Skip to main content

अक्षरप्रेमी

नमस्कार.

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर 'अक्षरप्रेमी' नावाच्या नव्या मराठी उन्माद ब्लॉगची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

मराठीमधील लेखनातून, मग ते ललित असो की वैचारिक, माहितीपूर्ण असो किंवा खेळीमेळीच्या गप्पाटप्पा असोत - लेखकांचे व वाचकांचे जीवन काही अंशांनी नासवून टाकणे, हे 'अक्षरप्रेमी' चे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर आंतरजाल हे टुकार साहित्यनिर्मितीचे व भांडाफोडीचे माध्यम म्हणून समृद्ध करणे हे त्याला पूरक उद्दिष्ट आहे. हे साधण्यासाठी लेखकांच्या अवांतराला प्रोत्साहन, डायरीयाची व लेखनकंडूंची विशेष नोंद, टुकारपणाला श्रेणी देण्याची सुविधा देणे याद्वारे प्रयत्न केला जाईल. सदस्यांची एकमेकांचे आई-बाप काढण्याची क्षमता हे ब्लॉगचे बलस्थान आहे. त्याचा वापर करून घेण्यासाठी हलकटधर्मी सदस्यांना शेकडा खेकडा करण्याची संधी उपलब्ध असेल. नियमितपणे काही कंपू कट्टे आयोजित करून त्यात आपापल्या लेखन क्षेत्रात घुसणार्‍या मान्यवर व्यक्तींना कॉर्नर करण्याचा मानसही आहे. यातून पारंपारिक कंपूबाजी व नवीन बालवाडी यांमधील दरी कमी होईल अशीही आशा आहे.

संकेतस्थळाचे अधिकृत उद्घाटन ऐसीअक्षरेवरती पहिला राडा होईल त्या दिवशी होईल. पण आत्ता या घडीला ब्लॉग निर्मिती अवस्थेत आहे. तिथे येऊन आपल्या विरोधकाचा आयडी काढून ठेवावा, व ह्या ब्लॉगच्या टवाळरूपाविषयी तुमचे अभिप्राय, सूचना, अडचणी, प्रश्न अजिबात कळवू नयेत ही आज्ञा. तसेच आपण सर्वांनी हलकटपणाने लेखन करून व उत्तम लेखनाची टवाळी करण्यात सहभागी व्हावे हीदेखील मनापासूनची इच्छा.

ह्या बरोबरच ऐसीअक्षरे व इतर लॉलीपॉप संस्थळांवरती जे नाही ते सर्व आम्ही इथे पुरवणार आहोतच.

१)बालगीते,कोडी,गंमतगाणी, झबली आणि टोपड्याच्या कलाकृतींनी बहरलेला 'लहान व्हा' विभाग .

२)चहा - लिंबू सरबत - दही पोहे अशा अवीट दर्जाच्या मात्र करायला अतिशय अवघड अशा पाकृनी सजलेला 'चमत्कृती विभाग'.

३)'गावरान आणि मी', 'शाई - एक फुटलेली काच' ’परभणी आख्यान’ अशा स्वर्गीय महाकाव्यांनी लगडलेला 'जे न लिही कवी..' हा विभाग.

४) येवढेच नाही तर १८+ म्हणजे वरिष्ठ सदस्यांसाठी 'उघडझाप' विभाग सुरू करत आहोत. ह्यात 'स्ट्रेट फ्रॉम द पँट' 'अबलख घोडा' 'काही रात्री भलत्यासलत्या...' अशा आंबटगोड कथांनी खचाखच मजकूर भरलेला असेल.

५) 'पळादालन' नावाच्या विभागात कागदी होड्या, टोकदार होड्या, कागदाचे रुमाल कसे बनवावेत, शीतपेयांच्या स्ट्रॉ पासून बाहुलीचा झगा, आइसक्रीमच्या काड्यांपासून फोटोफ्रेम कशी तयार करावी हे शिकता येईल.

चला तर मग आता आणखी एक नवा टॅब उघडून ठेवायच्या तयारीला लागा.

टारझन Mon, 24/10/2011 - 15:56

परा हॅज टेकन ओव्हर.
लिवता रहा दोस्त.

