Skip to main content

कंट्री सॉन्ग्ज

अमेरिकेत कंत्राटदार (कॉन्ट्रॅक्टर) नोकरीमध्ये खूप खूप गावे/शहरे फिरायला मिळाले. खूपशा राज्यात बरीच वर्षे काढल्याने, तेथील राहणीमान समजायला मदत झाली. गावाकडचे आयुष्य आणि शहरातले आयुष्य यात बरीच तफावत असते हे लक्षात आले. उदाहरणार्थ - शहर फार इंडिफरेन्ट असते, कोणाचे कोणाच्या आयुष्यात लक्ष नसते. कामास काम, बाकी तुम्ही तुमचे राजे. on your own . याउलट गावात प्रत्येकाला प्रत्येकजण माहीत असतो. आपुलकी असते पण पायात पायही असल्यासारखे वाटते. तुम्हाला काय सूट होते, तुम्ही ठरवायचे. शहरात उंच टोलेजंग इमारती तर गावात टुमदार, प्रशस्त घरे, खूप मोकळे परसदार, आवार. अनेक ठिकाणी घोडे, गायी पाळणारे लोक, शेते. अरे मग हे तर अगदी भारतासारखेच की - असे लक्षात आले. गावाकडे देशभक्तीही खूप दिसते. अनेक युवक आर्मी, नेव्ही, मरीन, वायुदलात भरती होण्याकरता जातात. शाळेत त्यांच्याकरता खास स्कॉलरशिप्स असतात. दुकानांबाहेर मोठे मोठे अमेरीकन फ्लॅग असतात. याउलट शहरात हे असे इतके डोळ्यात भरण्यासारखे दिसले नाही.शहरी मूल्ये वेगळी तिथे स्पर्धा, घाईघाई, ट्रेन्स, धामधूम तर गावात बसेस ची जास्त सेवा, एकंदर निवांत सुशेगाद आयुष्य. या फरकामुळे, गाव आणि शहर यांच्यात एकमेकांना कमी लेखण्याची स्पर्धाही. आता हे गाणेच घ्या ना -
स्मॉल टाउन बॉय - डस्टिन लिन्च
या गाण्यात मुलींना गावातली मुले कशी आवडतात याबद्दलचे boasting आहे.
>>>>>She can have anybody that she wants to be
Anywhere she wants to be
She loves a small town boy like मी>>>>
अजून एक - यात वर्णन आहे की मुलीच्या आई-वडिलांना वाटते, की मुलीने शहरी, वकील/डॉक्टरांशी लग्न करावे पण त्यांची परी गावातल्या शेतकर्याच्या मुलाची निवड करते.
लेडीज लव्ह कंट्री बॉयिज - ट्रेस् ॲडकिन्स्
>>>>Yeah, you know mamas and daddies want better for their daughters
Hope they'll settle down with a doctor or a lawyer
In their uptown, ball gown, hand-me-down royalty
They never understand
Why their princess falls
For some…>>>
म्हणजे एकंदर गावातील लोक स्वतः:ला रफ & टफ, कणखर, काटक, मजबूत समजतात. तर शहरी पुरुष त्यामानाने sissy असे चित्र या गाण्यांत रंगवलेले असते.
आता हेच गाणे घ्या यात या शेतकऱ्याचा राखणदार कुत्रा एका शहरी माणसावर साधा भुंकतो आणि तो माणूस सटपटतो. हे असेच काहीतरी चितारलेले असते.
रफ & रेडी - ट्रेस ॲडकिन्स
बरेचदा कंट्री सॉंग्ज ही, प्रेयसी, दारू/बीअर, शेतात वापरल्या जाणाऱ्या रफ आणि टफ गाड्या, मोठे टायर्स, मासेमारी यांच्या वर्णनांनी चितारलेली असतात. उदा -
मड ऑन द टायर्स - ब्रॅड पैसली
.
बॉडी लाइक बॅक रोड - सॅम हंट
या गाण्याच्या चित्रीकरणात गावात होणारी कार रेस चितारलेली आहे.
पण हां अनेक गाणी ऐकल्यावर अजून एक थीम लक्षात आली ती म्हणजे - गावाकडची मूल्ये. यामध्ये मुली खूप डिव्होटेड तसेच आई मुलांच्या खाण्याजेवणाची काळजी घेणारी असते. आजी-आजोबा असतात, संस्कार असतात. आता स्कॉटी मकरीरी ची ही गाणीच घ्या ना -
फाइव्ह मोअर मिनीट - स्कॉटी मकरीरी यात आपण आईला नेहमी खेळताना म्हणायचो ना 'आई ५ मिनिटात आले ग" तसे प्रसंग घेतले आहेत. कि असे प्रसंग ज्यातून पाय निघत नाही उदा - मित्र-मैत्रिणींचा खेळ, प्रेयसीबरोबर घालवलेली संध्याकाळ, .... ज्यात आपण म्हणतो अरे अजून ५ मिनिटं , अजून ५ मिनिटं. पण या गाण्याचा शेवट फार टचिंग आहे. आजोबांचे शेवटचे क्षण समीप आहेत आणि नायक म्हणतो "देवा अजून फक्त ५ मिनिटं - अजून ५ मिनिटं"
