वेश्याव्यवसाय - पुस्तक परिचय
वेश्याव्यवसाय
मध्यंतरी अमृता फडणवीस यांनी एक सनसनाटी विधान केले. माध्यमांनी त्याला चटपटीत प्रसिद्धी ही दिली होती.
"वेश्या व्यवसायाचा प्रोफेशन म्हणून स्विकार करायला हवा" . जर्मनीसारखेच भारतातही वेश्या व्यवसायाकडे आदराने पहावं असं त्यांनी म्हटलंय. देहविक्रय हा पुरातन व्यवसाय आहे. देहविक्रय करणाऱ्या महिलांमुळेच समाजात बॅलन्स टिकून आहे. देहविक्रय करणाऱ्या महिला या समाजाच्या अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे या महिलांना समाजात मानाचे स्थान मिळायला हवे हा अमृता फडणवीस यांचा मुद्दा मध्यंतरी एका चर्चा पीठावर मी मांडला होता त्यावर एका स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्तीनी हा व्यवसाय अमृता किंवा त्यांच्या बिरादरीतील महिला प्रोफेशन म्हणून स्वीकारतील का? असा प्रश्न उपस्थित केला. खर तर अशा विषयांवर अनेक जण मौन राखणॆ पसंत करतात अमृता फडणवीस यांनी तो विनासंकोच मांडला या बद्दल मला त्याचे कौतुक वाटले. अशा प्रकारचे विचार दुर्गा भागवत यांनीही पुर्वी मांडले होते. दुर्गाबाई भागवत यांना “साहित्य अकादमी” पुरस्कार मिळाल्याबद्दल एक सत्कार समारंभ कुलाबा येथे एका महिला संघटनेने आयोजित केला होता.या कार्यक्रमात त्यांनी एक अजब वक्तव्य केले होते.”मी तमाशा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले ते केवळ मानसन्मानासाठी नव्हे तर तमासगिरांचे ,आणि विशेषत: त्यातील स्त्रियांचे जीवन कळावे म्हणून,त्यांचे दु:ख समजावे म्हणून,वेश्यांना आपण बदनाम समजतो,मात्र वेश्या हा समाजाचा एक अत्यावश्यक भाग आहे.सांसारिक जीवन जराही खिळखिळे झाले तर पुरुष अतृप्तीच्या मोकळ्या वाटांवर मोकाट सुटतो. त्याच्या वासनांची पूर्तता करून वेश्या एक प्रकारे समाजाचा तोल सांभाळत असतात.वेश्या व्यवसाय अशा रीतीने समाजाचे रक्षण करतो.डॉक्टर इंजिनिअर प्रमाणे त्याला प्रतिष्ठा आणि सामाजिक मान्यता मिळाली पाहिजे.
गोलपीठा” या प्रकाशन सोहळ्यात दुर्गाबाई भागवत प्रमुख पाहुण्या होत्या.भाषण करताना त्यावेळी त्या म्हणाल्या की,
“घराला जशी संडासबाथरूमची गरज असते,त्याचप्रमाणे समाजस्वास्थ्यासाठी समाजाला वेश्या व्यवसायाची गरज आहे.परंतु वेश्यांना समाजाने सामाजिक प्रतिष्ठा द्यायला पाहिजे,कारण ती समाजाची गरज भागवते.”
दुर्गाबाई भागवत यांच्या उपरोक्त भाषणांचा राजा ढाले यांनी त्यांच्या भाषणात खरपूस समाचार घेतला होता. ‘वेश्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून द्या,कारण ती समाजाची गरज भागवते,
असं म्हणणाऱ्या भागवत बाईंना वेश्यांना वेश्याच ठेवायचं आहे. हा त्यांचा पतितोद्धार असं ज्यांना वाटतं त्यांनी स्वत: हा धंदा का करू नये?
समाजाच्या लैंगिक जाणीवांचे व्यवस्थापन करणार्या साहित्यात र.धों. कर्वे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल आख्ख आयुष्य त्यांनी हा कार्यासाठी खर्च केले आहे.
र.धों.कर्वे वेश्याव्यवसाय या आपल्या पुस्तकातील प्रस्तावनेत लिहितात
"प्रस्तुत लेखकावर वेश्यावृत्तीचा पुरस्कार करण्याचा आरोप अनेकांनी केल आहे आणि त्यांत थोडेबहुत तथ्यहि आहे. परंतु तो पुरस्कार केवळ समाजसुखा- च्या दृष्टीने आहे, वेश्या ही एक उत्तम संस्था आहे अशा विश्वासाने नव्हे. पूर्वी सुखी असलेल्या समाजांनी आज नीतिवाजीच्या आहारी जाऊन अनेकांना काम- तृप्ति दुर्लभ केली आहे. ती सुलभ झाल्याशिवाय समाज सुखी होणें शक्य नाही. कृत्रिम कर्तव्यांपुढे अन्नाची परवा न ठेवणें हाच सद्गुग मानल्यावर कामतृप्तीला अजीबात फाटा देण्याचा प्रयत्न झाल्यास नवल नाही, परंतु ज्यांना निसर्गनियमांचे थोडेबहुत ज्ञान आहे, त्यांना यांत भूषण वाटणार नाही, आणि ज्याप्रमाणे सर्वांना अन्न मिळाले पाहिजे आणि तें खायला वेळ मिळाला पाहिजे, हें आतां लोकांना हळूहळू कळूं लागले आहे, आणि यामुळेच समाजवाद उत्पन्न झाला आहे, त्याचप्रमाणे कामतृप्तीचाहि हक्क सर्वांना असला पाहिजे हैं जेव्हा लोकांना कळूं लागेल, त्या वेळी समागमावरचे फालतू निर्बंध नाहीसे होतील आणि समागम सुलभ होऊन समाज सुखी होईल. परंतु ते निर्बंध जोपर्यंत नाहीसे झाले नाहीत तोपर्यंत समाजाला वेश्यांची गरज आहे. वेश्यांना मागणी नाहीशी झाली म्हणजे त्या आपोआपच नाहीशा होतील, परंतु तेथपर्यंत आणि नंतरहि त्यांना आपला धंदा करण्याचा पूर्ण हक्क आहे आणि तो त्यांना सरळपणें करूं न देऊन त्यांना छळण्याचा जो प्रयत्न नीतिवाज लोक करीत आहेत तो अत्यंत निंद्य आहे आणि त्यांत समाजाचें हित नाही. मात्र वेश्यांनाहि है घडसें कळत नाही आणि त्यांना देखील आपण पाप करतों असेंच वाटतें. ही भावना ज्यांना आहे, आणि एकाच पुरुषाला चिकटून राहण्यांतच ज्यांना मोठेपणा वाटतो, त्या खऱ्या वेश्याच नव्हत. त्यांत कमीपणा न वाटतां मोकळ्या मनाने ज्या धंदा करतात त्याच खऱ्या वेश्या, आणि त्यांचेवर नीति- बाजांच्या प्रचाराचा विलकुल परिणाम होत नाही. अशाच वेश्यांचा समा- जाला उपयोग आहे आणि याच दृष्टीने येथे या प्रश्नाचा विचार केलेला आहे."
