Skip to main content

नाती आणि प्रेम

2 minutes

नाती आणि प्रेम
========

राजीव उपाध्ये

टीप - हे लिखाण पुष्कळ (पुढचा मागचा) विचार करून मगच इथे टाकले आहे.

प्रसिध्द मानववंशशास्त्रज्ञ डेस्मण्ड मॉरीस असे म्हणतो की निष्ठा तिथे निर्माण होतात जिथे गरजा भागतात आणि संगोपन होते. मी या सिद्धान्ताचा थोडा विस्तार केला आहे - जिथे भावनिक, शारीरिक, आर्थिक, बौद्धिक गरजांची पूर्तता होते तिथे सशक्त नाती निर्माण होतात. लग्नासारख्या नात्यात आणखी एका घटकाची आवश्यकता असते - तो म्हणजे एकमेकांविषयी विनाअट आदर.

माझ्या आईच्या आईचे संगोपन तिच्या मावशीने केले होते. ती बालविधवा होती. तिने सुईणकाम करून आणि आज ज्यांना "कुटीरउद्योग" म्हटले जाते अशा विविध कामांतून आपला उदरनिर्वाह केला. स्वतःची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही, कोकणातील दुर्गम गावातून पुण्याला कोणी येत असेल तर ती तिच्या परीने मला काही ना काही पाठवत असे. त्यात लहान असताना माझे पाय थंडीत फुटायचे म्हणून कोकम तेल हमखास असे.

मुद्दा असा की, तिची आर्थिक परिस्थिती माझ्या वडिलांच्या कुटुंबापेक्षा अधिकच वाईट होती; परंतु तिची वृत्ती, जिव्हाळा आणि प्रेम मला माझ्या वडिलांच्या कुटुंबाकडून मिळालेल्या प्रेमापेक्षा लाख पटीने अधिक मिळाले.

माझा सख्खा मामा अमेरीकेत एका मोठ्या कंपनीत डायरेक्टरपदावर होता. आईच्या त्यागाची आठवण ठेवून तो शेवटच्या आजारपणात तो धावून आला तेव्हा त्याने घरात भांडी विसळायला पण मदत केली होती. अशी मदत वडीलांच्याकडच्या नातेवाईकांनी कधी केल्याचे मला आठवत नाही. आई सांगायची की "ते फक्त कोडग्यासारखे हात पसरून पुढे असायचे. आम्ही संसार चालू केला तेव्हा तुझ्या वडीलांच्या खात्यात फक्त ५१ रु आणि ९८ पैसे होते" हे वाक्य तिच्याकडून आयुष्यभर ऐकले.

माझ्या चुलत्याने मला कधी फुटका खुळखुळा पण घेऊन दिला नाही, पण स्मशानात भावाची (माझ्या वडीलांची) चिता विझायच्या आत माझे अमे्रिकेला जायचे प्लॅन आहेत का, याची चिंता त्या *हरामखोराला* सतावत होती.

याविषयावर अक्कल शिकविणारे लोकं भेटतात तेव्हा सोईस्करपणे या वास्तवावर बोळा फिरवतात तेव्हा मात्र माझे रक्त उकळायला लागते.

Node read time
2 minutes

'न'वी बाजू Tue, 23/06/2026 - 16:36

याविषयावर अक्कल शिकविणारे लोकं भेटतात तेव्हा सोईस्करपणे या वास्तवावर बोळा फिरवतात तेव्हा मात्र माझे रक्त उकळायला लागते.

“जौद्यात. हिंदू आहेत.” म्हणून सोडून द्यायचे, झाले. कोठे प्रत्येकाच्या नावाने आपलेच डोके खराब करून घेत राहायचे? असल्या नमुन्यांना तोटा नसतो. आणि, They know no better. And will never know any better.

(तो येशू मरतामरता काय म्हणून गेला मग? (त्याचाही असल्याच लोकांशी पाला पडून गेला होता. (भले हिंदू नसले, तरीही.)))

चालायचेच.

'न'वी बाजू Tue, 23/06/2026 - 17:27

च्यायला! या तर्कतीर्थाच्या एखाद्या लेखाला जन्मात कधी “लाईक” देईन, असे वाटले नव्हते. काय वाटेल ते होऊ शकते या जगात!

(या हिशेबाने, उद्या मी, (गॉड फॉरबिड, परंतु), (१) भारताचे नागरिकत्व (पुन्हा) पत्करून, (२) मोदींना तर मत देणार नाही ना, अशी भीती वाटू लागते. (छे, छे! Perish the thought!))

असो चालायचेच.


गुजरातीतला ‘छे’ नव्हे. (मोदींचा विषय निघाला, तरीही.)

मारवा Tue, 23/06/2026 - 19:17

कुणास ठाऊक
काळ अनंत आहे
आणि खरेच असे झाले समजा तर
त्यात इतके कुचंबून किंवा लज्जित होण्यासारखे काय आहे ?
दिसली बुवा नवी बाजू आय मीन चांगली बाजू आज
उदा मला मोदी शुष्क पुरुष वठलेल्या सारखे वाटत होते
पण मेलोनी यांच्या सानिध्यात त्यांची बहरलेली कोवळी पालवी दिसली.
असो