Skip to main content

मराठी अस्मिते साठी : उच्च शिक्षण मराठीत द्या.

काही महिन्यांपूर्वी मराठीचिये नगरी पुण्याला गेलो होतो. बाप आपल्या दोन वर्षाच्या मुलीशी आंग्ल भाषेत बोलत होता. दोन्ही उच्च शिक्षित नवरा -बायको ही त्याच भाषेत बोलत होते. दोन दिवस तिथे राहिलो आणि मला आपण "अनपढ़ गंवार" आहोत असा फील येऊ लागला. त्याची लेक बाहेर खेळताना इतर मराठी मुलांशी हिन्दीत मिश्रित आंग्ल भाषेत बोलत होती. बाहेर हिन्दी आणि घरात आंग्ल. लेकीसाठी मराठी भाषा परकी झाली होती. तिच्या वडिलांना ही चूक म्हणू शकत नाही. प्रत्येक पालकला वाटते त्याच्या मुलाने उत्तम दर्जाचे शिक्षण घ्यावे आणि उत्तम पगारची नौकरी त्याला मिळावी. त्या मध्यम वर्गीय हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये सर्वच पालक मुलांशी आंग्ल भाषेत बोलत होते किंवा बोलण्याचा सराव करत होते. ही स्थिति पुण्याची मुंबईची नव्हे तर थेट मागासलेल्या चंद्रपुर सारख्या शहराची ही आहे. पालकांना वाटते त्यांच्या मुलांना आंग्ल भाषेत महारथ प्राप्त झाली की त्यांना तात्यांच्या गावी स्थायिक होण्यासाठी जाता येईल. त्यासाठी पालक मुलांच्या शिक्षणासाठी कान्वेंट शाळा, तिथे नाही मिळाली तर इतर सीबीएससी शाळा निवडतात. सरकारी शाळांमध्ये तर मराठी शासनाच्या जबरदस्ती मुळे शिकावी लागते. बाकी मराठी असो की हिन्दी दोन्ही विषयांत कमी मार्क्स मिळाले तरी पालकांना काहीही फरक पडत नाही. पण मुलांना आंग्ल भाषेत किमान 75 टक्के पेक्षा जास्त मिळाले पाहिजे, असे मध्यमवर्गीय पालकांची इच्छा असते.

दिल्लीत पूर्वी एक कहावत प्रसिद्ध होती " हाथ कंगन को आरसी क्या? पढे लिखे को फारसी क्या?" फारसी मुगलांच्या आणि नंतर ब्रिटिश काळात रोजगार देणारी भाषा होती. सरकारी दफ्तरात फारसी चालायची. मराठी जर रोजगार देणारी भाषा बनली तर मराठी माणूस सोडा इतर ही भाषिक लोक ही मराठी शिकतील हे अत्यंत सौपे गणित आहे. त्यासाठी मराठी भाषेत उच्च दर्जाचे टेक्निकल शिक्षण देणे गरजेचे. ज्यांना मराठीच्या अस्मितेची चिंता आहे, हिन्दी विरोधाचा ड्रामा सोडून, मराठी भाषेत उच्च शिक्षण देण्यास सरकारला बाध्य करण्यासाठी आंदोलन केले पाहिजे. महाराष्ट्र शासनाने ही उच्च शिक्षण क्षेत्रात, मग चिकित्सा असो की विज्ञानाच्या शाखा उदा. इंजीनियर ते वास्तुविद, किमान 50 टक्के जागा, फक्त मराठी माध्यमात शिक्षण देण्यासाठी आरक्षित केल्या पाहिजे. मराठीत उच्च शिक्षण घेणार्‍यांना महाराष्ट्रांत सरकारी खात्यांत, हॉस्पिटल इत्यादीत किमान 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे. मग पहा पालक स्वतहून त्यांच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळांत घालू लागतील. बाकी ज्यांच्या मनात तात्यांच्या गावी जाण्याचे स्वप्न आहे ते निश्चित याला विरोध करतील.

