अभ्यासोनी मग
anant_yaatree
"अभ्यासोनी मग | प्रकटावे" ऐसे
कुण्या रामदासे | सांगितले
"दिसामाजी काही | तरी ते लिहावे
प्रसंगी वाचावे | अखंडित"
असेही वदले | तेव्हा रामदास
मना उपदेश | करताना
आता मला सांगा | लिहिणे, वाचणे
अभ्यास करणे | कोणा झेपे?
अभ्यास कशाला | प्रकटण्या आधी?
आता Grok हाती | असताना !
जे जे कृ बु सांगे | ठोकतो मी तेच
अधे मधे ठेच | लागेना का
वायफळ मळे | पिकवू अमाप
काळाची झडप | येवो सुखे
हा हा हा!
हल्लीच एका प्रकल्पासाठी जेन ए.आय वापरून कोड लिहिताना मनात फार शंका येत होती. शेवटी किमान ६ तासांचे व्हिडिओ बघणं क्रमप्राप्त आहे, असं लक्षात आहे. तेव्हा दिसामाजी काही तरी लिहीत सुटलं तरी ते फायद्याचं नाही, असं पुन्हा एकदा स्वतःला सांगितलं आहे.