Skip to main content

दोन बाजू, चार हाथ लांब : नाणं आणि नेणिवा

एकीकडे अक्षरे मेळवूनि , पैजा जिंकल्या
सगळ्यांना खुले स्थळ दिले,येऊ दे सगळे
बोला, लिहा काय वाट्टेल ते! आम्ही आहोत
छापू आपण पटणारे, न पटणारे !सगळे!

दुसरीकडे केली कंपूबाजी, दिली कामे
भाई बंधूंना, रोटी-बेटी, शेटजी-भटजींचा
केला नेक्सस, देतो ऍक्सेस फक्त काहींना !

एकीकडे टाळ बोले चिपळली, नाच माझ्यासंग,
देवाजीच्या दारी आज, रंगला अभंग
दरबारी आले, रंक आणि राव
सारे एकरूप, नाही भेदभाव
पण मनी नाही भाव , म्हणे देवा मला पाव,
देव काही अशाने भेटायचा नाही र
देव काय बाजारचा भाजी पाला नाही र.
मातीचा देव, त्याला पाण्याचं भेव ।
सोन्या-चाँदीचा देव, त्याल चोराचं भेव ।
लाकडाचा देव,त्याल अग्नीचं भेव ।
देव बाजारचा... भाजीपाला नाही र
दुसरीकडे कंपूबाजीचे -आईज वाईड शट !
कॅम्प्यु बाबा हिशेब कर हिशेब कर
हिशेब कर... साटी-लोटी चा जप कर
कर कर जप जप जप
क्लिक क्लिक क्लिक
टिक टॉक, टिक टिक टिक,
आले पैसे लख लख लख..
लख लख चंदेरी तेजाची
न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योती या हा हा
एकीकडे गोपनीयता टॉप पे भारी,
सरासरी, गेला बाजार, असली वाक्ये,
लेखकाची री करणार , ट्रॉल एडिटर,
त्यांना मावश्या दोन...
जिंकून जिंकून जिंकणार कोण,
कंपूबाजी शिवाय हायच कोन,

क्या मौसी यहाँ कहाँ .. तुम इधर तो
तो उधर गल्ले पे कौन है.
अल्गोरिदम वाले चचा है ना तुम्हारे !

दुसरीकडे its time for us to write
brahmin manifestos,
raise kshatriya swords
tally Vaishya checks and balances
and stamp and brand Dalits,
stamp stamp stamp stamp,
brand brand brand brand
का ? क्यू ? किस वजहसे ..
कारण आम्ही घराला घरपण देणारी माणसे आहोत.
आग्रह करून आग्रहाराच्या दारातून बाहेर पाठवतो.
नव्हे लाथ मारतो तिथे पाणी काढतो.
होणारच दूर दुष्काळ. पण अवकाळ आलाय
त्याला कंपूबाजीतून बाहेर करा.
आणि चालू देत जसे चालले आहे सगळे
कॅम्प्यु बाबा हिशेब कर
ट्रॉल वाहिनी तुम्ही विक्षिप्त व्हा
जांतातुर चिंटू तूम्ही इन लाईन या
सँडोक्यान तुम्ही निषेध नका नोंदवू
तूम्ही manifesto ची जाहिरात करा
बाकी पुन्हा कुणी आला ना कंपूबाजीत
आग्रहाराच्या बाहेरून तर ...
देख लेंगे हम उसको
कारण आमचे डोळे ..
आवर आईज आर... वाईड शट
Senorita ऐसे छोटे छोटे cult में ऐसी बडी बडी बाते होती है !

अस्वल Fri, 04/11/2022 - 09:30

थोडे शब्दशिंतोडे आपल्या दिवाळी अंकातल्या अपुऱ्या, त्रोटक लेखाच्या स्पष्टीकरणात उडवाल का सर?

वामन देशमुख Fri, 04/11/2022 - 10:45

In reply to by अस्वल

ते झूमलिंक शेअर करतील ना?

---

चांगल्या चांगल्या ऐसीकरांना संयम म्हणून नाहीच, सगळं पटकन करून मोकळं व्हायचं!

'न'वी बाजू Sat, 05/11/2022 - 02:02

In reply to by वामन देशमुख

काही नाही, लोकांच्या रँडम कवितांतून इकडूनतिकडून रँडमली काही ओळी उचलून, रँडमली कटपेस्ट करून काहीतरी कोलाज करण्याचा उद्योग दिसतोय, झाले. (हे आर्टवाले नि कलासमीक्षावाले यांच्याकडून याहून वेगळी काय अपेक्षा करणार!) त्यातसुद्धा चुका आहेत, पण ते सोडा.

'न'वी बाजू Sat, 05/11/2022 - 01:58

ट्रॉल वाहिनी तुम्ही विक्षिप्त व्हा
जांतातुर चिंटू तूम्ही इन लाईन या
सँडोक्यान तुम्ही निषेध नका नोंदवू
तूम्ही manifesto ची जाहिरात करा
बाकी पुन्हा कुणी आला ना कंपूबाजीत
आग्रहाराच्या बाहेरून तर ...
देख लेंगे हम उसको

हे चिंतातुर जंतू म्हणजे तुमचे खास दोस्त रणदिवे ना? (ऐकीव माहिती; चूभूद्याघ्या. आणि, खास दोस्त नव्हेत, तर उगाच कशाला त्यांना तुम्ही 'ह्या बिनडोक लोकांसोबत काय करता तुम्ही?' म्हणून विचाराल?) शिवाय, बहुधा येथील तुमचे आमंत्रणकर्ते? (असा आपला आमचा अंदाज, हं!) मग आता काय त्यांच्यासुद्धा नावाने शंख? (नाही, आमचे एक वेळ ठीक आहे, हो, पण... तुम्हीसुद्धा???)

काय दिवस आलेत!