स्कॉटीची सगळीच गाणी माझ्या आवडीची आहेत. खूप आदर्शवादी, कौटुंबिक मूल्ये त्याच्या गाण्यात चितारलेली असतात. आवाजही फार मस्त आहे. डीप
ख्रिस्टमस इन हेवन - स्कॉटी मकरीरी
.
कॅरोलिना आईज
.
जस्ट फिशिंग हे एक सुरेख गाणे आहे. यात नायक म्हणतो त्याची लहानशी मुलगी समजते आहे आम्ही फक्त मासेमारी करत आहोत ती हे जाणतच नाही की आम्ही मुख्य काम तिच्याकरता बालपणीच्या सुंदर आठवणी निर्माण करतो आहोत. हेच तर दिवस आहेत जे ती जपेल, चेरीश करेल. मोठेपणी हे विसाव्याचे क्षण तिला उपयोगी पडणार आहेत.
.
एका अजून एका थीम म्हणजे माणूस शहरात जाऊन कामाच्या रगाड्यात, आयुष्यात अडकून पडतो पण गावाकडची आठवण काही मनातून जात नाही आणि मग अशाच उदास क्षणी ते गावाकडचं कौलारू घर, आई साऱ्या आठवणी अंगावर तुटून कोसळतात.
बॅक ॲट मामाज - टिम मकग्रॉव
या गाण्यातील गावाकडील निवांतपणाचे वर्णन जरूर वाचा.
>>>>Meanwhile back at Mama's
The porch lights on, come on in if you wanna
Suppers on the stove, and beer's in the fridge
Red sun sinking out low on the ridge
Games on the tube and daddy smoked cigarettes
Whiskey keeps his whistle wet
Funny the things you thought you'd never miss
In a world gone crazy as this >>>
.
याच थीमवरचे
जॉन डेन्व्हरचे एक अतिशय विस्टफुल अतिशय सुन्दर गायलेले हे अजुन एक गाणे - कितीदा ऐकते मी.
कंट्री रोड टेक मी होम - जॉन डेन्व्हर
.
मूल्याबद्दल, आदर्शांबद्दल च बोलायचे झाले तर स्त्रियांनी गायलेली हि गाणी एका. प्रियकराने केलेली प्रतारणा, व्यभिचार, विश्वासघात या थीम्स या गाण्यात येतात. पण गावाकडची मुलगी असल्याने, तीही टक्कर देणारी असते, ती असले काही सहन तर करता नाहीच वर धडा शिकवते. ट्रू रेडनेक वूमन.अनेकांना रेडनेक असल्याचा अभिमानही असतो. रेडनेक म्हणजे गावरान, गावठी मला वाटतं. जरा डेरोगेटरीच शब्द आहे.
रेडनेक वुमन - ग्रेट्चेन विल्सन
.
लुक इट अप - ॲश्टन शेफर्ड या गाण्यात नायिकेचा प्रियकर चोरुन एका अन्य स्त्रीबरोबर लफडे करत आहे. पण जेव्हा नायिकेला ते कळते तेव्हा ती आकाशपाताळ एक करते, त्याला चांगलाच धडा शिकवते. चक्क त्याच्या सर्व वस्तूंचा गराज सेलमध्ये लिलाव करते. अगदी त्याच्या मोटरसायकलपासून ते त्याच्या लाडक्या पाळीव कुत्र्यापर्यन्त.
कॅरी अंडरवूडचे पुढील गाणेही तसेच -
डर्टी लाँड्री - कॅरी अंडरवुड
बिफोर ही चीटस - कॅरी अंडरवुड या गाण्यातही नायिका चक्क नायकाची महागडी, पॉश कार, हॉकी स्टिकने, फोडते वगैरे. :)
.
जाना क्रेमरचे मग बर्यापैकी सौम्य गाणे - आय गॉट द बॉय - जाना क्रेमर
.
कीप मुर एका माझा आवडता पण दुर्दैवाने दुर्लक्षित असा एका गुणी गायक आहे. हा फार मिश्किल वाटतो मला. त्याचे बॅकसीट - कीप मुर हे एक महामिष्किल गाणे आहे. ज्यात त्याने एका तरुण मुलामुलीचा पहीला प्रेमप्रसंग अर्थात कारच्या मागच्या सीटवरती घडलेला प्रसंग चितारला आहे. गाण्याचे चित्रीकरण भन्नाट आहे. गाण्यातले त्याचे हसू महामिश्किल.
त्याचे एक गाणे आहे - डर्ट रोड जे मला आवडते. तोम्हणतो मला स्वर्गात जायला आवडेल, नाही असे नाही पण एकच अट आहे - तिथे आमच्या गावातले चिखल-मातीचे रस्ते हवेत म्हणजे अर्थात माझ्या गावासारखा जर स्वर्ग असेल तरच. :) यातही परत गावाचा अभिमानच दिसतो. गावाचा खूप अभिमान असतो या लोकांना हे खरे आहे.
ल्युक ब्रायनचे पुढेल गाणेच ऐका.व्हॉट मेक्स यु कंट्री - ल्युक ब्रायन

