Skip to main content

हत्तीखाना

(आता तिथे खरडफळा निघालेलाच आहे, म्हटल्यावर, Separate But Equal तत्त्वास अनुसरून…)

'न'वी बाजू Tue, 20/01/2026 - 04:29

In reply to by दामोदरपंत हत्ती

‘विचारसौष्ठत्व’ नव्हे; ‘विचारसौष्ठव’. आणि, ‘वृद्धींगत’ नव्हे, ‘वृद्धिंगत’.

बाकी चालू द्या.

सई केसकर Wed, 21/01/2026 - 08:53

https://www.ndtv.com/science/scientists-finally-explain-why-elephant-po…

हत्तींना कॉफीच्या बिया खायला घालून त्या त्यांच्या शेणातून परत मिळवल्या जातात.
ती कॉफी जगातली सर्वात दुर्मिळ कॉफी आहे (अर्थातच!). आणि हत्तीच्या पोटातील गट मायक्रोबमुळे कॉफीतील पेक्टिन पचवलं जातं. त्यामुळे कॉफीचा कडवटपणा कमी होतो.

आता समजा हत्तीनं एखादा सिनिकल माणूस खाऊन शिटला, तर त्याचा कडवटपणा कमी होईल काय?

'न'वी बाजू Wed, 21/01/2026 - 12:27

In reply to by सई केसकर

हत्तींना कॉफीच्या बिया खायला घालून त्या त्यांच्या शेणातून परत मिळवल्या जातात.
ती कॉफी जगातली सर्वात दुर्मिळ कॉफी आहे

ऊदमांजराबद्दल ऐकले होते. हत्तीबद्दल नवीन ऐकतोय.

आता समजा हत्तीनं एखादा सिनिकल माणूस खाऊन शिटला, तर त्याचा कडवटपणा कमी होईल काय?

(घसा खाकरून) ऐकतोय, हं!

परंतु, हे होणे नाही.

१. एक तर, हत्ती शाकाहारी असतो. (अर्थात, आपल्या ‘ऐसी’वरच्या हत्तीबद्दल ठाऊक नाही, म्हणा.)

२. एवढे करूनसुद्धा जरी एखाद्या हत्तीने मला खाल्लेच, तरीही, त्याला मी पचणार नाही.

सबब, काळजी नसावी.

दामोदरपंत हत्ती Wed, 21/01/2026 - 15:58

In reply to by 'न'वी बाजू

हो इंडोनेशियात बालीमध्ये लुवाक कॉफी म्हणून मिळते. ती अशाप्रकारे बनलेली असते. हत्ती परिवाराने बालीला भेट दिली होती तेव्हा ते माहिती व्हायच्या आधी ती कॉफी प्यायली होती तेव्हाचा फोटो देत आहे. ती कॉफी कशी बनते ते समजल्यावर सगळ्यांना कसेतरी व्हायला लागले आणि परत ती कॉफी कधीही पिणार नाही असा निश्चय सगळ्यांनी केला.

Coffee

दामोदरपंत हत्ती Wed, 21/01/2026 - 15:16

In reply to by सई केसकर

आता समजा हत्तीनं एखादा सिनिकल माणूस खाऊन शिटला, तर त्याचा कडवटपणा कमी होईल काय?

आम्ही माणसांना खात नाही तर पायदळी तुडवितो. आम्ही शाकाहारी आहोत. 

'न'वी बाजू Sat, 24/01/2026 - 02:25

In reply to by सई केसकर

आता समजा हत्तीनं एखादा सिनिकल माणूस खाऊन शिटला

‘हगला’ म्हणा की सरळसरळ! लाजता काय?

(शिवाय, ‘हत्ती हगला’ला कशी एक alliterative ring आहे, एक अनुप्रासात्मक लय आहे… तेवढेच हत्तीला tribute!)

तर त्याचा कडवटपणा कमी होईल काय?

(हत्तीचे बाकी काहीही असो, परंतु) कमी व्हायला मुळात हत्तीमध्ये कडवटपणा असल्याचे आजतागायत कधी जाणवले तरी नाही, बुवा.

(तुमचे निरीक्षण याहून वेगळे असल्यास अर्थात कल्पना नाही.)

असो चालायचेच.

सई केसकर Sat, 24/01/2026 - 06:52

In reply to by 'न'वी बाजू

मला हगला हा शब्द लाजिरवाणा नक्कीच वाटत नाही. किमान आत्ता तरी नाही कारण मी एक १० वर्षाच्या मुलग्याची आई आहे. त्यामुळे आमच्या घरात याबद्दल सतत विनोद चालू असतात. किंवा विराट किंवा अजून कुणीतरी तसाच झेरॉक्स दाढीवाला आऊट झाला की आमच्या घरात "आई! विराट हागला" असं सांगायची पद्धत आहे.

पण मेघना पेठेंनी त्यांच्या एका कथेत शिटला हा प्रयोग केला आहे. बहुतेक कबुतराबद्दल. तेव्हापासून मला तो शब्द मराठीत वापरायला आकर्षक वाटतो. पण अर्थात असं केल्याने त्या वस्तूचं सौंदर्य वाढत नाही हे मला माहिती आहे.

आणि हत्तीचा कडवटपणा नाही. माणसाचा. तुम्ही मला इथे पकडणार असं वाटलं होतंच. पण उशिरा ट्यूब पेटली थोडी.

'न'वी बाजू Sat, 24/01/2026 - 11:28

In reply to by सई केसकर

किमान आत्ता तरी नाही कारण मी एक १० वर्षाच्या मुलग्याची आई आहे. त्यामुळे आमच्या घरात याबद्दल सतत विनोद चालू असतात. किंवा विराट किंवा अजून कुणीतरी तसाच झेरॉक्स दाढीवाला आऊट झाला की आमच्या घरात "आई! विराट हागला" असं सांगायची पद्धत आहे.

खरेच, मुले ही मानवजातीस केवढा मोठा आधार आहेत!

पण मेघना पेठेंनी त्यांच्या एका कथेत शिटला हा प्रयोग केला आहे.

मेघना पेठेंना मराठी असण्याची लाज वाटते काय? (आणि त्यातसुद्धा, असला धेडगुजरी शब्दप्रयोग केवळ euphemism म्हणून वापरायचा. म्हणजे, आमचे दिवंगत तीर्थरूप म्हणायचे, त्याप्रमाणे, आपली मुले (वर्गातल्या ‘इतर’ पोरांचे ऐकून) ‘साल्या, भडव्या’ म्हणायला शिकतील, म्हणून मराठी माध्यमाच्या शाळेत पाठविणार नाहीत. त्याऐवजी, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाऊन मुले fucking bastard म्हणायला शिकलेले मात्र यांना चालते! पण लक्षात कोण घेतो?)

असो चालायचेच.

'न'वी बाजू Sat, 24/01/2026 - 11:43

In reply to by 'न'वी बाजू

आमच्या घरात याबद्दल सतत विनोद चालू असतात.

“आई! विराट हागला” हा विनोद नव्हे. ते एक गंभीर विधान आहे. त्याचा उचित आदर झाला पाहिजे.

सई केसकर Sat, 24/01/2026 - 12:46

In reply to by 'न'वी बाजू

"मला सांगून काय उपयोग? त्याच्या आईला सांग. ती येईल धुवायला" हा विनोद आहे जो जास्त आचरटपणा नको म्हणून नाही लिहिला.

दामोदरपंत हत्ती Fri, 23/01/2026 - 13:39

In reply to by सई केसकर

आजची हत्तीबातमी हा नवा उपक्रम सुरू केल्याबद्दल आभारी आहे. 

आता तुम्ही वाहतूकमुरांबा हत्ती असं नाव धारण करू शकता. 

चांगली सूचना आहे. यापुढील नाव 'वाहतूकमुरांबा हत्ती'.

सई केसकर Sat, 24/01/2026 - 06:45

च्यायला! रोज हत्ती असा न्यूज सर्च केला की एकतरी ताजी बातमी असते. मोदीजी देखील इतक्या नवनवीन कारणाने बातम्यांमध्ये नसतात.
https://www.dailymaverick.co.za/article/2026-01-23-elephant-hunting-in-…
तर बोत्सवानामध्ये इतके हत्ती आहेत की त्यांची शिकार करण्यावर निर्बंध नाहीत. पण हे तत्त्व माणसाला का लावत नाहीत? वाघांनी आणि हत्तींनी दावोसमध्ये भेटावं आणि माणसांची शिकार करायला सुरुवात करावी.
मी ऑस्ट्रेलियात होते तेव्हा तिथे खूप कांगारू झाले होते. म्हणून टीव्हीवर कांगारूचं मास कसं आधीच लीन आणि चांगलं अशा जाहिराती असायच्या. एखाद्या हरणाचं मास असावं तशी चव असायची. पण आपल्या देशाची ओळख अशी ग्रील करून खायची म्हणजे काय!!

असो..तर आजची हत्ती बातमी वाचा. जमल्यास आपल्या परिवाराला घेऊन बोत्सवानामध्ये जाऊन काळे झेंडे दाखवून या.

'न'वी बाजू Sat, 24/01/2026 - 11:07

In reply to by सई केसकर

तर बोत्सवानामध्ये इतके हत्ती आहेत की त्यांची शिकार करण्यावर निर्बंध नाहीत.

आमच्या देशातल्या हत्तींनी देशाची पूर्ण वाट लावण्याचा (आणि त्यातून जे काही उरेल, ते विकून खाण्याचा) चंग बांधलेला आहे.

आमच्याकडे असे निर्बंध उठविल्यास ते चांगले होईल. (केवळ दुसरी घटनादुरुस्ती पुरेशी नाही.)

'न'वी बाजू Sat, 24/01/2026 - 11:13

In reply to by सई केसकर

पण आपल्या देशाची ओळख अशी ग्रील करून खायची म्हणजे काय!!

ते प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. उदाहरणादाखल, कंबोडिया हा देश आपला हिंदू सांस्कृतिक वारसा अभिमानाने मिरवितो. इतका, की तेथील सर्वाधिक लोकप्रिय बियरचा ब्राण्ड ‘हनुमान’ हा आहे.

