Skip to main content

लेखनासाठी लेस्बियनपणा : चुकीच्या निर्णयांची परिणती

हल्लीच आमच्या एका मित्रवर्यांची पन्नाशी झाली. त्याच्या काही दिवस आधी त्यांच्या उत्तमार्धीचा निरोप आला होता की सध्याच्या परिस्थितीत लोकांना बोलावून पार्टी करणं वगैरे शक्य नाही, तर त्याच्या सगळ्या मित्रमैत्रिणींकडून शुभेच्छा लिहवून मागवत आहे. मग फेसबुकवर भरल्या ताटाचे फोटो बघून तर मला भरल्या पोटी भूक लागली.

म्हणजे मी तशी फार हावरट नाही. अगदी मोजून परवाची गोष्ट. टीव्ही बघताबघता सोफ्यावर झोप लागली. (अर्थातच, सुट्टीच्या दिवशीसुद्धा मी सकाळी साडेसहाला उठून जिमला जाऊन व्यायाम करून आले होते!) जाग आली तर लोक काहीबाही खात होते. हे असं काही बघून मला हमखास भूक लागते. तर ते टीव्हीतले सगळे पदार्थ बघून मला एकही पदार्थ खावासा वाटला नाही. मग मी मनात आणखी काही पदार्थांचा विचार केला. तरीही तोंडाला पाणी सुटलं नाही. म्हणजे ... म्हणजे मला भूक लागली नव्हती! हे निश्चितच वय झाल्याचं लक्षण आहे. सकाळी अर्धा तास दणकून व्यायाम केल्यावरही टीव्हीतलं खाणं बघून भूक लागत नसेल तर काय तरी बिनसलं असणारच, आणि ते वय सोडून आणखी काय असणार!

आता माझी चाळीशी आली. मित्राच्या पन्नाशीसाठी त्याच्या बायकोनं केवढं काही केलं, तसं माझ्या चाळीशीसाठी काय होईल?मी विचार केला तर लक्षात आलं की हेही माझ्या भुकेसारखंच असणार आहे. माझ्या चाळीशीसाठी कुणीही, काहीही करणार नाहीये. कुणीही माझ्यासाठी ५-७ वाक्यांचे का होईना, निबंध लिहिणार नाहीये; कुणीही मसालेभात-जिलबीचं जेवण आणून मला वाढणार नाहीये; कुणीही तिर्री मांजरीबरोबरचे माझे गोडगोड फोटो फेसबुकवर जाहीर करणार नाहीये!

अस्सल बायकी गुणधर्माप्रमाणे ह्याबद्दल मी स्वशोध आणि स्वताडन सुरू केलं. चूक माझीच असणार. माझी नाही तर आणखी कुणाची! मीच चुकीची निवड केली. मीही चांगली बायको शोधली असती तर ...

कितीदा दिसतं फेसबुकवर! बायका आपल्या नवऱ्यांच्या वाढदिवसांसाठी केवढे कष्ट घेतात; चांगलंचुंगलं खायला घालतात. मला कोण खायला घालणार?

एकदा एक न-मित्र, परिचित म्हणू त्यांना, फेसबुकवर म्हणाले होते - माझं कधीचं स्वप्न आहे. मी सकाळी लवकर उठून कादंबरी लिहायला बसावं, आणि बायकोनं लगेच हातात गरमागरम चहा आणून द्यावा. हे वाचलं तेव्हा माझ्याकडे शनिवार सकाळ होती; एका हातात मीच केलेली कोमट कॉफी होती; दुसऱ्या हाताची बोटं कीबोर्डवर नाचत होती; आणि 'विदाभान' सदरात ह्या वेळेस काय लिहायचं हे सुचत नसल्याची सबब करून मी फेसबुकवर बागडत होते. बरा अर्धा तेव्हा बेडरूममध्ये घोरत असणार. (घोरण्याचा कोटा तो मी उठल्यावर पूर्ण करत असणार. मी तिथे असताना घोरला तर मी त्याला ढोसून घोरणं बंद करायला लावते. झोपताना संगीत कशाला हवंय?)