१ जून १९४०.
र. धों. कर्वे
पुस्तकात वेश्याव्यसायाबद्दल जागतिक स्तरावरील माहिती दिली आहे.
1) प्राचीन हिंदुस्थान
2) युरोप
3) नंतरची परिस्थिती
4) वेश्याबंदीची मोहिम
5) कायदेबंदीचा सविस्तर विचार
6) कायदेबंदीचे प्रत्यक्ष परिणाम
7) नियंत्रण कसे असावे
8) वेश्यावृत्तीचा नैतिक विचार
अशा विविध प्रकरणातून सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक,वैज्ञानिक पातळींवर विविधांगी विस्तॄत विचार मांडले आहेत. पुस्तकात खर्या व खोट्या वेश्या हे एक प्रकरण पुरवणी म्हणून जोडले आहे. त्यात ते म्हणतात,"
कायद्याचा त्रास होतो काय तो खर्या वेश्यांना मुख्यतः यांचाच विचार केलेला आहे. त्यांच्याबद्दल कोणासही सहानुभूती वाटत नाही आणि ती वाटल्याचे ढोंग जे सोंवळे लोक करीत असतात, त्यांचा मुख्य उदेश वेश्या नाहीसा करण्याचाच असतो. हा उद्देश सफल झाल्या विवाहसंस्थेला अनंत धोका आहे हे अशा लोकांस कळत नाही. प्रस्तुत लेखकाला विवाहसंस्थेबद्दल मोठाला आदर नाही, परंतु वेश्या आणि विवाहसंस्था यांचा अत्यंत निकट संबंध आहे ही गोष्ट बाजूला ठेवली तरी वेश्यांना धंदा करण्याचा हक्क आहे आणि तो कायद्याने सरळपणाने कबूल केला पाहिजे आणि वेगवेगळ्या मिषाने त्यांना त्रास देणे हा अन्याय आहे, हे समजण्याइतकी न्यायबुद्धी लोकांत उत्पन्न झाली तरी पुष्कळ आहे. लोकांत न्यायबुद्धी नसते असे नाही, परंतु पारंपरिक बुरसटपणामुळे ती लुप्त झालेली असते, आणि तिचा कांही उपयोग होत नाही ही गोष्ट लोकांच्या नजरेस आल्यास ती कदाचित् जागृत होईल"
र.धों. देहविक्रय शब्द वापरत नाहीत. कारण वेश्या शरीराचा विक्रय करत नाहीत. शरीर भाड्याने देतात. आजही वेश्यांसाठी काम करणार्या अनेक संघटनांचे तेच म्हणणे आहे. वेश्यांचे ही तेच म्हणणे आहे. आता सेक्स वर्कर हा शब्द प्रचारात आला आहे. कारण त्यांना वेश्या म्हणायला कसंतरीच वाटते. वेश्या पेक्षा सेक्सवर्कर शब्द जरा प्रतिष्ठा असलेला वाटतो. त्यांचे प्रश्न पुन्हा वेगळे आहेत. तो पुन्हा एक स्वतंत्र विषय आहे. मागे वेश्याव्यवसायची नैतिकता या एका पोस्ट मधे मी काही भाग पुर्वी मांडला होता. असो.
सगळे वाचले की पुन्हा र.धों हे काळाच्या किती पुढे होते हे जाणवत राहते.
मुकुंद टांकसाळे यांनी https://radhonkarve.com/ या संकेतस्थळावर पुस्तक उपलब्ध करुन दिले आहे. अक्षरस्पर्श ग्रंथालयाचे दुर्मिळ पुस्तक ठेवल्याबद्दल आभार.
प्रकाशक- र.धों. कर्वे
राईट एजन्सीज, नवी भटवाडी, गिरगांव मुंबई
प्रकाशन काल-1940
पृष्ठे- 166
किंमत- ?
गैरलागू मुद्दे
मुळात इतर "समाजमान्य" नोकरीधंदा करणारे कितीजण स्वेच्छेने करतात?
- समाजातील किती टक्के (उदाहरणादाखल) शिक्षक, वकील, अथवा बँककारकून हे आपापल्या व्यवसायात (तिर्हाइताकडून परस्पर) विकले गेलेले / traffic झालेले असतात?
- 'इतर व्यवसायदेखील बहुतांश जन स्वेच्छेने करीत नाहीत' हे आर्ग्युमेंट (खरे जरी मानले, तरीही) अनैच्छिक वेश्याव्यवसायाचे समर्थन कसे काय होऊ शकते?
’जिगोलो’ हा शब्द तुम्हाला माहित नाही काय? भारतातील जिगोलोंच्या "लैंगिक-सेवां"बद्दल युट्य़ूबवर भरपूर माहिती मिळेल.
'जिगोलो' हा शब्द मला माहीत आहे. (माझ्या सामान्यज्ञानाबद्दल काळजी नसावी.) मुद्दा तो नाही.
मुद्दा हा आहे, की, र.धों.च्या (किंवा, फॉर्दॅट्मॅटर, दुर्गाबाईंच्या) जमान्यात अशा सेवा समाजात (राजरोसपणे अथवा पडद्यामागे) कितीश्या प्रमाणात उपलब्ध होत्या? आणि, (तौलनिकदृष्ट्या) समाजातील किती टक्के स्त्रिया अशा सेवांचा लाभ (उघडउघड वा लपूनछपून) (अ) घेत होत्या, (ब) घेऊ शकत होत्या, वा (क) घेण्याचा विचारसुद्धा करू शकत होत्या?
लैंगिक वर्तन
लैंगिक वर्तन
========
राजीव उपाध्ये
पूर्वी अधून-मधून वृत्तपत्रातून झळकणार्या काही बातम्या आता नित्याच्या झाल्या आहेत - त्यात "तरूण जोडप्याचे सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन" ही बातमी वारंवार झळकते. वेगवेगळ्या कारणांनी होणार्या भावनिक कोंडीमुळे अनावर झालेल्या लैंगिक उर्जेच्या निचर्याला "अश्लील" संबोधल्याने समाज निरंतर चुकीच्या कल्पना गोंजारत राहतो. मानवी लैंगिक-व्यवहाराचे कोडे सोडवताना काहीतरी भोज्जा (संदर्भबिंदू) पकडणे आवश्यक ठरते.