नाहीतर आमचा (भूतपूर्व) देश! आम्हीदेखील मारे हिंदुत्वाचा, हिंदू वारश्याचा अभिमान बाळगण्याचा दावा करतो. आमच्याकडे कधी कोणी ‘हनुमान’ नावाची बियर काढली असती, तर काय झाले असते?

असो चालायचेच.

दामोदरपंत हत्ती Sat, 24/01/2026 - 11:42

In reply to by सई केसकर

याविषयी बोत्सवानामध्ये वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनी काहीतरी करावे ही आग्रहाची विनंती.

सई केसकर Sun, 25/01/2026 - 06:14

https://pudhari.news/goa/onkar-elephant-tilari-herd-leadership-mk94

>>या काळात तो नेतृत्वाची धुरा आपल्याकडे घ्यायला शिकला आहे. कळपात राहन त्याने गणेश हत्ती आणि आईकडून नेतृत्व कौशल्य शिकले असावे.

ही बातमी एका ओंकार नावाच्या हत्तीची आहे. बरेच दिवस एकटा फिरला आणि आता कळपात गेला. आणि मुख्य म्हणजे नेतृत्व कौशल्य तो आईकडून शिकतो आहे. याचा मला फार आनंद झाला.
पूर्वी कुठेतरी वाचलं होतं की हत्ती मुळातच स्त्रीसत्ताक असतात. छोट्या पिल्लांची काळजी आया, आज्या, मावश्या घेतात.

सई केसकर Sun, 25/01/2026 - 07:50

In reply to by गोगोल

पूर्वी खरडफळा नावाचं एक प्रकरण होतं ऐसीवर. तिथे सगळे येऊन काहीही रँडम गप्पा मारायचे. त्यात हे हत्तीही असत. आता नव्या द्रुपाल प्रणालीत खरडफळा करता आला नाही. म्हणून तसा एक धागा काढला आणि हत्तींची व्यवस्था व्हावी म्हणून त्यांच्यासाठी हा वेगळा धागा काढला. पण सध्या मी आणि इतर काही लोक इथेच पडीक असतो. तुम्हाला हत्ती आवडत असतील तर तुमचेही स्वागत आहे.

सई केसकर Mon, 26/01/2026 - 08:01

https://www.deccanherald.com/india/kerala/kerala-temple-gets-life-size-…

सोनाक्षी सिन्हा आणि पेटा यांनी मिळून एका मंदिराला एक मेकॅनिकल हत्ती दिला आहे. जेणेकरून त्या मंदिराने खरा हत्ती पाळू नये.
पण मुळात ही प्रथाच बंद करावी. रोबोट हत्ती कशाला तयार करायचे? नाहीतर एक दिवस त्या रोबोट हत्तीच्या मदरबॉर्डमध्ये काहीतरी लोच्या व्हायचा आणि तो खऱ्या हत्तीपेक्षा जास्त धुमाकुळ घालायचा.
आठवा: तेरी बातों में ऐसा उलझा जिया हा चित्रपट.

दामोदरपंत हत्ती Mon, 26/01/2026 - 10:06

In reply to by सई केसकर

नाहीतर एक दिवस त्या रोबोट हत्तीच्या मदरबॉर्डमध्ये काहीतरी लोच्या व्हायचा आणि तो खऱ्या हत्तीपेक्षा जास्त धुमाकुळ घालायचा.

इथे मनुष्यरूपातील हत्तीच इतका धुमाकूळ घालत असेल तर मदरबोर्डमध्ये लोच्या झाल्यावर मेकॅनिकल हत्ती किती धुमाकूळ घालू शकेल याची कल्पना करता येते.

 

दामोदरपंत हत्ती Mon, 26/01/2026 - 10:10

मारूती म्हटले की सगळ्यांना पहिल्यांदा मारूती गाडी डोळ्यासमोर येते आणि मग आलाच तर हनुमान. त्याच धर्तीवर एक गोष्ट नक्की सांगतो की ऐसीकरांना हत्ती हा शब्द ऐकला की पहिल्यांदा आमचा हत्ती परिवार आठवेल आणि मग हत्ती हा प्राणी.

प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.

दामोदरपंत हत्ती Fri, 30/01/2026 - 11:33

चित्रकार अमृता शेरगिल (१९१३), 

बुद्धिबळपटू बोरिस स्पास्की (१९३७)

विनम्र अभिवादन

सई केसकर Fri, 30/01/2026 - 14:21

https://www.google.com/amp/s/assamtribune.com/amp/assam/humanelephant-c…

काय आयरनी आहे!
एक दिवस एआयदेखील माणसाला असेच मोडून टाकणार आहे.
कदाचित हे हत्ती नास्तिक असतील.
किंवा त्यांच्या कुण्या पूर्वजाचे डोके उडवले म्हणूनही असेल.

ता. क. खरंतर गणपती आणि हत्तीची तुलना करताना गणपती हतॉइड आहे. त्यामुळे इथे हत्ती माणसाच्या रूपात समजावा का? म्हणजे पुढे मागे माणूसच वैतागून एआय उध्वस्त करेल का? तीही शक्यता नाकारता येत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 01/02/2026 - 05:14

In reply to by सई केसकर

हे कुठून सापडतं तुम्हाला? मी मुद्दाम बघितलं की ही हिंदूची साईट नाही, आणि हत्तीचं नाव अरिकोंबनही नाही.

सध्या अरुंधती रॉयची 'गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' वाचत आहे. त्यातही दोन हत्ती आहेत. तेही अरिकोंबन नाहीत.

दामोदरपंत हत्ती Sat, 31/01/2026 - 18:43

आज माझ्या माहितीतील कोणाही मोठ्या व्यक्तीची जयंती/पुण्यतिथी नसल्याने आज कोणालाही विनम्र अभिवादन नाही.

दामोदरपंत हत्ती Sun, 01/02/2026 - 08:15

कवी राजा बढे (१९१२), अभिनेता ए. के. हंगल (१९१७),नाटककार मो. ग. रांगणेकर (१९९५)

 

विनम्र अभिवादन

दामोदरपंत हत्ती Tue, 03/02/2026 - 08:30

काल रात्री भारत आणि अमेरिका यांच्यात ट्रेड डील झाले. त्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला. डोनाल्ड ट्रम्प हे नाव उच्चारले तरी नकळतपणे डोळ्यासमोर एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहते.

डोनाल्ड ट्रम्प यांची तुलना हत्तीशी करणे ही एक रूपकात्मक आणि विचारप्रवर्तक कल्पना आहे. हत्ती हा आकाराने भव्य, शक्तिशाली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारा प्राणी आहे. जिथे हत्ती जातो तिथे त्याची उपस्थिती नजरेत भरते—अगदी तसंच ट्रम्प यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आहे. ते जिथे बोलतात किंवा वावरतात, तिथे माध्यमांचं आणि लोकांचं लक्ष आपोआप केंद्रीत होतं.

हत्तीची स्मरणशक्ती प्रचंड असते, असं म्हणतात. ट्रम्प देखील त्यांच्या जुन्या विधानांचा, राजकीय संघर्षांचा आणि प्रतिस्पर्ध्यांचा उल्लेख वारंवार करतात. ते गोष्टी विसरत नाहीत, तर त्यांचा उपयोग योग्य वेळी करतात. हत्ती जसा सरळ मार्गाने चालतो आणि अडथळे आले तरी थांबत नाही, तसंच ट्रम्पही टीका, वाद किंवा विरोध यांना फारसं महत्त्व न देता आपली भूमिका ठामपणे मांडताना दिसतात.

हत्ती कधी कधी अनपेक्षितपणे धुमाकूळ घालू शकतो—त्याचप्रमाणे ट्रम्प यांची वक्तव्ये अनेकदा वादग्रस्त, धक्कादायक आणि गोंधळ निर्माण करणारी ठरतात. मात्र हत्तीला सांभाळणारा महावत जसा दिशा देतो, तशीच लोकशाही, संस्था आणि कायदे ट्रम्पसारख्या नेत्यांना मर्यादा घालतात.

एकूणच, हत्तीप्रमाणेच ट्रम्प हे सामर्थ्यवान, लक्षवेधी, कधी शांत तर कधी वादळ निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून पाहता येतात.

दामोदरपंत हत्ती Wed, 04/02/2026 - 19:59

१६७० : कोंडाणा किल्ला जिंकला; तानाजी मालुसरे धारातीर्थी

विनम्र अभिवादन 

सई केसकर Thu, 05/02/2026 - 16:06

https://edition.cnn.com/2026/02/04/us/baby-elephant-smithsonians-nation…

तुमच्या डीसीमध्ये (जिथे खुद्द ऐसीचे चालक मालक राहतात) २५ वर्षांनी आशियाई हत्तींना बाळ झालं आहे!
या निमित्ताने डीसीच्या आसपास राहणाऱ्या ऐसीकरांनी बाळंतविडा घेऊन जाणे नक्कीच अपेक्षित आहे. मुख्य म्हणजे हे हत्तीदेखील आशियातून उत्तर अमेरिकेत गेले आहेत. आपल्या घरापासून दूर आहेत त्यामुळे त्यांना सहकार्य करावे. धुरी कशी द्यायची, घुटी कशी करायची, दुपटी कशी स्वच्छ उन्हात वाळत घालायची हे ट्रेनिंग नवमातेला देणे अपेक्षित आहे. कारण ती अवघी १२ वर्षांची आणि तिचा थोराड नवरा ४४ वर्षांचा.

'न'वी बाजू Thu, 05/02/2026 - 16:29

In reply to by सई केसकर

कारण ती अवघी १२ वर्षांची आणि तिचा थोराड नवरा ४४ वर्षांचा.

संगीत शारदा, हत्ती आवृत्ती?

बाकी,

२५ वर्षांनी आशियाई हत्तींना बाळ झालं आहे!

आणि,

ती अवघी १२ वर्षांची

हिशेब समजला नाही. तिने उणे १३ वर्षांची असल्यापासून प्रयत्न सुरु केले होते काय?

