GenZ - जंतर-मंतर आणि भारतात इतरत्र
1. आज वीस वर्षांच्या मुलाचं वय भाजपा सत्तेवर आली तेव्हा आठ वर्षांचं होतं. राममंदिर, संघ, स्वातंत्र्यलढा, सावरकर, नेहरू, गांधी, पटेल, लव जिहाद, काश्मिरी पंडित वगैरे कुठलाही विषय यांना भावना दुखावण्याचा अगर दुखावून घेण्याच्या लायकीचा वाटत नाही.
2. Gen Z चा sense of humor अफाट आहे आणि तो व्यक्त करण्यासाठी लागणारी creativity आणि media command त्यांच्याकडे भरपूर आहे.
3. Millennial आणि boomer - विशेषत: उजव्या विचारांच्या लोकांना GenZ चे विनोद झेपत नाहीत किंवा कळत सुद्धा नाहीत. किंबहुना stand up comedy, टवाळी वगैरे प्रकाराची त्यांना allergy आहे. हे लोक हसणं विसरले आहेत. त्यांना हसणार्या मुलांचा राग येतो, ती फालतू झुरळं वाटतात.
4. मुलांची भाषा अर्वाच्य असल्याने (आणि त्यातले विनोद कळत नसल्याने) त्यांच्या घोषणा आणि फलक यांमुळे बसलेल्या मानसिक धक्क्यातून वरच्या दोन पिढ्यातले बरेच लोक सावरूच शकत नाहियेत. लगेच नेहेमीप्रमाणे हेच का संस्कार, काय त्या मुलींचे कपडे, त्यापेक्षा xx परवडल्या वगैरे कोल्हेकुई सुरू झाली आहे. मुलांनी पंतप्रधानांसह कुणाचीही पत्रास बाळगली नाहिये. त्यांची शिवराळ भाषा आणि संघाला अपेक्षित संस्कृत प्रचुर हिंदी भाषा यांचा दूरान्वयानेही संबंध नाही. इंग्रजीतील फलकांवर f words चा सुकाळ आणि अश्लील caricatures आहेत.
Someone has summed it up as - protest generation Vs prostrate generation :-)
5. काही मुलं बिनधास्तपणे आमचे पालक संघी किंवा भाजपाई आहेत आणि आम्हाला त्याची लाज वाटते हे सांगत आहेत. पण तरीही हे सांगताना त्यात एक एकदम matter of fact tone आहे. चीड, खदखद, दुःख नाही.
6. मुलं आंदोलन सुद्धा "enjoy" करत आहेत- सगळ्या धुमश्चक्रीत जिथे मजेचे दोन क्षण सापडतील ते संपूर्णपणे जगून घेत आहेत.
4. भटकी कुत्री म्हणजे 'डाॅगेश भाई' यांच्या आत्यंतिक प्रेमाचा विषय आहे (मांजरी सुद्धा). त्यांना खाऊ घालायला यांनी dog food देखील पैदा केलं आहे. हा निरागसपणा खूप लोभस आहे.
5. आम्ही काही विशेष करत आहोत हा अभिनिवेष अजिबात नाही. उलट सद्यस्थितीत दुसरं काही करता येण्याजोगं नाही याचा पूर्ण स्वीकार दिसून येतो
4. त्यांच्यासाठी कुणी स्टार व्यक्तीने/ संस्थेने पाठीशी उभं राहावं अशी अपेक्षा नाही. त्यांना कोण आला गेला यानी फरकच पडत नाही.गुळमुळीत पाठिंबा द्यायला येऊ नका, त्यापेक्षा खरं बोला नाहीतर निघा असा स्पष्ट संदेश सचिन तेंडुलकर सारख्या so called cricket god लाही देऊन झाला आहे. विशेषतः राजकीय पक्षांशी त्यांनी फारकत घेतली आहे.
5. ही मुलं संतापाने आणि कटुतेने धुमसत राहणार नाहीत पण मुद्दा देखिल सोडणार नाहीत. ती खुनशी तर अजिबात नाहीत. उलट त्यांच्यात एक प्रांजळपणा आणि प्रेमळपणा आहे.