दोन प्रमुख भोज्जे या संबंधीच्या चर्चेत वैयक्तिक जडणघडणीनुसार निवडले जातात-
१ ला भोज्जा - "सुसंस्कृत मानवसमाज" "सुसंस्कृत"
समाजाची रचना ज्या गतीने झाली त्या गतीने जीवशास्त्राचे ज्ञान मानवाला झालेले नाही, मानवसमाजाने निर्माण केलेल्या नैतिकतेच्या, धार्मिक जटिल कल्पना कायम निसर्गाविरूद्ध केलेल्या आचरणाचे उदात्तीकरण करतात. मग "ब्रह्मचर्य", "षड्रिपू" सारख्या कल्पना गळी उतरवून जे अपवाद (आऊटलायर्स) यात यशस्वी होतात त्यांना डोक्यावर घेतले जाते. याशिवाय नैतिक-अनैतिकतेच्या कल्पना प्रत्येक संस्कृतीनुसार बदलतात, त्यामुळे उडणारा गोंधळ वेगळाच... "सुसंस्कृत" मानव समाजाला आपण मूलत: माकडे आहोत हे स्वीकारायला जड जाते. आपण विचार करणारे असल्यामुळे जीवसृष्टीत आपले स्थान वेगळे आहे अशी एक भ्रामक कल्पना त्यात अंतर्भूत असते. प्रत्यक्षात माणसाचे असंख्य प्रश्न निसर्गापासून फटकून राहण्यातून निर्माण होतात, याचा पूर्णपणे सर्वांना विसर पडलेला असतो. शिवाय संप्रेरकांच्या प्रभावा खाली विवेक नष्ट होऊ शकतो. हे गैरसोईचे सत्य स्वीकारले जात नाही. वैज्ञानिक सत्ये फक्त चटण्या कोशिंबिरीसारखी तोंडी लावायला वापरली जातात. आपण विचार करू शकतो म्हणून प्रत्येक निसर्गाच्या प्रत्येक व्यवहारावर नियंत्रण मिळवू शकतो, हा दर्प अशा लोकांमध्ये सहसा असतो. सर्वांनी असे नियंत्रण मिळवलेच पाहिजे असा आग्रह पण धरला जातो. पण हा भोज्जा पकडणार्यांचा जीवशास्त्राशी ३६ आकडा असतो. ही माणसे वैज्ञानिकांपेक्षा धर्मगुरूंना जास्त मानतात. स्वत:च्या प्रश्नांची उत्तरे शोधतांना विज्ञाना ऐवजी धर्माचा आधार घेतल्याने, आयुष्याचा ताबा आपोआप धर्मगुरूंकडे दिला जातो, हे विसरले जाते. एकंदर आग "रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी" असा प्रकार असतो. इथे मला एक प्रश्न पडतो - अघोरी उपायांनी जीवसृष्टीच्या चक्रातून स्वत:ला बाद करणारे श्रद्धाळु (पक्षी - विकारांवर विजय मिळवणारे) श्रेष्ठ की न्युड बीचेसवर कोणत्याही अघोरी उपायांचा अवलंब न करता उद्दीपित न होणारे आनंदाचे उपासक श्रेष्ठ? प्रश्न अनेकांना बोचरा वाटेल याची मला खात्री आहे...
२ रा भोज्जा - मानवी जीवशास्त्र
हा भोज्जा पकडला तर मानवी लैंगिक-व्यवहाराचे कोडे बर्यापैकी अलगद सुटते. प्रथम निसर्गाला मानवी समाजाचे नियम कळत नाहीत, तो त्याच्या नियमांनी पुढे जातो. हे (काहीसे गैरसोईचे) वास्तव स्वीकारणे आवश्यक ठरते. या शिवाय "मानव हा विचार करणारा" प्राणी असला तरी ती क्षमता अनेक कारणांनी सर्वांमध्ये समान विकसित होत नाही. किंबहुना ही क्षमता बहुसंख्य लोकात विकसितच होत नाही. त्यामुळे सर्वांकडून या धारणेला योग्य असे "विवेकप्रधान" वर्तन होत नाही. ज्यांना जीवशास्त्र पचवता येते, त्यांनाच हे कळू शकते. आपण मूलत: माकडे असल्यामुळे आपले लैंगिक वर्तन आपल्या कपिकुळातील जातभाईंसारखेच असणार आहे, हे एकदा स्वीकारले की भ्रामक कल्पनांच्या गुंत्यात अडकावे लागत नाही. नीतिप्रधान उत्तरे शोधण्याऐवजी कल्पक पण गरजांना न्याय देतील अशी उत्तरे शोधण्याकडे कल असतो. उदा० लैंगिक भूक भागविणारी खेळणी वरील गटातील लोकांना अनैतिक, अभिरुचीहीन वाटतील पण २ र्या जीवशास्त्रवादी गटाला याचे काही वावगे वाटणार नाही. जीवशास्त्रवादी गट नीति-अनीतिच्या सुटसुटीत कल्पनांचा आदर ठेऊन पुढे जातो. मग "सुरक्षित आणि संमती" घेऊन केलेले लैंगिक आचरण "भोगवाद" न ठरता गरजांची पूर्तता करणारे ठरते. जगात वेगवेगळ्या ठिकाणी साजरे केले जाणारे "लैंगिकतेचे उत्सव" मग वावगे/चूकीचे वाटत नाहीत. "नग्नतेची" किळस वाटत नाही. तसेच हीरामंडीतील श्रीमंत पुरूषांना "शिक्षण" देणार्या, जर्मनीतील सर्वात जुन्या कुंटणखान्यातील इन्कमटॅक्स भरणार्या, अमेरिकेतील कुंटणखान्यातील पी०एच०डी० झालेल्या ’वेश्यांचे’ कौतूक वाटल्याशिवाय राहात नाही.
*सध्याचा भारतीय समाज एकंदर या विषयात प्रचंड गंडलेला आहे आणि ते अतिशय चिंताजनक आहे, असे मला वाटते.*
तीव्र आक्षेप
>>त्याच्या वासनांची पूर्तता करून वेश्या एक प्रकारे समाजाचा तोल सांभाळत असतात.
वरील लेखातील मुळात "वासना" या शब्दाला माझा तीव्र आक्षेप आहे. "वासने"च्या जागी "गरजा" शब्द वापरून पहा. लैंगिक वर्तन "असुरक्षित" आणि "संमतीविना" असेल "तर आणि तरच" वासना शब्द बापरण योग्य ठरेल.
मूळापासून उखडलेल्या वृक्षांना पालवी धुमारे फुटतात. याला "वासना" म्हणायचे का?