देशाला भाषा आणि प्रांत आधारावर तोडण्याचे प्रयत्न गेल्या 70 वर्षांपासून सुरू आहे. महाराष्ट्रात ही राजनेता निवडणूक जिंकण्यासाठी भाषाई अस्मितेचा उपयोग करतात. आजकाल महाराष्ट्रात जे हिन्दी विरोधी आंदोलन सुरू आहे, ते फक्त राजनीतिक आहे. या घटकेला मुंबईत 22 टक्के एक गठ्ठा मते आहेत. मराठी लोकांच्या भावना भडकावून एम+एम गाठजोड करून मुंबईत निवडणूक जिंकता येईल यासाठी हे सर्व सुरू आहे. या शिवाय उर्दूला दुसर्‍या भाषेचा दर्जा देण्याचा इरादा ही आहे. महाराष्ट्र शासनाने हिन्दीला लवकरच महाराष्ट्रची दुसरी राजभाषा घोषित केली पाहिजे नाहीतर भविष्यात हिन्दी एवजी उर्दू दुसरी भाषा घोषित केली जाईल. बाकी हिन्दी भारतात सर्वात जास्त बोलणारी भाषा आहे. हिन्दी भाषेचा रोजगारसाठी निश्चित लाभ होतो. तिसरी भाषा म्हणून हिन्दी अवश्य शिकली पाहिजे. हिंदीची लिपि ही देवनागरी आहे. याशिवाय मराठी मुलांसाठी हिन्दी जड नाही कारण 90 टक्के शब्द एकसारखे आहेत. केंद्र सरकारच्या नौकरीतला अनुभव सांगतो मराठीतील 90 टक्के पत्र अनुवादसाठी जात नाही कारण अधिकान्श बाबूंना पत्रातील समस्या/ विषय कळतो.

Node read time
3 minutes
3 minutes

अबापट Tue, 08/07/2025 - 17:26

काय सांगता काका ?
" हिन्दी एवजी उर्दू दुसरी भाषा घोषित केली जाईल."
महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीसजी यांचा उर्दूला दुसरी भाषा घोषित करण्याचा इरादा आहे ?
शिव शिव !!

'न'वी बाजू Wed, 09/07/2025 - 00:13

In reply to by अबापट

गुड क्याच!

हे म्हणजे, साक्षात आदरणीय स्वा. सावरकरजींनी, आसिंधुसिंधुपर्यंत आर्यभूमीचा राष्ट्रधर्म अिस्लाम असावा, असा पुरस्कार करण्यासारखे झाले!

(With friends like these, who needs enemies?)


कोणास ठाऊक. कदाचित,

  • अुर्दू ही हिंदु-आर्य गटातील भाषा आहे,
  • झालेच तर, अुर्दूवर सर्वाधिक प्रभाव ज्या फ़ारसी भाषेचा, ती फ़ारसी भाषा ही हिंदु-अिराणी गटातील भाषा अत अेव संस्कृतची भगिनी आहे,
  • फार कशाला, फ़ारसी भाषेची पितृभू जे अिराण, तेथे परवापरवापर्यंत आर्यत्वाचे खूळ प्रबळ होते,

अित्यादी गोष्टींचा साक्षात्कार मा. फडणवीसजींना अितक्यातच झाला असू शकेल.


(यावरून अवांतर: असाच काहीसा साक्षात्कार पाकिस्तानचे भूतपूर्व अध्यक्ष आदरणीय सरसेनापती श्री. झिया अुल-हकजी यांस झाला होता, असे समजते. कारण, त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी पाकिस्तानात जे अिस्लामीकरण राबविले, त्याचा अेक भाग म्हणून, पाकिस्तानातील प्रचलित अुर्दू भाषेची अधिकृत शुद्धीमोहीम अुघडून, त्या भाषेतून फ़ारसी शब्दांचे शक्य तितके अुच्चाटन करून त्या जागी अरबी शब्द योजण्याचा घाट घातला होता. ‘नमाज़’ नाही म्हणायचे, ‘सलात’ म्हणायचे, म्हणे! झालेच तर, रेडियो पाकिस्तानवरील निवेदक रात्री प्रसारण खंडित करण्यापूर्वी ‘ख़ुदा हाफ़िज़’ म्हणत, ते त्यांच्या कारकीर्दीत रद्द होअून, त्याअैवजी ‘अल्ला हाफ़िज़’ म्हणण्याचा प्रघात लागू करण्यात आला.)