आता पाहा, एक वर्षं झालंय पण 'विदाभान'चं पुस्तक लिहिण्याचं काम फार झालेलं नाहीये. का? मला एखादी चांगली बायको असती तर तिनं मला सकाळी माझ्या आधी उठून कॉफी करून, हातात आणून दिली असती. मला लेख लिहायला सुचत नसतं तर माझ्याशी गप्पा मारून मला विषय सुचवला असता, माझ्यासाठी बागेत फुलं वगेरे फुलवली असती, मलाही लिहिण्याची प्रेरणाबिरणा दिली असती, किंवा मी लिहीत नाहीये म्हणून मलाही ढोसलं असतं ....!

माझ्या आयुष्यात दोन घोडचुका झाल्या आहेत. सगळ्यात पहिली म्हणजे मी बाई होण्याचं ठरवलं, ती चूक सुधारणं शक्य नाही. जुन्या सवयी सहज सुटत नाहीत. आणि दुसरी चूक, बायको केली नाही. मी बायको न करता बरा अर्धा केला. ती चूक सुधारणं शक्य आहे...

(नोंद - १९७०-८०च्या दशकात अनेक अमेरिकी स्त्रीवाद्यांनी राजकीय कारणासाठी स्त्रियांशीच संबंध ठेवले होते.)

'न'वी बाजू Sat, 02/01/2021 - 23:44

म्हणजे असे पाहा: समजा तुम्ही बरा अर्धा न करता बायको केली असती. समजा त्या बायकोनेसुद्धा नेमका तसाच विचार करून बायको (पक्षी: तुम्ही) केली असती. म्हणजे, दोघींनीही कॉफी न बनवता फक्त एकमेकांकडून (पक्षी: आपापल्या बायकांकडून) कॉफीची अपेक्षा केली असती. परिणाम काय, तर दोघींच्या भांडणात फक्त स्टारबक्सचा फायदा!

त्यामुळे, आहे त्यापेक्षा परिस्थिती नक्की कशी काय सुधारली असती, कळत नाही.

(शिवाय, तुमची बायको घोरली नसती कशावरून?)

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 02/01/2021 - 23:46

In reply to by 'न'वी बाजू

बायको निराळी, उत्तमार्धी निराळी!

शिवाय बायका घोरत नाहीत, हे जागतिक सत्य तुम्हाला अजूनही माहीत कसं नाही?

'न'वी बाजू Sat, 02/01/2021 - 23:53

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शिवाय बायका घोरत नाहीत, हे जागतिक सत्य तुम्हाला अजूनही माहीत कसं नाही?

कोठल्या गाढविणीने सांगितले तुम्हाला हे? तद्दन खोटे आहे हे!

बायका घोरतात. किंबहुना, इतरही अनेक गोष्टी करतात, करू शकतात. (किंबहुना, बायकांच्या शब्दकोशात 'अशक्य' असा शब्द असणे हे बायकांना कमीपणाचे असू नये काय?)

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 03/01/2021 - 02:53

In reply to by 'न'वी बाजू

बायकांचा स्वतःच्या घोरण्यावरही ताबा असतो. कुणीही ऐकत असेल तर बायका घोरत नाहीत, आणि कुणी ऐकलंच नाही तर बायका घोरतात का?

पर्स्पेक्टिव्ह Sun, 10/01/2021 - 20:00

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमच्या मित्राची जी आहे, ती बायको आहे की उत्तमार्धी?

हल्लीच आमच्या एका मित्रवर्यांची पन्नाशी झाली. त्याच्या काही दिवस आधी त्यांच्या उत्तमार्धीचा निरोप आला होता की

मित्राच्या पन्नाशीसाठी त्याच्या बायकोनं केवढं काही केलं

की दोन्हीही आहे/त? की तुमचा वरील दावा खोटा आहे?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/01/2021 - 21:16

In reply to by पर्स्पेक्टिव्ह

रोल प्ले नावाची भानगड कधी ऐकली आहेत का? तुमचं वय अठरा नसेल तर शोधाशोध करू नका. फक्त सज्ञान लोकांसाठी केलेला विनोद आहे हा.

पर्स्पेक्टिव्ह Mon, 11/01/2021 - 23:39

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

रोल प्ले नावाची भानगड कधी ऐकली आहेत का?