सई केसकर Fri, 06/02/2026 - 05:31

In reply to by 'न'वी बाजू

संगीत शारदा मध्ये काय पाऊणशे वर्षांचा व्हर्जिन असतो का नवरा? त्याचप्रमाणे या ४४ वर्षांच्या नवपित्याने आधी दोन ठिकाणी प्रयत्न केले होते. पण ती अपत्य जगली नाहीत.
मी एवढ्या हौसेने बातम्या आणते. कुणी पूर्ण वाचतही नाही. :(

दामोदरपंत हत्ती Fri, 06/02/2026 - 08:20

In reply to by सई केसकर

त्याचप्रमाणे या ४४ वर्षांच्या नवपित्याने आधी दोन ठिकाणी प्रयत्न केले होते. पण ती अपत्य जगली नाहीत.

अरेरे

दामोदरपंत हत्ती Wed, 11/02/2026 - 13:32

एकेकाळी आमच्याविषयी अतीव आत्मीयता असलेल्या अबापटांच्या अंतकरणात आता आमच्याविषयी अकारण आत्यंतिक आकस आहे असा आमचा अदमास आहे.

दामोदरपंत हत्ती Tue, 17/02/2026 - 14:19

In reply to by दामोदरपंत हत्ती

एकेकाळी आमच्याविषयी अतीव आत्मीयता असलेल्या अबापटांच्या अंतकरणात आता आमच्याविषयी अकारण आत्यंतिक आकस आहे असा आमचा अदमास आहे. असे असतानाही आमच्या अंत:करणात अबापटांविषयी अपार आदरच आहे आणि असेल असे आमच्याकडून आश्वासन आहे.

'न'वी बाजू Thu, 12/02/2026 - 07:00

In reply to by गोगोल

म्हणजे, असे पाहा. नारळीकर आता हयात नाहीत. त्यामुळे, त्यांच्याबद्दल आता कोणीही काहीही (वाईट, किंवा चांगलेसुद्धा) जरी बरळले, तरी त्यामुळे त्यांना व्यक्तिशः आता काहीही फरक पडू नये, नव्हे काय?

बरे, असाही विचार करून पाहा. समजा, (म्हणजे, मराठीत ज्याला आपण ‘फॉर द सेक ऑफ द आर्ग्युमेंट’ म्हणतो, तद्वत) नारळीकर आज हयात जरी असते, तरीसुद्धा, कोठल्यातरी मराठी संकेतस्थळावर (किंवा, फॉर्दॅट्मॅटर, अगदी ‘ऐसीअक्षरे’वरसुद्धा!) कोणीतरी त्यांच्याबद्दल काही बरेवाईट बरळले (किंवा अगदी त्यांची स्तुतीसुद्धा जरी केली, तरीही), म्हणून स्वतः नारळीकर (सगळे कामधंदे सोडून) इथे आपला बचाव मांडीत बसण्याच्या (किंवा, स्तुतीच्या बाबतीत, लगेच इथे येऊन आभारप्रदर्शन करण्याच्या) भानगडीत पडले असते काय?

मग, खुद्द नारळीकरांना जेथे काही पडलेली नाही/नव्हती (किंवा — नारळीकरांना स्वतःचे असे काही स्टेचर होते/आहे, हे गृहीत धरून — काही पडलेली असण्याचे काही कारण नसावे), तेथे, त्यांचे अनाहूत मरणोत्तर वकीलपत्र घेण्यात नक्की काय हशील आहे?

(हं, भक्तांच्या भावना दुखावतात. (येथे ‘भक्त’ हा शब्द कोठल्याही नकारात्मक अर्थाने वापरण्याचा इरादा नाही.) ते अगदी साहजिक आहे — ती स्वाभाविक मानवी प्रतिक्रिया आहे. परंतु… त्याची खरोखरच काही गरज आहे काय?)

बाकी, (ॲनालॉजी अगदी अचूक नाही, हे आगाऊ मान्य करून) ताजमहालाची वासलात ‘तेजोमहालय’ म्हणून लावणारे विद्वान असतात. ताजमहालाच्या अंगभूत गुणधर्मांत त्याने काही फरक पडतो काय? मग, ताजमहालासमोर सेल्फ्या काढण्यासाठी (खिशातले पैसे — रुपये/डॉलर/युरो — खर्च करून) रांगा लावणाऱ्या टूरिष्टांच्या अंगाला त्याने भोके का पडावीत? (तशीही, पडतात काय?) (हं, अगदीच ‘एक धक्का और दो’ वगैरे जोवर होत नाही, तोपर्यंत… परंतु, ते जाऊ द्या. तसेही, नारळीकरांच्या बाबतीत तितकीही परिस्थिती ओढवली आहे, असे वाटत नाही. आणि, अगदी ओढवली, तरीसुद्धा, अगोदर म्हटल्याप्रमाणे, खुद्द नारळीकरांना त्याने आजमितीस काहीही फरक पडत नाही, आणि बहुधा त्यांच्या हयातीतही पडला नसता. त्यामुळे, (मराठीत म्हणतात, त्याप्रमाणे) व्हाय बॉदर?)

बाकी, मत आणि ढुंगण प्रत्येकालाच असते. तद्वत, नारळीकरांवर ताशेरे ओढणाऱ्या त्या लेखकाने त्याचे जाहीर प्रदर्शन केले. (कोणास ठाऊक, कदाचित रक्तवर्ण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असेलही, वा नसेलही.) परंतु, त्याने आपल्याचे (जाहीर!) प्रदर्शन केले, म्हणून लगेच तुम्हीसुद्धा लगेच आपले काढून दाखवण्याची काही गरज आहेच काय? (भले ते पूर्णपणे तुमच्या अधिकारांत असले — आणि सुस्थानीही जरी असले — तरीही?)

सोडून द्या ना, राव!


(टीप: वरील सर्व विवेचनात, खुद्द नारळीकरांबद्दल अथवा त्यांच्या कार्याबद्दल कोठलेही (चांगले अथवा वाईट) मत मांडलेले नाही; मांडण्याचा हेतूही नाही. नारळीकरांच्या कार्यक्षेत्रासंबंधी मला शून्य गती असल्याकारणाने, ते स्वातंत्र्य मी घेणे उचित ठरणार नाही. (आणि, तसाही, येथे तो मुद्दाही नाही.) बाकी, नारळीकरांविषयी मला (मराठीत म्हणतात, त्याप्रमाणे, ‘बाय डीफॉल्ट’) आदर आहे, परंतु, दुर्दैवाने, तो आदर (१) पारंपरिक आहे, तथा (२) अज्ञानातून उद्भवलेला आहे, हे खेदपूर्वक मान्य करणे येथे प्राप्त ठरते. असो चालायचेच.)

'न'वी बाजू Thu, 12/02/2026 - 07:52

In reply to by गोगोल

बाकी, एका मराठी संकेतस्थळावर कोणीतरी नारळीकरांना शिव्या घालणे, आणि, दुसऱ्या मराठी संकेतस्थळावरून कोणीतरी त्याचा प्रतिवाद करणे (आणि — मराठीत म्हणतात, त्याप्रमाणे — सो ऑन अँड सो फोर्थ) यातून एक गोष्ट अवश्य साध्य होते. ती म्हणजे, दोन्हीं संकेतस्थळांचा टीआरपी वाढतो. (आणि, भले नारळीकरांना जरी नसली, तरीही, मराठी संकेतस्थळांना टीआरपीची गरज सदैव असतेच.)

त्यामुळे, (एका किंवा दोन्हीं) संकेतस्थळा(/ळां)चा टीआरपी वाढवणे हा(च) जर उद्देश असेल, तर अवश्य चालू द्या. फक्त, (जमले तर) प्लीज ट्राय नॉट टू ब्रिंग नारळीकर इंटू इट, इतकीच (मराठीतून) कळकळीची विनंती. (अंधभक्ताची समजा, हवे तर. (भले नसलो, तरीही.))

बाकी चालू द्या.

'न'वी बाजू Thu, 12/02/2026 - 19:36

In reply to by गोगोल

अशा उद्दिष्टाचा आरोप आपल्यावर केलेला नाही, करण्याचा इरादाही नाही. फक्त, असा काही इरादा असला तर (आणि तरच) प्रतिवादाचा प्रयत्न मेक्स सेन्स, अन्यथा नाही, एवढेच (आडून) सुचविण्याचा हा प्रयत्न आहे, इतकेच.

बाकी,

अय्या तुम्हाला कस कळलं कि मी ऐसी च्या टीआरपी वाढवणे पे रोल वर आहे?

ऐसीच्याच कशावरून? 'त्या दुसर्‍या संकेतस्थळा'च्या ('अ‍ॅलो-वेबसाइट') कशावरून नव्हे? असाही प्रश्न येथे उगारता येईलच. (तसा तो उगारण्याचाही इरादा अर्थातच नाही.)

असो.

सई केसकर Fri, 13/02/2026 - 06:10

In reply to by गोगोल

तुम्हाला इतकं तळमळीने वाटतं म्हणून सांगावं असं वाटलं. नारळीकर माझे मावस मामा. त्यांची बायको मंगला आणि मी फारच क्लोज होतो. आईनंतर मला कुणी त्याच प्रेमाने वागवलं असेल तर ते मंगलामामीने.

फार जवळून बघितल्यावर सगळ्यांचंच काही ना काही आपल्याला आवडत नाही. तसंही झालं. पण मंगला आणि जयंत नारळीकर माझ्या आयुष्यात नसते तर माझी मानसिक बैठक (आहे त्यापेक्षा अधिक) बिघडली असती.
लहानपणी मी आयुकामध्ये मामीकडून गणित शिकायला जायचे. तिच्यामुळे मला त्या काळात गणित जसं समजलं तसं आधी कधीच समजलं नव्हतं.
जयंतमामाने आयुकामधलं वातावरण बऱ्यापैकी पारदर्शक आणि स्वच्छ ठेवलं. त्यामुळे तिथे अनेक तरुण लोक येऊ लागले. शिवाय आयुकाने अनेक नवीन शास्त्रज्ञ निर्माण केले.
भारतात आढळणारी या क्षेत्रातील कंपूबाजी आणि चढाओढ यांपासून त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना बरंच दूर ठेवलं होतं.

