल
--------------------------------------------------
टीप: वरील सुविचारात प्रॉपर यमकजुळणीसाठी तो शब्द "देवानंद" असा लिहिणे आवश्यक असे. देव आनंद असे लिहून चालत नसे.
कदाचित...
...ते पुढल्या पिढीतले असल्यामुळे कंटेंपररी म्हणून त्यांना अमिताभ बच्चन म्हणून शिकविले असेल. यमकबिमक गेले तेल लावत.
(विवेकानंदांचे काय, म्हणून विचाराल, तर ते ऑल-टाइम प्राचीन आहेत. अगदी बाबा आदमच्या जमान्यापासून. बोले तो, श्री. आलोक नाथ हे कसे जन्मतःच बाबूजी म्हणून पैदा झाले, तद्वत. थोडक्यात, कंटेंपररी बनू नका, पुरातन व्हा, असा तो पुरातत्त्ववादी संदेश आहे. पारंपरिक हिंदू थेरडेशाहीकडून याहून वेगळी ती काय अपेक्षा करणार?)
मराठी शाळेतल्या मुलांकडून
मराठी शाळेतल्या मुलांकडून मराठी लेखनाची अपेक्षा धरल्यास तो कॅार्पसच पूर्वीच्या तीनचार टक्के उरला आहे. त्याच्यातून एकदोन टक्के संस्थळावर येणार हे गणित करायला नवनीत नको.
वावा चेंडु पाहा या गाण्याची जागा ज्याकअँडजिलने घेतलीय अगदी दूरच्या/शहरांपासूनच्या दूरच्या गावात.
शी प्लस प्लस
:D :D
इतकं होऊनही इतकं होऊनही आमच्या ऑफिसमधले लोक तावातावाने नोटबंदी वगैरेचं समर्थन करत असतात की विचारू नका.
एल्टीसीजी देताना आनंद होतो का असं विचारल्यावर मात्र गुळमुळीत उत्तरं देतात.
लेलिनचा पुतळा पडल्यावर दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली तेव्हा दोन बंगाल्यांनी बोलणंच बंद केलंय.
२०१९ पर्यंत काय काय होईल गोमाता जाणे.
मोदींची परराष्ट्रनीती यशस्वी
मोदींची परराष्ट्रनीती यशस्वी व प्रगल्भ आणि व्यापक आहे.
चारपाच चांगली उदाहरणे द्याल का - की मोदींची परराष्ट्रनीती प्रगल्भ आहे याची ? फक्त या देशाबरोबर संबंध बनवले, मजबूत केले असे मुद्दे नकोत. त्यामागची प्रगल्भता म्हंजे काय याची उदाहरणे द्या.
दुसरं म्हंजे - व्यापकता हे धोरण असते ते नेमके कसे ? सगळ्या देशांशी मस्तमस्त संबंध ठेवायचा यत्न करणे हे धोरण असते का ??
.
यशस्वी परराष्ट्रनीती म्हणजे
यशस्वी परराष्ट्रनीती म्हणजे आपल्या देशाचे इंटरेस्ट बहुतांश वेळा सांभाळले जाणे. आणि भविष्यातील उद्दिष्टांच्या साध्यासाठी आंतरराष्ट्रीय मोर्चेबांधणी करणे.
आपल्या देशाचे इंटरेस्ट तात्कालिक असू शकतात आणि दीर्घकालीन असू शकतात. तात्कालिक उद्दिष्टांमध्ये बहुतांश व्यापारी इंटरेस्ट असतात. पाकिस्तान/चीनच्या कारवायांचे नियंत्रण हे सार्वकालिक उद्दिष्ट आहे.
नेहरू पंप्र असताना जागतिक पातळीवरील राजकारणात भारताला "भूमिका" असावी असे उद्दिष्ट होते (असे वाटते). त्या उद्दिष्टाला तात्कालिक परिस्थितीमुळे खीळ बसत असे. पण भारताला भूमिका असावी या हेतुने अलिप्तराष्ट्र परिषद वगैरे गोष्टी नेहरूंनी केल्या. (त्याच वेळी तात्कालिक उद्दिष्टांसाठी अमेरिका किंवा रशिया यांना चुचकारण्याचे प्रकार चालू होते). १९६२ नंतर (की नेहरूंनंतर?) आंतरराष्ट्रीय राजकारणातून भारताने अंग काढून घेतल्यासारखे झाले. अलिप्तता चळवळ चालू होती पण तिचा भारताच्या आंतरराष्ट्रीय स्थानाला फार उपयोग नव्हता. (शेवटी गरीबांचा दादा !! ).