(‘ख़ुदा’अैवजी ‘अल्ला’ राबविण्यामागील कारण काहीसे रोचक होते. अेक तर, ‘ख़ुदा’ हा फ़ारसी शब्द तर ‘अल्ला’ हा अरबी शब्द आहे, हे तर झालेच. परंतु, त्याहीअुपर, फ़ारसीतील ‘ख़ुदा’ हा शब्द ‘अीश्वर अथवा अीश्वरतत्त्व’ दर्शविणारा सामान्य शब्द आहे, अत अेव, त्यातून अिस्लाममधील ‘अल्ला’-संकल्पना अनन्यत्वेकरून दर्शविली जात नाही, म्हणे. म्हणजे, (फ़ारसीत बोलताना) ‘ख़ुदा’ हा मुसलमानांचा ‘अल्ला’, किंवा पारश्यांचा जो कोणी देव असेल तो (चूभूद्याघ्या.), झालेच तर हिंदूंचा (कोठलाही) देव, किंवा शिखांचा वाहेगुरू, यापैकी कोणाचाही अुल्लेख करण्याकरिता वापरला जाऊ शकतो; अुलटपक्षी, (अरबीतील) ‘अल्ला’ म्हणजे अल्ला म्हणजे अल्ला असतो, असा काहीसा तर्क त्यामागे होता, असे वाचण्यात आले आहे.)

(वस्तुतः, याही तर्कात कदाचित दोष काढता येअीलच. म्हणजे, केवळ अिस्लामधर्मी अरबच नव्हे, तर ख्रिस्तीधर्मीय अरब हेसुद्धा अरबीत बोलताना त्यांच्या (पक्षी: ख्रिस्त्यांच्या) अीश्वरास ‘अल्ला’ असेच संबोधतात, हे प्रतिअुदाहरण ठळक आहे. अर्थात, समस्त अिब्राहिमी धर्मांचा (यांत यहुदी, ख्रिस्ती तथा अिस्लाम हे तिन्ही धर्म आले.) अीश्वर अेकच आहे, ही गोष्ट लक्षात घेतली असता, यात तर्कविसंगती आहेच, असे ठामपणे म्हणता येअीलच, असे नाही. असो चालायचेच.)


(थोडक्यात काय, आदरणीय स्वा. सावरकरजी काय, किंवा आदरणीय अध्यक्ष सरसेनापती श्री. झिया अुल-हकजी काय, (दोघेही) अेकाच माळेचे मणी! अर्थात, या दिग्गजांपुढे, फडणवीसजी काय, किंवा (दोघेही) ठाकरेजी-(चुलत)बंधू काय, किंवा आपले पटाअीतजी काय, हे निव्वळ लिंबूटिंबू आहेत, हे ओघानेच आले!)

(या दुसऱ्या (लिंबूटिंबूंच्या) यादीत, आदरणीय सवाअी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. (थोरले) ठाकरेजी यांचा समावेश केलेला नाही, याची कृपया नोंद घ्यावी. आदरणीय सवाअी हिंदुहृदयसम्राट हे बाकी काहीही असतील, परंतु लिंबूटिंबू खचितच नव्हते. किंबहुना, त्यांचा जर कशात समावेश करायचाच झाला, तर त्या पहिल्या (दिग्गजांच्या) यादीत (सर्वश्री आद्य हिंदुहृदयसम्राट तथा पाकसेनाप्रमुख यांच्या समवेत/संगतीत) करण्यासारखी त्यांची पात्रता खचितच आहे. असो.)

विवेक पटाईत Tue, 22/07/2025 - 08:34

In reply to by अबापट

जीवंत राहाल तर भाजप गेल्या नंतर पुढील दहा वर्षांत उर्दूला महाराष्ट्रची दुसरी भाषा बनताना आपल्या डोळ्यांनी पहाल. लागेल तर स्क्रीन शॉट काढून ठेवा.

'न'वी बाजू Tue, 22/07/2025 - 09:09

In reply to by विवेक पटाईत

भाजप महाराष्ट्रात सत्तेवर येण्यापूर्वीच्या इतक्या वर्षांच्या काळात — नव्हे, इतक्या दशकांच्या काळात — कशी काय नाही झाली ब्वॉ?