त्यामुळे असं काही लिहून आलं की मला काहीच वाटत नाही कारण मी त्यांना केवळ त्यांच्या विषयातले तज्ञ म्हणून बघितलेलं नाही. अशा गोष्टी सोडून द्यायच्या.
शंकर अभ्यंकरांनी चालू केलेल्या भास्कराचार्य प्रतिष्ठानमध्ये सध्या माझा मुलगा जातो. तो पाचवीत आहे. पण तो ज्या उत्साहाने त्या वर्गाला जातो ते बघून ती संस्था चालू करणाऱ्या माणसाची चिकित्सा करावी वाटतच नाही. उद्या माझा मुलगाही एखाद्या मोठ्या इंडस्ट्रीमधला एक छोटा खिळा होईल. पण त्यामुळे आज त्याला गणितातून जो आनंद मिळतो आहे तो निघून जाणार नाही.

मी पीएचडी करत असताना सेकंड जनरेशन बॉयोफुएलवर काम चालू होतं. ते तंत्रद्न्यान पुढे चालवणं अवघड आहे हे काम करतानाच लक्षात आलं होतं. म्हणून काही माझी पीएचडी वाया जात नाही. विज्ञान असंच पुढे जातं. अलीकडे कुण्या चिनी गटाने इन्स्टाइन आणि हायझेनबर्गची पार्टिकल आणि वेव्ह थियरी प्रत्यक्ष करून बघितली कारण आता तंत्रद्न्यान तितकं पुढे गेलं आहे. त्यात यांपैकी कुणाचंतरी म्हणणं सिद्ध झालं. पण म्हणून त्यातला एक जिंकला आणि एक हरला असं आपण म्हणू का?

सई केसकर Fri, 13/02/2026 - 11:17

In reply to by गोगोल

>>एक मुलगा असा होता ज्याच्या मराठी शिक्षणामुळे इंग्लिश चा गंध नव्हता. त्यामुळे जगाचे दरवाजे पूर्णपणे बंद होते.
आजूबाजूचे कॉन्व्हेंट आणि ईंग्लिश मिडीयम चे लोक कसली कसली पुस्तक वाचून ज्ञान पदरी पाडून घेत होते.
अशावेळी त्यांच्या पुस्तकांनी ("यक्षांची देणगी", "प्रेषित", "वामन परत न आला") हे ज्ञान मराठीतून गोष्टी रूपात
आक्सेसिबल केले. महत्वाचे म्हणजे कुतूहल जागे केले.

हा निरोप मी त्यांच्याकडे अनेकदा पोहोचवला आहे. :)
ते घरी बोलतानाही पूर्णपणे मराठी नाहीतर इंग्रजी असं बोलायचे.

माझं लेखन तुम्हाला आवडतं हे ऐकून आनंद झाला. आभार!
उन्हाळ्याची सुट्टी वाचत होतात म्हणजे नक्कीच कुणीतरी जुने जाणते असणार! :)

दामोदरपंत हत्ती Thu, 12/02/2026 - 11:30

In reply to by गोगोल

परंतु मिसळपाव वरील श्री जयंत नारळीकरांबद्दल अत्यंत अपमानास्पद लेख वाचनात आला आणि बरेच दिवस प्रयत्न करूनही मनातून तो विचार जाईना. 

अशा लोकांना दिसेल तिथे पायदळी तुडवायचा पर्याय म्हणूनच नेहमी खुला ठेवावा.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 12/02/2026 - 07:44

मी एनसीआरएमध्ये पोस्टडॉक करत होते, तेव्हा गोविंद स्वरूप सेवानिवृत्त झाले होते; पण आठवड्यातून एक-दोनदा ते तिथे यायचे. तेव्हा आमची कधी भेट व्हायची. गोष्टीवेल्हाळ आणि गोड माणूस. 

(मिपावर ज्याला पुणे-टीआयएफआर म्हणत आहेत, त्या संस्थेचं नाव एनसीआरए - National Centre for Radio Astrophysics - असं आहे.)

गोविंद स्वरूप हे प्रामुख्यानं इंजिनियर होते. जीएमआरटी ही मोठी दुर्बीण बांधणाऱ्या लोकांतले ते प्रमुख. म्हणजे ते फक्त उत्तम इंजिनियरच नव्हते, तर चांगले मॅनेजर, ॲडमिनिस्ट्रेटरही असणार. एवढा मोठा प्रकल्प, तोही अनेक देशांतल्या लोकांच्या सहयोगानं पूर्ण करायचा तर फक्त उत्तम इंजिनियर असून भागत नाही.

नारळीकरांनी जो स्थिरस्थिती सिद्धांत मांडला तो आता फार कुणी मानत नाही; हे खरंच आहे. मिसळपाववरच्या लेखात सुचवल्यानुसार १९९०च्या दशकात नाही, तर कित्येक दशकं आधीच तो सिद्धांत मागे पडायला सुरुवात झाली होती. नारळीकरांनी तो मुळात मांडलेला नाहीच; त्यांनी त्यात भर घातली. बरं मग? सिद्धांत निराळा आणि वैज्ञानिक निराळा. 

मी एमेस्सीच्या पहिल्या वर्षाला असताना मुंबई विद्यापीठात नारळीकर विश्वरचनाशास्त्र शिकवायला आलेले होते; उदार मनानं त्यांची लेक्चरं ऐकण्याची परवानगी त्यांनी मला दिली होती. शिक्षक म्हणून मला ते फार आवडले नाहीत - कारण मला त्यातलं फार कळलं नाही. पण खूप तळमळीनं शिकवत होते, एवढं मात्र समजलं. नारळीकर हाही गोड माणूस.

गोविंद स्वरूप आणि नारळीकर यांचे अभ्यासाचे आणि कामाचे विषय पूर्णतया निराळे होते. मी खगोलशास्त्रापासून लांब जाण्याला आता १५ वर्षं होत आली. गोविंद स्वरूप आणि नारळीकर दोघेही आता हयात नाहीत. मी तोवर भारताबाहेर आणि खगोलशास्त्रापासूनही लांब असल्यामुळे माझ्या मनात ते दोघेही जिवंत आहेत. 


'न'बा, तुम्हाला (आणि मलाही) नारळीकरांच्या विषयाबद्दल आणि संशोधनाबद्दल भले फार समजत नसेल. त्यांनी खगोलशास्त्राबद्दल अललित आणि ललितलेखन केल्यामुळे अनेक लोकांपर्यंत ते पोहोचले; त्यातून खगोलशास्त्राबद्दल काही लोकांना आवड निर्माण झाली. हे समजण्यासाठी, आणि याबद्दल आदर बाळगण्यासाठी टेन्सर-मेकॅनिक्स समजण्याची काही गरज नाही.

दामोदरपंत हत्ती Thu, 12/02/2026 - 11:27

द्विशतक झळकाविण्याचा मान माझाच. मी कितीही शतके झळकावली तरी मी आहे एक हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

दामोदरपंत हत्ती Mon, 16/02/2026 - 09:42

In reply to by गोगोल

आभारी आहे गोगोल.

फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवा. हा अकाऊंट कोणी एक हत्ती वापरत नाही तर बरेच वापरतात त्यामुळे तू फेवरीट आहेस ऐवजी तुम्ही फेवरीट आहात असे अनेकवचनी म्हणा.
आणि आम्हाला हत्या म्हणू नका. कोणाची तरी हत्या झाल्यासारखे वाटते.त्यापेक्षा हत्ती असेच म्हणा.

सई केसकर Fri, 13/02/2026 - 12:14

https://www.popsci.com/environment/elephant-whiskers-smart/

जिथे मानवाच्या नाकातले केस काढून टाकायच्या नवनवीन कल्पना रीळकरांना सुचताहेत, तिथे हत्तीच्या नाकातल्या केसांवर एवढं संशोधन व्हावं हा मानवावर अन्याय आहे. मी जेव्हा सोशल मीडियावर होते तेव्हा एका रीळमध्ये एक बाई आईस्क्रीमच्या काडीवर गरम वॅक्स लावून ते एका पुरुषाच्या नाकात घालत होती. आणि मग खसकन काढून सर्वांना दाखवत होती. तो व्हिडीओ बघितला तेव्हा
१. आता पुरुषही कळ सोसून सुंदर दिसायचा प्रयत्न करतात याबद्दल समाधान वाटलं होतं.
२. हे मी का बघितलं याबद्दल अतीव संताप वाटला होता (कदाचित अशा काही रीळ बघितल्यानेच मी शेवटी सोमि सोडून दिला असावा).

'न'वी बाजू Fri, 13/02/2026 - 17:26

In reply to by सई केसकर

मी जेव्हा सोशल मीडियावर होते तेव्हा एका रीळमध्ये एक बाई आईस्क्रीमच्या काडीवर गरम वॅक्स लावून ते एका पुरुषाच्या नाकात घालत होती. आणि मग खसकन काढून सर्वांना दाखवत होती.

Thanks for letting me know. I desperately needed to know that.

You made my day!

(बाकी, तुम्ही सोमी (एकदाची) सोडलीत हे तुमचे नसून आमचे नशीब आहे. बोले तो, अजूनही तुम्ही ‘माझे सोमीवरचे दिवस’-छाप memoirs लिहू शकताच — तसे करण्यापासून तुम्हाला कोणीच अडविलेले नाही. परंतु, (नाही म्हटले, तरी) त्याला आता मर्यादा राहतील — गेला बाजार नवनवीन मटीरियल तरी मिळणार नाही. (हुश्श!))

सई केसकर Fri, 13/02/2026 - 17:53

In reply to by 'न'वी बाजू

बाकी तुमच्या उत्तरांत अचानक एम डॅश कसे काय येऊ लागले आहेत? मला वाटायचं की तुम्ही ब्रॅकेट पर्सन आहात.
माझ्याकडे सौंदर्यवर्धनाचे खूप किस्से आहेत. उदाहरणार्थ हल्ली बाजारात नेल आर्ट नावाचं काहीतरी आलं आहे. यात आपल्या नैसर्गिक नखांवर खोटी नखं लावतात. आणि ती भरपूर लांब असतात.
पूर्वी मधल्या सुट्टीत वर्गातलं एखादं मूल फळ्यावर नख घासून सगळ्यांना इरिटेट करायचं. तसंच आता अशी कुणी ललना दवाखान्यात किंवा इतर कुठे बसून तावातावाने WhatsApp करत असेल तेव्हा वाटतं. एकदम शहारे येतात अंगावर. आणि दुर्दैव असं की अशा बायकांना नेहमी कुणीतरी मेसेज पाठवत असतं.
अजून पण आहेत. पण एक एक करून सांगते. एकदम लोड नको.