(इंदिरा गांधींच्या दुसऱ्या इनिंगमध्ये आणि) राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर भारताने आशियाचा दादा बनायचा प्रयत्न केला. पण तो थोडा ॲरोगंट आर्म ट्विस्टिंग प्रकारचा होता. फार काही यश मिळाले नाही.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भूमिका घेण्याचा विचार करण्याची सवड मधल्या काळातल्या सरकारांना मिळाली नाही असे असेल का?
नेहरूंनंतर शास्त्रींचा काळ सोडला तर इंदिरा गांधींच्या पहिल्या इनिंग मध्ये त्यांची पक्षावर मजबूत पकड झालेली नव्हती. तसेच जयप्रकाश नारायण वगैरेंच्या आंदोलनामुळे सरकारची बरीच शक्ती स्वत:च्या सर्व्हायव्हलसाठी खर्च होत होती. राजीव गांधींना तो प्रश्न फारसा नव्हता. त्यानंतर व्ही पी सिंग ते ममो सिंग यांच्यापर्यंत सर्व सरकारे सर्व्हायव्हिंग बाय द डे/मंथ होती.
आता मोदींना पुन्हा ती सवड मिळाली आहे.
खरय.
खरय.
खरय.
भाजपच्या रेट्यापुढे काही पक्ष दिल्लीतला अधिकृत सरकारी बंगलाही घालवून बसलेत. पक्ष चालवण्यासाठी आसरा नको का?
दीदी,काका एकाच बैठकीत विचारविनिमय करताना पाहून बरं वाटलं.
दीदीला/डाव्यांना कारखाने नकोत पण नोकय्रा द्यायच्या आहेत. ते कसं काय करणार? सरकारी निगमांची अवस्था आता काये?
चीनच्या कॅाम्युनिझमची चुणूक बिजिंग ओलिंपिकमध्ये दिसली इतका कॅाम्यु० अवगुंठित प्रगल्भ साम्राज्यवाद भारतात शक्य आहे का? फुकटचे बसून पेन्शन कसे मिळेल एवढीच इच्छा ठेवायची पण जगाच्या मागे राहायला तयार अशी मानसिकता इथे आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भूमिका
आंतरराष्ट्रीय स्तरावर भूमिका घेण्याचा विचार करण्याची सवड मधल्या काळातल्या सरकारांना मिळाली नाही असे असेल का?
राव सरकारने इस्राएलशी राजकीय संबंध सुरु केले. बाकी इंदिरा गांधींना, आपल्या विरोधकांचा नि:पात करणाऱ्या इंदिरा गांधींना १५ वर्षात सवड मिळाली नाही हे पचायला जड आहे.
राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर भारताने आशियाचा दादा बनायचा प्रयत्न केला. पण तो थोडा ॲरोगंट आर्म ट्विस्टिंग प्रकारचा होता. फार काही यश मिळाले नाही.
उलट अंगाशी आला तो प्रयत्न. (रा.गांच्याच !)
तुलना
++ . बाकी इंदिरा गांधींना, आपल्या विरोधकांचा नि:पात करणाऱ्या इंदिरा गांधींना १५ वर्षात सवड मिळाली नाही हे पचायला जड आहे.++
१९६७ ते १९७०-७१ इंदिरा गांधी आपले डळमळीत पक्षांतर्गत स्थान मजबूत करण्यात व्यग्र असाव्यात .
१९७०-७१ च्या काळात संपूर्ण वेस्ट ब्लॉक भारताच्या विरोधी ( प्रो पाकिस्तान , निक्सन किसिंजर एरा ) असताना बांगला देश मुक्तीचे युद्ध चालू असण्याच्या काळात आपले मर्यादित उद्दिष्ट अत्यंत सक्षमपणे पार पाडणे हे अवघड काम असेल असे वाटते .