तुम्ही माझे प्रतिसाद (निदान या धाग्यावरचे तरी) नीट वाचले आहेत का?

तुमचं वय अठरा नसेल तर शोधाशोध करू नका.

तुम्हांला 'अठरा पूर्ण नसेल तर' असं म्हणायचं होतं का? कारण माझं वय अठरा निश्चितच नाही. अठराच्या पटीत किंवा जास्त असू शकेल.

मारवा Sun, 03/01/2021 - 10:58

भानावर या कॉफीची कुणीतरी भानामती केलेली दिसतेय या भानगडीत
विदाभान सुटलं तर आमचं नुकसान होइल.
वाटल्यास साहीत्य सेवकांची व्यवस्था करुन कॉफी चा काहीतरी बंदोबस्त करु
पण तुम्ही काम थांबवु नका

किती साहीत्यकृतींची कॉफी अभावी भ्रुणहत्या झाली याचा काही विदा असेल का ?

सामो Sun, 03/01/2021 - 21:32

अस्सल बायकी गुणधर्माप्रमाणे ह्याबद्दल मी स्वशोध आणि स्वताडन सुरू केलं. चूक माझीच असणार. माझी नाही तर आणखी कुणाची!

खरे आहे. पुरुषांपेक्षा बायका जास्त वेळस 'सॉरी' म्हणतात. त्यांची दर वेळेस चूक असते म्हणुन नव्हे तर ..... सवय म्हणुन.
________
पूर्ण कर गं पुस्तक मग भले त्याकरता तूच नवरा हो तूच बायको हो. स्प्लिट पर्सनॅलिटी ;)

राजेश घासकडवी Tue, 05/01/2021 - 09:20

तुझी बायको तुझ्यासाखीच निघाली असती तर? तू देतेस का कॉफी तुमच्या अहोंना? कामावरून तुमचे हे दमून आल्यावर देतेस का पाय चेपून?

उग्गाच काहीतरी लेस्बियनपणाचे डोहाळे!

पर्स्पेक्टिव्ह Fri, 08/01/2021 - 08:49

(नोंद - १९७०-८०च्या दशकात अनेक अमेरिकी स्त्रीवाद्यांनी राजकीय कारणासाठी स्त्रियांशीच संबंध ठेवले होते.)

म्हणजे? तुम्हांला 'अमेरिकी स्त्रीवादी स्त्रियांनी' असे म्हणायचे होते का? की स्त्रीवादी ह्या मंडळींत केवळ स्त्रियाच बाय डिफॉल्ट असू शकतात असा बायस अंतर्भूत आहे? की बायकोला 'मम' म्हणायची सवय अंगवळणी पडलेल्या नवऱ्यांंना स्त्रीवादी नाही म्हणायचे का? (आणि काब्रे म्हणायचे नाही?)

येथे 'बायको' किंवा 'उत्तमार्धी' असा सोयीनुसार अर्थ घ्यावा. तसेही स्त्री ही दोन्ही भूमिकांमध्ये१अ हवं तेव्हा वावरू शकतेच की.

१अ बोले तो, Role play???

तेच ते. 'नवरा' किंवा 'उत्तमार्धा', दोन्हीही. किंवा नाहीही. किंवा कसेही. काये की कितीही केलं तरी तो मेला पुरुषच!

एकूणच ज्याने-त्याने स्वसोयीनुसार 'बिचारा/बिचारी' असा स्मार्ट स्ट्याण्ड घेत रहावा. आमचं काही म्हणणं नाही. आम्हांला वाचायला काय जातेय?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 08/01/2021 - 09:11

In reply to by पर्स्पेक्टिव्ह

राहू दे. सगळे विनोद सगळ्यांसाठी नसतात.

गोगोल Sat, 09/01/2021 - 06:31

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कदाचित असं असू शकेल का की पर्स्पेक्टिव्ह यांना तुम्ही "इनोदी" लिहायचा प्रयत्न केला आहे ते कळलं आहे पण ते तुम्हाला तुमची पंचलाईन चुकल्यामुळे तुमचा "ज्योक" फ्लॅट गेल्याच दाखवून देत आहेत? सगळे प्रतिसादही सगळ्यांसाठी नसतात.

