संशोधन प्रकल्पात सहभागी होण्यासाठी आवाहन
पर्यावरण साक्षरता व उपभोक्त्यांचे वर्तन' या विषयावरील संशोधनात सहभागी होण्यासाठी काही स्वयंसेवकांची गरज आहे. स्वयंसेवक हे अठरा वर्षांपेक्षा अधिक वयाचे व संगणक साक्षर असावेत. सदर स्वयंसेवकांना एक प्रश्नावलीचा दुवा पाठवण्यात येईल. त्या दुव्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी भरायची आहेत. सर्व प्रश्न हे बहुपर्यायी स्वरुपाचे आहेत. कोणतीही खाजगी माहिती, अगदी स्वयंसेवकाचे नावही, देणे बंधनकारक नाही. सदर माहिती गोपनीय ठेवली जाईल व तिचा फक्त संशोधनासाठीच वापर करण्यात येईल.
ही प्रश्नावली थोडी मोठी (व मोठ्या कष्टाने तयार केलेली ) आहे. ज्यांना संशोधन या विषयात रस आहे त्यांना या संशोधनाचे निष्कर्ष व्यक्तिगत निरोपातून कळवण्यात येतील. 'ऐसी अक्षरे' च्या वाचकांना मी सदर संशोधनात भाग घेण्याचे आवाहन करतो आहे. ज्यांना या प्रकल्पात भाग घ्यावासा वाटतो, त्यांनी कृपया त्यांचा ई-मेल पत्ता मला व्यक्तिगत निरोपातून पाठवावा.
सदर संशोधन माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. जितके अधिक स्वयंसेवक यात भाग घेतील, तितकी या संशोधनाची व्यापकता वाढेल. कृपया या उपक्रमात सहभागी होऊन या संशोधनाला हातभार लावावा.
धन्यवाद.
प्रश्नावली
प्रश्नावली वेब स्वरुपातच (गुगल डॉक) आहे. ती थोडी वेळखाऊ आहे. काही लोकांना किंचित कंटाळवाणीही वाटू शकेल. म्हणून ती वैयक्तिक ई मेलने पाठवावी असे मला वाटले.
या प्रकल्पात भाग घेतलेल्यांचे आणि त्यात रस दाखवलेल्यांचे आभार. नंदन, अदिती, प्रश्नावलीचा दुवा पाठवला आहे.
सर्वांसाठी.
सर्वेक्षणातील काही प्रश्न संदिग्ध वाटले.
पर्यावरणाच्या एखाद्या कॉजला सपोर्ट करण्यासाठी एखादी कंपनी आपले प्रॉडक्ट प्रमोट करत असेल तर..... असे काही प्रश्न आहेत.
त्यात दोन प्रकार संभवतात..... एक आमचे प्रॉडक्ट कमी ऊर्जा खाते/कमी प्रदूषण करते
दोन आमचे प्रॉडक्ट इतरांसारखेच आहे पण या प्रॉडक्टच्या विक्रीतला काही भाग आम्ही प्रदूषण नियंत्रणासाठी खर्च करू
प्रमोट करण्याचा कोणता प्रकार अपेक्षित आहे ते कळत नाही.
सुधारित प्रश्नावली
या जुन्या धाग्यात उल्लेख केलेल्या संशोधनातून काही रोचक निष्कर्ष हाती आले आहेत. या संशोधनात सहभागी झालेल्या लोकांनी केलेल्या सूचनांवरुन या प्रश्नावलीत काही बदल केले आहेत. या सुधारीत प्रश्नावलीचा दुवा खाली दिलेला आहे. यात रस असलेल्या लोकांनी कृपया या दुव्यावर जाऊन ही प्रश्नावली भरावी. याआधी ही प्रश्नावली भरलेल्यांनीही पुन्हा एकदा (आणि शेवटचे!) ही प्रश्नावली भरण्याचे कष्ट घ्यावेत. या प्रश्नावलीबाबतचा अभिप्रायही जरुर कळवावा.
या संशोधनात सहभागी झालेल्यांचे आणि या कामात सहकार्य केलेल्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
https://docs.google.com/forms/d/1yg6tlUQqCqzuw1BlpU0EK2ASjRGC3Ny4H5Roch…
काल उत्तरं दिली आहेत ...
काल उत्तरं दिली आहेत ... प्रश्नावली अधिक निर्दोष करण्याच्या प्रयत्नात लांब झाली आहे परंतु उत्तरं द्यायचा प्रयत्न केला...
माहितीवर आधारित क्विझ सारखे जे सुरुवातीचे प्रश्न आहेत त्यात काही उत्तरं मला माहिती नव्हती... काही येत होती उत्तरं...
ज्यांची उत्तरं येत नव्हती त्यांना प्रामाणिकपणे ( गूगलमदत न घेता) काही गेस मारले.
....
.. ( वस्तूचा इतर सर्व दर्जा समान असताना) पर्यावरण वाचवण्याच्या प्रयत्नात वस्तूची किंमत १० % च्या वर वाढू नये, अशा स्वरूपाचा प्रश्न आवडला... मी सहमत आहे..
डन. प्रश्न रोचक होते.
डन. प्रश्न रोचक होते. आपल्याला किती कमी माहीती आहे हे जाणवल.
निष्कर्ष वाचायला आवडेल.