Skip to main content

अंतर्नाद

अमूर्ताचा अंतर्नाद
अक्षरांच्या कपारीत
शब्दाशब्दाच्या घळीत
ओळीओळीत गुंजतो

अमूर्ताचा पायरव
हलकेच जाणवता
अनाहत तरंगांनी
रिक्त डोह खळ्बळतो

अमूर्ताचा पोत कसा?
अमूर्ताचा पैस किती?
अमूर्ताचा ठाव कुठे?
उत्तरांच्या निबिडात
अस्तित्वाचा अणुरेणू
अहर्निश भटकतो