6. ज्या दिल्ली पोलिसांनी त्यांना मारलं त्यांना देखिल बरीच मुलं खायला देत आहेत. उपहासगर्भ आणि मजेशीर प्रश्न विचारून शरमिंदा करत आहेत.
7. दिल्लीत कसं, कुठे, किती दिवस राहणार याची कोणतीही काळजी दिसत नाही. उलट 'करू manage' हा विश्वास आहे. यात गरीब आणि privileged घरातली मुलं असा भेदभाव नाही.
8. मुली पोलिसांच्या लाठ्या काठ्यांना न घाबरता उलट भिडत आहेत. जाब विचारत आहेत. आम्ही आमच्या आणि देशाच्या भविष्याची काळजी म्हणून इथे आलो आहोत, आम्हाला आडवून तुमचा काय फायदा होणार आहे, आणि आम्ही तुमच्या मुलांकरता सुद्धा लढत आहोत हे ठासून सांगत आहेत. ' ये अंदरकी बात है, पुलिस हमारे साथ है' अशा घोषणा देत आहेत.
9. आंदोलनात मुलगे, पुरूष आसपास असताना दिल्लीच्या गर्दीत यापूर्वी इतकं सुरक्षित कधीच वाटलं नव्हतं हे मुली बोलून दाखवत आहेत.
10. भारतातले इच्छुक जनसामान्य आपापल्या पद्धतीने आंदोलनात सामिल आहेत. ते त्यांच्या शहरात मोर्चे नेत आहेत, social media वर खुलेपणाने पोस्ट टाकत आहेत, मुलांना जंतर-मंतर वर zomato swiggy द्वारा अन्नपुरवठा करत आहेत.
सांगण्याजोग्या बर्याच गोष्टी राहून गेल्यात. पण GenZ मुळे बदल होईल अशी वातावरणनिर्मिती मस्त झाली आहे. निदान चावर्या भक्तांच्या भीतीने गप्प बसलेले लोक बोलू लागले आहेत. हेही नसे थोडके.
संस्कार!
सत्यवचन!
शिवाय कळतील असे jokes आणि पोस्टर्स अश्लील असल्याने ती समजली हे दाखवायची देखिल चोरी. त्यामुळे ह्या लोक्सना संस्कारांवर घसरल्याखेरीज पर्यायच उरला नाही.
त्याचीही पब्लिकने टिंगल उडवली. उदा- फटति-फटतः-फटन्ति. इथे फोटो कसे चिकटवायचे कसे ते माहित नसल्याने ते पोस्टर दाखवता येत नाहिये..फक्त त्यावरचं text सांगितलं. The caricature was hilarious.
+/…
शुभेच्छा, झालेच तर सहानुभूती, वगैरे तर आहेतच.१ (किंबहुना, तुम्हीआम्ही फक्त तेवढेच करू शकतो आणि/किंवा करतो. शिवाजी नेहमी शेजारच्या घरातल्या जिजाक्कांच्याच पोटी जन्मास येतो.२)
परंतु, ही जेन-झी मंडळी तुमच्या(आमच्या) शुभेच्छांवर (किंवा सहानुभूतीवर, किंवा पाठिंब्यावरसुद्धा) अवलंबून नाहीत, असे वाटते.
(आणि, असूही नये. लढा द्यायचा आहे, तर द्यायचा आहे. ‘आलात, तर तुमच्यासह, नाहीतर तुमच्याविना.’ तुम्हीआम्ही शुभेच्छा द्यायला येण्याची वाट पाहात बसले, तर विचारायलाच नको. यशापयश, बरोबर-चूक वगैरे काय ते posterity पाहून घेईल. बाकी talking heads३ काय, बोलत राहातीलच. (‘झुरळे’ वगैरे तर काय, आत्ताच म्हणताहेत.४))
चालायचेच.
१ म्हणजे, एकंदरीतच जेन-झीबद्दल. या विशिष्ट लढ्याच्या(च) संदर्भात, असे नव्हे.
२ मावळेसुद्धा शेजारपाजारच्या घरांतूनच गोळा होतात. चालायचेच.
३ यात तुम्हीआम्ही, झालेच तर इथले सगळेच आलो.
