फेसबुकवर पोस्ट शेअर करताना पोस्टकर्त्याची परवानगी घेणे कायदेशीर / अधिकृतपणे आवश्यक आहे का?
फेसबुकवर पोस्ट शेअर करताना पोस्टकर्त्याची परवानगी घेणे कायदेशीर / अधिकृतपणे आवश्यक आहे का?
हा प्रश्न माझ्या मनात बराच काळ रेंगाळत राहिला. फेसबुकावर शेअर हा पर्याय खुला आहे. एखाद्याने फेसबुकावर लिहिलेली पोस्ट वाचण्यासाठी पोस्टकर्त्याची परवानगी लागत नाही. ते लाईक करण्यासाठीही पोस्टकर्त्याची परवानगी लागत नाही. फेसबुकावर जे काही तांत्रिक सेटिंग केले असेल त्या प्रमाणे पात्र व्यक्ती प्रतिक्रियाही देउ शकते. त्यासाठी पण परवानगीची आवश्यकता लागत नाही. बरेच लोक आपल्याला आवडलेले किंवा ज्याची चर्चा व्हावी असे वाटते ते लेखन / पोस्ट लेखकाच्या परवानगी शिवाय शेअर करतात. लेखकही त्यावर आक्षेप घेत नाही. कौतुक केलेले लेखन शेअर केल्यास लेखकालाही मनातूना आनंद होत असल्याची शक्यता अधिक आहे.वाचकाने कौतुक केले की बहुसंख्य लेखकाला बरच वाटत. जीएंसारखा एखादा विक्षिप्त प्रतिभावान त्याला अपवाद असू शकतो. मला त्याविषयी माहित नाही. मला एखाद्या लेखकाचे साहित्य कुणी वाचायला दिले व मी ते वाचून दुसर्या एखाद्या मित्राला वाचायला दिले कि वाचून दाखवले तर मला लेखकाची परवानगी घ्यावी लागत नाही. लेखकाने लिहिलेला मजकूर मी त्याच्या नावे अवतरणात जशाच्या तसा उधृत करुन तो चर्चेसाठी घेतला तर मला लेखकाच्या परवानगीचे गरज नाही.
एखाद्या लेखकाचा मजकूर कॉपी पेस्ट करुन स्वत:चा म्हणून खपवणे हे कुणीही नैतिक व कायदेशीर दोन्ही पातळीवर आक्षेपार्ह मानेल. पुर्वी बौद्धीक संपदेबाबत उपक्रमावर फेअर युज या प्रकाराविषयी चर्चा झाली होती. आत्ता हा मुद्दा घेण्याचे कारण म्हणजे ऐसीकरिण मेघना भुस्कुटे च्या फेसबुक भिंतीवर हा थोडा उपचर्चेचा विषय झाला. त्यात तिने अशी परवानगी घेणे हे कायदेशीर/ अधिकृत दृष्ट्या आवश्यक आहे असे मत व्यक्त केले आहे. आपणास काय वाटते?
संदर्भ?
आत्ता हा मुद्दा घेण्याचे कारण म्हणजे ऐसीकरिण मेघना भुस्कुटे च्या फेसबुक भिंतीवर हा थोडा उपचर्चेचा विषय झाला. त्यात तिने अशी परवानगी घेणे हे कायदेशीर/ अधिकृत दृष्ट्या आवश्यक आहे असे मत व्यक्त केले आहे.
फेसबुक चर्चेचा दुवा दिलात तर मेघनाचं म्हणणं ससंदर्भ समजून घेता येईल.
जर फेसबुक पोस्टचा शेअर पर्याय मूळ लेखकाने खुला ठेवला असेल आणि पोस्ट पब्लिक केली असेल, तर शेअरचा पर्याय वापरण्याआधी मूळ लेखकाची परवानगी का घ्यायला हवी ते मला समजलं नाही. जर पोस्ट पब्लिक नसेल, तर ती केवळ शेअर केली असता (जिथे शेअर केली असेल तिथेही) मूळ परवानगीनुसार दिसत असावी असा माझा अंदाज - उदा. मी एखाद्याला ब्लॅाक केलं असेल तर माझी पोस्ट इतर कुणी शेअर केली तरी मी ब्लॅाक केलेल्याला दिसत नसावी. त्यामुळे नक्की कशासाठी परवानगीची आवश्यकता आहे ते स्पष्ट केल्याशिवाय मुद्दा नीट कळत नाही.
फेसबुकवर शेअर करण्याआधी
फेसबुकवर शेअर करण्याआधी लोकांनी परवानगी घ्यावी अशी फेसबुकची इच्छा नसावी.
