आजकाल
anant_yaatree
कोलाहलात गर्दीच्या
एकांती मी हरवतो
अंधारून येता मीच
अंतर्बाह्य झळाळतो
रिक्ततेच्या डोहामध्ये
सदा सचैल डुंबतो
शून्य असूनही थेट
अनंताशी झोंबी घेतो
आठवता आठवता
पुन्हा त्याला विसरतो
दशदिशा कोंदून जो
दहा अंगुळे उरतो
हे एक ठिगळ
स्थिर असुनही
अनंताची यात्रा करितो |