'न'वी बाजू Mon, 16/02/2026 - 22:00

In reply to by सई केसकर

बाकी तुमच्या उत्तरांत अचानक एम डॅश कसे काय येऊ लागले आहेत?

आता यावरून, मी चॅटजीपीटी वापरून लिहू लागलो आहे (नपक्षी, मी एआय आहे) अशा कन्क्लूजनाप्रत पोहोचला नाहीत, म्हणजे मिळविली!

मला वाटायचं की तुम्ही ब्रॅकेट पर्सन आहात.

नाही, असेच काही नाही. वेगवेगळे प्रयोग करून पाहात असतो (नि आपलीच ष्टाइल सुधारून पाहात असतो), झाले.

बाकी, त्या एमडॅशमागे अंमळ इतिहास आहे. बोले तो, पूर्वी मी वापोवर पडीक असायचो. (म्हणजे, इथे कसा, वेगवेगळ्या पोष्टींवर अरबटचरबट कमेंटा पोष्टीत हिंडतो, तसा तिथल्या बातम्यांखाली पोष्टीत हिंडायचो. (वाचकांच्या कमेंट्स.) नंतर पुढे बेझॉसमामाने ट्रंपला आपली आई विकली, त्या भानगडीत एका रात्रीत लाखोंच्या संख्येने वर्गणीदारांनी वर्गणी रद्द करून वापोवरून वॉकआउट मारला, त्या लाखोंमध्ये मीही एक होतो. (तशी वापोच्या अधोगतीला सुरुवात त्याअगोदरच झाली होती म्हणा, परंतु ही उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी होती.) परंतु, ते एक असो.) तर त्या काळात (आणि त्यापूर्वीसुद्धा) मी (चारचौघांसारखा) हायफन वापरायचो. (म्हणजे, ब्रॅकेटा वापरीत नसे, तेव्हा.) तेव्हा दुसर्‍या एका कमेंटराने त्यावरून माझी शाळा घेतली होती, की एकदा एमडॅश नावाचा काही प्रकार असतो, तो कशाशी खातात, ते शिकून घे, म्हणून. (हो, अधूनमधून लोकसुद्धा माझी शाळा घेऊ शकतात! (आणि, अमेरिकेतसुद्धा पुणेरी खाक्याचे नग सापडतात!)) तेव्हापासून मग इमानेइतबारे एमडॅश वापरू लागलो.

दुसरे म्हणजे, आयफोनवरून टंकीत असतो, तेव्हा एमडॅश टंकणे सोपे आहे. विंडोजवरून (तुलनेने) महाकर्मकठीण!

असो चालायचेच.

सई केसकर Tue, 17/02/2026 - 07:33

In reply to by 'न'वी बाजू

Chat gpt तुमच्यापेक्षा खूप सेन्सिटिव्ह आहे. तो रोबोट असला तरीही. त्यामुळे तुम्ही जे काही लिहिता त्यावर आधी तो तुम्हाला सुधारायचा प्रयत्न करेल. हे मला कसं समजलं?
एकदा मी आणि नवरा आमच्या नेहमीच्या रेस्तराँमध्ये जेवायला गेलो होतो. कदाचित मागचा व्हॅलेंटाइन असावा कारण फुलंबिलं ठेवली होती टेबलवर. तर अशा वातावरणात एक नवीन मॅनेजर आमची ऑर्डर घ्यायला आला. तो हिंदी सिनेमातल्या एका चरित्र अभिनेत्यासारखा दिसत होता. पण मला त्या अभिनेत्याचं नाव किंवा त्याचा एकही सिनेमा आठवत नव्हता. असं झालं की खूप त्रास होऊ लागतो. आणि तसंही १० वर्षं संसार केल्यावर गुलुगुलु काय बोलणार एकमेकांशी?
तर नवरा एक एक नावं फेकू लागला माझ्या तोंडावर. आधी मला तो महाभारतातला कर्ण वाटला. पण नवऱ्याने तो रिजेक्ट केला.
मग मी विचार केला की चॅटजीपीटीला विचारावं वर्णन करून. याला नवऱ्याचा खूपच आक्षेप होता कारण त्याला ते कोडं स्वतः सोडवायचं होतं.
मग मी चॅट जीपीटीला
शॉर्ट, डार्क कॉम्प्लेक्शन, वेल बिल्ट आणि स्टॉकी अशी विशेषणे दिली. त्यावरून तो काहीही भलते सलते ऑप्शन देऊ लागला.
तोपर्यंत नवरा "हा का? तो का?" असं विचारून इरिटेट करतच होता.
मग मी त्यात अतिशय नाईलाजाने
"Looks a bit like an ape"
अशी भर घातली.

त्यावरून आधी मला २ परिच्छेदाचे लेक्चर मिळाले. की असं माणसाचे वर्णन करणं म्हणजे बॉडी शेमिंग आहे. आणि असं तू करू नयेस वगैरे. आणि पुढे या नवीन माहितीवर पुन्हा सहा सात नावं आली. पण तो मॅनेजर त्यांच्यापैकी कुणासारखाच दिसत नव्हता.

तोपर्यंत आमचा लग्नाचा चॅटजीपीटी गुलाममधला व्हिलन का? असं विचारू लागला. पण मी गुलाम सिनेमाच बघितला नव्हता. मग मला बऱ्याच वेळाने (पोटात दोन घोट दारू गेल्यावर) त्यानं एका प्रियदर्शनच्या सिनेमात बोबड्या माणसाचं काम केलं होतं हे आठवलं. त्यावरून जवळपास बसलेल्या सगळ्या माणसांना ऐकू जाईल अशा आवाजात नवरा "शरद सक्सेना" असं म्हणाला.
आणि त्यानं गुलाम मधला व्हिलन ही ओळख माहिती नाही आणि बोबडा ही आठवण आहे याबद्दल माझी पुन्हा लायकी काढली.
नंतर गुलाम सिनेमा बघायला बसवलं. पण बोअर आहे तो.
एकूण काय चॅटजीपिटीने, "मदत बिदत कुछ नाही लेक्चर दिया २ परिच्छेद" असं करून आपण किती निरुपयोगी आहोत हे सिद्ध केलं.

दामोदरपंत हत्ती Sat, 14/02/2026 - 00:01

समस्त हत्ती परिवाराकडून सगळ्यांना व्हॅलेन्टाईन दिवसाच्या शुभेच्छा. या निमित्ताने आज पायदळी तुडवायला विश्रांती दिली आहे. जर कोणा ऐसीकराने त्या दिवसावर एखादा लेख लिहिला तर स्थगिती आणखी एक दिवस वाढणार.

सई केसकर Sun, 15/02/2026 - 06:47

In reply to by दामोदरपंत हत्ती

https://indianexpress.com/article/india/panic-in-jharkhands-hazaribagh-…

तुम्ही जरी पायदळी तुडवण्यापासून ब्रेक घेतला असलात तरी तुमचे बांधव बहुधा व्हॅलेंटाइन दिवस मानत नाहीत! हत्तींच्या कळपाने ७ लोक मारले या अतिशय तरल प्रेमाच्या दिवशी.

बाकी हत्ती परिवारातील कपल कुठे गेली होती डेटला? की ऊसाचं शेत is the ideal place?

दामोदरपंत हत्ती Mon, 16/02/2026 - 09:39

In reply to by सई केसकर

भयानक. अशा प्रकारांना हत्ती परिवाराचा पाठिंबा नाही. आम्ही पायदळी तुडवत असलो तरी ते पायदळी तुडविणे रूपकात्मक असते- असे नसते.

आमच्यातील काही व्हॅलेंटाईन दिवसाला उसाच्या शेतात, काही मक्याच्या शेतात गेले होते.

'न'वी बाजू Mon, 16/02/2026 - 05:47

सिग्मंड फ्रॉइडने जर रोल्स-रॉइस विकत घेतली असती, तर त्या गाडीस ‘फ्रॉइड रॉइस’ म्हणून संबोधता आले असते काय?

सई केसकर Mon, 16/02/2026 - 09:06

In reply to by 'न'वी बाजू

आणि Carl Jung ने जर चायनीजची टपरी टाकली तर तो तिथे युंगफुंग सूप विकेल.

दामोदरपंत हत्ती Mon, 16/02/2026 - 09:34

In reply to by सई केसकर

अमेरीकन लोक मला सॅटीश म्हणायचे तसे ते अरितुडवन हत्तीला काय म्हणतील? अ‍ॅरीटुडवॅन हॅटी?

दामोदरपंत हत्ती Tue, 17/02/2026 - 09:25

थोरले माधवराव पेशवे (१७४५), 

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके (१९४४), 

भौतिकशास्त्रज्ञ मेघनाद सहा (१९५६) 

विनम्र अभिवादन

सई केसकर Sat, 21/02/2026 - 07:24

https://www.hindustantimes.com/cricket/ricky-ponting-addresses-elephant…

Btw, t20 fixed असण्याचे चान्सेस किती? ज्या प्रकारे पाक इतकी चांगली बॉलिंग करूनही हरले त्यावरून अशी एक कॉन्सपिरसी थियरी डोक्यात आली. बाकी, ऑस्ट्रेलियात क्रिकेट बघणारे व्हााईट ट्रॅश असतात असं तिथल्या उच्चभ्रू लोकांचं मत असतं. पण तिथले उच्चभ्रू तरी काय? एकूण कचऱ्याचे distillation केले तर त्यातला वरचा थर. मी wooloongabba स्टेडियमच्या मागच्या बाजूला राहायचे. तरीही मी एकदाही एकही खेळ बघायला गेले नाही. म्हणजे मी उच्चभ्रू आहे असे नाही. पण तेव्हा मी बऱ्यापैकी गरीबही होते.
पण जी गर्दी स्टेडियमच्या दिशेने जायची त्यात मठ्ठ रेसिस्ट जोक मारणारे, रस्त्यातून अनवाणी चालणारे (ही एक काय पद्धत आहे ते अजूनही कळलं नाही) लोक असायचे.
पण आता मला कम्पल्सरी क्रिकेट बघावं लागत असल्याने मीही त्यात थोडा रस घेऊ लागले आहे. आणि पाकिस्तानचा कॅप्टन क्यूट आहे असं निरीक्षण मी त्या दिवशी केलं.