मृत शरीरात प्राणवायु शिल्लक असे पर्यंत लैगिक-उद्दीपन (ऑरगॅझम) होऊ शकते. त्याला वैद्यकाच्या भाषेत लाझरस-रिफलेक्स असे म्हणत्तात. त्याला वासना म्हणणे हा जीवशास्त्राचा अपमान आहे.
..... पोकल बांबूचे फटके मारण्यात येतील...
या ठिकाणी अमुक अमुक वर्तन केल्यास ...पोकल ...
अशा पाट्या आमच्याकडच्या बागांत लावलेल्या असतात.
---------
गावागावात अशी काही घराणी आहेत तिथे आईच मुलींना 'चालू करते'.
-------
ब्रिटिश आर्मीचे क्यांप जिथे जिथे होते तिथे वेश्यांची घरे आजूबाजूला असत. ब्रिटिश कंपनीची एक डॉक्टर टीम तिथे येऊन त्यांच्या आरोग्याची तपासणी करत असे. कुणाला औषधे, कुणाला सहा महिने संपर्काला बंदी असे उपाय केले जात.
-----------
बाकी लेख आणि पुस्तकांतील किंवा भाषणांतील वाक्यांसाठी टाळ्या.
...
सांसारिक जीवन जराही खिळखिळे झाले तर पुरुष अतृप्तीच्या मोकळ्या वाटांवर मोकाट सुटतो. त्याच्या वासनांची पूर्तता करून वेश्या एक प्रकारे समाजाचा तोल सांभाळत असतात.वेश्या व्यवसाय अशा रीतीने समाजाचे रक्षण करतो.डॉक्टर इंजिनिअर प्रमाणे त्याला प्रतिष्ठा आणि सामाजिक मान्यता मिळाली पाहिजे.
हे आर्ग्युमेंट म्हणजे, स्त्रीभ्रूणहत्या तथा सतीप्रथा यांद्वारे बेसुमार लोकसंख्येवर काही प्रमाणात नियंत्रण बसून लोकसंख्येचा तोल सांभाळला जातो, म्हणून या प्रथांना प्रतिष्ठा तथा सामाजिक मान्यता मिळाली पाहिजे, यासारखे नाही झाले काय थोडेसे?
ह्स्तमैथुनासाठी ब्रेक
पण मग लैंगिक ऊर्जेचा निचरा न होण्याने जे प्रश्न निर्माण होतात, त्यासाठी स्पष्ट उपाय (समाजातील सरव थरातील घटकांसाठी) पण सुचवा.
मध्यंतरी एका कंपनीने ह्स्तमैथुनासाठी ब्रेक घ्यायची परवानगी आपल्या कर्मचार्याना दिली होती. असे उपाय तुम्हाला चालतील का?
https://news.outsourceaccelerator.com/spanish-company-masturbation-brea…
…
पण मग लैंगिक ऊर्जेचा निचरा न होण्याने जे प्रश्न निर्माण होतात, त्यासाठी स्पष्ट उपाय (समाजातील सरव थरातील घटकांसाठी) पण सुचवा.
ती जबाबदारी माझी कशी? हे म्हणजे, बाप दाखव, नाहीतर श्राद्ध कर, यासारखे झाले.
लैंगिक ऊर्जेचा निचरा न होण्याने प्रश्न निर्माण होऊ शकतात, हे मान्य आहे. त्यासाठी उपायांची आवश्यकता आहे, हेही मान्य आहे. समाजाला निकड असेल, आणि समाजाची तितकी कुवत असेल, तर समाज कदाचित यथावकाश, यथाशक्ती काही उपाय योजेलही. (किंवा, योजणार नाही. Whatever.) मध्यंतरी (In the meanwhile), या समस्येकरिता मला योग्य वाटणारा एखादा उपाय तूर्तास तरी मजजवळ नाही. (उगाच सुचवायचा, म्हणून काहीतरी उपाय ठोकून देण्यात काय हशील आहे, नाही का?) परंतु, सांप्रतकालीन “उपाय” हा कदापि उचित नाही, इतकाच माझा आक्षेप आहे. ज्यांना तितकीच आत्यंतिक वैयक्तिक निकड असेल, ते कदाचित इतर काही उपाय शोधून काढतीलही. (तूर्तास मला माझ्यापुरती अशी काही आत्यंतिक वैयक्तिक निकड दृग्गोचर होत नाही.) त्याला माझा आक्षेप नाही. असे काही पर्यायी उपाय हे उचित आहेत किंवा नाहीत, याचा विचार असे पर्याय सामोरे आल्यावर करता येईलच. मात्र, “समाजाची निकड आहे”च्या नावाखाली समाजातील एका वर्गाच्या मानवी हक्कांना डावलून, त्यांचा बळी देऊन, त्यांच्या शोषणाचे समर्थन हे कदापि समर्थनीय नाही, इतकेच म्हणायचे आहे.
(तुमच्या त्या र.धों., दुर्गाबाई आदींनी तथाकथित “समाजा”चा विचार केलेला (किंवा, किमानपक्षी, “समाजा”चा विचार करण्याचा आव तरी आणलेला) दिसतो; मात्र, वेश्यांच्या पायताणांत उभे राहून त्यांच्या बाजूने विचार करण्याचा किमान प्रयत्नदेखील केलेला दिसत नाही, इतकेच सुचवावेसे वाटते.)
मध्यंतरी एका कंपनीने ह्स्तमैथुनासाठी ब्रेक घ्यायची परवानगी आपल्या कर्मचार्याना दिली होती. असे उपाय तुम्हाला चालतील का?
हा ती कंपनी आणि तिचे कर्मचारी यांचा आपसांतील प्रश्न आहे. मला व्यक्तिशः अशी काही योजना ही कितीही निरुपयोगी, निरर्थक, तथा चमत्कारिक वाटली, तरीही, त्याबद्दल काही आक्षेप घेणारा मी कोण?
लाईक करण्यासाठी
लाईक करण्यासाठी लॉगिन केलं . पण लाईक वर क्लिक करून काही होतंयस दिसत नाही म्हणून हा प्रतिसाद. नबा ,
"मात्र, “समाजाची निकड आहे”च्या नावाखाली समाजातील एका वर्गाच्या मानवी हक्कांना डावलून, त्यांचा बळी देऊन, त्यांच्या शोषणाचे समर्थन हे कदापि समर्थनीय नाही, इतकेच म्हणायचे आहे."
या तुमच्या सारांशाला +100000000
उपाय पाहिजे ना? हा घ्या…
…अस्सल भारतीय परंपरेस साजेसा उपाय!
आपल्याकडे चातुर्मासात कांदे खायचे नसतात. म्हणून मग, समाजातील कांदेखाऊ ऊर्जेचा निचरा करण्यासाठी, चातुर्मास सुरू होण्याच्या थोड्याच अगोदर ‘कांदेनवमी’ नावाचा उत्सव असतो. या दिवशी, हवे तितके कांद्याचे प्रकार करून खाण्याची मुभा असते. (भजी, नि काय काय.) कारण, पुढील चार महिने अजिबात कांदा खायचा नसतो; त्यामुळे, आत्ताच काय तो हवा तितका कांदा खाऊन घ्या, लेको! मजा करा!
