फुर्रोगामी फियास्को
आज्ञा पाळणारे आज्ञाधारक
आदेश पाळणारे गुलाम
हुकुम देणारे हुकुमशहा
फतवा मानणारे धार्मिक
मंगळसूत्र आणि कुंकू
स्रीवर लादलेली बंधने
स्त्रीचं गृहकृतदक्ष राहणं
जेन्डर बायस्ड अन् स्टिरिओटाईप
हिजाब अन् बुरखा हर चॉईस
हलाला आणि मुताह विवाह
धार्मिक स्वातंत्र्याचे रितीरिवाज
तीन तलाक धार्मिक अधिकार
वटपौर्णिमा किंवा करवा चौथ
स्रीत्वाच्या गुलामीचं जोखड
मासिक धर्मात स्त्रीची अलिप्तता
म्हणजे स्त्रीत्वाचे शोषण
इद्दाह मात्र धार्मिक पवित्र विधी
"संविधान की मनुस्मृती" नारा असतो प्रोग्रेसिव्ह
"संविधान की शरिया" नारा कम्युनल प्रोपागंडा
सवर्ण दलित फूट म्हणजे हिंदूंचा वर्चस्ववाद
शिया सुन्नी वैर असतो इस्लामी अंतर्गत वाद
सर्वधर्मसमभावाचा वैचारिक विचका
फुर्रोगाम्यांनी केलेला इहवादी पचका
© भूषण वर्धेकर
१० फेब्रुवारी २०२२
पुणे
कोणा विषयी काहीच कॉमेंट करायची नाही
पण सर्व वादी.
उजवे वादी,डावे वरी,पुरोगामी वादी,नास्तिक वादी, अस्तिक वादी, राष्ट्रवादी, भाषा वादी,संस्कृती वादी हे सर्व वादी हे कोणी तरी स्पॉन्सर केलेली भाडोत्री लोक आहेत .
मग ते स्पॉन्सर राजकीय असतील,विघटन वादी असतील,विदेशी देश असतील,देशी संस्था असतील ,विदेशी संस्था ह्या मधील कोणी तरी असतेच.
आर्थिक नियोजन ,आणि प्रसिद्धी नियोजन हेच स्पॉन्सर करतात.
लोकांनी ह्या सर्व वादी पासून लांब राहवे .
आणि स्व हित वादी,विचार वादी,राहावे.
त्या मध्येच देशाचे आणि स्वतःचे हित आहे
माझी भूमिका
मी काल सकाळी जसं सुचलं तसं लिहिलं. सकाळी बातम्या वाचायला सुरुवात केल्यावर सगळीकडे हिजाब विषयी निघणारे, मोर्चे, आंदोलने आणि समर्थनार्थ आणि विरोधी सगळं वाचलं. म्हणजे सर्वपक्षीय व्यापक कटाचा भागच आहे असे दिसते. दुटप्पीपणा लगेचच दिसून येतो स्त्रीयांच्या बाबतीत प्रश्न मांडले जातात तेव्हा. एकूणच फियास्को झालेला आहे. समजा जर बुरखा किंवा हिजाब परिधान करूनच घराच्या बाहेर पडले पाहिजे असा फतवा असेल किंवा घरातील पुरुष मंडळी स्त्रीयांना सक्तीने सांगत असतील तर ही आसक्ती किंवा स्त्रीवर केली जाणारी बळजबरी नाही का? किंवा धर्माच्या नावाखाली असेच वागा असे पढवले जात असेल तर व्यक्तिगत स्वातंत्र्याची किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली होत नाही का? होत असेल तर त्याविरोधात कोणी अमुक स्त्रीने किंवा तमुक पुरुषाने आवाज उठवला पाहिजे असा कोणता दंडक आहे का? एरवी धर्मातल्या वाईट चालीरीती, कुप्रथा आणि बुरसटलेल्या रुढी, परंपरा ह्यावर तीखट भाषणे करणारे तथाकथित चळवळींचे कार्यकर्ते लोकांची भूमिका नक्की काय असावी?
मुळात पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्री ही गुलाम राहिल याची तजवीज केलेली असते सोकॉल्ड संस्कृतीचे कोंदण करून. त्यामुळे स्त्री पुढारली म्हणजे नेमकं काय बदललंय हे ज्याने त्याने ठरवलंय.