अलाबामा, ओक्लाहोमा, नॉर्थ कॅरोलिना, जॉर्जिआ वगैरे नावे गाण्यात येत जातात व मग आपल्यालाच आपले कळू लागते की हां ही गावप्रधान राज्ये दिसतायत.
यु आर रीझन गॉड मेड ओक्लाहोमा - ब्लेक शेल्टन

https://www.youtube.com/playlist?list=PLo4u5b2-l-fDxT8iRSbF6-6TW5vU06Q4t
या प्लेलिस्टवर तुम्हाला अनेक गाणी आढळतील.

जुन्या गायकांची गाणीही मस्त आहेत - जॉनी कॅश, पीटर-पॉल-मेरी , रोझॅन कॅश, केनी रॉजर्स, जॉन डेन्व्हर. त्याबद्दल पुन्हा कधीतरी

Node read time
5 minutes

ललित लेखनाचा प्रकार

5 minutes

shantadurga Sun, 06/09/2020 - 00:37

The good lie नावाचा सिनेमा बघितला. माणसाचं मूळ गाव आणि भूतकाळ त्याचा पिच्छा सोडत नाही...आफ्रिकन युद्धातून वाचलेल्या आणि अमेरिकेत आश्रित म्हणून गेलेल्या मुलांची परवड असा विषय आहे.

अबापट Sun, 06/09/2020 - 07:22

मामी झकास गाणी.
ते अमेरिकेतील खेडी/गावं वगैरे काही कळलं नाही.
पण आपल्याला काय त्याचं ? , गाणी ऐकण्याशी मतलब आपला.
झकास धागा.

'न'वी बाजू Wed, 02/06/2021 - 23:15

In reply to by अबापट

ते अमेरिकेतील खेडी/गावं वगैरे काही कळलं नाही.