४ म्हणजे, तुम्हीआम्ही म्हणत नाही, परंतु तरीही.
.
जेन झीने उभ्या केलेल्या इतर देशांमधील आंदोलनाचे काय झाले?
केल्याने होत आहे रे… (किंवा, होतही नाही बऱ्याचदा. परंतु तरीही…) आधी केलेचि पाहिजे.
ते ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ की कायसेसे आपल्या हिंदू धर्मातच (नि त्यातसुद्धा साक्षात् भगवान श्रीकृष्णांनी) सांगून ठेवलेले आहे ना? (भगवान श्रीकृष्ण काय खोटे बोलत होते मग?)
बाकी, इतर देशांमधील आंदोलनांचे काय झाले, म्हणाल, तर तेथे प्रस्थापित (तूर्तास तरी) वरचढ ठरले. म्हणून तो लढा गैरवाजवी ठरतो काय?
एकट्या जलियाँवाला बाग प्रकरणामुळे जनरल डायरचे आणि/किंवा ब्रिटिश सत्तेचे शष्पसुद्धा वाकडे झाले नाही. फक्त, शेकडो हिंदुस्थानी मेले. बरे मग?
एकट्यादुकट्या घटनेत इन्स्टंट यश दर खेपेस मिळत नाही. (किंबहुना, अनेकदा नुकसानसुद्धा सोसावे लागते.) Sustained लढ्यातूनच काही घडले, तर घडते. (तेसुद्धा घडतेच, किंवा शंभर टक्के हवे तसे घडतेच, असे नाही.) परंतु म्हणून, अन्याय होतोय असे जर वाटत असेल, तर कोणी लढूच नये की काय?
पेपर फोडावा म्हणून बापाकडून पैसे घेऊन फोडणारी पिढी जेन झीच ना?
(तुमच्याच लॉजिकने जायचे, तर) गांधींवर गोळ्या झाडणारे हिंदूच ना?
>>>(तुमच्याच लॉजिकने जायचे,…
>>>(तुमच्याच लॉजिकने जायचे, तर) गांधींवर गोळ्या झाडणारे हिंदूच ना?
हो... अगदी बरोबर. फक्त झाडणारे नाही तर झाडणारा... एक.
गांधींवर गोळ्या झाडणारा हिंदू... तो सुद्धा चित्पावन ब्राह्मण... बारामतीमधे जन्म.
मुद्दा संपला की डावे गांधीहत्येचा आधार घेतात असे ऐकले होते ;) बाकी आम्ही मागेच म्हटल्याप्रमाणे ना डावे ना उजवे... मध्यममार्गी... बाकी तुमचे चालू द्या... मजा येते.
>काही होत नाही. होणार नाही.…
>काही होत नाही. होणार नाही.
-म्हणून त्यांनी पण (तुमच्यासारखं) बसून राहावं अशी तुमची अपेक्षा आहे का काका?
तसं काही होत नसतंय:-)
Education Minister Dharmendra Pradhan Sends Resignation To PM Modi Amid Student Protests https://share.google/dJJbKjpojg37Fcntk
घ्या नुकतीच बातमी आली आहे. आता मित्रों bro राजिनामा स्वीकारतात ते पाहू 😄
>बापाकडून पैसे घेऊन फोडणारी पिढी जेन झीच ना?
- आणि पैसे खाणारी पिढी निर्दोष का? त्यांना काय विशेषणं लावायची?
>>> आणि पैसे खाणारी पिढी…
>>> आणि पैसे खाणारी पिढी निर्दोष का? त्यांना काय विशेषणं लावायची?
तेच तर आमचे म्हणणे... पैसे देणारे आणि घेणारे सोडून भुक्कड मंत्र्याचा राजीनामा घेऊन काय घंटा होणार? सिस्टम तशीच चालू रहाणार... मोदी जाऊन रागा आला किंवा अखिलेश आला किंवा अदित्य ठाकरे आला तरी हेच होणार... जंतर मंतर जिंदाबाद...
राजीनामा
राजीनामा आला असता / नसता तरी मला फरक पडत नव्हता.
पण मुलांनी मुद्दा ना सोडता परिस्थिती ज्या पद्धातीने हाताळली ते कौतुकास्पद आहे.