@पर्स्पेक्टिव्ह साधारणत: प्लॅटफॉर्म प्रोव्हायडर्स नी शक्य तितकं निष्पक्षपणे वागणे अपेक्षित असते. स्वत:ची मते दुसर्यांवर न लादता आणि दुसर्यांची मते आपल्या टोकाच्या विरोधात असताना ही त्या मतांचा आदर करून ती मते आपल्या प्लॅटफॉर्म वर मांडू देणे हे एका चांगल्या प्रोव्हायडर चे लक्षण असते.
परंतु या प्लॅटफॉर्म वर अनलेस तुम्ही "वोक" कॅटेगरीतले असल्याशिवाय आणि एकमेकांची पाठ खाजवल्याशिवाय तुम्हाला "निरर्थक" किंवा "पकाऊ" याच ष्रेणी मिळतील आणि तुमचा अपमान करून किंवा शाल जोडीतले मारण्यात येतात.

पर्स्पेक्टिव्ह Sun, 10/01/2021 - 19:53

In reply to by गोगोल

हाहाहाहा. नो ऑफेन्स टेकन, गोगोल. त्या श्रेणी-बिणींना आम्ही तसेही गर्धभश्रोणीत घालतो.

वैसे भी, अदितीबैंच्या स्त्रीवादी भूमिकेबद्दल पूर्ण आदर आणि माहिती असल्याने (आणि मीही कट्टर स्त्रीवादी असल्याने मैंणू फ़र्क नी पैंदा.

हे अजरामर वाक्य 'ऐसी..' वरूनच साभार. मूळ लेखकाचे नाव आठवत नाही.

तद्वतच मीही झालंच तर स्त्रियांशीच संबंध (शरीरसंबंध हे अध्याहृत. मैत्री/प्रेम/प्लेटोनिक इ. इ. अनुषंगिक.) ठेवले असले तरी ते राजकीय हेतूने नव्हते हे आणि मला त्याचा कसलाही राजकीय फायदाही कधी झाला नाही हे नम्रपणे नमूद करू इच्छितो. याचे कारण मी अमेरिकन नव्हतो असे असू शकेल का? ;-)

लेखातील अजून एक लॉजिकल पॅराडॉक्स वर दाखवून देतो आणि पळ काढतो.

सर्व श्रेण्या आम्हांस मृत्तिकेसमान! ही घोषणा प्रताधिकारमुक्त करण्यात येत आहे.

गोगोल Tue, 12/01/2021 - 11:48

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे सगळं मी वर लिहिलेल्या प्रतिसादामुळे आहे की दुसर्या एखाद्या प्रतिसादाला उद्देशून आहे?

चिंतातुर जंतू Wed, 13/01/2021 - 12:02

In reply to by गोगोल

व्हाट अ सॅड लाईफ!

मी उलट म्हणेन : आपापला अर्थ लावत जगणं मान्य नसेल तर - व्हाट अ सॅड लाईफ!

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 13/01/2021 - 18:56

In reply to by चिंतातुर जंतू

त्यांना मूळ विनोद समजलेला नाही; त्यांच्या तक्रारी बिनबुडाच्या असल्याचं तिथेच वर प्रतिसादात दिसतंय; वर कुणी चमच्यानं भरवत नाहीये. बरोबरच आहे. व्हाट अ सॅड लाइफ!

ते असो. तुझी पन्नाशी कधी येणार? तेव्हा तुलाही कोरडी सहानुभूती पाठवेन, हवी तर.

सामो Wed, 13/01/2021 - 19:02

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुझ्याशी पंगा घ्यायला तू तुल्यबळ तरी वाटतेस. हेही नसे थोडके. आमच्याशी कोणी पंगाच घेत नाही कारण ..... हाहाहा असो!! स्वत:वर विनोद करायला तुझ्याकडुनच शिकलेय. :)

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 13/01/2021 - 20:44

In reply to by सामो

राजकीय भूमिका मांडली की हवं असो वा नसो, पंगे घ्यावे लागतातच. स्त्रीवाद ह्या विषयावर गांभीर्यानं लिहिणं जवळजवळ बंद केलंय त्याचं हे कारण आहे. कुणीही उठतात, आणि अभ्यास-समज काही नसताना व्यक्तिगत पातळीवर उतरतात. त्यातून आपला लोकशाहीवर, त्या मूल्यावर विश्वास असला तर प्रतिक्रिया अनभ्यस्त आहेत म्हणून अगदीच दुर्लक्ष करता येत नाही.