(फार कशाला, भाजप महाराष्ट्रात सत्तेवर येण्यापूर्वीच्या काळात मध्ये एकदा महाराष्ट्रात एक मुसलमान मुख्यमंत्रीसुद्धा होऊन गेला. त्याच्या सत्ताकाळात त्याने इतर अनेक भानगडी केल्या असतीलही, परंतु, तोदेखील उर्दू दुसरी राजभाषा करण्याच्या भानगडीत पडला नाही. फार कशाला, उर्दूकरिता किंवा उर्दूच्या विकासाकरिता किंवा उर्दूचे महत्त्व वाढविण्याकरिता त्याने काही विशेष प्रयत्न केल्याचीही नोंद नाही.)

(महाराष्ट्राची दुसरी राजभाषा उर्दू कोण नि कशाला करेल? महाराष्ट्रातील मुसलमानांची भाषा बहुतकरून मराठी असावी (चूभूद्याघ्या. काही थोडक्यांची भाषा गुजरातीसुद्धा असू शकेल.); इतरांची गोष्ट तर सोडाच, परंतु महाराष्ट्रातील मुसलमानांनासुद्धा उर्दू महाराष्ट्राची दुसरी राजभाषा करण्यात स्वारस्य असेल, याबद्दल प्रचंड साशंक आहे.)

(हं, आता, महाराष्ट्रातील हिंदूमुसलमानांत फूट पाडण्यासाठी भाजपच्या राजकारण्यांनीच जर कावेबाजपणे महाराष्ट्रात उर्दू दुसरी राजभाषा बनविण्याचा डाव खेळला, तर गोष्ट वेगळी. आणि, भाजप असे काही करायला पुरेपूर समर्थ आहे, याची मला खात्री आहे. महाराष्ट्रातील मुसलमानांच्या वतीने अर्थातच बोलू शकत वा इच्छीत नाही, परंतु, महाराष्ट्रातील मुसलमान असल्या डावाला फसू शकतील, असे वाटत नाही.)

(बाकी तुमचे चालू द्या. पुष्कळ करमणूक होते.)

Rajesh188 Wed, 09/07/2025 - 20:59

हा व्यक्ती bjp चा एजन्टआहे.

1) ज्ञान, हुशारी पणा आणि भाषा ह्याचा काडी चं संबंध नाही.
2)भारतात english मेडीयम, हिंदी मेडीयम मध्ये शिकून पण जागतिक स्तरावर हुशार, ज्ञानि व्यक्ती मध्ये कोणताच भारतीय नाही.

3)जगात लागलेल्या एका पण शोधात भारतीय लोकांचा काही सहभाग नाही.

4) कारण भारतीय शिक्षण पद्धती मध्ये स्व बुद्धी वापरून परीक्षा देण्याची पद्धत नाही.

5) फ्रेंच, जर्मन, चीन, जपानी, कोरियान लोक विविध आधुनिक शोधात पुढे आहेत पण english बिलकुल वापरत नाहीत.
.
6) dr बाबासाहेबांनी वंचित घटकणा नोकरीत आणि राजकीय आरक्षण का ठेवले त्याचे महत्व आणि अर्थ आज चे मोदी सरकार चे कार्य बघून लक्षात आला खरेच dr बाबासाहेब आंबेडकर तीव्र बुद्धिमत्ता असणारे आणि दूर दृष्टी असणारे महामानवं होते.
7) भारतातील सर्व आर्थिक क्षेत्र फक्त आणि फक्त उच्च वर्णीय लोकांच्या ताब्यात देणे हेच एकमेव ध्येय bjp चं आहे.
8) महाराष्ट्र आणि दक्षिण भारतीय राज्यांना हिंदी भाषिक करण्यात हाच कुटील डाव bjp चं आहे.
9) आर्थिक क्षेत्र, मीडिया, सरकारी यंत्रणा उच्च वर्गीय लोकांच्या ताब्यात गेलीच पाहिजे हेच bjp चं ब्रीद आहे.
10)हिंदू राष्ट्र ही सज्ञा फक्त वंचित, obc ह्या समाजाला उल्लू बनवण्यासाठी आहे.
11) महाराष्ट्र मध्ये हिंदी विरुद्ध मराठी हा वाद लावून हिंदू राष्ट्र चे स्वप्न दाखवून महाराष्ट्र मधील साधन संपत्ती धन दांडगे उच्च जाती चे मारवाडी, गुजराती, मराठी ह्यांच्या ताब्यात देण्याची योजना bjp ची आहे.
12) दक्षिण भारतात पण पहिले दक्षिण भारतीय भाषा नष्ट करणे हिंदी थोपवणे आणि दक्षिण भारताची साधन संपत्ती वर ठराविक लोकांचीच सत्ता निर्माण करणे हे bjp चं स्वप्न आहे.