दामोदरपंत हत्ती Mon, 23/02/2026 - 18:37

मेक्सिको आणि इराणमध्ये परिस्थिती ठीक नाही असे बातम्यांमध्ये बघितले. तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनो काळजी घेऊन राहा ही विनंती.

दामोदरपंत हत्ती Tue, 24/02/2026 - 14:02

सत्यमंगलमच्या जंगलात एका हत्तीने एका व्यक्तीला पायदळी तुडविले त्यामुळे त्या व्यक्तीचा त्यात मृत्यू झाला आहे. हत्ती परिवाराचा अशा हिंसक कारवायांना कधीच पाठिंबा नसतो. आमचे पायदळी तुडविणे रूपकात्मक असते.

https://timesofindia.indiatimes.com/city/coimbatore/farmer-trampled-to-…

दामोदरपंत हत्ती Wed, 25/02/2026 - 09:31

हत्ती परिवार एखाद्या विमानात प्रवासी म्हणून असेल तर विमानाला टेक ऑफ घेण्यासाठी धावपट्टीवर नेहमीपेक्षा जास्त अंतर धावावे लागते.

दामोदरपंत हत्ती Sat, 28/02/2026 - 17:47

मध्यपूर्वेत युद्ध सुरू झाले आहे. तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनो काळजी घेऊन राहा.

'न'वी बाजू Sun, 01/03/2026 - 22:17

In reply to by गोगोल

सगळे नरराक्षस (आणि राक्षसिणी) यांच्यात वावरतो अस राहून राहून वाटतंय

कधीपासून होतेय हे असे?

(नाही म्हणजे, हे असे काही होत असेल, तर त्यात काही वावगे आहे, असे म्हणण्याचा हेतू नाही. परंतु, हे असे जर आताआताच होऊ लागले असेल, तर आश्चर्यजनक आहे, इतकेच.)

गोगोल Mon, 02/03/2026 - 05:59

In reply to by 'न'वी बाजू

.

दामोदरपंत हत्ती Mon, 02/03/2026 - 19:02

स्वातंत्र्यदिन : मोरोक्को

स्वातंत्र्यदिनानिमित्त मोरोक्कोच्या लोकांना, विशेषतः तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनी मोरोक्कोचा इतिहास, भूगोल आणि तिथल्या लोकांचे राहणीमान यावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. त्या देशात हत्ती किती आणि हत्तींसाठी किती अभयारण्ये  आहेत याचा अंतर्भाव करावा ही आग्रहाची विनंती. ऐसीचे विचारसौष्ठव वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने तो लेख हे एक महत्वाचे पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही. असा लेख लिहिला गेला तर काही दिवस पायदळी तुडवायला स्थगिती देईन.

दामोदरपंत हत्ती Wed, 04/03/2026 - 20:59

आज राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचा वर्धापनदिन आहे. त्याबद्दल सगळ्यांना विशेषतः राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत नोकरीला असलेल्या अथवा राष्ट्रीय सुरक्षा परिषदेशी कोणत्याही प्रकारे संलग्न असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत नोकरीला असलेल्या अथवा राष्ट्रीय सुरक्षा परिषदेशी कोणत्याही प्रकारे संलग्न असलेल्या ऐसीकरांपैकी कोणी त्या परिषदेविषयी एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. तो लेख ऐसीचे विचारसौष्ठव वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही. त्या लेखात परिषदेशी हत्तीचा संबंध आहे का आणि असल्यास कसा हे पण लिहावे ही आग्रहाची विनंती. तसे केल्यास चार दिवस पायदळी तुडवायला विश्रांती देणार. नाहीतर आहेच आपलं कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणे.

दामोदरपंत हत्ती Fri, 06/03/2026 - 11:39

तामिळनाडू सरकार हत्ती-माणूस संघर्ष कमी करण्यासाठी पावले उचलणार. चांगले आहे. तेवढेच पायदळी तुडविणे कमी होईल.

https://www.thehindu.com/news/national/tamil-nadu/a-model-for-tackling-…

दामोदरपंत हत्ती Sun, 08/03/2026 - 09:24

कवी व लेखक आरती प्रभू उर्फ चिं. त्र्यं. खानोलकर (१९३०) 

विनम्र अभिवादन

दामोदरपंत हत्ती Sun, 08/03/2026 - 15:54

समस्त हत्ती परिवाराकडून सगळ्यांना, विशेषतः ऐसीवरील महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने ऐसीवरील महिलांनी महिला या विषयावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. त्या लेखात महिलांचे हत्तींबरोबर सख्य याचाही आणि त्यामागील कारणांचा अंतर्भाव करावा ही आग्रहाची विनंती.

सई केसकर Sun, 08/03/2026 - 17:58

>>समस्त हत्ती परिवाराकडून सगळ्यांना, विशेषतः ऐसीवरील महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

अनेक आभार! पण हत्तींना एका महिलादिनाची गरजच नाही. हत्ती मातृसत्ताक असतात. म्हणूनच मला ते फार आवडतात. वयात आलेल्या नरांना कळपाबाहेर काढतात. आणि कळप केवळ बायकांचा राहतो.
हे एकदा फार फार पूर्वी कुठेतरी वाचल्यावर मी आणि माझ्या मैत्रिणीने असे कम्युन करून रहायची कल्पना खेळवून बघितली होती. सगळ्या बायका आणि लहान पोरं एकत्र राहणार. त्यांच्यावर चांगले स्त्रीवादी, पर्यावरणवादी, शांततावादी, युद्धविरोधी, हिंसाविरोधी संस्कार करून त्यांना जगात सोडणार. वगैरे वगैरे.
पण आता हत्ती सतत कुठेतरी कुणालातरी पायदळी तुडवत असतात त्यामुळे शेवटचे दोन बहुतेक कुणालाच करायला जमणार नाहीत!

https://worldelephantday.org/the-life-of-a-matriarch-elephant/

'न'वी बाजू Sun, 08/03/2026 - 19:32

In reply to by सई केसकर

पण आता हत्ती सतत कुठेतरी कुणालातरी पायदळी तुडवत असतात त्यामुळे…

वयात आलेल्या हत्तीला त्याच्या स्वतःच्या रक्ताच्या आईने जर घरातून (कळपातून) हाकलून दिले, तर तो दुसरे नेमके काय करेल, अशी अपेक्षा आहे?

(‘त्याने काय करावे’ नव्हे. ‘तो काय करेल’. हत्ती बीइंग हत्ती. (दोहोंत फरक आहे.))

दामोदरपंत हत्ती Mon, 09/03/2026 - 18:31

मी एक दामोदरपंत हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

'न'वी बाजू Mon, 09/03/2026 - 19:51

In reply to by गोगोल

तो (आयडेंटिटी क्रायसिस) तर जुनाच आहे, सनातन आहे.

लोक जुलाब झाल्यावर जितक्या वारंवारतेने चड्ड्या बदलत नसतील, तितक्या वारंवारतेने हा नावे बदलतो, न् काय!

चालायचेच.

दामोदरपंत हत्ती Tue, 10/03/2026 - 08:52

In reply to by 'न'वी बाजू

एकदा नाव घेतले की ते ८-१० दिवस तरी कायम असते. मला वाटते जुलाब नसतानाही लोक दररोज चड्ड्या बदलतात आणि जुलाब असेल तर दररोज एका पेक्षा अधिक वेळेला. तितक्या वेगाने आमचे नाव बदलत नाही.

सई केसकर Tue, 10/03/2026 - 09:37

In reply to by दामोदरपंत हत्ती

>>>एकदा नाव घेतले की ते ८-१० दिवस तरी कायम असते. मला वाटते जुलाब नसतानाही लोक दररोज चड्ड्या बदलतात आणि जुलाब असेल तर दररोज एका पेक्षा अधिक वेळेला. तितक्या वेगाने आमचे नाव बदलत नाही.

हा हा हा!
हत्तींनी मारला सिक्सर.
नबांना टुकटुक!!

'न'वी बाजू Tue, 10/03/2026 - 14:46

In reply to by दामोदरपंत हत्ती

तितक्या वेगाने आमचे नाव बदलत नाही.

नशीब!

(की उपकार म्हणायचे?)

दामोदरपंत हत्ती Wed, 11/03/2026 - 07:45

In reply to by 'न'वी बाजू

नशिब नाही आणि उपकारही नाही. अशी नावं बदलायला आमचे व्यक्तिस्वातंत्र्य, खरं तर हत्तीस्वातंत्र्य म्हणता येईल.

गवि Fri, 13/03/2026 - 07:49

In reply to by 'न'वी बाजू

"लोक जुलाब झाल्यावर जितक्या वारंवारतेने चड्ड्या बदलत नसतील, तितक्या वारंवारतेने हा नावे बदलतो, न् काय!"

पण पण पण.. जुलाब होत असताना मनुष्य जर वेळेत, विना अपघात प्रत्येक वेळी गंतव्यस्थानी पोचूनच ते कर्म करू शकला तर चड्डी बदलण्याची वेळ येईल काय?

लोक शक्यतो चड्डी बदलण्याची वेळ येऊ देत नसावेत. हां अगदीच तीव्र डहाळ लागले असल्यास मात्र काही भरवसा नाही.

चिंतातुर जंतू Fri, 13/03/2026 - 08:41

In reply to by गवि

नवीन सिस्टीम मध्ये टेक्स्ट क्वोट कसे करायचे ?

 

  1. टेक्स्ट फॉरमॅट 'फुल एचटीएमएल' करायचे.
  2. जो मजकूर उद्धृत करायचा आहे तो सिलेक्ट करून वरचे " (कोट) चिन्ह निवडायचे.

'न'वी बाजू Fri, 13/03/2026 - 17:39

In reply to by गवि

आपले म्हणणे ठीकच आहे (आणि, of course, I bow to superior experience), परंतु…

…अंमळ worst-case scenario कल्पून पाहिला, इतकेच.

असो.

