Skip to main content

गूज

2 minutes

तुझ्यावरी आई माझा जीव जडू दे
कोल्यांची बाय तू लाडाची हाय
तुलाच माझ्या मनीचं ठाय
डोंगरावर तुझा दरबार भरू दे
तुझ्यावर आई माझा जीव जडू दे
लेकरांवर तुझी पाखर हाय
चंदनपालखी तुझी दिमाखात जाय
माणिकमोत्यांची फुलं तुला वाहू दे
चाफेनं आई तुझी परडी भरु दे
खणानारळानं तुझी ओटी भरीन
तांबुलविडा आई तुला अर्पिन
चरणांची आई तुझ्या सेवा घडू दे
तुझ्यावर बाय माझा जीव जडू दे
___________________________________
रेणु राजाची सुकन्या ऋषी जमदग्नींची भार्या
परशुरामाची जननी आई एकविरा भवानी
उधो उधो माझ्या अंबेचा दुर्गा भवानी कालिकेचा
________________________________________
अष्टमीच्या रात्री आभाळभर चांदण्यांची परडी उपडी होते. कार्ला गडावरती किर्रर्र काळोखाचं राज्य सुरु होतं. झोंबणाऱ्या वाऱ्याचे बोल तेवढे दर्याखोर्यात घुमत असतात. गडाभोवतालचं किर्रर्र रानही चिडीचूप निद्रेच्या आधीन झालंल असतं. त्या वेळी. गडावर चिटपाखरू जागं नसतं. गडावरच्या तलावात पडलेलं चंद्राचे प्रतिबिंब वातावरणाची गूढता अधिकच टोकदार करतं. अशा वेळी गडावर पाऊल ठेवण्याचं धाडस करू नका. आई ची चांदणझोका घेण्याची ही वेळ असते. जंगली श्वापदांच्या सान्निध्यात, पती काळभैरावासहित क्रीडेचा समय असतो. त्यात व्यत्यय आणण्याचे धैर्य मर्त्यच काय , अमर्त्य लोकांतही कोणास नाही.
हां पहाट फुटली झुंजूमुंजू होऊ लागलं कि गडाला जाग येईल. आईचा सौम्य रूपाचा समय. तेव्हा दर्शनाला जा. सुदैवी असाल तर तीच गर्दीतली एक होऊन तुमच्या भेटीला येईल. कासवी जशी तिच्या पिलांना नजरेनेच सांभाळते तशी सौम्य रूपातली आई तिच्या लेकरांवर मायेची पाखर घालत असते. उगीच तिला अनेकरूपा या नावाने शास्त्रकार संबोधत नाहीत.
तुम्हाला येणारा प्रत्येक अनुभव तिचा प्रसाद आहे. श्रद्धा ठेवण्या ना ठेवण्याने वास्तवात फरक पडत नाही.
__________________
एकवीरा माऊलीची गद्य प्रार्थना-
चित्ते कृपा समरनिष्ठुरता च दृष्टा
त्वय्येव देवि वरदे भुवनत्रयेऽपि ॥
वात्सल्यामृत पाजुन लाडावणारी माऊली हे तुझे रुप डोळ्यांसमोर आणणे थोडे कठीणच. याउलट धाकदपटशाने, शिस्तीचा बडगा उगारुन , पापौघाचा नाश करणारी अशी वरवर कठोर , परंतु मनाने कोमल अशा रुपांत तू तुझ्या भक्तांना परिचित. जिथे समरांगणी आपल्या खड्गाने राक्षसांचा वध करुन , त्यांचे भले तू साधतेस तिथे तुझ्याच बालकांचे भले झाल्याशिवाय कसे बरे राहील! विष्णुदास तुला ‘विचित्र खेळ मांडणारी गारुडीण’ म्हणुन संबोधतात. जिथे आमची सर्वाधिक आसक्ती तेच विषय तू समूळ उखडतेस अशा रीतीने माझ्या पदरामध्ये घाललेले वीषसुध्दा मला मान्य. तू उन्हातान्हात रखडवलस तरी माझ्या तोंडुन अवाक्षर निघणार नाही. आधिव्याधी सर्व तुझा प्रसाद. माझी वणवण तुझी प्रदक्षिणा. गरुडीच्या पिल्लांला काळरुपी सर्पाचे भय ते काय. आणि हे सत्य कळण्याचतच जन्म गेले तरी पुन्हा उद्या मी हे सारं शहाणपण विसरुन जगापुढे तोंड वेंगाडणार आहेच. तेव्हा आता शुध्दीत असतानाच साकडं घालते आई तुझ्या वाटेवर आले आता मोकलु नकोस.
आदि शंकराचार्यांचेच शब्द उधार घेउन प्रार्थना करते - मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि ।
एवं ज्ञात्वा महादेवि यथायोग्यं तथा कुरु ॥

Node read time
2 minutes

ललित लेखनाचा प्रकार

कांचन दिलीप सापटणेकर Wed, 27/11/2019 - 14:07

किती छान कल्पना! आई एकविरा माझ्या माहेरचं कुलदैवत, त्यामुळे कारल्याला अनेक वेळा जाणं झालंय. पण ही कल्पना मनाला भिडली.

अतिशहाणा Thu, 28/11/2019 - 20:25

In reply to by 'न'वी बाजू

सर्वत्र शिटणाऱ्या या पक्ष्यांना गूज हेच नाव योग्य आहे.

'न'वी बाजू Sun, 08/12/2019 - 21:26

In reply to by अतिशहाणा

सर्वत्र शिटणाऱ्या या पक्ष्यांना गूज हेच नाव योग्य आहे.

सहमत आहे. कधी बॅकयार्डात घुसले, तर आख्खे बॅकयार्ड हिरवे१ करून सोडतात.

(अवांतर: या प्रजातीतल्या पुरुषांना२ 'गँडर' म्हणून संबोधतात, यामागेसुद्धा असेच काही कारण असू शकेल काय?३)

.......‌.‌.‌.

१ अवांतर माहिती: या पक्ष्याच्या विष्ठेचा रंग सहसा गडद हिरवा असतो, असा पूर्वानुभव आहे.१अ

१अअतिअवांतर: हे पक्षी रस्ता क्रॉस करताना शिस्तीत सिंगल फाइलमध्ये करतात (जेणेकरून रस्त्यावरील वाहतूक खोळंबून राहावी), असेही सार्वत्रिक निरीक्षण आहे.

२ 'गूज' हे नामाभिधान (अचूकपणे वापरायचे झालेच, तर) केवळ त्या प्रजातीतील स्त्रियांना अनुलक्षून वापरता येते. मात्र, सामान्यतः ते (या नियमास धुडकावून) या प्रजातीतील कोणत्याही समाजघटकास अनुलक्षून लिंगनिरपेक्षतः सर्रास वापरले जाते. पण लक्षात कोण घेतो?

३ हा प्रतिसादांश स्त्रियांना uncomfortable वाटू शकतो काय?