याच धर्तीवर, ‘लिंगनवमी’ (किंवा ‘रतिनवमी’) नावाचा काही नवा उत्सव सुरू करावा. या दिवशी, प्रत्येक भारतीय पुरुषास, समोर दिसेल त्या स्त्रीबरोबर (भले ती स्त्री आपली रक्ताची नातेवाईक आहे, निकटची वा दूरची आप्त आहे, ओळखीतली आहे, वा पूर्णपणे अनोळखी आहे, झालेच तर, तिची सहमती आहे किंवा नाही, तिचे वय, वैवाहिक स्थिती, वगैरे कश्शाकश्शाचा विधीनिषेध न बाळगता) दिसेल तिथे, मनसोक्त, वाटेल तितके, आणि वाटेल त्या पद्धतीने, रत होण्याची मुभा असावी. घ्या लेको हवा तितका लैंगिक ऊर्जेचा निचरा करून! (त्यानंतर मग पुढील रतिनवमीपर्यंत वर्षभर सांप्रतकालीन सामान्य निर्बंधांचे दुष्टचक्र जारी ठेवण्यास प्रत्यवाय नसावा.)
या सुचवणीत वस्तुतः क्रांतिकारी असे काहीही नसावे. कांदेनवमीला वाटेल तेवढे कांदे खायला, शिमग्याला वाटेल तेवढ्या बोंबा मारायला नि शिव्या द्यायला, झालेच तर गटारी अमावास्येला वाटेल तेवढी दारू ढोसून गडाबडा लोळायला, मुभा तशीही असतेच; त्या उज्ज्वल भारतीय परंपरेत ही आणखी एक भर पडेल, इतकेच.
हं, समाजातील सर्व घटकांना (उदाहरणादाखल: स्त्रियांना) या उपायातून लाभ होणार नाही, असा (माझ्या मते क्षुल्लक) आक्षेप या ठिकाणी घेता येईलच. त्याला माझे उत्तर असे आहे, की बोलूनचालून आपली भारतीय संस्कृती ही पुरुषसत्ताक आहेच; स्त्रियांचा विचार या ठिकाणी मुळात करायचा कशासाठी? (कांदेनवमीस कांद्यांच्या बाजूने विचार करतो का आपण? नाही ना? मग रतिनवमीस (किंवा, फॉर्दॅट्मॅटर, कधीही) स्त्रियांच्या बाजूने विचार नक्की काय म्हणून करावा?)
(समाजातील लैंगिक ऊर्जेच्या निचऱ्याकरिता वेश्याव्यवसाय या पर्यायाची सुचवण जितक्या गांभीर्याने केलेली आहे, तितक्याच गांभीर्याने वरील पर्यायी प्रस्ताव मांडलेला आहे, तथा तितक्याच गांभीर्याने त्यावर विचार होणे अपेक्षित आहे. बाकी चालू द्या.)
तेजस्वी सेवेकरी यांची मुलाखत भाग 1
बुधवार पेठ हा शब्द बर्याचदा सांकेतिक अर्थाने वापरला जातो. विषय संवेदनशील आहे. यापुर्वी मी अनेकदा यावर लिहिले आहे
गिऱ्हाईक म्हणून आलेल्या अनेक पुरुषांनी संसार थाटले । Tejaswi Sevekari । Woman Ki Baat । AarPaar
वेश्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता असावी का ? हा प्रश्न सातत्याने डोकावत असतो. परंतु कायदेशीर करणे म्हणजे याचे नेमके परिणाम काय होतील? असं होणं खरचं गरजेचं आहे का? या प्रश्नांची उत्तरे मोघम देऊन जमणार नाही. तर ज्या व्यक्तीला वेश्या वस्तीतील वास्तवाची जाण आहे, या विषयवार त्यांनी काम केलं आहे. महिलांना समजून घेऊन त्यांच्या आयुष्यात थोडाफार का होईना बदल घडवला, तीच व्यक्ती या प्रश्नाचे अधिक तर्कशुद्ध उत्तर देऊ शकेल. तेजस्वी सेवेकरी गेल्या ३० वर्षांपासून वेश्यावस्तीत जगणाऱ्या महिलांसाठी काम करत आहेत. त्यामुळे या पॉडकास्ट मध्ये त्यांनी व्यक्त केलेलं प्रत्येक मत हे अनुभवलेलं परखड वास्तव आहे.
तेजस्वी सेवेकरी यांनी रेड लाईट वस्तीतील महिलांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून आजपर्यंत सहेली संघ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाची तर माहिती होईलच पण त्यापेक्षा असंख्य प्रश्न भेडसावतील, विचार करायला लावतील. कारण इतकी वर्षे उलटली तरी प्रश्न कमी होत नाहीत, किंवा नव्या स्वरूपात समोर येत आहे. शुल्लक वाटणारे प्रश्न या महिलांसाठी आयुष्य बदलवणारे आहेत पण तरीही परिस्थिती जैसे थे का ? यासाठी हा पॉडकास्ट संपूर्ण पहा. सिने नाट्य अभिनेत्री व लेखिका मुग्धा गोडबोले यांनी ही मुलाखत घेतली आहे. ही दोन भागात मुलाखत आहे. पहिला भाग इथे देत आहे. जरुर पहा
https://youtu.be/B4-KI--gHkc?si=0hHIpIcqgF-fsPn8
तेजस्वी सेवेकरी यांची मुलाखत भाग 2
वेश्यावस्तीमुळे बलात्कार व्हायचे थांबले का?। Tejaswi Sevekari भाग २ । Woman Ki Baat । AarPaar
वेश्यावस्ती आहे म्हणून बलात्कार कमी होतात, अशा काही कॉमेंट्स आधीच्या व्हिडिओवर आल्या होत्या. साधारणपणे खूप लोक या मताचे आहेत. पण वास्तव तसं नाही. वेश्यावस्ती नसती तरीही बलात्कार घडलेच असते. तेजस्वी सेवेकरी असं का म्हणतात? यासाठी हा दुसरा भाग समजून घेतला पाहिजे.
वेश्याव्यवसायात असणाऱ्या महिलांचे पुनर्वसन झाले पाहिजे, त्यांनी यातून बाहेर पडले पाहिजे, हे बोलणं सोपं आहे. पण हे साध्य करत असताना कायद्यातील त्रुटी किंवा अस्पष्टता आणि सुरक्षित पर्यायांचा अभाव असल्याने, इच्छा असूनही अनेक महिलांना यातून बाहेर पडता येत नाही. तरीही काही सकारात्मक गोष्टी इथे घडल्या आहेत, ज्यामुळे काही महिलांचे आयुष्य सावरले आहे. अशा चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजू या पॉडकास्टमध्ये तेजस्वी सेवेकरी यांनी मांडल्या आहेत.