बाकी भाषा आणि हुशारी ह्याचा काडी मात्र संबंद नाही.
हा पटाईट फक्त bjp चं agenda इथे प्रसिद्ध करत आहे

विवेक पटाईत Tue, 22/07/2025 - 08:42

In reply to by Rajesh188

महाराष्ट्रात भाजप सरकार आहे तरी मराठीत उच्च शिक्षण नाही. त्यामुळे मला भाजप समर्थक म्हणता येत नाही. भारतात उच्चह शिक्षण फक्त आंगल भाषेत दिल्या जाते त्यात मराठी हिन्दी भाषेचा दोष नाही. दोष व्यवस्थेचा आहे. मराठी भाषिक लोकांची संख्या 11 कोटीच्या जवळ आहे. सर्व उच्च शिक्षण मराठीत दिले जाऊ शकते. बाकी दरवेळी निवडणूक जवळ आली की मुंबईत मराठीचा कळवळा येतो. एम + मतांसाठी हिन्दी विरोध असतो. त्याशिवाय दुसरे काही नाही. हे आपल्याला ही उत्तम ठाऊक आहे. बाकी तुमचे इतर प्रतिसाद महाविद्वान व्यक्ति सारखे आहेत. त्याला उत्तर देण्याची गरज नाही.

Rajesh188 Wed, 09/07/2025 - 20:59

हा व्यक्ती bjp चा एजन्टआहे.

1) ज्ञान, हुशारी पणा आणि भाषा ह्याचा काडी चं संबंध नाही.
2)भारतात english मेडीयम, हिंदी मेडीयम मध्ये शिकून पण जागतिक स्तरावर हुशार, ज्ञानि व्यक्ती मध्ये कोणताच भारतीय नाही.

3)जगात लागलेल्या एका पण शोधात भारतीय लोकांचा काही सहभाग नाही.

4) कारण भारतीय शिक्षण पद्धती मध्ये स्व बुद्धी वापरून परीक्षा देण्याची पद्धत नाही.

5) फ्रेंच, जर्मन, चीन, जपानी, कोरियान लोक विविध आधुनिक शोधात पुढे आहेत पण english बिलकुल वापरत नाहीत.
.
6) dr बाबासाहेबांनी वंचित घटकणा नोकरीत आणि राजकीय आरक्षण का ठेवले त्याचे महत्व आणि अर्थ आज चे मोदी सरकार चे कार्य बघून लक्षात आला खरेच dr बाबासाहेब आंबेडकर तीव्र बुद्धिमत्ता असणारे आणि दूर दृष्टी असणारे महामानवं होते.
7) भारतातील सर्व आर्थिक क्षेत्र फक्त आणि फक्त उच्च वर्णीय लोकांच्या ताब्यात देणे हेच एकमेव ध्येय bjp चं आहे.
8) महाराष्ट्र आणि दक्षिण भारतीय राज्यांना हिंदी भाषिक करण्यात हाच कुटील डाव bjp चं आहे.
9) आर्थिक क्षेत्र, मीडिया, सरकारी यंत्रणा उच्च वर्गीय लोकांच्या ताब्यात गेलीच पाहिजे हेच bjp चं ब्रीद आहे.
10)हिंदू राष्ट्र ही सज्ञा फक्त वंचित, obc ह्या समाजाला उल्लू बनवण्यासाठी आहे.
11) महाराष्ट्र मध्ये हिंदी विरुद्ध मराठी हा वाद लावून हिंदू राष्ट्र चे स्वप्न दाखवून महाराष्ट्र मधील साधन संपत्ती धन दांडगे उच्च जाती चे मारवाडी, गुजराती, मराठी ह्यांच्या ताब्यात देण्याची योजना bjp ची आहे.
12) दक्षिण भारतात पण पहिले दक्षिण भारतीय भाषा नष्ट करणे हिंदी थोपवणे आणि दक्षिण भारताची साधन संपत्ती वर ठराविक लोकांचीच सत्ता निर्माण करणे हे bjp चं स्वप्न आहे.