हो पण पोस्टकर्त्याची इच्छा असेल तर? व त्याची तशी इच्छा आहे हे वाचणाऱ्याला समजले नाही व त्याने पोस्टकर्त्याच्या परवानगीशिवाय शेअर केले तर? असे प्रश्न माझ्या मनात आधीपासून होते. आपले साहित्य हे आपले अपत्य आहे असे मानणारे काही लोक त्याबाबत पझेसिव्ह असू शकतात.
तुझे आहे तुजपाशी
हो पण पोस्टकर्त्याची इच्छा असेल तर? व त्याची तशी इच्छा आहे हे वाचणाऱ्याला समजले नाही व त्याने पोस्टकर्त्याच्या परवानगीशिवाय शेअर केले तर?
मग त्यासाठी फेसबुक ही चुकीची जागा आहे. मुळात लोकांमध्ये खाजगीपणा किंवा मालकीहक्काची कल्पना अधिकाधिक रुजवण्यासाठी सोशल मीडिया कार्यरत नाही. ते त्या माध्यमाचं ध्येय नाही.
"शेअर करा" किंवा "फॉरवर्ड करा
"शेअर करा" किंवा "फॉरवर्ड करा" असं बटण / सुविधा कोणत्याही संस्थळाने दिली असेल तर ते विना परवानगी शेअर किंवा फॉरवर्ड करणं बेकायदेशीर (?!) असू शकत नाही. किमान शेअर / फॉरवर्ड करणारा त्यास जबाबदार ठरु शकत नाही.
शेअर बटण न ठेवणं किंवा ते दाबल्यावर मूळ लेखकाची परवानगी मागण्याची स्टेप प्रणालीत अनिवार्य ठेवली असती तरच असं शेअरिंग बेकायदेशीर (?!) म्हणता येईल.
बेकायदेशीर ऐवजी अवैध वगैरे काही म्हणता येईल का?
कॉपी पेस्ट करुन शेअर करणं हे तांत्रिकदृष्ट्या सदैव अवैध म्हणता येईल. मग त्याने मूळ लेखकाला आनंद होतो अथवा दुःख अथवा गुदगुल्या हा अंदाज कम फॅक्टर विचारार्ह नसावा.
फेबु किंवा तत्सम अन्यत्र नसल्याने शेअरिंग वगैरेची काय व्यवस्था असते ते माहीत नाही. फोन ब्राऊजरमध्ये कोणतीही वेबसाईट वाचताना मात्र शेअर असा ऑप्शन असतो. ऑनलाईन न्यूजपेपर्समध्ये शेअर असं बटण दिसतं. याचा अर्थ शेअर करणं अपेक्षित आहे (मूळ लिंकसहित).
गूगलून सापडले ते
इथे काही रोचक माहिती दिली आहे. तिच्या वैधतेविषयी मला कल्पना नाही. त्यातून हे उद्धृत -
You own everything you post to Facebook, but Facebook can do pretty much whatever they want with it, including allowing other people to do pretty much whatever they want with it. Don't post something to Facebook if you want to keep control over who uses it and how.
'मोना लिसा'ला मिशा
'मोना लिसा'ला मिशा काढण्याची कायदेशीर परवानगी लिओनार्दोच्या हयातीतही मिळाली असती. (हे संदर्भ अंमळ कालविसंगत आहेत, ह्याची जाणीव आहे, पण ते सध्या बाजूला ठेवा.) आपण जे काय गूगल-फेसबुकावर लिहितो त्याचा हवा तसा - म्हणजे नफा कमावण्यासाठी जे जे काही करता येईल ते - करण्यासाठी वापर करण्याचा हक्क त्यांना एवीतेवीच नसेल का?
दुसरं, त्यांच्या जागेत येऊन आपण नाच-गाणं केलं तर त्यातून 'बघा, आमच्याकडे किती नाच-गाणं चालतं' म्हणण्याचा अधिकार आपणच त्यांना देतो. भले बौद्धिक संपदा आपली असेल, पण जागा आणि तंत्रज्ञान त्यांचंच असतं ना! असा अधिकार त्यांना द्यायचा नसेल तर सध्या एकच पर्याय - कागदावर लिहून तो कागद कबूतरांमार्फत लोकांना वाटायचा, किंवा पुस्तक काढून छापायचं; किंवा स्वतः पैसे-वेळ खर्चून स्वतःचं फेसबुक काढायचं.
लांबचा पर्याय - कायदे कालसुसंगत करण्याचे प्रयत्न करायचे.