पत्रकार त्यांना "cbse चा full form (तरी) येतो का" असे प्रश्न विचारात होते.
काल आरक्षणाबद्दल मते विचारात होते. मुलांनी अतिशय व्यवस्थितपणे हे सगळे सांभाळले.
पुढे काय होईल माहीत नाही, पण २ दिवस तरी "हे खरे विद्यार्थी नव्हतेच" / "५० सुद्धा लोक आले नव्हते" / "यांच्या funding चा source तपासा" असे फालतू मुद्दे वाचायला मजा येईल.
gen-z चे पुन्हा एकदा कौतुक!
(cbse च्या प्रश्नावर खरे तर "आता तुम्ही सांगा बरं २ +६ किती होतात? आणि १ + ७? असे प्रतिप्रश्न त्यांना विचारता आले असते )
स्वाद आ गया!
हे मान्य आहेच. माझ्यासह अनेकांना हा आशेचा किरण वाटतो आहे.
पण - काही निकटवर्तीयांचे विचार ऐकल्यावर हेही जाणवते की त्यांना आणि त्यांच्या समविचारी लोकांना "जे" हवे आहे त्याचा पुरवठा शेठ आणि त्याच्या टीम कडून जोपर्यंत होत राहील तोपर्यंत काही मोठे बदल होणे अवघड आहे.
(२०१४ साली झालेला बदल भ्रष्टाचाराला कंटाळून झाला- हा माझा गैरसमज लवकरच दूर झाला होता)
…
पत्रकार त्यांना "cbse चा full form (तरी) येतो का" असे प्रश्न विचारात होते.
गळत्यात *** स्वतःची लाल करून घेण्याचा प्रकार… दुसरे काय? चालायचेच.
(cbse च्या प्रश्नावर खरे तर "आता तुम्ही सांगा बरं २ +६ किती होतात? आणि १ + ७? असे प्रतिप्रश्न त्यांना विचारता आले असते )
<स्वतःची जाहिरात मोड>
ते मरू द्या. हे पाहा.
</स्वतःची जाहिरात मोड>
(सांगण्याचा मतलब, २ + ६ किंवा १ + ७ किती, असे प्रतिप्रश्न विचारून उपयोग नाही. त्याची उत्तरे ते (पक्षी: detractors) तत्काळ बरोबर देतीलही. परंतु, केवळ बेरीज-वजाबाकी करता येते, म्हणून त्या बेरीज-वजाबाकीच्या (बरोबर) उत्तरांतून बरोबर निष्कर्ष काढता येतातच, असे नाही. आणि, ते expose करायला साटल्यत्वेकरून खोलात शिरावे लागते; ते असे इन्स्टंट पद्धतीने होऊ शकत नाही.)
ओहो!
नाही, ही रत्ने ठाऊक नव्हती. (माय बॅड.)
कसे आहे ना, की तुमचे विश्वगुरू काय, किंवा आमचे विश्वगुरू काय, एकंदरीतच या विश्वगुरू मंडळींना तूर्तास इतका विटलेलो आहे, की त्यांच्या मौक्तिकांना (किंवा त्यांनासुद्धा) तूर्तास मुद्दाम, आपण होऊन फॉलो करायला जात नाही. (त्यातून मनोरंजन होणेसुद्धा बंद झालेले आहे — These people are not even funny any more. फक्त डिप्रेशन वाढते, इतकेच.) असेच चर्चांतून नाहीतर वर्तमानपत्रांच्या हेडलाइनींतून काही कानांवर/डोळ्यांवर पडले, तर पडले. त्यामुळे… असो.
सध्या चालू असलेल्या…
सध्या चालू असलेल्या घडामोडीनुसार धर्मेंद्र जाऊन देवेंद्र येणार असे दिसते. पवारांची मोदी भेट फळली. ब्राह्मण मुख्यमंत्री जाऊन ते पद मराठा समाजाकडे परत येणार. पेपर फोडणारे ब्राह्मण आता वाचणार नाहीत, बहुजन समाज आता मुक्त होणार.
