कवितेच्या वाटेवरती
कवितेच्या वाटेवरती
कधी झुलतो मोरपिसारा
मोहविती पांथस्थांच्या
पाणवल्या, दिपल्या नजरा
कवितेच्या वाटेवरती
कधी विफल, विरागी राख
दडलेले त्यात कधीचे
धुमसते निखारे कैक
कवितेच्या वाटेवरती
अर्थाचा वर्ख निखळतो
शब्दांचा अचपळ पारा
वाटेवर विखरुनी जातो
(On a (slightly) more serious note…)
एकंदरीत, कवीला कधीकधी मोहक दृश्ये दिसतात, तर कधी त्याच्या (किंवा कविताविषयाच्या. किंवा कोणाच्याही.) मनात वैराग्यपूर्ण भावना (नि त्या भावनांना जन्म देणारा क्षोभ. किंवा फ्रस्ट्रेशन.) धुमसतात. ते जे काही (तात्कालिक) असेल, त्याला कवी कवितेतून प्रामाणिकपणे वाट करून देण्याचा प्रयत्न करतो. मात्र, एकदा का कविता प्रसिद्ध केली, की तिला स्वतःचे आयुष्य प्राप्त होते, नि मग केवळ तिचे शब्द उरतात, नि अर्थ (कवीच्या मनातला न राहता) subject to the reader’s interpretation होऊन जातो (नि, थोडक्यात, अर्थाचा अनर्थ होऊ शकतो), असे काहीसे प्रस्तुत कवितेतून सुचवायचे असावे, असे वाटते.
कवितेचा हा आशय जर का मला बरोबर समजला असला, तर तो आशय आवडला (नि त्यामागील व्यथा जाणवली). (चूभूद्याघ्या.)
असो.
.
ठीक. (मोरपिसाराच का, (उदाहरणादाखल) बदकांची (किंवा कॅनडा गीज़ची) रांग का नाही, हा प्रश्न तूर्तास आवरता घेतो.)
(मोर भसाड्या आवाजात केकाटतात; बदके (किंवा कॅनडा गीज़)सुद्धा भसाड्या आवाजातच केकाटतात. मात्र, आम्हाला इथे (उपनगरीय अटलांटात) (पिसारा फुलविणारे) मोर दिसत नाहीत; (जिथेतिथे हिरव्या लेंड्या टाकीत जाणाऱ्या, किंवा भर रहदारीचा रस्ता मध्येच कोठेतरी, शिस्तीत सिंगल फाइलीत ओलांडून तोवर समग्र वाहतूक अडविणाऱ्या) बदकांच्या (किंवा खरे तर कॅनडा गीज़च्या) रांगा मात्र वारंवार दिसतात, त्यामुळे त्यांच्याशी अधिक चांगल्या रीतीने रिलेट करता येते, म्हणून आमचा त्यांना प्रेफरन्स, इतकेच.)
(परंतु, ठीक आहे. कविता तुमची आहे. त्यामुळे, मोर तर मोर. तुमचा चॉइस. चालू द्या.)
परंतु,
नजरा एकसमयावच्छेदेकरून पाणवल्या नि दिपल्या कशा असतील? (फॉर्दॅट्मॅटर, दिपल्या नजरांना मोर (किंवा बदके. किंवा कॅनडा गीज़.) किंवा त्यांचे पिसारे (किंवा लेंड्या.) कसे दिसतील?)
(आशयाच्या दृष्टीने) हे एकमेव कडवे आवडले. (किंवा, रादर, समजले(से वाटते. (चूभूद्याघ्या.)) नि समजले(से वाटले), म्हणून आवडले.) परंतु, इथेसुद्धा एक बारीक (तांत्रिक) अडचण आहे. ‘राख’ नि ‘कैक’चे यमक तितकेसे चांगले जुळत नाही. (‘ख’ला ’क’ ठीक आहे, परंतु, ती अलामत की काय म्हणतात ती बोंबलते.) तेवढे जरा साफ करता आले तर ठीक होईल.
पाऱ्यावर वर्ख? असे नेमके कोण (नि कशासाठी) करतो?
(वर्ख सामान्यतः मिठाई किंवा तत्सम खाद्यपदार्थांवर लावतात ना? नि, पारा हा तर विषारी असतो ना? मग पाऱ्यावर वर्ख लावून तो कोणाला खाऊ घालण्यामागील प्रयोजन काय असावे बरे? समजले नाही.)
(असो. आमची कवितेची समज तितपतच. त्यामुळे, चालायचेच.)