तरीही
तरीही लोकांच्या जागेत जाऊन बागडायचं तर आपल्या घरात असल्यासारखी सोय मिळण्याची अपेक्षा ठेवू नये.
कायदे करून आपली व्यक्तिगत स्वरूपाची माहिती शोधून वापरण्यावर बंधनं आणता येतील. पण विदा जमा करणं आणि माहिती मिळवणं ह्यावर बंधनं आणता येण्यासाठी आता किमान १५ वर्षं उशीर झाला. गूगलनं २००४ साली हे सुरू केलं.
अहो फेसबुकने कसा ट्विस्ट
अहो फेसबुकने कसा ट्विस्ट टाकला आहे तो पाहा.
१)तुम्हाला कुणाला एखादी (फेसबुकी) लिंक मिळते,
२) ती ब्राउजरात टाकता,
३) तुमचे फेसबुकी खातेच नसते किंवा त्याक्षणी त्याण ब्राउजरातून लागिन नसता,
४)काय मेसेज दिसतो? "हे वाचण्यासाठी साइनप /लॉगिन. "
५) आता "कोन्टेन्ट मे बी युज्ड बाइ द सबस्क्राइबरस" शिवाय त्या लीगल ( लांबलचक) अटींत काही ट्वीस्ट असेल त्याशी सहमती फेसबुकिने घेतली आहे वाचकाची. ही तिसरी पार्टी आहे वादातली आणि दुर्लक्षून चालणार नाही.
दुसरे उदाहरण कॉपीपेस्टचे
१) माझ्याकडे असलेल्या एका पर्यटनाच्या जाडजूड पुस्तकातील फक्त। जाण्ययाच्या ठिकाणाच्या माहितीच्या पानांचे कॉपीज बरोबर नेतो. पण ते मी कुणास( फुकटही) दिले तरी कॉपीराईटस भंग करतो.
शिवाय मी फेअर युज बद्दल चा मुद्दाही वर घेतला आहे
माझ्या घराच्या माळ्यावर एक चागली खुर्ची पडून आहे ती दुसरा कुणी फेअर युज करू शकतो का माझ्या परवानगी शिवाय?
माझ्या घराच्या माळ्यावर एक
माझ्या घराच्या माळ्यावर एक चागली खुर्ची पडून आहे ती दुसरा कुणी फेअर युज करू शकतो का माझ्या परवानगी शिवाय?
ही तुलना बौद्धिक संपदेबाबत गैरलागू आहे.
फेअर युज या कॉपीराईट मधील संकल्पना बाबत इथे लिहिले आहे. भारतात त्याला फेअर डिलिंग म्हटले आहे.
प्रत्यक्ष बौद्धिक संपदेची प्रकरणे हाताळणारे याबाबत अधिक माहिती देउ शकतील.चित्तरंजन भट यांना विचारल पाहिजे.
१) आमच्या साइटवरचे सभासदांचे
१) आमच्या साइटवरचे सभासदांचे लेखन आणि फोटो हे क्रिएटिव कॉमन लायसनमध्ये येतं असं फेसबुकने स्पष्ट म्हटलं आहे का?
२) कोणी फेसबुकच्या अंगणात नाचगाणी केली तर त्याचे हक्क उघड केले असं होतं का?
३) कोणी फेअर युज करत असेल त्यास मूळ लेखकाने आक्षेप घेतला नाही म्हणजे त्याचे हक्क दिलेत असा स्पष्ट अर्थ ( express permission ) घेता येत नाही. प्रकाश घाटपांडे , ती विकी लेखाची लिंक दिली आहे त्यात वेगवेगळ्या देशांत फेअर यूस /डील याबाबत युएसए देशात जसे काटेकोर नियम तपासणी (stringent measures?)आहे तशी होईलच असं नाही हे म्हटले आहे.
थोडक्यात या शब्दांवर न्यायालयात कायद्याचा कीस पडू शकतो.
उदाहरणार्थ: कोणते एक नाटक लता नार्वेकर बरीच वर्षे सादर करत होत्या. सुयोग भटांनी ते केल्यावर लताबाइंनी दावा लावला पण भटांनी हक्क मिळाल्याचा करारच दाखवला. कोर्ट लताबाइंना म्हणाले तुमचा लेखी करार / चेक पेमेंट/इतर काही ग्राह्य व्यवहार (कन्सिड्रेशन)दाखवा. ((( पेप्रातल्या बातमीवर आधारित, माननीय कोर्टाच्या निर्णयाबाबत टीका नाही. )))
>>२) कोणी फेसबुकच्या अंगणात
>>२) कोणी फेसबुकच्या अंगणात नाचगाणी केली तर त्याचे हक्क उघड केले असं होतं का?