केंद्रातील गृहमंत्र्याविरोधात वातावरण करुन मोदींनी योगींचा प्रवास सोपा केला पण देवेंद्र आणि तावडेची पाचर मारुन ठेवणार.
(अवांतर)
नवे शिक्षण मंत्री जोशी आहेत.
आणि
ते ब्राह्मण आहेत किंवा नाही माहिती नाही.
‘जोशी’ हे by definition ब्राह्मणांव्यतिरिक्त कोणीही असूच शकत नाहीत. (ब्राह्मणांमधील भिन्न पोटजातींत१ वा प्रांतीयतांमध्ये२ असू शकतात, परंतु essentially ब्राह्मण.)
सबब, प्रस्तुत हे जे कोणी ‘जोशी’ म्हणताय, ते (कोण आहेत, झालेच तर गोरे की काळे, हे मला ठाऊक नाही, परंतु) मराठी नसतीलही कदाचित, परंतु ब्राह्मण असणार, हे निश्चित. (Unless, मूळचे हिंदू ब्राह्मण, परंतु नंतर बाटून ख्रिस्तीबिस्ती झाले असल्याखेरीज. परंतु, भाजपच्या मंत्रिमंडळात आहेत, म्हटल्यावर तशी शक्यता नगण्य वाटते.)
(अतिअवांतर: ‘जोशी’ हा ‘ज्योतिषी’चा अपभ्रंश आहे. (Astronomer किंवा astrologer, दोन्हींपैकी कोठल्याही अर्थाने.) परंपरेने astrologerचा व्यवसाय, झालेच तर पंचांग पाहणे, मुहूर्त काढून देणे, कुंडली मांडणे, असल्या उद्योगांत specialize करणारे जे ब्राह्मण असत, ते ‘जोशी’ झाले. असो.)
१ महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले, तर देशस्थांत तथा कोकणस्थांत आढळतात. कऱ्हाड्यांत ऐकलेले नाही, परंतु असल्यास आश्चर्य वाटणार नाही.
२ महाराष्ट्राबाहेर गुजराती, उत्तरप्रदेशी, पहाड़ी (उत्तराखंड? नैनिताल वगैरे.), झालेच तर क्वचित नेपाळी समाजांत हे आडनाव आढळते. (इतर प्रांतांतही असू शकेल.)
..
नवे शिक्षण मंत्री तात्पुरते प्रभारी आहेत. पवारांची भेट अचानक उगाच झाली नाही हे १९८० पासून त्यांचे राजकारण नीट पहाणा-याला कळेल. प्रत्येक गोष्ट विनोदी वाटणा-या आणि विनोद समजणे हेच प्रगल्भतेचे लक्षण मानणा-यांना कदाचित कळणार नाही. असो..
आमचे तात्या म्हणायचे तसे ज्याची त्याची समज वगैरे...
.
>>आमचे तात्या म्हणायचे तसे ज्याची त्याची समज वगैरे...
तुमचे तात्या अगदी बरोबर म्हणायचे. कारण तुम्ही एक मोठ्ठा पॉईंट मिस केला आहे.
गेल्या काही वर्षांत मोदी आणि रास्व संघाने प्रत्येक शिक्षण संस्थेत RSS चे लोक बसवले आहेत.
मग त्यांची पात्रता असो किंवा नसो. आता हे जोशी का कोण त्यांनी BA केलेलं आहे आणि नंतर ते केमिकल व्यवसाय करत होते.
त्यामुळे जरी फडणवीस शिक्षण मंत्री झाले तरी ते लहानपणापासून संघात जातात म्हणून होतील. शिक्षण संस्थांची जवाबदारी घ्यायची म्हणजे संघाचे असायलाच हवे. त्यामुळे अलीकडे विज्ञानातल्या कोणत्याही विषयात एक भारतीय संस्कृतीतील उदाहरण असतं. भले ते व्यवस्थित तर्काच्या आधारावर सिद्ध झालं असो किंवा नसो. एखाद्या संकल्पनेच्या केवळ अध्यात्मिक मांडणीलाही विज्ञानात आता जागा आहे.
>>>गेल्या काही वर्षांत मोदी…
>>>गेल्या काही वर्षांत मोदी आणि रास्व संघाने प्रत्येक शिक्षण संस्थेत RSS चे लोक बसवले आहेत.
