Skip to main content

नोकरी, इतर जबाबदाऱ्या सांभाळून पुण्यात महिन्याला 40 ते 50 हजार कसे कमावता येतील?

नमस्कार मित्रांनो, मी पुण्यातील अशोक आदक आहे, एमएस. अभियांत्रिकी पूर्ण झाल्यानंतर मी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या आयटी फर्ममध्ये २ years वर्षे काम केले. या कालावधीत, 4 वर्षे यूएस आणि यूकेमध्ये परदेशात देखील होते. मागील 10 वर्षांपासून व्यवसायामध्ये आणि सध्याच्या नोकरी, इतर जबाबदाऱ्या सांभाळून पुण्यात महिन्याला 40 ते 50 हजार कसे कमावता येतील? व उत्पन्न कसे वाढवायचे याबद्दल मार्गदर्शन प्रदान करतो.

पूर्ण महिपतीसाठी इथे क्लिक करून माझ्या ब्लॉग साईटवर लेख वाचा

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 23/10/2019 - 18:47

०. लेख वाचून पैेसे मिळणार का आणखी काही करावं लागणार?
१. कुणाला महिन्याचे ४०-५० हजार मिळणार? तुम्हांला, मला का तिर्री मांजरीला?
२. ४०-५० हजार कधीचे, १० वर्षांपूर्वीचे inflation adjusted का असेच?
३. आणि ही महिपती कोण?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 25/10/2019 - 00:51

In reply to by नितिन थत्ते

मारुती गाडीला तुम्ही तो मारुती गाडी म्हणता?

असो. (सु)नीती. आणखी बारा तासांत उत्तर आलं नाही तर तीकारान्त शब्द पुल्लिंगी समजणाऱ्यांवर भेंडी चढणार.

jitendra Deshpande Wed, 23/10/2019 - 19:06

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या लेखात लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून आपण वेबसाईट जाऊन ब्लॉग मध्ये पूर्ण माहिती वाचू शकता, विडिओ रूपात पण माहिती आहे,
-
http://sellonlinewithus.com/blog-how-to-earn-extra-40-to-50-thousand-mo…

चिमणराव Wed, 23/10/2019 - 19:31

असं काही पुण्यात करता येतं याबद्दल पुण्यातले जुने ऐसीकर ताकास तुर लागू देत नाहीत.
फक्त प्यारडाइज प्यारडाइज बोलून या या म्हणतात.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 23/10/2019 - 19:42

In reply to by चिमणराव

पुणेकर माणसंच चाबरट हो. पैशांबद्दलही बोलायचं तर अर्थव्यवस्थेबद्दल वगैरे बोलतात. आपले ढेरेशास्त्रीच पाहा! लेख वगैरे लिहितात, इथेच प्रकाशित करतात, दिवाळी अंकात वगैरे लिहितात ... इथे येऊन इतरांच्या जाहिराती करत नाहीत.

'न'वी बाजू Wed, 23/10/2019 - 20:45

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

इथे येऊन इतरांच्या जाहिराती करत नाहीत.

इतरांच्या??????

आक्षेप!!!

प्रस्तुत लेखकाने येथे इतरांची जाहिरात केली असावी, असे निदान सकृद्दर्शनी तरी वाटत नाही.१ बहुधा स्वत:चीच (रादर स्वत:च्या धंद्याची) जाहिरात केली असावी, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

(अर्थात, तेही कितपत स्वीकारार्ह आहे, हा मुद्दा पूर्णपणे वेगळा. मात्र, मुळातला आरोप तद्दन चुकीचा आहे, एवढेच दर्शवून देण्याकरिता प्रस्तुत प्रतिसादप्रपंच.)

इत्यलम्|

==========

१ प्रस्तुत दुवा मी उघडून पाहिलेला नाही.१अ

१अ उघडून पाहण्याची शक्यताही सुतराम् नाही. त्याबद्दल मला कोणीही कितीही पैसे देऊ केले, तरीही. मुळात असल्या जाहिरातींमध्ये - त्यातही बेट-अँड-क्लिक जाहिरातींमध्ये - स्वारस्य नाही.१अ१

१अ१ बेट-अँड-क्लिक जाहिरातदारांच्या - त्यातही फुकट्या बे.-अँ.-क्लि. जाहिरातदारांच्या - बैलांना माझा सादर, सप्रेम तथा विनम्र घो.

'न'वी बाजू Wed, 23/10/2019 - 21:00

In reply to by 'न'वी बाजू

लक्षात आले.

(अशोक आदक हेच जितेंद्र देशपांडे असल्याखेरीज) आपल्या (इतरांच्या जाहिरातीबद्दलच्या) मुद्द्यात दम आहे.