मुलाखतीचे दोन्ही भाग पाहिल्यानंतर आपल्यापैकी अनेकांना कदाचित सांस्कृतिक धक्का बसेल. हे पाहिल्यावर आपला पारंपारिक मेंदु पुन्हा विचार करायला प्रवृत्त होईल.
वेश्यावस्तीमुळे बलात्कार व्हायचे थांबले का?। Tejaswi Sevekari भाग २ । Woman Ki Baat । AarPaar
वेश्यावस्ती आहे म्हणून बलात्कार कमी होतात, अशा काही कॉमेंट्स आधीच्या व्हिडिओवर आल्या होत्या. साधारणपणे खूप लोक या मताचे आहेत. पण वास्तव तसं नाही. वेश्यावस्ती नसती तरीही बलात्कार घडलेच असते. तेजस्वी सेवेकरी असं का म्हणतात? यासाठी हा दुसरा भाग समजून घेतला पाहिजे.
वेश्याव्यवसायात असणाऱ्या महिलांचे पुनर्वसन झाले पाहिजे, त्यांनी यातून बाहेर पडले पाहिजे, हे बोलणं सोपं आहे. पण हे साध्य करत असताना कायद्यातील त्रुटी किंवा अस्पष्टता आणि सुरक्षित पर्यायांचा अभाव असल्याने, इच्छा असूनही अनेक महिलांना यातून बाहेर पडता येत नाही. तरीही काही सकारात्मक गोष्टी इथे घडल्या आहेत, ज्यामुळे काही महिलांचे आयुष्य सावरले आहे. अशा चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजू या पॉडकास्टमध्ये तेजस्वी सेवेकरी यांनी मांडल्या आहेत.
हे सर्व पहाताना मला स्वत:ला छांदोग्य उपनिषदातील सत्यकाम जाबालि ची कथा आठवली. सामाजिक कलंका मुळे आजही अनेक गुणवंत वेश्यापुत्रांना आपली ओळख लपवावी लागते. त्यांची संधीची उपलब्धता एकदम कमी होउन जाते. समाजाच्या मुख्य प्रवाहात आज सेक्सवर्कर्स ना आणण्यासाठी काय दिव्य करावे लागते हे आपल्याला या कार्यक्रमातून समजेल.
वेश्यावस्तीमुळे बलात्कार व्हायचे थांबले का? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नाही असे द्यावे लागेल. पण वेश्याव्यवसायामुळे बलात्कार होण्याचे प्रमाण कमी होण्यास नक्की मदत होते. असे मला नेहमी वाटत आलेले आहे. प्रेशर कुकर मधे शिट्टी ही व्यवस्था नसती तर प्रेशर कुकरच्या भांड्याचा स्फोट झाला असता. प्रेशरकुकरची शिट्टी शिवाय देखील एक सेफ्टी व्हॉल्वह त्यामधे असतो. त्यामळे स्फोट होण्याचे वाचते. कल्पना करा की लैंगिक वासनेचा निचरा होण्याची सोयच नाहीये अशी परिस्थिती असेल तर माणूस ( इथे मला पुरुष म्हणायचे आहे) कोणत्याही थराला जाउ शकतो. कारण त्याची आदिम प्रेरणा कार्यन्वित होते. तिथे विवेकी मेंदु काम करत नाही.
राग,लोभ,मद,मत्सर, मोह अनावर झाल्याने हिंसक गुन्हे घडतात तसेच काम तथा लैंगिक प्रेरणा अनावर झाल्याने संयम सुटतो व बलात्कार सारखे गुन्हे घडू शकतात हे देखील नाकारता येत नाही .याशिवाय power game सारखी अन्यही अनेक कारणे असतात. कामातुराणाम न भयं न लज्जा
समाजाच्या लैंगिक भुकेचे व्यवस्थापन हा महत्वाचा विषय हाताळण्यात आपण अयशस्वी झालो आहे. बलात्कार,लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार, व्याभिचार, वेश्याव्यवसाय , पॉर्न, हनीट्रॅप, इत्यादी लैगिकतेशी निगडीत घटना जेव्हा आपण वाचतो त्यावेळी समाजमाध्यमात अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात. काही संवेदनशील पुरुषांना आपण पुरुष असल्याचा अपराधगंडही तयार होतो. त्याबद्दल ते वैचारिक आत्मपीडन ही करुन घेतात. किमान त्यामुळे सगळेच पुरुष तसे नाहीत असा विचार काही स्त्रियांना सुखावून नेतो. मानवी लैंगिक आविष्कारांकडे कसे पाहायचे हे संस्कृती, समाज, व्यक्ति, स्थल काल सापेक्ष बनत जाते. कुठल्या गोष्टीला प्रकृती म्हणायची व कुठल्या गोष्टीला विकृती म्हणायची हे देखील बदलत गेले आहे. उदा. हस्तमैथुन ही एके काळी विकृती मानली असल्याने कित्येक संवेदनशील तरुण पापभावनेत पिचत राहिले. त्याकाळातील मानसतज्ञ देखील या विकृतीतून त्याला बाहेर काढण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करीत होते. लहानपणाच्या वाईट सवयी मुळे....... वगैरे जाहीराती सर्रास असायच्या. असो मुद्दा हा की मानवी लैंगिकतेबद्दल समजून घेण्य़ासाठी उत्क्रांतीजनय विज्ञान काय सांगते हे समजून घेतले की काही अंशीतरी समाजाचा लैंगिक बुद्ध्यांक वाढेल. र.धों कर्व्यांनी आपली हयात यात घालवली.
जेव्हा याबद्दलच्या तज्ञांच्या चर्चा मी ऐकतो पहातो. त्यावेळी तज्ञांची सुद्धा त्रेधातिरपीट उडते. शिवाय एकच एक असे उत्तर इथे नसल्याने एके ठिकाणची प्रकृती दुसर्या ठिकाणी विकृती बनते.
सुबोध जावडेकर, मिलिंद वाटवे व निरंजन घाटे यांची अलिकडच्या काळातील पुस्तके वाचली तर काहींसाठी तो सांस्कृतिक धक्का असू शकतो. अर्थांत या लेखकांनी हा डोस हळूहळू च दिला आहे.