फेसबुकच्या अंगणात केलेली नाचगाणी कोणी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून त्याच अंगणात नंतर आलेल्यांना दाखवली तर कसले हक्क डावलले जात नाहीत. मुळात फेसबुकवर टाकलेल्या कुठल्याही पोस्टला कॉपीराईट हक्क लागू असतात असे वाटत नाही.
वर्तमानपत्रात किंवा मासिकात आलेल्या मजकूरावर पण (बहुधा) असे स्वामित्व हक्क नसतात. "विदाभान" लेखांमधील मजकूर मी ३_१४ यांच्या परवानगीशिवाय उद्धृत/वितरित करू शकतो
लोक करत आहेत, करतात, करू
लोक करत आहेत, करतात, करू शकतात हे सर्व मला मान्य आहे @नितिन थत्ते.
समजा हे तुम्ही एखाद्या पुस्तकात उद्धृत केलंत आणि अदितीने दावा लावला की १)मी परवानगी दिलेली नाही,२) त्या मजकुराने पुस्तकाच्या खपावर परिणाम होत आहे, वाढत आहे, ३)व्यावसायिक वापर होत आहे तरी विक्रीवर स्टे मिळावा. आणि प्राइमा फेशी खटला दाखल झाला तर? पुस्तकाच्या ढागाऱ्याच्या खुर्च्या होतील?
इतर ठिकाणी उद्धृत केलेल्यावर आक्षेप नाही म्हणजे वापरा असा समज चुकीचा ठरेल.
त्याच अंगणात
वर थत्ते यांनी म्हटल्याप्रमाणे 'त्याच अंगणात' हा मुद्दा महत्त्वाचा आहे. जे फेसबुकवर 'पब्लिक' शेअर केलं आहे आणि ज्याचा शेअर पर्याय खुला आहे ते फेसबुकवर कुणीही शेअर करू शकतं.
समजा हे तुम्ही एखाद्या पुस्तकात उद्धृत केलंत आणि अदितीने दावा लावला की १)मी परवानगी दिलेली नाही,२) त्या मजकुराने पुस्तकाच्या खपावर परिणाम होत आहे, वाढत आहे, ३)व्यावसायिक वापर होत आहे तरी विक्रीवर स्टे मिळावा. आणि प्राइमा फेशी खटला दाखल झाला तर?
वृत्तपत्राने आपल्या वेबसाइटवर शेअर केलेल्या लेखाचा दुवा शेअर करणे : एकंदरीत लिंक शेअर करण्याबद्दलची माहिती इथे मिळेल. थोडक्यात सांगायचं तर जी लिंक शेअर केली ती पब्लिक असेल, आणि वृत्तपत्राकडे जाणारं ट्रॅफिक दुसरीकडे वळवण्यात येत नसेल, आणि तुम्ही त्यातून पैसे मिळवत नसाल, तर लिंक शेअर करता येते. त्यामुळे तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे लावलेला दावा टिकेल. आणि दावा अदितीच नव्हे, तर लोकसत्तासुद्धा करू शकेल.
मी त्यावर पैसे मिळवत नसेन तर
मी त्यावर पैसे मिळवत नसेन तर ऑब्जेक्शन टिकेल का?
मी 'सोशल मीडिया आपल्या डेटाचा कसा वापर करते' या विषयी काहीतरी आर्ग्युमेंट कुठेतरी करत आहे. त्याला सपोर्ट म्हणून विदाभान मधील लेखाचा काही भाग उद्धृत केला (हा विदाभान मधील आहे असं लिहून- किंवा या विषयावरील तज्ञाचे असे मत आहे इतकेच लिहून) आणि मी यातून पैसे मिळवत नसेन तर ?
मी त्यावर पैसे मिळवत नसेन तर
मी त्यावर पैसे मिळवत नसेन तर ऑब्जेक्शन टिकेल का?
/१) तुम्ही आणखी एका कोणत्या साईटवर टाकताय जी तुमच्या मालकीची नाही. तर तुम्हास थेट फायदा काही होतच नाहीये. फक्त 'माहितीसाठी' झाले. ऑब्जेक्शन घेण्याची खटपट मूळ लेखक करणार नाही बहुतेक. जरी तुम्ही लिखाणाचा वापर स्वत:करता करत नाही.