नजरचुकीने प्रस्तुत बाब दुर्लक्षिली गेली, याबद्दल हार्दिक दिलगिरी.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 23/10/2019 - 21:11

In reply to by 'न'वी बाजू

मला वाटलंच होतं, 'इतरांच्या जाहिराती'वरून तुम्ही टोकणार. त्या निमित्तानं तुमच्याकडून एक मोठा प्रतिसाद मिळाला. आजचा दिवस सफल झाला.

त्यापुढे तुम्ही पुढची शक्यता लक्षात घेऊन आणखी एक, छोटा उपप्रतिसाद द्याल असं वाटलं नव्हतं. त्याबद्दल मी स्वतःचीच निराशा केली आहे. त्याबद्दल पालसाम्राज्ञी मला माफ करोत.

'न'वी बाजू Wed, 23/10/2019 - 21:58

In reply to by jitendra Deshpande

आपण भारतीय सैन्यदलाच्या भोजनगृहां१पैकी एखाद्यात भाकरी-शेफ म्हणून नियुक्त आहात काय?

(आपल्या वैयक्तिक जेवणाचा डबा मात्र रोज आपल्या घरूनच येत असावा, असा अंदाज. चूभूद्याघ्या.)

----------
१ मराठीत: मेस.

मारवा Wed, 23/10/2019 - 20:57

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ढेरे अनुप आहेत रां चि नाही काही शोध लावुन आयत द्यायला
कोका कोला ने ट्रेड सिक्रेट सांगितल का आजवर ?
मग जो तो येऊन चितळे बाकर वडीची रेसीपी सांगत नाहीत वा दर्जेदार दुधा मागील म्हैस दाखवत नाहीत्
हा आग्रह कशासाठी मी म्हणतो पुणेकरांकडुन ?

अबापट Wed, 23/10/2019 - 21:04

In reply to by चिमणराव

एकदा या तर तिथे, मग म्हणाल चाळीस काय पन्नास हजार क्या चीज है!! हवेत कशाला एवढे पैसे.
येऊनच बघा.

मारवा Wed, 23/10/2019 - 20:49

महोदय वर तुम्ही म्हणत आहात पुर्ण माहीतीसाठी क्लीक करा.
तुमच्या साइटवर जाउन
पुर्ण लेख वाचला
पुर्ण व्हीडीयो पाहीला
पण तुम्ही तिथेही पिक्चर दाखवलाच नाही. तो ब्लॉग ही ट्रेलरच आहे नव्हे ट्रेलरही नाही फर्स्ट लुक च आहे
तुम्ही म्हणता संपर्क साधा
साधल्यावर च पत्ता खोलणार असाल तर एक विनंती
हा सर्व फाफटपसारा आवरा
आणि शहरातील मोठ्या मोक्य्चाच्या जागेवर जे रीकामे होर्डींग असतात त्यावर जाहीरात हवी असल्यास फक्त एकच शब्द
contact -9999912345
इतकाच शब्द आणि एकच नंबर असतो तसा इथे द्या
नव्हे मी देतो म्हणजे लोकांचे ब्लॉग वाचण्यातले कष्ट वाचतील्
४० व ५० हजारासाठी हपापलेला आसुसलेला ललचाये वाला
मी
Ashok Adak, Pune
Call me @: 8669027653

मारवा Wed, 23/10/2019 - 20:51

बाकी ऑलिम्प ट्रेड ची व तिच्या भन्नाट जाहीरातींची सर नाही.
म्हणुन म्हणावी तेवढी मजा आली नाही ती नाहीच्
नाही तरी ऐसीवर दिवाळी अंकाच्या टायमाला मजा आली तरच मजा जाते
दिवाळीत ऐसीवर मजा न येण्यातच मजा येते असते मानले जाते वगैरे वगैरे वगैरे

अनामिक Thu, 24/10/2019 - 08:57

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या आयटी फर्ममध्ये २ years वर्षे काम करुन् या कालावधीत, 4 वर्षे यूएस आणि यूकेमध्ये परदेशात होता म्हणजे कमालच!

अस्वल Thu, 24/10/2019 - 22:06

भर दिवाळी अंकाच्या वेळी काढलेल्या ह्या धाग्याला सर्वाधिक प्रतिक्रिया.
शाब्बास.
पैशाचा मोह (तेही नोकरी आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळून पुण्यात महिन्याला घरबसल्या मिळणारे) ऐसीकरांनाही टाळता येत नाही हेच खरे.
भले असतील मारे टेक्सासात किंवा जॉर्जियात किंवा पॉलिनेशियात - शेवटी पुणेकरच ते.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 25/10/2019 - 01:29

In reply to by अस्वल

इथे बडबड करण्याला अस्वला, तू पैसे मिळवणं म्हणावंस! आपल्याला फक्त बोलायला आवडतं!

-- स्वतःला सारखं सारखं सिरीयसली घेणारी, स्वसासासी, अदिती