मग अशा प्रकारांवर आपला किती वेळ घालवायचा! म्हणून टिंगल केली. विनोद केला की 'असंच का म्हणतेस' असल्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागत नाहीत. मला जोक आला, मी केला. तुम्हाला नसेल आवडला तर नका हसू! सगळे विनोद सगळ्यांसाठी नसतात.

गोगोल Sat, 23/01/2021 - 10:19

तुम्हा वोक लोकांच कुठलीही गोष्ट कशीही फिरवायच चातुर्य अफाट आहे. म्हणजे मला ईतक्या कमी प्रतिसादात स्ट्रॉमॅन फॉलसी, पॅसिव ॲग्रेसिवनेस, वीकमॅन फॉलसी आणि डायरेक्ट ॲटॅक बघायला नव्हता मिळाला. आता तुम्ही इतका को-ऑर्डिनेटेड ॲटॅक केल्यावर मला त्याच रसग्रहण तरी करु देत. प्लीज इंडल्ज मी :)
(नवल या गोष्टीच वाटत की युज्वली नवी बाजु (जे मी आता समजतोय पर्स्पेक्टिव्ह आहेत) आणि चिंतातुर जंतू सारख्या बॅलन्स्ड आयडीज नी पण असे प्रतिसाद दिले.)

म्हणजे बघा ह, मी हा लेख वाचला आणि मला तो अजिबात विनोदी वाटला नाही. म्हणजे लैंगिकता किंवा स्त्रीवादाच वावड आहे म्हणून नाही तर अशा प्रकारच्या जॉनरॉ म्ध्ये चांगले विनोद करायला एक प्रचंड स्किल लागत (साटल्य आणि टाईट रोप वॉक) नाहीतर तसे जोक बटबटीत होतात. मी लेख वाचून सोडून दिला. नंतर काही दिवसांनी बघतो तर युज्वल सस्पेक्ट्स पेक्षा एका नवीन आयडीनी -- पर्स्पेक्टिव्ह -- दिलेला प्रतिसाद बघितला आणि त्यावर पॅसिव ॲग्रेसिव किंवा सार्कॅस्टिक रीप्लाय वाचला. आता माझ्या लक्षात येतय की पर्स्पेक्टिव्ह म्हणजेच नवी बाजु असावेत (प्रतिसादाच्या स्टाईल आणि पर्स्पेक्टिव्हच डायरेक्ट भाषांतर बघता). मी नया भिडु आहे म्हणुन प्रतिसाद लिहिला कि हे पॅसिव ॲग्रेसिव किंवा सार्कॅस्टिक रीप्लाईज ही या साईटची खासीयत आहे आणि ही एकंदर वोक लोकांची साईट आहे. आता वोक म्हणजे काय तर:

Woke (/ˈwoʊk/ WOHK) is a political term that originated in the United States, and it refers to a perceived awareness of issues that concern social justice and racial justice.

पण मी पेजोरेटिवली वापरला होता (कारण हा लेखच काय या ओपीचा एकंदर स्त्रीवाद "शव्ह ईट डाऊन योर थ्रोट" या स्वरुपाचाच असतो नेहमी. आता विकिपेडियावर यावर एक आक्खा सेक्शनच आहे जो की सगळाच वाचण्यासारखा आहे, पण मी काही वाक्ये इथे टंकतो.
-------
Other observers have commented that while the concept of woke may have good intentions, its associated style of activism and philosophies have harmed rather than helped the advancement of social causes.
....
There is no measure or moderation to wokeness. It’s always good to be more woke. It’s always good to see injustice in maximalist terms. To point to any mitigating factors in the environment is to be naïve, childish, a co-opted part of the status quo. [...] The problem with wokeness is that it doesn’t inspire action; it freezes it. To be woke is first and foremost to put yourself on display. To make a problem seem massively intractable is to inspire separation — building a wall between you and the problem — not a solution.