पारंपारिक समजुतींना धक्का पोचल्याने काही जणांना हे जणु लैंगिक गैरवर्तनाचे समर्थनच आहे की काय असे देखील वाटलेले आहे. उदा पुरुषाची कामेच्छा, त्याच्या कामपूर्तीतील अडथळे आणि त्यातून त्याची होणारी लैंगिक आणि मानसिक कोंडी हा विषय कधी चर्चेच्या ऐरणीवर येत नाही मात्र या विषयावर निर्भया प्रकरणानंतर 2013 साली मंगला सामंत यांचा लोकसत्तामधील लैंगिकतेचे शमन कि दमन? हा लेख व नंतर लैंगितेचे शमन हवेच हा एक लेख वैज्ञानिक दृष्टीकोन व सामाजिक दृष्टीकोन सांगणारा आहे त्यातील मुद्यांवर सध्या चर्चा होताना दिसत नाही हे मला ठळक पणे जाणवले. अनेक मानसशास्त्रीय पैलू या लेखात चांगले मांडले होते. असो या निमित्त वर उल्लेख केलेल्या लेखकांची पुस्तके जरुर वाचा.
त्याच बरोबर लैंगिकतेचे शमन की दमन?
https://www.loksatta.com/chaturang/sexual-satisfaction-or-aggression-36…
मंगला सामंत, लोकसत्ता चतुरंग 5 जाने 2013
लैंगिकतेचे शमन हवेच
https://www.loksatta.com/chaturang/sexual-satisfaction-is-needed-40206
मंगला सामंत, लोकसत्ता चतुरंग 12 जाने 2013
हे दोन्ही लेख तज्ञांनी आणि जिज्ञासूंनी जरुर वाचावेत
https://youtu.be/fuxmEhupN4k?si=cUOzDPFTCcXYVAIC
.
वेश्यावस्तीमुळे बलात्कार व्हायचे थांबले का? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नाही असे द्यावे लागेल. पण वेश्याव्यवसायामुळे बलात्कार होण्याचे प्रमाण कमी होण्यास नक्की मदत होते. असे मला नेहमी वाटत आलेले आहे. प्रेशर कुकर मधे शिट्टी ही व्यवस्था नसती तर प्रेशर कुकरच्या भांड्याचा स्फोट झाला असता. प्रेशरकुकरची शिट्टी शिवाय देखील एक सेफ्टी व्हॉल्वह त्यामधे असतो. त्यामळे स्फोट होण्याचे वाचते.
ही (किंवा अशी) आर्ग्युमेंटे पुढे करणारांस उद्देशून एकच प्रश्न मला विचारावासा वाटतो:
समजा, समाजातील लैंगिक ऊर्जेचा निचरा व्हावा, आणि/किंवा समाजाला काही सेफ्टी व्हॉल्व्ह असावा, या उदात्त हेतूपोटी, आपल्या परिवारातील एखाद्या स्त्रीस (केवळ उदाहरणादाखल: आपली कन्यका, भगिनी, पत्नी, वहिनी, स्नुषा, अथवा आपल्या मातुःश्री) जर कोणी किडनॅप करून, ट्रॅफिक करून, परस्पर धंद्यास लावून दिले, तर त्याबद्दल आपणांस काही आक्षेप असेल, किंवा कसे? (फॉर द रेकॉर्ड: मला असेल!)
की, आपल्या परिवारातील एखादी व्यक्ती एक थोर सामाजिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कामी येत आहे, याचा आपणांस अभिमान वाटेल?
(हं, आपल्या परिवारातील संबंधित स्त्री जर स्वतःच्या मर्जीने, स्वखुशीने, किंवा कदाचित हौशीनेसुद्धा या व्यवसायात पदार्पण करीत असेल, तर मात्र त्याबद्दल मला आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही. (भले आपणांस असो, वा नसो.) I certainly know how and when to mind my own business.)
(मुद्दा लक्षात आला असेल, अशी आशा आहे. My objection is not to prostitution as an occupation, per se, from a moralistic perspective; my objection is to the exploitation that must necessarily accompany it.)
(शिवाय, समाजातील लैंगिक ऊर्जेचा निचरा झाला पाहिजे, झालेच तर, समाजाला सेफ्टी व्हॉल्व्ह पाहिजे, म्हणून परस्पर वेश्यांचा बळी देऊ पाहणारे आपण नक्की कोण लागून गेलो?)
(अतिअवांतर: शिवाजी जन्माला यावा, परंतु तो शेजाऱ्याच्या घरात जन्माला यावा, म्हणतात. तद्वत, वेश्या असाव्यात, परंतु त्या शेजाऱ्याच्या घरातल्या असाव्यात, नव्हे काय?)
चालायचेच!
.
(पुस्तकपरिचय ठीक आहे, परंतु…)
विधान वरकरणी पटण्यासारखे वाटते, परंतु, याच्या सर्व अंगांचा सखोल विचार न करता, असे बोलताबोलता, सहजगत्या (गप्पाटप्पांत, किंवा अगदी व्याख्यानांतसुद्धा), बेजबाबदारपणे फेकण्यासारखे हे विधान नव्हे.
टाळ्याघेऊ वाक्य.
परंतु, वाक्यात वरकरणी विरोध करण्यासारखे (let alone आक्षेप घेण्यासारखे) काहीच आढळत नसल्याकारणाने, केवळ ‘वा! व्वा! र.धों. म्हणजे ना, क्या बात है!’ अशी त्याची वासलात लावून सोडून देऊ.
काय हो र.धों.साहेब, समाजात निर्बंध पुरुषांना आहेत, तसे ते स्त्रियांना नाहीत काय? (किंबहुना, मी तर म्हणतो पुरुषांच्या तुलनेत अंमळ जास्तच आहेत.) मग पुरुषवेश्यांची समाजाला गरज त्याहूनही अधिक नव्हे काय?
कोठे सापडतात म्हणे तुमच्या समाजात, पुरुषवेश्या? सांगा!
Armchair idealist स्साला!
नाही म्हणजे, त्यांना आपला धंदा करण्याचा पूर्ण हक्क असावा, हे म्हणायला ठीक आहे. त्यांना छळू नये, हे तर मान्यच आहे. परंतु…
मला एक सांगा, या व्यवसायातल्या किती टक्के स्त्रिया स्वेच्छेने धंदा करतात? मुळात किती टक्के राजीखुशीने, झालेच तर हौशीने हा व्यवसाय पत्करतात?
अगदी!
आणि, ते भाडे खाणारे भाडखाऊ/भडवे/मॅडम निराळ्याच असतात. खुद्द वेश्येला त्यात कितीसा स्टेक असतो?
किंबहुना, माझा तर अंदाज आहे, की खुद्द वेश्या शरीराचा विक्रय किंवा शरीर भाड्याने देणे यांपैकी काहीच करीत नसाव्यात. (किंवा, असल्याच, तर फार थोड्या करीत असाव्यात.) बहुतांश केसिसमध्ये हे भाडखाऊ/भडवे/मॅडम हेच लोक वेश्येचे शरीर परस्पर भाड्याने देत असावेत. (चूभूद्याघ्या.)
