१.त्यांचे खाजगी देऊळ (खाजगी मालमत्ता) आहे. तिथे कुणी काय करायचे ते ठरवणार. इतर लोकांनी (त्यात मुलगी जावई, इतर नातेवाईकही आले) कशाला लक्ष घालायचे.
२. बाकी वडिलांच्या मालमत्तेत मुलींचाही वाटा( आणि हक्क) असतो हे कायद्याने मान्य असले तरी तो केव्हा लागू होतो? तर वारस कोण हे ठरवण्याची वेळ येते तेव्हा.
३. बाकी भाग्यश्री आणि तिचे पती यांच्यात आणि राजे यांच्यात वितुष्ट का आले आहे ते इतर काही विडिओत समजेलच.
४. वारसा आणि हक्क यादृष्टीने अनेक कायदेशिर खटले भारतात सुरू आहेत आणि त्यातील हा एक सामान्य स्वरूप म्हणून या घटनेकडे इतर लोक पाहू शकतात आणि आपसापात वाद घालू शकतात. परंपरेचा काही संबंध येत नाही.
________________________
अशीच एक घटना तासगावच्या गणपती मंदिराची आहे. पण ती थोडी वेगळी आहे कारण त्या मंदिराचा आता ट्रस्ट झाला आहे आणि त्यायोगे कार्यक्रम ,नियम ठरतात. हे मंदिरही पटवर्धन तासगाव शाखेचे मालक यांचे आहे. खाजगीच आहे. पण २००० च्या आसपास त्या देवळाच्या मालकांनी आवाहन केले होते की मंदिराच्या गोपुराच्या डागडुजीच्या खर्चासाठी लोकांनी देणगी द्यावी. रीतसर पावत्याही दिल्या. त्या पावत्यांच्या आधारे गावकऱ्यांनी / देणगीदारांनी खटला लावला की देवळाच्या खर्चात लोक सहभागी असल्याने सार्वजनिक ट्रस्टला मान्यता मिळावी. तशी मिळाली. मग ते मंडळ स्थापन होऊन नियम अटी वगैरे ठरवण्याचे अधिकार राजेसाहेबांकडे राहिले नाहीत.
दानपेटीत पडलेल्या दानाचा वापर केला असता तर ट्रस्ट वगैरे भानगड आली नसती.
-------------
चर्चेसाठी हा एक https://youtu.be/vZn4SWhzYPE?si=1XBVYwpA9BPcqCbY
आणि इतर विडिओ येतीलच.
-----------
अवांतर आणि अशीचच आणखी काही प्रकरणं...
एका मठाचा हत्ती/ हत्तीण जामनगरला नेण्यात आली आणि मठाजवळच्या गावकऱ्यांनी याला विरोध करणे.
किंवा कोल्हापुरचा मंगेशकरांचा स्टुडिओ विकला जाणे आणि त्याचं काय रूपांत होणे यात कोल्हापुरकरांनी लक्ष घालणे.
एखादा वाद कुजबुज या स्वरूपात या स्वरूपात असतो तोपर्यंत तो बर्यापकी खाजगी राहतो. इथे तो सार्वजनिक केला गेला आहे, त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या वकुबानुसार त्यावर प्रतिक्रिया देणारच.
अंतर्गत वाद आहे.
पण त्रयस्थपणे पाहिल्यास......
१.त्यांचे खाजगी देऊळ (खाजगी मालमत्ता) आहे. तिथे कुणी काय करायचे ते ठरवणार. इतर लोकांनी (त्यात मुलगी जावई, इतर नातेवाईकही आले) कशाला लक्ष घालायचे.
२. बाकी वडिलांच्या मालमत्तेत मुलींचाही वाटा( आणि हक्क) असतो हे कायद्याने मान्य असले तरी तो केव्हा लागू होतो? तर वारस कोण हे ठरवण्याची वेळ येते तेव्हा.
३. बाकी भाग्यश्री आणि तिचे पती यांच्यात आणि राजे यांच्यात वितुष्ट का आले आहे ते इतर काही विडिओत समजेलच.
४. वारसा आणि हक्क यादृष्टीने अनेक कायदेशिर खटले भारतात सुरू आहेत आणि त्यातील हा एक सामान्य स्वरूप म्हणून या घटनेकडे इतर लोक पाहू शकतात आणि आपसापात वाद घालू शकतात. परंपरेचा काही संबंध येत नाही.
________________________
अशीच एक घटना तासगावच्या गणपती मंदिराची आहे. पण ती थोडी वेगळी आहे कारण त्या मंदिराचा आता ट्रस्ट झाला आहे आणि त्यायोगे कार्यक्रम ,नियम ठरतात. हे मंदिरही पटवर्धन तासगाव शाखेचे मालक यांचे आहे. खाजगीच आहे. पण २००० च्या आसपास त्या देवळाच्या मालकांनी आवाहन केले होते की मंदिराच्या गोपुराच्या डागडुजीच्या खर्चासाठी लोकांनी देणगी द्यावी. रीतसर पावत्याही दिल्या. त्या पावत्यांच्या आधारे गावकऱ्यांनी / देणगीदारांनी खटला लावला की देवळाच्या खर्चात लोक सहभागी असल्याने सार्वजनिक ट्रस्टला मान्यता मिळावी. तशी मिळाली. मग ते मंडळ स्थापन होऊन नियम अटी वगैरे ठरवण्याचे अधिकार राजेसाहेबांकडे राहिले नाहीत.
दानपेटीत पडलेल्या दानाचा वापर केला असता तर ट्रस्ट वगैरे भानगड आली नसती.
-------------
चर्चेसाठी हा एक
https://youtu.be/vZn4SWhzYPE?si=1XBVYwpA9BPcqCbY