— David Brooks, The Problem with Wokeness, The New York Times
...
In October 2019, former United States President Barack Obama expressed comments that critiqued woke culture, stating: "This idea of purity and you're never compromised and you're politically woke, and all that stuff – you should get over that quickly. The world is messy. There are ambiguities. People who do really good stuff have flaws."
-----

त्यावर पर्स्पेक्टिव्ह यांचा वरकरणी खेळीमेळीचा प्रतिसाद आला पण त्यातल हे वाक्य:

"वैसे भी, अदितीबैंच्या स्त्रीवादी भूमिकेबद्दल पूर्ण आदर आणि माहिती असल्याने (आणि मीही कट्टर स्त्रीवादी असल्याने २ मैंणू फ़र्क नी पैंदा."

हळूच सुचित करुन जात की म्हणजेच तू स्त्रीवादाच्या विरुद्ध आहेस आणि आमच्यातला नाहीयेस. आता ही क्लासिक स्ट्रॉमॅन फॉलसी आहे कारण की मला स्त्रीवादाबद्द्ल कुठेही प्रॉब्लेम नाहीये पण वोकनेस आवडत नाही. यावर हा एक मोठ्ठाच्या मोठठा लेख वाचण्यासरखाच आहे. पण काही नाहीतर सेक्शन V तरी वाचाच. म्हणजे इथून हळूवारपणे मला अशा लोकांच्यात ढकलण सुरु की ज्यांचा तिरस्कार करण सोप जात.

मग ओपीनी स्व:तच्या पर्सनल अकांउटवरुन हा ईश्यु पॅसिव ॲग्रेसिव कमेंट्स टाकून पब्लिसाईझ केला. त्यात अस सुचित केल की फ्रेंडस मध्ये प्रायवेट थट्टा मस्करी चालू असताना हा कोण उपटसुंभ उगवला आणि कशा प्रतिक्रिया देतोय ते बघा. यात हा पब्लिक लेख होता आणि यात ते फ्रेंडस आहेत हे मला कुठेच सांगितल नाहीये हे नाही सांगितलेले. आता तिकडून अपेक्षित असे प्रतिसाद आल्यावर आणि वातावरण निर्मिती झाल्यावर परत तिकडून इकडे ते सगळ धुतलेले धुणं आणल. ट्रॅप तयार झालेला होता. आता मी बेट घ्यायला नको पाहीजे होती पण मला हा सगळा प्रकार (ईकडून तिकडे आणि तिकडून ईकडे) प्रचंड बालीश वाटला आणि एखाद्याचा ईगो इतक सगळ ॲकॉम्प्लिश करुनही इतका फ्रजाईल असु शकतो की ही सगळी ऊठाठेव करायला लागावी याच आश्र्च्रर्य वाटल म्हणून मी "सॅड लाईफ" अशी प्रतिक्रिया दिली (ईथे आय टूक द बेट जी मी घ्यायला नव्हती पाहीजे होती पण जरा पद्धतशीर पणे हे ईकडून तिकडे आणि तिकडून ईकडे केल गेलेले आणि मी बळी पडलो). आता चिंतातुर जंतू ची प्रतिक्रिया आली. मला त्यांच्या प्रतिक्रियेच आश्र्च्रर्य वाटल आणि खर सांगायच तर तितकीशी कळलीही नाही पण ती नकारत्मक होती हे तर स्प्ष्ट होत. नाऊ ईट वॉज टाईम फॉर किल!

> त्यांना मूळ विनोद समजलेला नाही;

म्हणजे माझा विनोद जर विनोद नाही वाटला तर तो कळण्याईतकी तुमची बुद्धी नाहीये.

> त्यांच्या तक्रारी बिनबुडाच्या असल्याचं तिथेच वर प्रतिसादात दिसतंय;

मी एकटीच नाही तर बाकीही असाच विचार करत आहेत (अस वर्सेस देम व्हेअर देम आर पिपल हु आर ईझी टू हेट)

> वर कुणी चमच्यानं भरवत नाहीये.