बाकी भाषा आणि हुशारी ह्याचा काडी मात्र संबंद नाही.
हा पटाईट फक्त bjp चं agenda इथे प्रसिद्ध करत आहे

'न'वी बाजू Wed, 09/07/2025 - 22:18

In reply to by Rajesh188

हा व्यक्ती bjp चा एजन्टआहे.

आणि

हा पटाईट फक्त bjp चं agenda इथे प्रसिद्ध करत आहे

१. पाणी ओले असते.

२. आकाश निळे असते.

३. सूर्य पूर्वेस उगवतो नि पश्चिमेस मावळतो.


इतक्यावर आपली सहमती आहे.

बाकी चालू द्या.

Rajesh188 Wed, 09/07/2025 - 21:14

भारताची शिक्षण पद्धती, स्पर्धा परीक्षा पॅटर्न साफ चूक आहे.
99.99% मार्क्क मिळतात आपल्या परीक्षेत पण ज्या विषयात 99.99% मार्क मिळतात त्या विषयातील बेसिक ज्ञान पण त्या विदर्थ्याला नसते.
Ias ips देश चालवतात पण सर्वात low दर्जा ची प्रशासन व्यवस्था भारतात आहे.
कित्येक उच्च अधिकाऱ्यांना कायदेचं माहित नसतात.
वा रे शिक्षण पद्धती.

मराठी, तेलगू आणि बाकी भाषा त्या राज्याचे अस्तित्व टिकवून आहेत आणि ती राज्य ह्या स्थानिक भाषा आणि वेगळी संस्कृती ह्या मुळे लुटता येत नाहीत.
म्हणून bjp चं एक देश एक चं हिंदी भाषा हे लोकांना मूर्ख बनवण्याचे कारस्थान चालू आहे

विवेक पटाईत Tue, 22/07/2025 - 08:52

In reply to by Rajesh188

मेकाले शिक्षण पद्धती फक्त बाबू बनविण्यासाठी होती. बिना विचार करता आदेश पालन त्यांच्या शिक्षणाचे धोरण होते. ते बदलण्याची गरज आहे. देशातील 80 टक्के गरीब आणि वंचित लोक आंगल भाषा शिकू शकत नाही. त्यामुळे देशातील नव्या प्रतिभेला संधि मिळत नाही. यासाठी स्थानीय भाषेत उच्च शिक्षण पाहिजे.
2. भारतातील प्रशासन व्यवस्था कितीही भ्रष्ट असली तरी जगात उत्तम आहे. आयएएस आणि आयपीएस अधिकार्‍यांना सारासार विचार करण्याची आवश्यकता असते. अधिकान्श या पातळी वर खरे उतरतात. एसडीएम ते कलेक्टर या पदांवर राहिल्यामुळे त्यांना जनतेच्या, व्यापार्‍यांच्या उद्योगांच्या समस्या कळतात. 39 वर्षांच्या नौकरीत जवळपास सर्व स्तरांच्या अधिकार्‍यांसोबत काम केले आहे. त्यात 18 वर्ष पीएमओ विभिन्न पक्षांची सरकार असताना. बाकी शिक्षण कसे आणि काय द्यायचे याचा निर्णय सरकार चालविणारे करतात. अधिकारी फक्त निर्णयाचे पालन करण्याचा मार्ग दाखवितात.
हिन्दी विरोधाचा मराठीत उच्च शिक्षण देण्याशी काही एक संबंध नाही या मताशी तरी सहमती दाखवा.
बाकी हिन्दीला राष्ट्रभाषा करणे काळाची गरज आहे. चंद्र बाबू नायडू म्हणाले होते, तेलगू आई तर हिन्दी आजी आहे.

'न'वी बाजू Tue, 22/07/2025 - 10:18

In reply to by विवेक पटाईत

बाकी हिन्दीला राष्ट्रभाषा करणे काळाची गरज आहे.

म्हणजे, हिंदी ही सध्या भारताची राष्ट्रभाषा नाही, हे तुम्हीसुद्धा मान्य करता तर.

चांगले आहे. प्रगती आहे.

भारतातील प्रशासन व्यवस्था कितीही भ्रष्ट असली तरी जगात उत्तम आहे.

