माजी पईली बायकु-१
कदी कागुद कमी पडला त कदी पेनातली श्याई वालून ग्येली माज्या जिंदगानीची इष्टोरी लिवताना. या इष्टोरी मदलं "माजी पईली बायकु" नाव असल्यालं पर्करन हाये ते लिवतो. मनापर्मान बायकु भेटाय लई बाग्य लागतं राजे हो. गावाकड येक जोतीस व्हता त्याला माजा जनम कागुद दावला न इचारलं की बाबा रे मला बायकु कशी भेटल? त्यो म्हनला तू लई नसीब काडनार हायेस. येक सोडून दोन मिळत्याल पन येकीची बी ग्यारंती नाय. मी त्येला बोल्लो तुज्या थोतरीत देवू का येक? त्यो म्हनला माज्या थोतरीत मारसील पन नसीबाच्या थोतरीत? कसं जगायचं आसा प्रस्न हुबा राईल तवा कोनला माराया जासील? जिंदगी म्हंजे काय हाय ते येकेक मिंट निस्टून जाताना कळल तवा हसायलाबी यील आन रडायलबी यील, तवा? नसीब देतय की नेतय कळत नाय तवा?दोन दोन सेकंदाचं गनित जुळत नाय, साटवायचं की आटवायचं ते ठरत नाय, कवा मईफिल रंगती त कवा बेरंग व्हतो तवा? कदी कलर त कदी बल्याक आन व्हायीट तवा? वैसाख आन जेश्टचा ताप सहन केल्यावं आसाडीचा पाउस तुज्यावं बरसला नाईच तर काय करशीला? गाब्रीचा पाऊस म्हून वराडसील? आया था येक शकस् मेरा दरद बाटने, रुकसत हुवा तो अपना गम बी मुजे दे गया आशी हालत हुईल तवा? तुज्या इच्या,आकंक्सा आसल्या रस्त्यावं चालतील ज्यावं लिवलं आसेल, रस्ता बंद, तवा? वाळवटात तू गुलाब फुलव, पन त्यावं भिरभिर कराय फुलपाक्रु याला नाय म्हनल तवा? तू मला कागुद पघितल्यालं पैसं नग देऊ पन जवा मी बोल्लो तशी येळ यील तवा ये माज्याकड, तुला उपाय सांगतो.
मी घराकड चालाय लागलो तवा माज्या डोसक्यात लई भिरभिर चाल्ली व्हती. मैन्याभरात पोरगी सांगून आली वळखीतली आन सुपारी फुटाल्ली. चंदा, माजी व्हनारी बायकु. तिचा बा राजाराम आन आय सोर्सोती. मंजी ती इद्येची देवी हाय तीच नाव, पन लिवाय वाचाय सून्य! हिंदीत म्हन हाय पगा, काला अक्सर बैंस बराबर, तशी, आन स्वबावानी बी लई जबराट. साकरपुडाच्या येळेला मला जब्बा न सूर्वार घेयाची व्हती तवा मी बोल्लो की लीनानकलब मदी जाऊ तर न्हाय म्हनली. खादी बाजारात जाऊ म्हनली. अंगती घ्यायची व्हती सोन्याची. कल्यान जवेलर मध्ये नको म्हनली सासू. मनप्पम मदी न्हेलं. घड्याल घ्याचं तर म्हणलो सी ती पंदोलकड रोलेक्कस नायतर ओमेगा घेऊ तर सासू बोलली मोबिल मदी टाईम दिस्तो नव्हं? लास्तला दिजीतल घेतलं शंबर रुप्याचं. जालं का मनापर्मान जमाईबापू असं इचारलं सासूनं आन मेवन्यान तवा कोनाच्या मनापर्मान? असं म्हनावं वाटलं पन ते म्हंत्यात ना, दुनिया योक तरफ पन जोरू का भाऊ योका बाजुला, म्हून गप रायलो. घरला येताना लई उन लागत व्हतं. वला नायतर हुबेर टक्सी करूया म्हणलो तर मेवना रिकषान जाउ म्हणला. मी बो ल्लो मला पाठुंगली घेतो का मी जमाई बापू हाय तवा कुटे रिकशा बलवली.
