Skip to main content

आस

अशाच या कातरवेळी
निशब्द असावा
आसमंत सारा
त्यासमयी रवि तु
क्षितिजाच्या कुशीत निजावा

रवि तुज निजवताना
वारा ही गाई झुळझुळ गाणे
ती लुकलुकणारी कोर ही
बघ तुज कथा सांगे

अशाच एका कातरवेळी
बघ. कोण पणती
त्या तुळशीसमोर लावे
मंद अश्या त्या प्रकाशात
माझा ऊर भरुन वाहे

तेव्हा दुरवर कोठेतरी
मज ऐकु येते ती किणकिणारी घंटा
'आस' लागे मनास कान्हा
तसाच ऐकु येईल का रे मज
एक दिन तुझा मधुर पावा..

-दिप्ती भगत
(९मे, २०२०)

चिमणराव Thu, 04/06/2020 - 12:46

गवळी मुले ( कान्हा धरून )दुपारच्याला झाडाखाली लवंडून पावा वाजवतात बहुतेक. सांजेला परतताना नसावे. पण वाजवायला सुरू करा रे. कुणी आसुसलेले आहे.
( वात्रट प्रतिसाद.)

तिरशिंगराव Thu, 04/06/2020 - 12:53

ही ओळ ऐकल्यावर अवांतर असलं तरी या जुन्या वात्रटिकेची आठवण झाली.
मुंगी व्याली चिंगी झाली तिचे दूध किती
अठरा रांजण भरुन उरले प्याले बारा हत्ती !

मन्या ऽ Thu, 04/06/2020 - 17:56

In reply to by चिमणराव

@शरद गाडगीळ
काका, मी पळुन जाणाऱ्यांपैकी नाहीये हो.. :) आत्ताच तर आलीये..
इथले काव्यप्रेमी वाचत असतीलच कि माझ्या कविता.. त्यांच्यासाठी थांबेल. लिहित राहील इथे.. पण लेखनात चुका आढळल्या तर सांगत जा. सुधारता येतील मला.. :)

तिरशिंगराव Fri, 05/06/2020 - 08:16

या प्रतिक्रियेवरुन ऐसीची तंबी येणार असे वाटत असेल तर तुम्ही ऐसी प्रशासनाला अजून ओळखलेच नाहीये. असो.
प्रतिक्रिया उडवायला संपादक सक्षम आहेतच.

चिमणराव Fri, 05/06/2020 - 09:28

ऐसी प्रशासनाला ओळखले आहे.
पण कधी कधी नवसभासद तक्रारीही करतात. मन्याने हसत प्रतिसाद दिलाच आहे.
( मायबोलीवर धागाही आहेच असा. आणि अनुभव आहे.)
सोमिवर थोडे सावध असणं बरं.

चिंतातुर जंतू Fri, 05/06/2020 - 12:00

'न'वी बाजू यांच्या रसग्रहणाच्या प्रतीक्षेत.