वेस्ट ब्लॉक संपूर्ण कट्टर विरोधात असताना सोविएत रशिया च्या बाजूला जाऊन आपला कार्यभाग साधणे हे मोठे परराष्ट्र नीतीचे यश म्हणावे असे वाटते .
१९७२ युद्दातून बाहेर पडल्याच्या लगेच नंतर ऑइल एम्बार्गो ज्यात आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती एकदम तिप्पट झाल्या. त्यामुळे अर्थातच महागाई अतोनात वाढणे वगैरे प्रकार झाले असावेत ज्याची परिणती त्यानंतर हळूहळू वाढत १९७५ च्या सुमारास पीक ला गेलेल्या जन आंदोलनात झाली. असावी .
( आज तेलाचे दर एक तृतीयांश झालेले असतानाही अर्थव्यवस्था मार्गावर ठेवण्यात येणाऱ्या अडचणी बघितल्या तर त्या काळातील अडचणी समजता येऊ शकतील .)
१९८० नंतर तीन वर्षे तशी स्थिर म्हणावीत अशी , पण तरी खलिस्तान चळवळीमुळे आलेला टेररिसम हि मोठी समस्या होतीच.
तुलनेने देशाची स्थिर व आर्थिकदृष्ट्या संपन्न परिस्थिती असताना परराष्ट्र नीती व उपरिनिर्दिष्ट काळातील परराष्ठ्रनीती यांची तुलना करणे अयोग्य वाटते .
या काळातील सामाजिक , राजकीय आणि जागतिक आर्थिक घटनांबद्दल थोडे वाचन केल्यास फायदा होईलसे वाटते .
बाकी जास्त माहिती नाही मला,मी लहान होतो . पण आचरट बाबा , तिरसिंगराव , कोल्हटकर वगैरे या काळात जाणत्या वयात असलेल्या ज्येष्ठानी या बाबत मत व्यक्त करावं .
जिएसटी
जिएसटी
इमारतीचं काही काम केलं त्या कामाला, परंतू कंत्राटदार म्हणतो वीस लाखांपेक्षा कमी (त्याचे टोटल वर्षाचे टर्नोवर इतके नाही) असल्याने मला नाही.
१) असंबी हाय का?
२) म्हणजे पावतीवर काय लिहायला हवे?
not applicable /without GST?
काही काम - स्ट्रक्चरल ओडिट*
नाही
पिडिएफ चे कॉपीराइट adobeकडेच आहे का? म्हणजे फाईल इक्सटेंन्शन डॉट पिडिएफ वापरणे?
पेटंटेड आहे पण कॉपीराइट नाही.
Public License
Adobe grants every individual and organization in the world the royalty-free right, under all Essential Claims that Adobe owns, to make, have made, use, sell, import and distribute Compliant Implementations.
अधिक माहिती इथे.
पीडीएफ प्रिंट
ते पेटंट पंधरा वर्षांनी संपल्यावरच दुसय्रा कुणाला 'प्रिंट करता येण्यासारखे डॅाक्युमेंट' करता येईल?
कुणालाही पीडीएफ इम्प्लिमेंट करायचा हक्क आहे. म्हणून वर्ड किंवा तत्सम कित्येक प्रणालीतून पीडीएफ फाईल एक्सपोर्ट करता येते.
लाटेकची फाइल dot div अशी सेव होते असं वाचलं. तर हीसुद्धा प्रिंट होईल?
पीएस किंवा पीडीएफ फाईल प्रिंट करता येतात. डिव्ह फाईलपासून पीएस किंवा पीडीएफ कन्व्हर्जनसाठी प्रणाली उपलब्ध आहेत.
The Dreams of Tipu Sultan.
The Dreams of Tipu Sultan. हे गिरिश कार्नाड यांच नाटक कोणी वाचल/ बघितलय का ? यावरची जनतेची मते जाणुन घ्यायला आवडेल.