या वाक्यात काही विरोधाभास आहे, हे तुमचे तुम्हालाच जाणवत नाही काय?

दुसरे म्हणजे, भारतातील प्रशासनव्यवस्था भ्रष्ट आहे, हे तुम्हीसुद्धा मान्य करता तर.

नाही म्हणजे, तुम्हीसुद्धा या प्रशासनव्यवस्थेचा भाग होता, आणि तेदेखील केवळ ‘अच्छ्या दिनां’च्या काळातच नव्हे, तर त्यांच्याही बऱ्याच आधीपासून (एकंदरीत तब्बल ३९ वर्षे; नि त्यातसुद्धा, PMO पातळीवर १८ वर्षे, म्हणजे ‘अच्छे दिन’ येण्याअगोदरच्या काळातसुद्धा गेला बाजार ६-७ वर्षे), हे तुम्हीच सांगताय. रोचक आहे.

चंद्र बाबू नायडू म्हणाले होते, तेलगू आई तर हिन्दी आजी आहे.

चंद्राबाबू नायडूंची आजी जर हिंदी असेल, तर तो संपूर्णपणे त्यांचा प्रश्न (अत एव त्यांची डोकेदुखी) आहे. ती त्यांना लखलाभ होवो; आमचे त्याबद्दल काहीच म्हणणे नाही. परंतु, चंद्राबाबू नायडूंची आजी हिंदी आहे, म्हणून आमचीसुद्धा आजी हिंदी असली पाहिजे, हा अट्टाहास कशासाठी? हा कोठला न्याय झाला? मुख्य म्हणजे, चंद्राबाबू नायडूंची आजी आमच्यावर का लादता?

Rajesh188 Wed, 09/07/2025 - 21:42

भाषा ही संवाद साठी असते हे बुद्धी भेद करणारे वाक्य आहे.

भाषा ही त्या भाषिक समाजाचे अस्तित्व टिकवते,
भाषा ही त्या भाषिक समाजाची वेगळी ओळख टिकवते.

भाषा ही त्या भाषिक समाजाची संस्कृती टिकवते.
.

मुंबई मध्ये मराठी विरुद्ध हिंदी हा भाषिक वाद नाही.
मराठी लोकांचे अस्तित्व चं मराठी भाषे मुळे आहे मराठी नष्ट केली की मराठी समज आपोआप नष्ट होईल आणि bjp ला मुंबई मधून मराठी समाज नष्ट करायचा आहे.

आणि मुंबई ची लुट कराय ची आहे.

सामान्य लोक इतका खोल विचार करत नाहीत आणि ह्यांच्या कुटील davat फसतात.
हिंदू राष्ट्र हा पण कुटील डाव चं आहे.
हिंदू राष्ट्र म्हणजे संपत्ती हीन obc, वंचित समाज आणि पूर्ण संपत्ती फक्त उच्च वर्णीय लोकांकडे.
हा सरळ अर्थ आहे हिंदू राष्ट्र चं

'न'वी बाजू Thu, 10/07/2025 - 04:50

In reply to by Rajesh188

भाषा ही त्या भाषिक समाजाचे अस्तित्व टिकवते,
भाषा ही त्या भाषिक समाजाची वेगळी ओळख टिकवते.


इंग्रजी ही भाषा मातृभाषा म्हणून इंग्लंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इतक्या साऱ्या देशांत बोलली जाते. मात्र, या सर्व इंग्रजीभाषक गटांची ‘एक भाषिक समाज’ म्हणून एक समाईक ओळख आहे, असे म्हणता येणार नाही. (या प्रत्येक गटाची एकएक समाज म्हणून स्वतंत्र ओळख आहे. एकच समाज म्हणून नव्हे. किंबहुना, England and America are two societies divided by a common language असे कायसेसे ऐकलेले आहे.)

पॅरिसमधला फ्रेंचभाषक, ब्रसेल्समधला फ्रेंचभाषक, जिनीव्हातील फ्रेंचभाषक, आणि (कॅनडातल्या) माँत्रेआलमधील फ्रेंचभाषक — चौघांचीही मातृभाषा एकच. त्या समाईक मातृभाषेतून ते एकमेकांशी सहज संवाद साधू शकतील. मात्र, ते एकमेकांना एकाच (भाषिक) समाजातील गणणार नाहीत.