कसे आहे ना, अण्णा, की "भारत हा खेड्यांचा देश आहे", असे कायसेसे आपले सर्वांचे पूज्य बापू (चूभूद्याघ्या.) म्हणत असत.

पण आपल्या (म्हणजे तुमच्या. आणि माझ्या भूतपूर्व.) करंट्या देशातल्या करंट्या गाण्यांतून 'महाराष्ट्र', 'गुजरात', 'बिहार', 'तेलंगण' असले काही येत नसल्याकारणाने, लोकांच्या ते लक्षात येत नाही.

संबंधित अधिकारी याकडे लक्ष देतील काय?

सामो Sun, 13/09/2020 - 00:47

मस्त!!!

https://www.youtube.com/watch?v=wEOdcR6CJZ4

Oh, give me land, lots of land under starry skies above,
Don't fence me in.
Let me ride through the wide open country that I love,
Don't fence me in.
Let me be by myself in the evenin' breeze,
And listen to the murmur of the cottonwood trees,
Send me off forever but I ask you please,
Don't fence me in.
Just turn me loose, let me straddle my old saddle
Underneath the western skies.
On my Cayuse, let me wander over yonder
'Till I see the mountains rise.
I want to ride to the ridge where the west commences
And gaze at the moon 'till I lose my senses
And I can't look at hovels and I can't stand fences
Don't fence me in.
Oh, give me land, lots of land under starry skies,
Don't fence me in.
Let me ride through the wide open country that I love,
Don't fence me in.…

सामो Mon, 31/05/2021 - 00:50

५०० माइल्स' (https://www.youtube.com/watch?v=B_K6z3HiRAs) गाणे ऐकून कढ का येतो ते कळलेले नव्हते. एवढेच माहीत होते की इट इज अ रेलरोडर्स लॅमेंट म्हणजे शोक आहे. रेलरोडर्स कोण वगैरे प्रश्न पडले नव्हते. परंतु आज, प्राईमवरती 'रायडिंग द रेल्स' नावची डॉक्युमेन्टरी पाहीली आणि लक्षात आले. अमेरिकन इतिहासाच्या एका विशिष्ठ काळाविषयीचे ते गाणे आहे. जागतिक मंदीच्या विळख्यामध्ये भरडल्या गेलेल्या लोकांविषयी विशेषत: अनेक कुमारवयीन मुलांना जगाव्या लागलेल्या भटक्या आयुष्याविषयी ते गाणे आहे. मंदीच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या कामधंदे गेले आणि या काळात लोकांनी आपापल्या मुलांना 'तुम्ही तुमचे पोट भरा आता म्हणुन' घराबाहेर काढले तर काही मुलेमुली ही साहसी वृत्तीतून बाहेर पडली. ही मुले भटकी झाली. मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांबरोबर अमेरीकेत राज्ये फिरत. मिळेल ते काम करुन पोट भरत. अचानक सुस्थितीमधुन, हलाखीत पडलेल्या या मुला-मुलींना आयुष्याचे भयंकर चटके बसुन अकाली प्रौढ होत. भूकेमुळे खपाटीला गेली पोट, विषण्ण एकटेपण, उद्याच्या अन्नाची ना शाश्वती ना भविष्यकाळावरती विश्वास. अजुनही अनेक जणांच्या डोळ्यात् ते दिवस आठवले की अश्रू येतात. हा जो काळ आहे, हे जे 'होमलेस बॉइज', 'होमलेस बोहेमिअन' त्यातुन होबोस असे या मुलामुलींना म्हटले गेले.

http://xroads.virginia.edu/~MA01/White/hobo/intro.html
https://www.collectorsweekly.com/articles/dont-call-them-bums-the-unsun…

या काळाविषयी काही गाणी खाली -
https://www.youtube.com/playlist?list=OLAK5uy_nmaS8c8c2SuWQQchLUNbDDRZb…
https://www.youtube.com/playlist?list=PLo4u5b2-l-fDDNsETGCjTzcNKNTs9VF0k

'न'वी बाजू Wed, 02/06/2021 - 23:09

In reply to by नील

ते जाऊ द्या. हे गाणे ऐका. सांगा कशाची आठवण येते.