शोधगंगा वर हा पेपर आहे त्यातील ही माहीती
It was A. K. Ramanujan who drew Karnad’s attention to the dreams Tipu recorded, the original of that are now in th India House Library in London. Karand also selects, “Tippoo’s Dream Book,” for his source material to rebuild Indian History and to review the grand personality of Tipu with a modern perspective. This book was found in his palace after his death. It preserves the record of his never told dreams maintained till the last day of his life which Munshi Habibullah stumbled upon at the palace, and which was cast aside by Colonel Colin Mackenzie considering as ‘an odd little book a pleasantly inconsequential conversation piece The words written on its first page in the Sultan’s own hand were “In this register are recorded the dreams I’ve had and am having.” His last dream must have been recorded on a piece of paper which he handed to Kirmani in a sealed envelope with the instruction to keep it till he came back. He could never
come back because it was his final battle with the English on the 4th May, 1799. Kirmani reveals:
“I forgot all about the letter. Naturally, with all that followed. Next day, I found it in my pocket. Reluctantly, I broke open the seal. Inside was a paper on which he had recorded the dream he had had the previous night. His last dream.” This dream book thus becomes a metaphor for an exploration of man behind the curtain of a warrior. But unfortunately his visions and dreams do not find fulfillment.
शोधगंगा वर जो पेपर आहे त्याचा दुवा
http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/24123/5/05_chapter%20…
गिरीश कार्नाड म्हणतात्
Karnad says
–
“What I find fascinating is the fact that Tipu Sultan , who practically spent forty nine years of his life on horse back, recorded his dreams and kept them under his pillow.”
He admits, “The plot obviously had to deal with some aspect of Indo–British relations and I immediately thought of Tipu Sultan, one of the most politically perceptive and tragic figures in modern history.”
Music to my ears
तांबड्या रंगाने रंगवलेले वाक्य एकदम मार्मिक आहे. ते पूर्ण बरोबर आहे असं नाही. पण.....
Coming back to socialism, arithmetic somehow refuses to be convinced. Most countries fold at the free food stage itself. Disappear. America collapsed in 2008 because of Housing for all programme. Europe is disappearing at the free healthcare and old age pension stage- people there have figured out that if govt is to take care of them in old age, and sex is available off the shelf, why go to the trouble of marrying and raising children. Fertility rate in Europe is now below 1.5. In desperation, they are trying to import the young, the future tax payers to fund their old age entitlements they voted to themselves; from the third world. Good luck with that.
.
.
लेखाच्या शेवटी जो अति अलार्मिस्ट टोन आहे तो न पटणारा आहे.
.
लेखात लेफ्टीस्टांना दोष देण्यात आलेला आहे. मुळात त्यांना दोष देणे हा पलायनवाद आहे.
दोष मुख्यत्वे, व प्राधान्याने लेफ्टिस्टांना दिला जाऊ नये.
.
---
.
या विषयावर नवीन पुस्तक नुकतेच प्रकाशित झालेले आहे. -
.
The High Cost of Good Intentions: A History of U.S. Federal Entitlement Programs
.
स्टॉक मार्केट संदर्भात एक प्रश्न पडलाय
सध्या स्टॉक मार्केट चे फंक्शनींग समजुन घेतोय. तर फ्युचर च्या व्यवहारांचा बेसीक समजुन घेतला. तर तो असा की समजा मला एक इन्फोसीसचा फ्युचर्स चा व्यवहार करायचा आहे. तर नियमाप्रमाणे ठराविक लॉट घ्यावे लागतात (जे वेगवेगळ्या संख्येचे असतात जसे १२५ वा २०० इ.) त्यानंतर % ऑफ मार्जिन अगोदर भरावे लागते जे वेगवेगळे असते उदा. १८% समजा मी मार्जिन अमाउंट भरतो. त्याबदल्यात मला उर्वरीत पुर्ण रकमेचा लिव्हरेज मिळतो वगैरे. म्हणजे मी या स्टेज पर्यंत आलोय. आता या मार्केट मध्ये तर सेलर्स लॉस = बायर्स प्रॉफिट किंवा उलट हे तत्व आहे. म्हणजे दोन्हीकडुन एक्झॅक्ट व्यव्हार बॅलन्स होतो शिवाय एक्स्पायरी डेट को सौदा तोडना पडता है. तर मला एक कन्फ्युज अस झालय की सौदा तोडण्याच्या दिवशी उर्वरीत लिव्हजेज ची रक्कम (ज्याची हमी रेग्युलेटरची असते ) तो रेग्युलेटर ती एन्शुअर कशी करतो.