वेश्या, की वेश्याव्यवसाय? (फरक आहे!)
मग पुरुषवेश्यांची पद्धत सुरू करा की, ‘आपल्या समाजा’त! त्यांचाही विवाहसंस्थेशी तितकाच निकटसंबंध आहे, आणि, गरजेचे म्हणाल, तर अधिक गरज आहे.
आणि, बायका? त्या बऱ्या मोकाट सुटत नाहीत? (निदान, इतक्या सहजी तरी?)
आणि, स्त्रियांच्या वासनांची पूर्तता करून “समाजाचा तोल” वगैरे कोण सांभाळणार?
I mean, कशाचे justification कोण काय देईल, कोणी सांगावे! (आणि, of all the people, दुर्गाबाई!)
Let me put it another way. सामाजिक निर्बंधांमुळे म्हणा, किंवा अन्य कशामुळे म्हणा, परंतु, स्त्रियांच्या वासनांची पूर्तता करून “समाजाचा तोल” वगैरे सांभाळणारी एखादी यंत्रणा “आपल्या समाजा”त अद्याप निर्माण झाल्याचे आढळलेले नाही. परंतु, या अभावामुळे समाजाचा काही तोल वगैरे ढळल्याचेही अद्यपि निदर्शनास आलेले नाही. मग पुरुषांच्याच तेवढ्या वासनांची पूर्तता करणाऱ्या यंत्रणेच्या अभावी “समाजाचा तोल” वगैरे बरा ढळतो? (ढळू दिला जातो?)
ऐकून घेतोय, म्हणून काय वाटेल ती आर्ग्युमेंटे फेकणार काय? (आणि, दुर्गाबाई???)
या मुद्द्याचा समाचार थोडा नंतर घेतो.
काय पण ॲनालॉजी आहे! (परंतु, दुर्गाबाईंची आहे, म्हटल्यावर, ‘व्वा! क्या बात है!’ म्हणून टाळ्या वाजवायच्या, झाले.)
अतिशय मार्मिक निरीक्षण!
पुन्हा, प्रश्न बिंदुगामी आहे. आणि, त्याचे उत्तरही तितकेच सोपे आहे. (खरे तर obvious असायला पाहिजे, परंतु, दुर्दैवाने, ते तसे नाही.)
Because, she has a f***ing choice not to indulge in it, you dummy!
And therein lies the point. हा धंदा न करण्याचा पर्याय दुर्गाबाईंना उपलब्ध आहे. बहुतांश वेश्यांना तो उपलब्ध नसावा. हा दोहोंतील फरक आहे.
Going back to अमृताबाई फडणविसांचे विधान…
कौतुक वाटण्यासारखे खरे तर त्यात विशेष काही नाही. घिसापिटा मुद्दा आहे, जुनीच पोपटपंची आहे. त्यात ओरिजिनल काहीही नाही. (बकवासही आहे, परंतु तो वेगळा मुद्दा.) हं, चारचौघांत मांडल्याने मांडणारी व्यक्ती ‘कूल’ दिसू शकते (झालेच तर, ‘तेवढेच ज्ञानप्रकाशात’), हा ‘कूल फॅक्टर’ आहे खरा (शिवाय, पब्लिकला सनसनाटी वाटणारे काहीतरी छापून ‘ज्ञानप्रकाशा’चीही सर्क्युलेशनची तात्कालिक सोय होते, हाही भाग आहेच), परंतु, ते असो. माझा रोख त्याकडे नाही.
माझा रोख आहे, तो, वेश्यांना समाजात मानाचे स्थान असावे, झालेच तर professional dignity वगैरे असावी (कारण इतर व्यवसायांसारखाच हाही एक व्यवसाय आहे), वगैरे वगैरे हा जो काही मुद्दा फिरूनफिरून उपस्थित होत आहे, त्याकडे आहे. (अमृताबाईंनी उपस्थित केला, दुर्गाबाईंनी काढला, मला वाटते र.धों.नीही त्याचा ज़िक्र केला असावा. (चूभूद्याघ्या.))
My guess is, as far as most prostitutes are concerned (although, I not being one, I cannot state this with any amount of certainty, let alone authority), professional dignity would be the least of their worries. Most of them, I daresay, are not in this profession out of choice, let alone for pleasure or for profit — they have been f***ing trafficked into it, for God’s sake! Adding a pinch of professional dignity is not going to improve their lot in the least bit — they need to be rescued and rehabilitated, if possible, and not dignified (let alone glorified).
(हे म्हणजे, (वेश्यांचे सोडा, परंतु) एकंदरीतच स्त्रियांचे ‘देवी’ नाहीतर ‘माता’ म्हणून चारचौघांत उन्नयनीकरण करायचे — त्यांना उच्च पदस्थलावर चढवायचे — आणि पाठून त्यांची *ड मारायची, हा जो काही प्रकार आपल्या समाजात सर्रास चालतो, त्याहून वेगळे कसे, ते समजत नाही.)
These bloody socialites! (यात एकट्या अमृताबाईंकडे रोख नाही. अमृताबाई, दुर्गाबाई, र.धों., झालेच तर प्रस्तुत लेखाचे लेखक — सगळे सगळे आले त्यात!) यांना पब्लिकमध्ये विधाने करायला (झालेच तर पुस्तके लिहायला) काय जाते?
या सगळ्या मंडळींना माझी एकच सुचवण आहे. (नाही, या सर्वांनी स्वतः (स्त्री- किंवा पुरुष-) वेश्याव्यवसाय करायला उभे ठाकावे (आणि/किंवा आपल्या जवळच्या नात्यातील कोणास तसे करण्यास उद्युक्त करावे), असा माझा मुळीच आग्रह नाही. (Although, ही मंडळी जर स्वतः या व्यवसायास उभी ठाकली, तर त्यांच्या विधानांस ‘अनुभवाच्या बोलां’चे मोल येईल खरे, त्यामुळे, that would certainly help! However, it is entirely their choice; I, for one, would certainly not insist upon it.) असो.) या सगळ्या मंडळींना मला एवढेच सांगायचे आहे, की, सर्वप्रथम, हा व्यवसायात असलेली प्रत्येक व्यक्ती (स्त्री वा पुरुष) ही या व्यवसायात स्वखुशीने (झालेच तर हौशीने) पदार्पण केलेलीच आहे, याची शाश्वती देता येण्यासारखी परिस्थिती समाजात निर्माण करा, नि मारा मग professional dignityच्या वाटेल तेवढ्या गप्पा!
पण लक्षात कोण घेतो? चालायचेच.