जनगणनेची विश्वासार्हता
जनगणनेची विश्वासार्हता
============
राजीव उपाध्ये
जनगणनेच्यासाठी माझ्याकडे एक बाई येऊन गेल्या. त्यांच्या कार्यपद्धतीने मला जनगणनेच्या विश्वासार्हतेबद्दल शंका निर्माण झाली.
या अगोदर झालेल्या राज्यपातळीवरील एका जनगणनेच्या वेळी मला शंका उपस्थित झाली होती. तेव्हा त्या अधिकार्याने माझी कोर्या कागदावर माझी सही मागितली होती आणी त्याला मी नकार दिला होता. तसेच त्याने सिस्टीममध्ये काय माहिती भरली याची माझ्याकडे पोचपावती नसल्याने, त्याने माहिती भरताना चुका केल्या किंवा नाहीत हे कळायला काहीही मार्ग नाही.
माझ्याकडे आलेल्या बाईनी माझं नाव आणि वैयक्तिक माहिती वहीत उतरवून घेतली. त्यांना मी यावर प्रश्न विचारल्यावर त्यांनी माहिती मी ॲपमध्ये नंतर भरणार असल्याचे सांगितले. तसेच तुम्ही दिलेल्या माहिती विषयी काही शंका असेल तर मी त्यात नंतर बदल करू शकते, असे सांगितले.
माझ्या मते याच टप्प्यावर पारदर्शकतेला छानपैकी चुना लावण्यात आला आहे - बेसिकली ॲपमध्ये काय माहिती भरली जाणार आहे, याचा मला काडीमात्र पत्ता कधीही लागणार नाही. मी दिलेली माहिती बदलली जाण्याची यत्किंचितही शक्यता असेल, तसेच मला त्याची कॉपी मिळणार नसेल तर माझ्या नावावर काहीही माहिती दुरुस्तीच्या हेतूने भरता येते.
मग जनगणनेला काहीही विश्वासार्हता राहात नाही.
भारत या देशात पारदर्शकतेचा आदर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भारत एक भ्रष्ट देश राहणार.
घ्या चालवून
भारतात भारताच्या इतिहास मधील सर्वात जास्त वाईट काळ चालू आहे.
पारदर्शकता बिलकुल नाही.
खोटे बोलणे हीच स्किल .
सरकारी निर्णय साफ शब्धत जाहीर न करणे.
लोकांना काही शंका असतील तर पत्रकार परिषद च न घेणे.
अंध भक्त बावळे वेगळेच काही तरी बोलत असतात.
कठीण काळ आहे.
CHS असावे ते
Census House servey. एक बाई आल्या होत्या घरी/दारावर. (२५. मे) त्यांनी माहिती विचारली आणि त्यांच्या फोनमध्ये भरली. (ती मी पाहिली नाही.)तुमचा हाऊस सर्वे केला म्हणाल्या. मी विचारले की ऑनलाइन आहे ना? तर हो म्हणाल्या.... पण ती साईट महाराष्ट्रासाठी १-१५ मे चालू होती. म्हणजे मला ते काम स्वत: करता आले असते. जाहिराती येत होत्या आणि माझे दुर्लक्ष झाले.( साइट उघडू आणि माहिती भरू हा विचार परंतू ती साईट थोडाच कालावधीसाठी आहे हे नंतर समजले. मुख्य म्हणजे फोन नंबराला ओटीपी येणार होता आणि खात्री होऊन एक नोंदणी क्रमांक मिळणार होता. ती साईट https://se.census.gov.in/
विस्तृत माहिती इथे https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2246847®=3&lang=2
घर कोणाच्या नावावर आहे, किती जण राहतात, गॅस ( lpg) आहे का, वाहन आहे का आणि फोन नंबर विचारून माहिती app मध्ये भरली. [ काही कर्मचाऱ्यांनी ओटिपी विचारला त्यावर विरोध झाला होता.]
___________________
तर लेखाचा मुद्दा विचारात घेऊन म्हणेन की सांगितलेली माहितीच्या आधारे किंवा नागरिकांनी स्वतः भरलेल्या माहिती आधारे जनगणना होत आहे. काय आणि किती विश्वास ठेवणार.