एक कोडे
आटनी भाषेतील काही वाक्ये खाली दिली आहेत. या वाक्यांत साध्या बेरजा, वजाबाक्या, गुणाकार आणि भागाकार दिले आहेत, उदा. पन्नास अधिक चार बरोबर चौपन्न इ. एकाही वाक्याचा अथवा शब्दाचा अर्थ मराठीत दिलेला नाही. या वाक्यांत फक्त पूर्णांक वापरले आहेत आणि ते अंकांत न लिहिता अक्षरांत लिहिले आहेत.
परंतु, सावधानः अशा बेरजावजाबाक्या मराठीत लिहिताना आपण वाक्य ज्या पद्धतीने घडवतो, तीच पद्धत आटनीतली अशी वाक्ये घडवताना वापरली असेलच असे नाही. थोडक्यात काय, तर 'कख अधिक गघ बरोबर चछ' असा अर्थ जरी आटनी वाक्यात सापडला, तरी अशीच घडण त्यात सापडेल असे नाही.
आटनीतील वाक्ये-
पेमे गी डीग्
बीमी बी बी
गीमे काप् गे
कूमे कू कू
बेग्मे टा टीक्
कूमा कू बी
पोट्मो डो पे
बीमे बी बी
डोमी काप् डीग्
बीमा बी बी
पोट्मा गी बेग्
कूमी कू पे
टामी पे बा
पेमी कू टा
कूमो कू कू
टामे पे गी
आता एवढ्या माहितीच्या आधारे पुढील वाक्ये देवनागरी अंक घालून पूर्ण करा:
१. बेग्मी डिग् ___
२. डिग्मे पोट् ___
३. गेमो डो ___
४. टिक्मा गी ___
५. डोमे बा ___
६. गीमी काप् ___
उत्तरे कृपया व्य.नि.ने द्यावीत. तसेच, कोड्यात काही चूक आढळल्यास कळवावे.
एक विनंती
राधिका,
माझ्यासाठी हे आटनी भाषा हे एक पूर्णतया नवे क्षेत्र आहे. त्यामुळे माझी तुम्हाला एक विनंती आहे की,
ज्यावेळी तुम्ही उत्तरे जाहीर कराल त्यावेळी त्या उत्तरांमागचे लॉजिक व आटनी भाषेबद्दल थोडे लिहा. म्हणजे माझ्यासारख्या काहीच न कळालेल्या वाचकांना एका उत्कंठावर्धक नव्या भाषेची माहिती कळेल.
व्यनी केला आहे माझं काहितरी
व्यनी केला आहे
माझं काहितरी चुकलं असेल त्यामुळे सगळी उत्तरे मिळालेली नाहित. नसल्यास कोड्यात चुक दिसतेय