कॉन्स्पिरसी थिअरीज
आत्ताच फेसबुकवर एक कॉन्स्पिरसी थिअरी वाचली.
गणपती झाले...
दसरा दिवाळी येत आहे.
मिष्टान व मिठाईचे दिवस..
विदेशी चॉकलेट्स चा खप वाढावा म्हणून आता खव्या वर धाडीचे सत्र सुरु होणार..
बनावटी खवा,.भेसळ युक्त खवा जप्त अश्या बातम्या झळकणार..
उद्देश हाच की चोकलेत्स भेट म्हणून द्या ..
पारंपारिक मिठाई नको...............................
म्हटलं आपल्याला अशा कॉन्स्पिरसी थिअर्या बनवता येतात का पाहू.
मी पण बनवल्या आहेत काही थिअर्या.
१. स्त्रीमुक्तीचा प्रचार सुरू झाला.
नोकरी करणारी स्त्री कशी थकते आणि तिच्याकडून मोदक, पुरणपोळ्या, दिवाळीच्या फराळाचे पदार्थ करण्याची अपेक्षा करणे कसे चुकीचे आणि अन्यायकारक आहे हे मध्यमवर्गीयांच्या मनावर बिंबवले गेले.
उद्देश हाच फराळ, मोदक, पुरणपोळ्या (आणि इतर खाद्यपदार्थ) करून देणार्या व्यावसायिकांचा धंदा चालावा.
२. पूर्वी सर्व लेखन, परीक्षेच्या उत्तरपत्रिका, बँकेचे चेक वगैरे फाउंटन पेनाने करावे लागत असे.
नंतर बॉलपेनाने लिहायची परवानगी दिली गेली.
उद्देश हाच की काळे आणि म्हात्रे या मराठी व्यावसायिकांचा धंदा बसावा.
३. स्वातंत्र्याच्या काळात नेत्यांकडून स्वावलंबनाची शिकवण दिली गेली.
लोक घरच्या घरी स्वतःच दाढी करू लागले.
उद्देश हाच की न्हावी समाजाचा व्यवसाय गोत्यात यावा. (गुरू नानकांचासुद्धा हाच उद्देश होता की काय ते ठाऊक नाही. इतक्या मागचा इतिहास तितकासा ज्ञात नाही).
पाहूया सदस्यांना आणखी किती कॉन्स्पिरसी थिअर्या बनवता येतात....
पाणी
भारतातील, पाण्याच्या अशुद्धतेबद्दल वृत्तपत्रांत वारंवार लेख येत असतात.
त्यामुळे घाबरुन जाऊन नवश्रीमंत वर्ग बाहेर कायम बॉटल्ड पाणी पितो. अर्थातच मिनरल वॉटर विकणार्या कंपन्यांचा प्रचंड फायदा. अशी सवय लागलेल्या व्यक्तीने चुकून कुठे साधे पाणी प्यायलेच तर इम्युनिटी कमी झाल्यामुळे त्याला लगेच इन्फेक्शन होणार आणि पुन्हा एकदा - डॉक्टरांचा प्रचंड फायदा आणि ते जी औषधे लिहून देतात त्या औषध कंपन्यांचा अतिप्रचंड फायदा!!!
डायपर जाहिरातीतील गोग्गोड बाळे!!
डायपरच्या जाहिराती टीव्हीवर सतत पाहून, हल्लीच्या माता लहान बाळांना चोवीस तास डायपर लावून ठेवतात. त्यामुळे त्या कंपन्यांचा प्रचंड फायदा आणि त्याचा साईड इफेक्ट म्हणून, बाळाला त्या जागी पुरुळ, रॅश आणि युरिनरी इन्फेक्शन झाल्यामुळे, पुन्हा एकदा डॉक्टर आणि औषध कंपन्यांचा फायदा.
सध्ध्या एवढेच!
आमचाही प्रयत्न
कोक आणि पेप्सीमधलं जंतूनाशकांचं प्रमाण अधिक असल्याची आवई नारळ आणि कोकमवाल्या केरळी/कोकणी लोकांनी उठवली होती.
पुढचं अंमळ अडल्ट आहे.
सविता भाभीच्या कार्टून्समधून स्त्रिया आणि समलैंगिकांनाही आनंद मिळतो हे न बघवून स्त्रीद्वेष्ट्या आणि होमोफोबिक लोकांनी संस्कृतीरक्षकांना हाताशी धरून त्या संस्थळावर बंदी आणवली.
ते सोप्पंय.
ते सोप्पंय. त्याच्या दोन थिअरीज आहेत.
एकतर मराठी विरुद्ध हिंदी भाषिक असा संघर्ष पेटवायचा आणि त्यातून (माझ्या मते बेचव) बंगाली पाणीपुरीसाठी अवकाश निर्माण करायचं हे एक.