तर मी इथपर्यंत आलोय. पुढे मार्केट टु मार्केट चा मुद्दा येतोय इथे जरा समजत नाही.
कोणी प्लीज समजावुन सांगेल का ?
प्रश्न असा आहे की रेग्युलेटर कसे एन्शुअर करतो की शेवटी सर्वांच्या खिशात योग्य रक्कम जाईल ?
म्हणजे उत्तरही नाही दिले सविस्तर तरी चालेल पण कोणत्या टर्म्स कन्सेप्ट अभ्यासल्या तर हे समजुन घेणे सोपे जाइल.
किंवा टॉपिक ऑफ स्टडी नेमके कोणते घेतले पायजे तेवढ सांगा जेणेकरुन यंत्रणा समजेल.
निळु भाऊ फारच मस्त सोर्स पुरवलाय तुम्ही
हे फारच झकास मोड्युल्स आहेत. बेसीक्स मध्ये नविन नाही आढळल पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे चौथा वाचायला सुरुवात केलीय.
फारच सुंदर सोपी सुटसुटीत भाषा उदाहरणे आहेत. माझ्यासारख्या नवशिक्याला तर खजिना भेटल्यासारखा आनंद वाटला.
खर म्हणजे मी एक एक कन्सेप्ट घेत गुगलुन चार ठिकाणाहुन जमवुन वाचत होतो. आत यात एकदम सुसुत्र व्यवस्थित टॉपिक बाय टॉपिक मोड्युल ॲरेंज केलेले आहेत. त्यामुळे विषय नीट समजतोय. माझी बरीच उत्तरे यातच गावतील असे वाटतेय.
पुन्हा एकदा अनेक धन्यवाद !
आज भाषणात आदरणीय मोदीजी
आज भाषणात आदरणीय मोदीजी म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेस ने पाडले पण श्यामाप्रसाद मुखर्जींच्या मुळे ते राज्यसभेत गेले . काँग्रेस उमेदवाराकडून ते लोकसभा निवडणुकांमध्ये दोनदा पराभूत झाले हे माहीत होतं. पण हे श्यामाप्रसाद मुखर्जींमुळे वगैरे खरं आहे का ?
कोण सांगू शकेल ?
बहुभाषिक विनोद - एक पृच्छा
हा विनोद त्यातली मजा न घालवता मराठीत अनुवादित करणे बहुधा अशक्य असावे (चूभूद्याघ्या), परंतु, अशा पठडीतला एखादा मराठी विनोद कोणास ठाऊक आहे काय? कोणी सांगू शकेल काय?
(सहज कुतूहल म्हणून.)
..........
(विनोद कळला नसेल तर विचारा, हात वर करा. (सवडीनुसार) मराठीतून समजावण्याचा - अगदी पंचलाइनीच्या मराठीतून स्पष्टीकरणासह - जमेल तितका प्रयत्न करेन. मग भले पंचलाइनीचा पचका होऊन विनोदाचा विचका झाला तरी बेहत्तर. पण विनोदाकडे कृपा करून दुर्लक्ष करू नका, मायबाप! विनोदानंतरचा प्रश्न (कुतूहल म्हणून) आत्यंतिक गांभीर्यपूर्वक विचारलेला आहे. धन्यवाद.)
केस कसे?
>>> परंतु, अशा पठडीतला एखादा मराठी विनोद कोणास ठाऊक आहे काय? कोणी सांगू शकेल काय?