/२) संदिप खरे यांनी कुणा दुसऱ्या कवीची कविता लोकसत्तेत दिली. कवीने ऑब्जेक्शन घेतल्याचे उदाहरण झाले.
- त्यात संदिपना मोबदला मिळाला का नाही बाजूला ठेवून, लोकसत्ता फुकट वाटण्याचे वर्तमानपत्र नाही. त्यांच्या कमाईवर परिणाम यामुळे होऊ शकतो हा मुद्दा खोडता येणे अवघड. पुढे कधीतरी लोकसत्ताला कविता विकण्याचा अधिकार मूळ कवीला राखायचा असेल तर?
((माझं मत तर्कावर मांडलंय.))
कोर्टाला खटला दाडल करून घ्यावासा वाटणे हेसुद्धा विचारात घ्यावे लागते. ज्या व्यक्तीस धंधा करायचा आहे तो संभाव्य अचानक उपस्थित होणारी देणी टाळण्याचे पाहतो. कॉन्टिनजन्सी लाइअबिलटीज.)
फेसबुकवर पोस्ट शेअर करताना
फेसबुकवर पोस्ट शेअर करताना पोस्टकर्त्याची परवानगी घेणे कायदेशीर / अधिकृतपणे आवश्यक आहे का?
नाही.
फेसबुकने पोस्ट पब्लिश करताना ती "कुणाला" दाखवायचीये त्याचे ऑप्शन्स दिले आहेत. जर तुम्हाला फक्त जवळच्या मित्रांसोबत शेअर करायचं असेल तर तसं नाहितर गावभर शेअर करू शकता.
ज्याला पोस्ट स्वत:च्या नावाने पोस्ट करायचंय तो शेअर कशाला करील? सरळ कॉपी पेस्ट करून आपल्या नावाने टाकील.
सबब, शेअर करताना परवानगी घेऊन काय साध्य करायचं आहे?
मालकी कोणाची?
लोकांच्या विदागारात आपली विदा असेल तरी मालकी कोणाची?
Microsoft's Ebook Apocalypse Shows the Dark Side of DRM
फेसबुक काय म्हणतं?
फेसबुकच्या Terms of Serviceमधून
Specifically, when you share, post or upload content that is covered by intellectual property rights (e.g. photos or videos) on or in connection with our Products, you grant us a non-exclusive, transferable, sub-licensable, royalty-free and worldwide licence to host, use, distribute, modify, run, copy, publicly perform or display, translate and create derivative works of your content (consistent with your privacy and application settings). This means, for example, that if you share a photo on Facebook, you give us permission to store, copy and share it with others (again, consistent with your settings) such as service providers that support our service or other Facebook Products that you use.
थोडक्यात, आपली पोस्ट फेसबुकवर ज्या लोकांना दिसत असेल ते लोक आपली पोस्ट आपल्या विशिष्ट परवानगीशिवाय आपलं लेखन शेअर करू शकतात. असं केल्यामुळे सदर व्यक्ती चिडून आपल्या व्यक्तिगत आणि/किंवा व्यावसायिक नातेसंबंधांवर परिणाम होण्याची भीती वाटत असेल तर गोष्ट निराळी!
१) फेसबुक पोस्टची लिंक डिजिटल
१) फेसबुक पोस्टची लिंक डिजिटल माध्यमात दिल्यास वाचक ते पान उघडून पब्लिक असल्यास वाचेल. इथे तुम्ही फक्त दर्शक होता.
२) एखादे पुस्तक लिहिताना संबंधित पोस्टची फक्त लिंक न देता तो मजकूर टाकलात तर प्रकाशक परवानगी आणा म्हणेल. कारण तुमच्याकडून लेखनाचे हक्क विकत घेतलेत पण त्या मजकुराचे काय? त्याचा आक्षेप आल्यास बाजारातून पुस्तक मागे घ्यावे लागण्याचा संभाव्य तोटा आहेच. हेच तुम्ही स्वत: पुस्तक प्रकाशित केल्यास होऊ शकते.
३) वरवर निरुपद्रवी उदारमतवादी वाटणारे बरेच फेसबुक लेखक हे बऱ्याचदा माझी कशी स्तुती होतेय या डबक्यात डुबक्या मारत असतात. पण त्यांना कधीकधी बातमीचे पटेन्शल समजलेले नसते.
४) दुसरा एक प्रकार अनुभवला आहे. एका naturalist च्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्यावर वावा होतेय म्हटल्यावर त्याने माझी पोस्ट डिलीट केली.
५) थोडक्यात कॉपी पेस्ट बिनापरवानगी गृहित धरता येणार नाही.