मग त्यांची पात्रता असो किंवा नसो.
काय सांगता काय ? मला माहितच नव्हते. बरे झाले सांगितले. मी आपला अलिगढ, जामिया. जे एन्यु, उस्मानिया हि वानगीदाखल देतोय इथे महान पुरोगामी उजवे नसलेले पवित्र लोक असावेत असे समजत होतो. धन्यवाद.
नंदन निलेकणी पक्का संघी का? नाही त्याच्याकडे जबाबदरी दिली म्हणजे तो लहानपणापासून संघात जात असणार आणि वर गौड सरस्वत म्हणजे काय बल्ले बल्ले.... रागाला महित नव्हते म्हणून त्याला तिकीट दिले होते... खिक्क .
बाकी आम्हाला काय हो विज्ञान का काय ते माहित... त्यामुळे संकल्पनांना विज्ञानात जागा नव्हती आणि आता आहे हे समजले.
काय सांगता काय ?
शांतीश्री पंडित हे नाव JNU सन्दर्भात ऐकले नाही ?
"IIT administrations, including IIT Roorkee and IIT Madras, along with universities like Delhi University and JNU, issued directives and advisories urging students to stay away from the Jantar Mantar protests and to remove social media posts expressing solidarity with the demonstrations" - अशासारखा कंटेंट वाचत नाही असं दिसतंय.
याच आय आय टी मधील हुशार मुले…
याच आय आय टी मधील हुशार मुले पुढे इतर देशांत विशेष करून अमेरिकेत शिकायला, नोकरी करायला, इथल्या कंपनी मार्फत काम करायला, जात असत्तात.
https://travel.state.gov/content/travel/en/News/visas-news/announcement…
वाचा म्हणजे कळेल जंतर मंतर कि आयुष्य याचा पर्याय निवड करतांना कोणते मार्गदर्शन योग्य राहील.
किती हो मुलांची काळजी!
तुम्ही लोक असे cute विचार लिहिता- बोलून दाखवता म्हणूनच GenZ - चाय बनाएं ×× नहीं, असं ठासून सांगते.
योग्य मार्गदर्शन आणि internal disciplinary action by the university यांच्यातला फरक GenZ ला चांगलाच कळतो :-)
त्यांनी अमेरिकेला जाणं न जाण्याची फिकीर युनिव्हर्सिट्यांना पडली नाहिये याची पूर्ण खात्री आहे. आयुष्यात पर्याय निवडण्यासाठी 'स्वातंत्र्य' असणं मुलांना अपेक्षित आहे.
"Universities warned that participation could invite legal consequences under applicable laws, social media restrictions, and internal disciplinary actions under the institutions' codes of conduct"
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/cities/delhi/du-…
फ्रँड्स
या मुलांचं unassuming nature फार छान आहे. मित्रों आणि गँगच्या एकसे एक बढाईखोर आणि चिथावणीखोर भाषणांच्या वैतागापुढे GenZ speakers are a breath of fresh air. एक video content creator जंतर-मंतर वर प्रकाशझोतात आला कारण त्याचे video viral झाले. आणि मग अनेक दिवस आंदोलनाशी जोडला गेला. त्याने 'मी कसा पाहिल्यापासून CJP बरोबर होतो, मी आंदोलनाशी किती एकनिष्ठ आहे' वगैरे काहीही बढाया मारल्या नाहीत. यानंतर इतर intersting projects करेन असं सहजपणे म्हणून गेला. आणि लाखो followers मिळाल्याबद्दल एकदम amused होता.
Damage control म्हणून परवा Bro ने 'फ्रँड्स' अशी सुरवात करत मध्यरात्री किडके दात आणि नाकातले केस दिसतील इतक्या जवळ selfie camera धरून जी video clip प्रसारित केली त्याला तोड नव्हती. त्यावरच्या कमेंट्स वाचताना हसून पुरेवाट झाली. Gen Alpha सुद्धा आजोबांना फोन कसा धरावा याचं ट्रेनिंग देत होती 😀
विशेषत: उजव्या विचारांच्या…
सहमत आहे