१. एका अन्य संकेतस्थळावर, कुणी एक सदस्या घरी फ्रेंचचा सराव करत असताना तिच्या बहिणीने तिचा फ्रेंच प्रश्न ऐकून, 'बरे आहेत की. विंचरायचेत तर विंचर' असं काहीसं उत्तर दिल्याचा किस्सा वाचला होता. तो प्रश्न: qu'est-ce que c'est? (उच्चारी: केस कसे?) :)
२. देशी नवरा आणि इंग्रज कलेक्टर (भायखळ्याच्या स्टेशनावर तिकीटं गोळा करणारा!) यांचा एक काल्पनिक संवाद 'बायकुला तू खाली आण' (पक्षी: 'भायखळा ते कल्याण') या वाक्याने, एका इनोदात, संपन्न होत असे. आता मूळ इनोद पूर्णपणे आठवत नाही, पण तो साधारण करमरकर साहेब म्हणजे डू-डाय-डू साहेब या दर्जाचाच असावा.
बाकी एका भाषेतले शब्द/उच्चार आणि दुसऱ्या भाषेत निराळाच अर्थ यावर विनोद रचायचेच म्हटले तर मराठीत नवरा (गुजरातीत: रिकामटेकडा), तेलगूत रंडी (अर्थ: या), गुजराती माकड (मराठी: ढेकूण), जर्मन आबा (अर्थ: परंतु), तमिळ मोर/पाल (ताक/दूध) इ. अनेक पर्याय आहेत.
धन्यवाद!
- 'केस कसे'करिता एक संभाव्य उत्तर 'पांढरे' असेही असल्याचे ऐकिवात आहे.
- 'बायकुला तू खाली आण' विनोदातील पुढील संवाद 'उष्टं पीठ देऊन टाक' ('यू स्टुपिड, डोंट टॉक') असा असल्याचे अंधुकसे स्मरते. विनोद टुकार होता, हे सांगणे अर्थातच नलगे.
- एकदा एक तेलुगू सद्गृहिणी एका तेलुगू सद्गृहस्थांस सहास्यवदने 'मी रंडी. रेप!' असे ऐकविताना पाहून उपस्थित त्रयस्थांस अचंबा जाहला. अधिक चौकशीअंती, त्या संभाषणाचा मराठी तर्जुमा साधारणतः 'तुम्ही या. उद्या.' असा असल्याचे कळले.
- गुजरातीभाषिकबहुल एडिसन (न्यूजर्सी) येथील लोकसंख्येतील तेलुगूभाषिकांचे प्रमाण वायटूकेनंतर अचानक वाढले. म्हटल्यावर स्थानिक देशी व्यापाऱ्यांनी त्याची दखल घेऊन स्थानिक रेडियोवरील आपल्या जाहिरातींत तेलुगू वाक्यांची पेरणी करावयास सुरुवात केली. नि मग रेडियोवरून 'श्री ज्युवेलर्स की रंडीऽऽऽऽऽऽ' ('श्री ज्युवेलर्सकडे याऽऽऽऽऽऽ') अशा जाहिराती ऐकू येऊ लागल्या. त्यावर, 'श्री ज्युवेलर्सनी आपला बिज़नेस डायव्हर्सिफाय केला वाटते' अशी एका स्थानिक सज्जनांची प्रतिक्रिया झाल्याचे ऐकिवात आहे.
असो.
एक
भारत-ऑस्ट्रेलिया यांचा क्रिकेट सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये बाळासाहेब ठाकरे बसलेले असतात. भारताची ब्याटिंग चालू असते. सचिन एक सिक्सर ठोकतो. बॉल ठाकऱ्यांच्या जवळ येऊन पडतो. सीमेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या मॅकग्रा ठाकऱ्यांना ओळखत असतो. तो जोरात ओरडतो 'बॉल टाकरे'. ठाकरे बॉल परत स्टेडियममध्ये टाकतात.
अक्षरश: भयावह
https://9gag.com/gag/a7rj9Wb?ref=fbp
हे पहा. मागे एकदा जपानच्या अशाच प्रॉब्लेमबद्दल वाचलेलं तेव्हा अंगावर जो काटा आलेला त्या तुलनेत हे अजूनच भयंकर आहे.
कवी म्हणे आतून
आज फेसबुकवर वाचायला मिळालेला मराठीचा एक नमुना -
नाॅन इंटेलेक्च्यूअली डिरायव्हेबल,शब्द किंवा कल्पना यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेतून अस्तीत्वाच्या रहस्यावर प्रकाश पाडणारी,शहाणिवेचं डिस्टीलेट नाॅन पाउटींग आपल्याआपल्यालाच सांगणारी कविता आतून आलेली असते.