फार कशाला, महाराष्ट्राबाहेर इंदौर, ग्वालियर, वडोदरा, हैदराबाद अशा ठिकाणी मराठीभाषक गट आहेत. त्यांची मराठी ऐकताना माझ्या कानांना कदाचित ती चमत्कारिक वाटू शकेलही, परंतु, त्यांच्याशी मराठीतून संवाद साधायला मला यत्किंचितही अडचण येणार नाही, असे वाटते. (चूभूद्याघ्या.) मात्र, (माझ्या मनात त्यांच्याप्रति कोणतीही शत्रुभावना नसली, किंवा, माझे त्यांच्याशी काहीही वाकडे नसले, तरीही) त्यांना मी ‘माझ्या भाषिक समाजा’पैकी गणणार नाही.

सांगण्याचा मतलब, भाषा ही माझ्या लेखी प्राथमिकतः एक संवादाचे माध्यम आहे. त्याउपर, ‘ओळख’ ही एक गुंतागुंतीची चीज आहे. ‘भाषा’ हा तिचा एक अंश कधी होऊ शकेलही, परंतु कधी होणारही नाही. तसा तो नेहमी होईलच, ही काही काळ्या दगडावरची पांढरी रेघ नाही.

बाकी तुमचे चालू द्या.

विवेक पटाईत Tue, 22/07/2025 - 08:59

In reply to by Rajesh188

हा प्रतिसाद बिना प्रमाण आहे. जो पर्यन्त मराठी माणूस शाळेत मराठी भाषा शिकणार मराठी नष्ट होणार नाही. मराठी वाचवायची असेल तर मराठीत उच्च शिक्षण दिले पाहिजे. या वर एका ही प्रतिसाद देणार्‍याने सहमति दाखविली नाही. याचा एकच अर्थ मराठी भाषेत तुम्हाला ही उच्च शिक्षण नको. मराठी वाचविण्याची चिंता तुम्हाला नाही. महाराष्ट्रातून दिल्लीत आलेल्या उच्च शिक्षित अधिकान्श मराठी लोकांनी शाळेत मराठी विषय शिकलेला नाही. चार पिढ्यांपासून दिल्लीत राहून ही मी मराठी लिहितो यावर त्यांना आश्चर्य होते. बाकी हिन्दी शाळेत शिकवली जाईल तर उर्दूला दुसरी भाषा करता येणार नाही. यासाठी हिन्दी विरोध आहे. मुंबईचे म्हणालो तर मुंबईत अनेक भाग आहे. तिथे जाऊन लोकांना मराठी बोला म्हणून दाखवा. भैय्या विरोध करून त्यांना मुंबई बाहेर घालवून त्यांची एम+ मतांसाठी हिन्दी विरोध आहे. दुसरे काही ही कारण नाही.

अमित.कुलकर्णी Sun, 13/07/2025 - 14:48

लेख नेहमीप्रमाणे पटला आणि आवडला.
एक शंका अशी आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर आता "मराठीद्वेषाला होणारा विरोध म्हणजे हिंदूंचा द्वेष" - हे समीकरण बरोबर आहे ना?

विवेक पटाईत Tue, 22/07/2025 - 09:02

हिन्दी आणि मराठी दोन्ही बहिणी आहे. ज्यांना हिन्दी येते त्यांना मराठी वाचता येते आणि 90 टक्के कळते ही. तसे मराठी भाषिकांना ही हिन्दी कळते. दिल्लीत ही मराठी पत्रे खूप कमी अनुवादासाठी जातात. जे मराठी विरोधी आहेत. तेच हिन्दी विरोध करणारे आहेत. वरील प्रतिसादात एकाने ही मराठी उच्च शिक्षण द्या या धाग्यावर सहमति दाखविलेली नाही.

मी लेखाशी संपूर्ण सहमती दाखवली होती.
वरील प्रतिसादाच्या शीर्षकात आपण माझे जे वाक्य घेतले आहे त्यात "हिंदूंचा द्वेष" लिहिले होते - "हिंदी"चा नाही.
आता "हिंदीचा द्वेष" / "हिंदीचा विरोध" असे समीकरण तयार करायचे असे ठरले असल्यास तेही मला बिनशर्त मान्य आहे.