आणि दुसरं, वडापावकडे अभिजनवर्ग बहुजनांचं अन्न म्हणून बघतो. अभिजनांची आवडती पण चोरून चैन करायची सवय, पाणीपुरी, तीच हद्दपार केली तर मराठी वडापाव अभिजनांचं खाद्य होऊ शकेल आणि मग मराठी भाषा अभिजात आहे हे जाहीर होण्यातल्या अडचणी कमी होतील. म्हणजे तसं म्हटलं तर मराठी भाषा अभिजात आहेच, सरकारकडून जाहीर झालं की मग गंगेत घोडं न्हालं ना. (हवंतर गंगेला हुगळी किंवा गोदावरी म्हणा, आपल्याला काय!)
पाणीपुरीच्या तांब्याचा व्हिडो हे मी चुकून बालाजी तांबे असं वाचलं ...
लिम्बॉ
१. ओबामा पुन्हा निवडून यावा म्हणून अल-कायदाने ओसामाचा बळी दिला.
२. रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन अडचणीत आणण्यासाठी वादळ टॅम्पा शहराच्या दिशेने वळवण्यात आले.
३. भावी अध्यक्षीय उमेदवार रॉमनीला बदनाम करण्यासाठीच डीसी कॉमिक्सने त्यांच्या व्हिलनचे नाव नव्वदच्या दशकात 'बेन' असे ठेवले.
.....
या आणि यासारख्या सुपीक कॉन्सिपरसी थिअरीजचा जनक अर्थातच रश लिम्बॉ :)
रमाबाई,
रमाबाई, फडके-खांडेकर म्हणायचे असावे तुम्हाला. कारण प्रल्हाद केशव ऊर्फ आचार्य अत्रे हे कोकणस्थ ब्राह्मण नव्हते - (म्हणजे देशस्थ ब्राह्मण होते, पण कुठले का असेनात?- ब्राह्मणच होते हे मात्र खरे - आता 'खरे' हेसुद्धा को.ब्रा. आडनाव आहे तेव्हा कोब्रांचाच जय होतो ('सत्यमेव जयते')हे त्रिकालाबाधित सत्य आहे)- असे खूप पूर्वी 'कर्हेच्या पाण्यात' वाचल्याचे आठवते. आता माझेही (कदाचित तुमच्याइतकेच) वय झाल्याने स्मृती थोडा दगा देते आणि विनाकारण विषयांतरही होते.. ;)
फेसबुकी
चिंतातुर जंतुंच्या महत्वाच्या आणि रोचक लेखावरुन लक्ष हटवण्यासाठी थत्तेंनी फेसबुकी* धागा सुरु केला आहे.
*फेसबुकी - कसाही अ/न/र्थ लावावा.
कैच्याकै
लोकांनी इंटरनेटवरचे साहित्य वाचून त्याचे मुल्यमापन केले तर काही जालसम्राटांच्या अनभिषिक्त साम्राज्यावर गदा येईल
लोकांनी इंटरनेटवरचे साहित्य वाचून त्याचे मूल्यमापन केले, तर फार फार तर त्यांचा वेळ काहीतरी निरुपयोगी करण्यात फुकट जाईल. जालसम्राटांवर काडीमात्र फरक पडणार नाही.
किंवा झालीच, तर 'मूल्यमापक'/'टीकाकार' जाँरमधल्या जालसम्राटांची नवी साम्राज्ये निर्माण होतील. (पण तशी शक्यता कमी वाटते. पब्लिकचा टॉलरन्स मूल्यमा'पका(ऊं)'करिता फारसा असावासा वाटत नाही.)
आणखीन् दोन...
१. पूर्वीही धो-धो पावसामुळे मुंबईतील लोकल्स प्रवासाचा बोर्या वाजत होताच. पण मिडियाने हल्ली तो एक 'इव्हेन्ट' बनविला आहे.
त्याला कारण मोबाईल फोनचे महत्व आईबापांच्या मनावर चांगलेच ठसावे. आयटी हमाल असलेला मुलगा मुलगी कुठेही असली तरी मोबाईलवरून मध्यरात्रीही क्षणाक्षणाला वार्तांकन देत असतो. मोबाईलचा प्रचंड खप कसा होईल हे चाणाक्षपणे सेल कंपन्यांनी ओळखून मिडियाशी हातमिळवणी केली.
२. पूर्वीही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने व्हायचेच. पण ज्या स्पोर्टस चॅनेलकडे प्रसारणाचे हक्क आहेत त्यांच्याच 'बातमी' सेक्शन मिडियाने त्याला 'वॉर' चे रूप दिले. एक फालतू टी-२० चा सामना, पण तो चालू होण्यापूर्वीच या जगात त्याच्याशिवाय महत्वाचे काहीच नाही, हाच गेली दोन दिवस ठणाणा.
कारण ? या देशातील एक अब्ज जनतेला उल्लू बनवून एरव्हीच्या मॅचेसना ५० जाहिराती असतील तर आजच्या मॅचला ५०० जाहिराती येणार म्हणजे येणारच, शिवाय रेटही घसघशीत.
सध्या तरी याच दोन कॉन्स्पिरसी थिअरीज वरील धाग्यात अॅड करतो.