साकरपुडा जाल्यावं मला सर्व लोकं बोल्ले की नाव घ्यायला पायजे जमाईराज त मी म्हनलो " कूकूचुकू कूकूचुकू, राजारामची ल्योक माजी बायकु" तर येकदम उचाकली आन म्हनली, " कूकूचुकू कूकूचुकू, चप्पल माजी पुसतो ह्यो भिकू." तिला नाव घ्याला कुनी अजून आग्रेव बी केला नवता तरी बी. तवा माजा लई कोच्या जाल्ता. इन्साल्ट.
पन सांगतो माज्या पयल्या बायको कडची मंडली लई खट.चौविसावं लागलं तवाच माज पैलं लगीन फिकस् झालं.लगीन फिकस् जालेला तवा मी लई इचार करायचो की बायकुचे लै लाड करायचं. पयल्या राती तीला मंजी चंदाला खुस करायची. लई गप्पा हानायच्या. सकाल पोत्तुर तीला जागवायचं. पन पयल्याच रातच्याला बोल्ली, " मी लई थकली हाय, " आन दुसऱ्या मिंटाला घोरायलाबी लागली. तवा माजा पयला केयलपीडी जाला.लगीन लागल्यावर आमी जेवन कराय बसलो तवा सगली लोकं तीला म्हनली नाव घे तर म्हनली " सोर्सती नं क्येला राजा संग रोमांस, भिकू घेनार माजा रातच्याला चांस", आन रातच्याला म्हंती मी लई थकली हाय.
मला झ्याक आटवतय दुसऱ्या दिशी सकालच्याला हुटली ती नऊ वाजता. डोल्यात चिपाड आलेल्या तिला म्या पघितलं आन आच्चरचकित व्हऊन गेलो. येगळीच दिसत व्हती. काल लगीन केलं तवा ब्येस दिस्नारी ती हीच का असा प्रस्न हुबा रायला. बयुटी पारलरवाले हडलीलाबी रंबा न उर्वसी बनिवत्यात असा माजा योक दोस्त बोकलत व्हता ते पतलं. ईतके दीस मंजी साकरपुडा जाल्यावं मी हया हाडळीचा आशिक कसं काय जालो व्हतो त्ये मला बी समजायना.
दुसऱ्या रातच्याला लाईट बंद झाली आन ती खाटेवं बसल्याचा चुईं आवाज आला. माज्या बाजुला झोपून बी मला चितकली न्हाई तवा मी माजा हात तिला लावला त सोताचा हात चार्शे विस हॉल्ट शाक लाग्ल्यावानी जटकला. " लाल रिबीन बांधली हाय म्या केसाला. चार दीस जवळीक न्हाई " म्हणली आन लगोलग घोरायलाबी लागली.पुन्यांदा केयलपिडी. मोबिलचा लाईट लावला न पाईलं त केसाला लावल्याली रिबीन पांढरी व्हती.
दुसरे दिवस अखेरला लगीन लावाय आल्याली लोकं पांगाय लागली. तिसरे दिवस संपला आन माजा बा आन आय म्हणलं की ते बी गावाकड चाल्ले हायेत. मी लई खुस जालो. आख्खा दीस आन रात मी आन चंदा. चार दीस जवळीक न्हाई म्हणली व्हती त्याचं बी शेवट उदया. चंदीसंग गुलू गुलु कराय माजा जीव लई आसुसला व्हता. चाचा कोप व्हटा पत्तुर आलेलं पन व्हट आजुन बी कोरड हुतं.
ललित लेखनाचा प्रकार
लै झाक, फर्मास, टाप, सालीड (
लै झाक, फर्मास, टाप, सालीड ( आमची शब्दसंपदा एवढीच, पु.लंच्या वरातीतलं खेडं आणि वटवटीतील काही अंक/प्रवेश, २-४ सिनेमे ह्याच्या भांडवलावर किती लिहणार, पण न जाणो का गावरान भाषेची ओढ खूप आहे, त्यातून डोकावणारी निरागसता, सहज-साधेपणामुळे असेल बहुदा, असो.. ) जाम भारी लिवलंय, भिकूची पुडलि इस्टोरी वाचाय आवडल! ते करमशहा का काय म्हनतात ते लिवलं नाय तुमी? पर पैली मनली कि पुडची आहेच कि!?
लई झकास झालं म्हंजे लेखान
लई झकास झालं म्हंजे लेखान बर्का. तुमच्या नसीबाचं न्हाई झालं अजून वटात पण लेखन झकास.
____________
मी कथा सुचण्याचं कारण काय याचा विचार करू लागलो.