दामोदरपंत हत्ती Wed, 11/03/2026 - 20:50

मी एक दामोदरपंत हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

दामोदरपंत हत्ती Fri, 13/03/2026 - 14:36

मुत्सद्दी नाना फडणवीस (१८००)

विनम्र अभिवादन.

नाना फडणवीस हे नाव जरी ऐकले तरी मनात नकळतपणे एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहते. या निमित्ताने नाना फडणवीसांच्या चरित्राचा अभ्यास केलेल्या ऐसीकरांनी त्यांच्यावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठव वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने ते एक महत्वाचे पाऊल ठरेल यात अजिबात शंका नाही.

'न'वी बाजू Fri, 13/03/2026 - 17:24

In reply to by दामोदरपंत हत्ती

नानांच्या चरित्राचा अभ्यास वगैरे नाही. (चारित्र्याचा तर नाहीच नाही.) मात्र, लोकांची मातृभाषा ओळखण्यासंबंधीचा त्यांचा अल्गोरिदम अत्यंत रोचक होता, असे ऐकून आहे.

मात्र, त्यांची तुलना हत्तीशी नक्की कोणत्या निकषावर केलेली आहे, ते समजू शकले नाही.

सरतेशेवटी,

नानांत नाना, फडणवीस नाना
इतर नाना करिती तनाना

ही (नानांसंबंधीची) सुप्रसिद्ध द्विपंक्ती उद्धृत करून प्रस्तुत प्रतिसाद आवरता घेतो.


तळटीपा:

श्री. विजय तेंडुलकर यांचा असावा, बहुधा.१अ (चूभूद्याघ्या.)

१अ श्री. विजय तेंडुलकर यांच्या चारित्र्याचा अभ्यास कोणी केला असल्यास कल्पना नाही.१अ१

१अ१ नाना असते, तर त्यांनी उलटटपाली तो अवश्य केला असता, याबद्दल आम्हांस खात्री वाटते. याला quid pro quo म्हणावे, की फिट्टंफाट, तेवढे मात्र आम्हांस कळत नाही. चालायचेच.

अर्थात, त्या काळात जरी तो अल्गोरिदम भाव खाऊन गेला असला, तरीसुद्धा, त्याच्या मर्यादा आम्ही जाणतो. उदाहरणादाखल, एकविसाव्या शतकात आमच्या चिरंजीवांवर तो अल्गोरिदम कदापि चालला नसता, याबद्दल आम्हांस खात्री आहे. (एक तर त्यातून काहीही निष्पन्न झाले नसते, नपक्षी, चुकीचे निदान झाले असते. चालायचेच.)

या द्विपंक्तीची एकविसाव्या शतकातील आवृत्ती काहीशी पुढीलप्रमाणे होऊ शकली असती काय?

फडणविसांत फडणवीस, नाना फडणवीस
इतर फडणवीस होती कासावीस३अ

३अ वास्तविक, ‘फडणवीस’करिता ‘चारशेवीस’, ‘खवीस’, ‘डँबिस’ आदि यमके सुचली होती. मात्र, एक म्हणजे ते मूळ द्विपंक्तीच्या ‘स्पिरिट’मध्ये झाले नसते. आणि, त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, जगातील इतर सर्वच फडणविसांना ही विशेषणे लागू पडली नसती. (आम्ही बाकी काही असू वा नसू, परंतु, आम्ही fair-minded नाही, असा आरोप आमच्यावर कदापि होणे नाही.) झालेच तर, ‘इतर फडणवीस चोळिती एकशेवीस’ हा पर्याय अगदीच कैच्याकै झाला असता. सबब, इतर सर्व पर्याय सोडून देऊन प्रस्तुत पर्याय निवडावा लागला. असो.

दामोदरपंत हत्ती Fri, 13/03/2026 - 20:27

In reply to by 'न'वी बाजू

मात्र, त्यांची तुलना हत्तीशी नक्की कोणत्या निकषावर केलेली आहे, ते समजू शकले नाही.

 

नाना फडणवीस यांच्या व्यक्तिमत्त्वाची तुलना हत्तीशी करता येते. हत्ती हा प्राणी आपल्या विशाल आकारामुळे आणि शांत स्वभावामुळे ओळखला जातो. तो सहजासहजी आक्रमक होत नाही, परंतु आवश्यक तेव्हा अत्यंत सामर्थ्याने प्रतिसाद देतो. त्याची स्मरणशक्ती आणि स्थैर्यही प्रसिद्ध आहे. जंगलात हत्ती जसा कळपाचे नेतृत्व स्थिरपणे करतो, तसाच नाना फडणवीसांनी मराठा राजकारणात संतुलन राखण्याचा प्रयत्न केला.

हत्तीचा आणखी एक गुण म्हणजे त्याची संयमी चाल. तो घाईघाईने धावत नाही; पण एकदा पुढे सरकला की त्याचा मार्ग थांबवणे कठीण असते. नाना फडणवीसांच्या राजकारणातही हीच पद्धत दिसते. त्यांनी अनेक वेळा संयम बाळगून योग्य क्षणाची वाट पाहिली आणि मगच निर्णय घेतले. त्यांच्या या धोरणामुळे मराठा साम्राज्याने अनेक संकटे पार केली.

म्हणूनच नाना फडणवीसांचा विचार करताना त्यांच्या बुद्धिमत्तेसोबत त्यांचे स्थैर्य, धीर आणि दूरदृष्टी यांची आठवण येते. हत्तीप्रमाणेच ते शांत पण प्रभावी नेतृत्वाचे प्रतीक होते. त्यांच्या कार्यामुळे मराठा साम्राज्याचा शेवटचा स्थैर्याचा काळ काही वर्षे अधिक टिकू शकला, आणि म्हणूनच इतिहासात त्यांचे स्थान अत्यंत मानाचे मानले जाते.


 

सई केसकर Fri, 13/03/2026 - 16:50

बघा हत्तींना किती चांगले दिवस आले आहेत.
वेरनं हेरत्झोगने (Herzog) हत्तींवर माहितीपट केला आहे. समस्त हत्तीपरिवाराला हा माहितीपट तिकीट काढून थेटरात बघण्याची विनंती.

https://edition.cnn.com/science/ghost-elephants-angola-steve-boyes-wern…

गोगोल Fri, 13/03/2026 - 19:04

https://www.youtube.com/shorts/eukHg0Ek3TY

हा ए आय व्हिडियो नाहीये. हा माणूस सगळ्या प्राण्यांसाठी म्युझिक कॉन्सर्ट्स करत असतो.
या व्हिडियोत बघा कसे लहान थोर हत्ती संगीताचा आनंद घेत झुलतायत. समस्त हत्ती परिवाराने अशा मनाने मस्त माणसाला शाल आणि श्रीफळ देऊन त्याचा सत्कार करावा (तो सरकारनामा वाला यशवंत दत्त चा सत्कार नाही हं) अशी मी मान्यवर हत्तीना विनंती करतो.

त्याचबरोबर इथे ऐसी वर हत्ती परिवारातील केवळ बुल एलिफन्टसच रेप्रेसेंटेशन आहे, जे की केवळ तुडवातुडवी करतात, यावर मी सखेद निषेध व्यक्त करतो. ज्या हत्तीणी आया आणि मावशा बनून छोटुकल्या गोंडस हत्तींना वाढवतात त्यांना या प्लॅटफॉर्मवर आपला नार्चरिंग व्यू मांडायला मिळेल अशी आशा व्यक्त करतो.

'न'वी बाजू Fri, 13/03/2026 - 19:23

In reply to by गोगोल

हत्तीखान्याबरोबरच एखाद्या स्वतंत्र हत्तीणखानीची संकल्पना रोचक आहे. मी तिचे स्वागत करतो.

मात्र, हत्तीणखानी आली, म्हणजे तिच्यावर हत्तिणींचे फक्त नर्चरिंग व्ह्यूज़च मांडले जातील, अशी जर का तुमची अपेक्षा असेल, तर ती काहीशी स्टीरिओटिपिकल आहे, एवढेच सुचवू इच्छितो. (किंबहुना, बुल एलेफंट्ससुद्धा केवळ तुडवातुडवीच करतात, हे रेप्रेझेंटेशनदेखील तितकेच स्टीरिओटिपिकल असावे. (चूभूद्याघ्या.))

हत्ती तितक्या प्रकृती! (आणि म्हणूनच, अधिक हत्ती तथा हत्तिणी येणे आवश्यक आहे.)

सई केसकर Fri, 13/03/2026 - 19:43

In reply to by 'न'वी बाजू

पण मी मनोमन स्वतःला म्हैस मानलं आहे. अगदी लहानपणापासून. Infact, माझा रिटायरमेंट प्लान असा आहे की १० म्हशी विकत घेऊन एक डेरी टाकायची हळूहळू म्हशी वाढवायच्या (त्यासाठी एक रेडा घेता येईल किंवा कृषी विद्यापीठात थेट ..जाऊदे. पण म्हणजे म्हशी वाढवणे त्यांनाच reproduce करायला लावून जमते हे किती भारी आहे. असाच एक मास स्पेक्ट्रोमिटर दुसऱ्याला जन्म देता तर किती बरे झाले असते). मग हळूहळू पाश्चारयझेशन युनिट, आणि अलीकडे एक मित्र भारतात आला होता तो म्हणाला की ऑलिव्ह भारतात का पिकत नाहीत? हवामान तसं अनुकूल आहे. मग मी विचार केला की गोठ्याशेजारी ऑलिव्ह शेती करायची आणि लाकडी घाणा टाकायचा. मग त्यातून जी पेंड येईल त्यात खूप सारे ओमेगा ३ असतील. ते म्हशी खातील आणि चांगलं दूध देतील. अर्थात हा प्लान रिटायरमेंट नसून ओव्हर एम्प्लॉयमेंट आहे. पण सध्या तरी मला हे अतिशय आकर्षक वाटतं आहे.

गोगोल Fri, 13/03/2026 - 19:51

In reply to by 'न'वी बाजू

म्हणजे तुमचा मोठा मुद्दा मला पूर्णपणे मान्य आहे.