त्यात कमीजास्त जरुरीप्रमाणे,कविच्या क्षमतेनुसार तोडजोड असते पण कोअर आयडीया ही पॅरानाॅर्मली सुचलेली असते.
स्रोत इथे
समजेलशा भाषेत
टाईम्सच्या शब्दकोड्यांत जसे, साधे आणि क्रिप्टिक क्लू असतात, तसे ते, मला या वाक्यांत दिसले. म्हणून भाषांतरेही दोन झाली.
१. फारसा विचार न करता, सुचलेल्या शब्द वा कल्पना, यांच्या वैशिष्ठ्यपूर्ण रचनेतून आस्तित्वाच्या रहस्यावर प्रकाश पाडणारी, शहाण्या जाणिवेचा अर्क, तोंड न वेंगाडता, आपल्याआपल्यालाच सांगणारी कविता आंतून आलेली असते.
त्यांत, कमीजास्त जरुरीप्रमाणे, कविच्या क्षमतेनुसार तोडजोड असते, पण मूळ कल्पना ही अतार्किकतेतून सुचलेली असते.
२. कॅलक्युलसही न येणार्या, एखाद्या सामान्य, व्यक्तिचे शब्द वा कल्पना यांच्या वैशिष्ठ्यपूर्ण रचनेतून, आस्तित्वाच्या रहस्यावर प्रकाश पाडणारी, मेंदूरुपी शहाळ्याचे उर्ध्वपातन करुन, पावटे सुद्धा न खाता, आपल्याआपल्यालाच सांगणारी कविता, आंतून आलेली असते.
त्यांत, कमीजास्त जरुरीप्रमाणे,सोडा घालून, कविच्या क्षमतेनुसार तोडफोड असते, पण मूळ कल्पना एखाद्या अतृत्प्त आत्म्यामुळे सुचलेली असते.
इ-सकाळ मधल्या प्रतिक्रिया
गेले काही महिने मला इ-सकाळ मधल्या वाचकांच्या प्रतिक्रिया वाचता येत नाहीत. त्यांनी त्या इ-व्हर्शनमध्ये दाखवणं बंद केलंय आणि म्हणून कुणालाच वाचता येत नाहीत की फक्त मलाच वाचता येत नाहियेत, कुणी जाणकार सांगेल का?
कारण सकाळ मधल्या वाचकाच्या प्रतिक्रिया (विशेषत: मुक्तपीठातल्या) अतिशय वाचनीय असतात, किंबहुना त्यातल्या बातम्या किंवा लेखांपेक्शा!
:)
प्रतिक्रिया दाखवणं बंद?
सुरवातीला काही २-३ प्रतिक्रिया दिसतात, त्यानंतर खाली अधिक नांवाचे बटन येते. ते दाबल्यावर पूर्वी आणखी प्रतिक्रिया दिसायच्या. आता त्या दिसत नाहीत.
तुमच्यापैकी कुणी त्या सायटींवर खातं बनवून मग प्रतिक्रिया पाहण्याचा प्रयत्न केला आहे का? प्रतिक्रियांचं वाचनमूल्य लक्षात आल्यामुळे त्यांनी त्या केवळ नोंदणीकृत सदस्यांना दाखवून त्याद्वारे काही तरी बिग डेटा वगैरे करण्याचा प्रयत्न चालू केला असावा असा माझा संशय आहे.
काय सांगता काय ?
अहो, त्यांची प्रेरणा- साक्षात देव साहेबांनीही हे डेरिंग केले नव्हते. चॉकलेट हिरोचा व्हिलन ? चॉकलेटचे फार फार तर बिटर चॉकलेट होऊ शकते, कारलं कसं होईल ?
फक्त एकच सल्ला द्यावासा वाटतो. व्हिलन झाल्यावरही आपल्या दैवताप्रमाणे मान हलवण्याचं सोडू नका. लहान मुलांची सहाव्या महिन्यापर्यंत मान डुलायची थांबते, देवसाहेब त्याला अपवाद होते.