नाऊ टाईम टू फिनिश द जॉब, वाचणाऱ्याला थोडाजरी कम-अकलेबद्दल संदेह असेल तर मिटवून टाकायचा. यानंतर मिशन ॲकॉम्प्लिश्ड यु गो गर्ल टाईप्सचे प्रतिसाद ज्या अंधभक्तांकडून येणे अपेक्षित होते ते आलेच. मग आता न असलेले पंगे कसे पंगे बनवले गेले, आणि स्व:त या सगळ्याला स्व:तच्याच पर्सनल अकाऊंट वरुन पब्लिसाईझ करुनही, हेच व्यक्तिगत पातळीवर उतरले गेले असे सोयिस्कर खापर फोडुन मोकळेही झाले. परत त्यात कोण हा ऐरा गैरा नत्थु खैरा ज्याला काहीही समज् नाही, अभ्यास नाही तो माझ्यासातख्या उच्च विचरांच्या लोकांशी पंगे घेतोय हा तुच्छतावादी ॲटिट्युड आहेच. आणि आपला लोकशाहीवर विश्वास असल्यानी, आपण स्त्रीवादी असल्यानी हे सगळ ठीक करायची जबाबदारी आपल्याच खांद्यांवर येऊन पडते हाही आविर्भाव.

ईन शॉर्ट:

माझा विनोद आवडला नाही आणि माझे नेहमीचे पॅसिव ॲग्रेसिव/सार्कॅस्टिक कमेंट्स आवडल्या नाहीत् तुम्ही तस बोलुन दाखवल = तुम्हाला तो विनोद कळायची बुद्धी नाही = तुम्ही स्त्रीवादी नसलेले अशिक्षित अडाणी मुर्ख आहात आणि तुम्हाला पब्लीकली रिडिक्युल केल पाहीजे.

गॉड मोड् वोकनेस लेवल अन्लॉक्ड!

'न'वी बाजू Sat, 23/01/2021 - 17:02

In reply to by गोगोल

नवल या गोष्टीच वाटत की युज्वली नवी बाजु (जे मी आता समजतोय पर्स्पेक्टिव्ह आहेत)

'न'वी बाजू आणि पर्स्पेक्टिव्ह, दोघांचीही बदनामी थांबवा!!!!!!

आता माझ्या लक्षात येतय की पर्स्पेक्टिव्ह म्हणजेच नवी बाजु असावेत (प्रतिसादाच्या स्टाईल आणि पर्स्पेक्टिव्हच डायरेक्ट भाषांतर बघता).

स्टाइल बऱ्यापैकी (तंतोतंत नव्हे.) सारखी आहे, हे खरेच आहे. (Imitation is the best form of flattery?) परंतु, 'न'वी बाजू हे पर्स्पेक्टिव्ह नव्हेत. (पर्स्पेक्टिव्ह यांच्या वतीने मी अर्थातच बोलू इच्छीत नाही, परंतु तेही 'न'वी बाजू नसावेत, असे मानायला जागा आहे, असे निदान मला तरी वाटते. चूभूद्याघ्या.)

तसेही, माझी स्टाइल प्रताधिकारमुक्त आहे; कोणीही त्या किंवा तत्सम शैलीचा अंगीकार केल्यास त्याबद्दल मला काही प्रत्यवाय नाही.

इत्यलम्|

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 24/01/2021 - 10:02

In reply to by 'न'वी बाजू

'न'बा, तुम्ही विनोदाची आणखी एक शक्यता सोडून दिलीत का लक्षात आली नाही? ते ओपींच्या स्त्रीवादाबद्दल बोलतायत! ओपी संगीतकार म्हणून प्रसिद्ध होते, आहेत; स्त्रीवादाचं कायतरी नवंच लफडं दिसतंय!

'न'वी बाजू Sun, 24/01/2021 - 17:28

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हो, त्या प्रतिसादात ओपी दिसले होते खरे, परंतु ते तेथे नक्की का टपकले, ते माझ्याही डोक्यावरून गेले. म्हटले असेल गब्बरच्या 'निपों'सारखे काहीतरी, आपल्याला काय कळते त्याच्यातले, म्हणून सोडून दिले, झाले.

असो चालायचेच.