त्यामुळे दगडूशेठ ला ऋषीपंचमीच्या निमित्ताने जेव्हा सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचा इव्हेंट साजरा होतो तेव्हा उगाचंच आम्ही हिंदू संस्कृती जोपासण्याची भरीव कामगिरी करतो असा फुकाचा अविर्भाव असतो ना अगदी तसाच हिजाब, निकाब, बुरखा याच्या समर्थनार्थ येणाऱ्या लोकांचा तथाकथित सेक्युलर अविर्भाव असतो.
बेसिकमध्ये लोचा झाला आहे खूप लोकांचा.
नोटेड.
मी सक्ती शब्द वापरणार होतो पण सक्ती मध्ये हुकूम पाळण्याचा आग्रह असतो. नाही पाळला तर शिक्षा असते.
मी आसक्ती शब्द वापरला त्यामागे भीती दाखवून प्रथा पाडायला भाग पाडणे किंवा गोडीगुलाबीने गळी उतरविणे या संदर्भात वापरला. काही लोकांना उगाचंच आकर्षण असते 'असे केले तर ...' आपण लय भारी कायतरी करतो याचं. सत्य मात्र वेगळंच असतं.
आपल्याकडे हिजाब परिधान न केल्याने कोणीही शिक्षा करत नाही. पण उगाचंच बागुलबुवा करायचा चंग बांधलाय. एकीकडे हिजाब तर एकीकडे भगवी उपरणे कमी म्हणून काही आंबेडकरवादी निळ्या रंगाचे कापडं गळ्यात गुंडाळून आले. असे प्राणी वेगळ्याच ग्रहावर अधिवास करत असतात बुवा. फक्त उद्या प्रत्येकाने धर्मिक पद्धतीने कॉलेजमध्ये यायचं ठरवलं तर जैन धर्मीय दिगंबर पंथातील लोकांनी काय करायचं? अन् कसं यायचं? ;-)
एक जावेद अख्तर फक्त व्यवस्थित कमेंटले या मुद्य्यावर्
बाकी चे नेहमीचेच यशस्वी नेहमीप्रमाणे
मुग गिळुन / जादु की चुप्पी / मौनं सरवार्थ वगैरे वगैरे
सर्वात मोठा जोक म्हणजे अल्लाहु अकबर हे जय श्रीराम पेक्षा वेगळ कसं?
आणि इराण बिफोर खोमेनी चा मुद्दा जबर होता
पण नेहमीचे यशस्वी कावरेबावरे अंग चोरतांन नेहमी सारखे
अरे हो जावेद अख्तरांनी ही एक मर्दानगी वाली चुक केलीच
च्या च्या च्या अर्र म्हणजे एकही प्रॉपऱ पऱ्फेक्ट कमेंट नाही सर्व तंबुवाल्यांच्या च्या च प्रतिक्रीया झाल्ल्या की
मंडप डेकोरेटर्स संघटनांचा विजय असो
देश हित
देशाचे हित कसे धोक्यात येईल आणि देशात सर्व धर्मीय ,सर्व जातीय लोक एकमेकांचे कसे कट्टर दुश्मन होतील.
ह्या साठी सर्व बुद्धी वापरणारी लोक म्हणजे पुरोगामी लोक.
त्यांचा विरोध प्रतेक व्यक्ती नी केला पाहिजे.
समाज सुधारक ,प्रगत विचार करणारे,जाती धर्म ह्याच्या शी काहीच देणे घेणे नसणारे
विश्र्वापेक्षा माझा देश महत्वाचा आहे.
असा जे विचार करतात ते पुरोगामी .
ही आदर्श व्याख्या झाली
.
पण भारतीय पुरोगामी
हिंदू ,मुस्लिम,ख्रिस्त,शीख ह्यांच्यात दंगल च झाली पाहिजे अशी वृत्ती असणारे.
भारत नेहमीच जाती धर्मात विभागलेला राहील हेच ध्येय असणारे.
भारतातील कुटुंब व्यवस्था जी जगात आदर्श आहे.
लहान मूल,स्त्रिया ,वरिष्ठ नागरिक ह्यांची काळजी घेणारी आदर्श व्यवस्था.
ही आदर्श व्यवस्था लवकर नष्ट होवून .
वरिष्ठ नागरिक असहाय झाले पाहिजेत.
मुल बेवारस झाली झाली पाहिजेत.
स्त्रिया ना भासमय मुक्ती देवून ती प्रतेक पुरुष साठी उपलब्ध झाली पाहिजे .
हे ध्येय असणारी जमात म्हणजे पुरोगामी.
समाज ,देश ह्यांची खरी दुश्मन.
याच विषयावर गुप्ताजी
याच विषयावर गुप्ताजी
- ओंकार.