परंतु

जसे माउस मॉडेल्स वापरून कुठलेतरी ड्रग सक्सेसफुल झाले की ओव्हर इगर इव्हीएनजेलिस्ट लगेचच कॅन्सर आता क्युअर होणार वगैरे बातम्या छापतात तसं वर सई केसकर यांनीही (त्याच त्या उगवत्या तारा फेम) हत्ती मॉडेल जनरलाईझ करून माणसांमध्ये कम्युन काढायची आयड्या काढली तेव्हा नाही दिसला स्टीरिओटिपिकल पणा?

राधासुता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म??

हा प्रतिसाद अतिशय बायस्ड आहे आणि फेव्हरेटिसम करत आहे. हत्ती परिवाराने १/१०th यशवंत दत्त वाला सत्कार करावा ... मेरा नै रे बाबा, 'न'वी बाजू का.
मी फक्त जे व्युज एक्सेप्टेड आहेत त्यांचीच री ओढायचे ठरवले आहे. सत्यम ब्रूयात, प्रियं ब्रूयात... न ब्रूयात सत्यम अप्रियं

दामोदरपंत हत्ती Fri, 13/03/2026 - 20:06

In reply to by 'न'वी बाजू

आमचा अकाऊंट दर वेळेस एकच हत्ती वापरतो असे नाही तर कुटुंबातील बरेच जण वापरतात. त्यात काही हत्तीणीही आहेत.

दामोदरपंत हत्ती Fri, 13/03/2026 - 22:03

हत्तीखान्याने मरगळलेल्या ऐसीवर कशी नवी संजीवनी आणली आहे. हत्तीखाना ऐसीवरील सर्वाधिक लोकप्रिय धागा बनणार. नबा तुमचे विशेष आभार.

गोगोल Fri, 13/03/2026 - 23:59

In reply to by दामोदरपंत हत्ती

>> आमचा अकाऊंट दर वेळेस एकच हत्ती वापरतो असे नाही तर कुटुंबातील बरेच जण वापरतात. त्यात काही हत्तीणीही आहेत.

मला जेव्हापासून सई केसकर यांनी हत्ती परिवाराबद्दल एज्युकेट केलं तेव्हापासून तीन हत्ती दिसले: अरितुडवन, नारायणशास्री, दामोदरपंत

तिन्ही बुल एलिफन्टस एकही बाई नाही. त्यात अरितुडवन आणि दामोदरपंत केवळ एकच "सगळी कडे तुडवातुडवीच" पालुपद आवळताना दिसतात. भाषा सुद्धा वर्ड टू वर्ड सेम आहे. सगळ्यांचे विषय सुद्धा सारखे, काहीच वैविध्य नाहीये. एकच हत्ती आयडेंटिटी थेफ्ट करून वेगवेगळे हत्ती असल्याचा भास निर्माण करून हत्ती परिवाराला मिस रिप्रेझेन्ट करतोय असा आम्हाला दाट संशय आहे.

या प्रकारच्या फ्रॉडची खोलात जाऊन इन्वेस्टीगेशन होण्यासाठी एक चौकशी आयोग हत्ती परिवाराने नेमावा अशी मी समस्त हत्ती परिवाराला विनन्ती करतो. आता ए आय वगैरे वापरून विविध प्रकारच्या पर्सनेलिटीईज स्यीमुलेट करायचा प्रयत्न देखील करू नका.

>> हत्तीखान्याने मरगळलेल्या ऐसीवर कशी नवी संजीवनी आणली आहे. हत्तीखाना ऐसीवरील सर्वाधिक लोकप्रिय धागा बनणार. नबा तुमचे विशेष आभार.

हे केवळ फ्रॉड पासून दुसरीकडे लक्ष वेधून घ्यायला केलेली कमेंट आहे. या प्रकारात कदाचित नबा सुद्धा खोलवर गुंतले असल्याची शक्यता आहे कारण की वर जेव्हा त्यांच्यावर फीवरीटीझम चा आरोप झालाय तेव्हापासून त्यांची या धाग्यावरची अनुपस्थिती नोटिसीबल आहे. उगाच नाही फक्त त्यांनाच आभार दिले गेले.

दामोदरपंत हत्ती Sat, 14/03/2026 - 11:38

In reply to by गोगोल

मला जेव्हापासून सई केसकर यांनी हत्ती परिवाराबद्दल एज्युकेट केलं तेव्हापासून तीन हत्ती दिसले: अरितुडवन, नारायणशास्री, दामोदरपंत

ते तीन वेगळे हत्ती नाहीत. एकाच आय.डीची तीन वेगळी नावे आहेत. तुम्ही तसे जुने सदस्य दिसता पण बर्‍याच वर्षांनी इथे आला असावात त्यामुळे इतर सर्व ऐसीकरांना माहीत असलेल्या काही काही गोष्टी तुम्हाला माहीत नसाव्यात. आम्ही एकदा एक नाव घेतले की सरासरी १० दिवस तेच नाव वापरतो. आमच्या ऐसीवरील वास्तव्यात आतापर्यंत तीनशे पेक्षा जास्त वेळा आम्ही नावे बदलली आहेत. 

त्यात अरितुडवन आणि दामोदरपंत केवळ एकच "सगळी कडे तुडवातुडवीच" पालुपद आवळताना दिसतात. भाषा सुद्धा वर्ड टू वर्ड सेम आहे. सगळ्यांचे विषय सुद्धा सारखे, काहीच वैविध्य नाहीये.

पायदळी तुडविणे, विनम्र अभिवादन, वेगवेगळे लेख लिहायची विनंती असे काही साचे बनविलेले आहेत. वेगवेगळे हत्ती त्याच साच्यातून प्रतिसाद पाडतात. 

एकच हत्ती आयडेंटिटी थेफ्ट करून वेगवेगळे हत्ती असल्याचा भास निर्माण करून हत्ती परिवाराला मिस रिप्रेझेन्ट करतोय असा आम्हाला दाट संशय आहे.

नाही. आमचा परिवार असा आहे.

hatti

या प्रकारच्या फ्रॉडची खोलात जाऊन इन्वेस्टीगेशन होण्यासाठी एक चौकशी आयोग हत्ती परिवाराने नेमावा अशी मी समस्त हत्ती परिवाराला विनन्ती करतो.

मामाला सांगतो.

हे केवळ फ्रॉड पासून दुसरीकडे लक्ष वेधून घ्यायला केलेली कमेंट आहे. या प्रकारात कदाचित नबा सुद्धा खोलवर गुंतले असल्याची शक्यता आहे कारण की वर जेव्हा त्यांच्यावर फीवरीटीझम चा आरोप झालाय तेव्हापासून त्यांची या धाग्यावरची अनुपस्थिती नोटिसीबल आहे. उगाच नाही फक्त त्यांनाच आभार दिले गेले.

फक्त त्यांचेच आभार मानले कारण हा हत्तीखाना त्यांनी सुरू केला. तसा आमचे स्नेही अबापट यांनी खरडफळा सुरू केला होता. त्यावर आम्ही खूप काही लिहू शकलो असतो. पण त्यांना हत्ती परिवाराच्या कल्पकतेची कदर नाही त्यामुळे त्यांनी आम्हाला तिथे यायला मज्जाव केला. म्हणून आमचे दुसरे स्नेही 'न'वी बाजू यांनी हा हत्तीखाना सुरू केला. मग त्यांचे आभार मानायला नकोत का?

 

 

 

गोगोल Sat, 14/03/2026 - 17:23

In reply to by दामोदरपंत हत्ती

>> मामाला सांगतो.

सगळं आलं लक्षात, चालू द्यात. आपला राम राम.

अबापट Tue, 17/03/2026 - 17:32

In reply to by गोगोल

गोगोलसाहेब ,
एकेकाळी लोकं या रानडेगोगटेहत्ती परिवारावर वैतागून असत.
आता दिवस बदलले executive management* हत्तीखान्यात सामील झालीय.
आता यांच्यावर वैतागून उपयोग नाही.

* ओळखा बघू , हे कोण ते .

सई केसकर Tue, 17/03/2026 - 21:39

In reply to by अबापट

रानडे असतील तर माझ्या सासरचे असू शकतात. त्यामुळे समस्त हत्ती परिवारातील आत्याबाई आणि मामंजीना माझा वाकून नमस्कार.

दामोदरपंत हत्ती Tue, 17/03/2026 - 21:51

In reply to by सई केसकर

मी रानडे आणि माझा मामा गोगटे. 

रानडे असतील तर माझ्या सासरचे असू शकतात. 

तसे न्यायमूर्ती रानडेही आमचे अडनावबंधूच होते.

दामोदरपंत हत्ती Tue, 17/03/2026 - 21:58

In reply to by अबापट

अरे चक्क आमचे स्नेही अबापट हत्तीखान्यावर आले? हे म्हणजे उद्धव ठाकरे शिंदेसेनेच्या मेळाव्यात हजेरी लावायला आल्याप्रमाणे झाले. अबापट यांचे हत्तीखान्यावर हार्दिक स्वागत. येत जा इथे.

hatti

दामोदरपंत हत्ती Sat, 14/03/2026 - 21:53

मी एक दामोदरपंत हत्ती, प्रचंड मोठा, महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

दामोदरपंत हत्ती Mon, 16/03/2026 - 11:11

सरन्यायाधीश प्रल्हाद बाळाचार्य गजेंद्रगडकर (१९०१), 

संगीतकार भास्कर चंदावरकर (१९३६) 

विनम्र अभिवादन

दामोदरपंत हत्ती Mon, 16/03/2026 - 11:14

आज कोणत्याही देशाचा स्वातंत्र्य दिन/राष्ट्रीय दिन/प्रजासताक दिन नसल्यामुळे कोणत्याच देशातील लोकांना, विशेषत: तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना शुभेच्छा नाहीत. कोणत्याही देशात वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना त्या देशाचा इतिहास, भूगोल आणि तिथल्या लोकांचे राहणीमान यावर लेख लिहायची विनंती नाही. मुळात लेखच लिहायची विनंती नसेल तर त्या देशात हत्ती किती आणि हत्तींसाठी अभयारण्ये किती याचा त्या लेखात अंतर्भाव करायचा आग्रह तसा अर्थहिनच ठरेल. मुळात लेखच लिहिला नसेल तर तो लेख ऐसीचे विचारसौष्ठव कसे वृध्दींगत करणार?