'न'वी बाजू Sat, 23/01/2021 - 18:14

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हा 'छू!' करण्याचा प्रकार आहे काय?

----------

परंतु असो. मला नाही वाटत तो प्रतिसाद तितक्या गांभीर्याने घेण्यालायक आहे म्हणून. त्यात मला नि चिंजंना 'युज्वली बॅलन्स्ड' म्हटलेले आहे. आता तुम्हीच मला सांगा, मी तुम्हाला कोठल्याही अँगलने बॅलन्स्ड वगैरे दिसतो काय?

आणि, चिंजं?????? त्यांची काय म्हणून अशी बदनामी?

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 24/01/2021 - 09:59

In reply to by 'न'वी बाजू

छे, अजिबातच नाही.

मी तुम्हाला कोठल्याही अँगलने बॅलन्स्ड वगैरे दिसतो काय?

आधी दिसा, मग बॅलन्स बघू या. (आता 'डिब्बे पे डिब्बा ... ' जोक आणि तुमचं न दिसणं याची सांगड घालून 'न'वी बाजू किंवा नंदन यांनी एखादा नवा जोक तयार करून सांगावा. अमुकसुद्धा असले जोक चांगले करतो. आणखी कुणीही केलेला चालेल, पण हे तिघे असले 'षी, आवरा!' असले विनोद करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत.)

मला नाही वाटत तो प्रतिसाद तितक्या गांभीर्याने घेण्यालायक आहे म्हणून.

:-) आपलं एकमत आहेच.

स्त्रीवादी चिंतन किंवा विनोद काहीही केलं तरी 'पुरुषच बॅलन्स्ड वाटतात', असं म्हणणारे प्रतिसाद, लेखन, लोक यांचं काय करायचं हे आता मला नव्यानं शिकायची गरज असणारे का? चाळीशी आली आता माझी!! :ड

पर्स्पेक्टिव्ह Sat, 30/01/2021 - 22:44

In reply to by गोगोल

हळूच सुचित करुन जात की म्हणजेच तू स्त्रीवादाच्या विरुद्ध आहेस आणि आमच्यातला नाहीयेस.

व्हॉट द एफ्...! असला विचारही मनाला शिवला नव्हता.

बादवे, वोक म्हणजे काय हे आत्ताच कळलं. त्याबद्दल धन्यवाद. ह्या आधी हा शब्द कधी वाचला/ऐकला नव्हता.

न'बा आणि मी, आमच्यात 'व्ह' हा एव्हढा मोठ्ठा फरक आहे. कर्ट्सी टू गुगल टायपिंग. (आणि यू कॅन ब्लेम इट ऑन नवनीत शब्दकोश इफ यू वॉन्ट टू!)

हे देखील वॉट असं टायपायला हवं असं काही प्युरिटन्स म्हणतील, बट दे कॅन गो फक् देमसेल्वज्!१अ

१अ ह्या अजरामर वाक्याबद्दल काळ्यापिवळ्या नवसाच्या जनककर्त्याला एक ग्लेनफ़िडीच लागू!

वेल, ऑन अ सायनिंग नोट, लेस्बियनिझम, किंवा मोर स्पेसिफिकली, बिइंग अ लेस्बियन (ऑर फॉर्दॅटमॅटर, एलजीबीटीक्यू) शुडण्ट बी अ सब्जेक्ट ऑफ रिडीक्यूलस जोक्स. अर्नेस्टली. वॉट से? ऑर व्हॉट से? व्हॉटेव्हर.

चिंतातुर जंतू Sun, 31/01/2021 - 16:02

In reply to by पर्स्पेक्टिव्ह

बिइंग अ लेस्बियन (ऑर फॉर्दॅटमॅटर, एलजीबीटीक्यू) शुडण्ट बी अ सब्जेक्ट ऑफ रिडीक्यूलस जोक्स. अर्नेस्टली.

  1. माणसाने फार अर्नेस्ट असू नये.
  2. बरेच लोक स्वतःवर हसू शकतात. *

* - गोगोल नाव घेतलेल्या व्यक्तीस ते करता येऊ नये हे म्हणजे फारच होते असे म्हणणे अंमळ अर्नेस्ट होईल असे वाटते. असो. चालायचेच.