किंवा हे.

आता हे गाणे आणि हे गाणे जक्स्टापोझ करून पाहा. आहे की नाही गंमत?

----------

बरे, तेही जाऊ द्या. आरडी बर्मनसारख्याने जर हे केले, तर ते एक वेळ समजू शकतो. तसलाच तो.

पण, शांता शेळकेंसारख्या नावाजलेल्या, ताकदीच्या कवयित्री-इन-हर-ओन राइटने हे ढापून त्याच्यातून हे असले काहीतरी काढावे, आणि, हाइट ऑफ हाइट्स, हे ढापून त्याच्यातून हे असले काहीतरी काढावे, याला काय म्हणाल?

असो चालायचेच.

घाटावरचे भट Thu, 03/06/2021 - 13:09

In reply to by 'न'वी बाजू

>>आरडी बर्मनसारख्याने जर हे केले, तर ते एक वेळ समजू शकतो. तसलाच तो.

वैयक्तिक मत - आर्डीच्या इतर ओरिजिनल चालींमुळे त्याला बाकीच्या चोऱ्या माफ आहेत. निदान माझ्या दृष्टीने तरी. बाकीच्यांना काय वाटतं याबद्दल मला उंदराच्या बुडाइतकेही घेणेदेणे नाही.

'न'वी बाजू Fri, 04/06/2021 - 17:13

In reply to by घाटावरचे भट

बाकीच्यांना काय वाटतं याबद्दल मला उंदराच्या बुडाइतकेही घेणेदेणे नाही.

तुम्ही भले द्यालसुद्धा. परंतु, उंदराचे बूड घेऊन मी काय करू?

पर्स्पेक्टिव्ह Fri, 11/06/2021 - 21:58

In reply to by 'न'वी बाजू

तुम्ही ज्या 'घरकुल' चित्रपटातल्या 'बांबूचे घर...' या गाण्याचा उल्लेख केलाय ते गाणं अँडी विल्यम्सचे मूळ गाणं १९५८ चं. त्यावरून नंतर अर्ल ग्रांट (१९६०), सदर्न कल्चर ऑन द स्कीड्स (१९९७), द बार्बरी कोस्टर्स (२००५), द हिलीबिली मून एक्स्प्लोजन (२००७) असे अनेक व्हर्जन (अगेन, 'व्ह' बद्दल क्षमस्व!) निघाले. मग आपल्या शांताबाईंनीच काय म्हणून घोडे मारले?

सुधीर Mon, 31/05/2021 - 20:22

कॅरी अंडरवुडचं "बिफोर ही चीटस" २००७-०८ च्या आसपास चार्टवर टॉप मध्ये होते. मला ते गाणे खूप आवडलेले. पण ते कंट्री म्युझिक आहे असे त्यावेळी वाटले नव्हते. बाकी गाण्यांच्या बाबतीत मी "ययाति" आहे. दरवेळी नवीन गाणी, नवीन गायक जून्या गाण्यांची जून्या गायकांची जागा घेत रहातात. फार क्वचित मी जूनी गाणी ऐकतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 03/06/2021 - 07:47

In reply to by सामो

मग तिचा पूर्ण अल्बम 'ब्लोन अवे' ऐकून पाहा. Nobody ever told you, किंवा Wine after whisky अंमळ चीजी आहेत, पण कंट्री साँग्ज आणखी काय निराळी असणार. Two Black Cadilacs पूर्ण बघा. यातलं Blown Awayसुद्धा चांगलं आहे.

सामो Thu, 03/06/2021 - 23:11

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पहाते. २ ब्लॅक कॅडिलॅक्स तू सांगीतलेले पूर्वी. ऐकले होते. 'प्रतारणा किंवा प्रेमातील फसवणूक' ही थीमच दिसते आहे तिच्या त्या आल्बमची.

बिपीन सुरेश सांगळे Thu, 03/06/2021 - 21:43

सामो
खूप वेगळ्या विषयांवर आपले लेख असतात
खूप इंटरेस्टिंग माहिती