श्रावण मोडक Mon, 24/10/2011 - 16:03

जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||
...........
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||
...........
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||
- संत ज्ञानेश्र्वर
;)

स्मिता. Mon, 24/10/2011 - 16:27

हि दिवाळी म्हणजे वाचनासाठी पर्वणीच म्हणायची... एकामागे एक धडाधड संस्थळं नि ब्लॉग्स् सुरु होत आहेत. त्यात आणखी अक्षरप्रेमीची भर!

बाकी या ब्लॉगच्या वैशिष्ट्यांमुळे आणि निरनिराळ्या रोचक विभागांमुळे तो लवलरच एक यशस्वी ब्लॉग म्हणून नावारूपाला अशीच चिन्ह दिसत आहेत.
अभिनंदन!

हिटलर Mon, 24/10/2011 - 16:28

त्या ब्लॉगच्या मालकांचा परिचय देऊ शकाल का? परा जी?

विजुभाऊ Mon, 24/10/2011 - 16:40

भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||
श्रावण सर बरोब्बरआठवले हो. ज्ञानेश्वरांना त्याकाळी भुतांची परस्परांशी मयत्री होते आणि हे ठौक होते. त्याकाळी इंटरनेट नसेल पण आंतरज्ञान नावाचे नेट त्या नेटक्या माणसाजवळ होते. याचीच प्राचिती येते.

अवांतरः अक्षरप्रेमी ब्लॉगवर " चिडचीड" नावाचा एक स्वतन्त्र विभाग सुरु करावा. त्यात
१) माझे इनोचे प्रयोग,
२) कशासोबत काय खावे
३) कशा सोबत काय प्यावे
४) कशासोबत काय नेसावे.
इत्यादी विषयांवरच्या मान्यवर लेखाकानी लिहिलेल्या लेखांचे संग्रह द्यावेत आणि त्याला संग्रहणी हे नाव द्यावे.

चिंतातुर जंतू Mon, 24/10/2011 - 16:58

>>दिवाळीच्या शुभमुहूर्तावर 'अक्षरप्रेमी' नावाच्या नव्या मराठी उन्माद ब्लॉगची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

'अक्षरप्रेमी' हे पुरेसे उन्मादक वाटत नाही. त्यापेक्षा 'घोडामैदान' चालेल का? मग 'राडा' आणि 'घोडा' यांत यमकही जुळेल आणि विरोधी पक्षांची दाणादाण उडेल. आणि मग हे बोधवाक्यदेखील चालावे:

अब तुम कब स्मरोगे राम । जिवडा दो दिनका यजमान ॥ध्रु०॥
गरम पनोमें हात जुडाया निकल हुवा बैमान ॥
बालपनोंमें खेल गमाया तारुनपनमों काम ॥
बुढ्ढेपनमों कांपन लागा निकल गया अवसान ॥
झूटी काया झूटी माया अखर मोत निदान ॥
कहत कबीरा सुन भाई साधु यही घोडा मैदान ॥

- चतुष्पाद जंतू

परिकथेतील राजकुमार Tue, 25/10/2011 - 11:08

In reply to by चिंतातुर जंतू

चतुष्पाद जंतू

येवढा 'मचाक' प्रतिसाद दिल्यानंतर निदान 'कामातुर तंतू' अशी सही तरी करायचीत ;)

इंटरनेटस्नेही Mon, 24/10/2011 - 18:45

=))सही! लेखन मनापासुन आवडले!

चेतन सुभाष गुगळे Mon, 24/10/2011 - 19:32

येवढेच नाही तर १८+ म्हणजे वरिष्ठ सदस्यांसाठी 'उघडझाप' विभाग सुरू करत आहोत. >>

या विभागाचे नाव उघडझीप असे ठेवले तर जास्त समर्पक ठरेल.

Nile Mon, 24/10/2011 - 19:57

१. तुमच्या ब्लॉगावर हलकट श्रेणी देता येईल का?

२. अक्षरप्रेमी काढल्याने "तोच तोच" पणा लोकांना वाटेल. त्या ऐवजी 'कैसी अक्षरे" (मळविन) कसे वाटते? ;-)

बाकी, काही प्रतिसाद वाचून मी जालीय म्हातारा झालो की काय अशी शंका मनाला चाटून गेली(ओ मोडक, आता तरी मोठा झालो की नाही ते सांगा!). ;-) . मराठी जालाचा समृद्ध इतिहास (की अडगळ) असे काहीसे पुस्तक काढायची गरज निर्माण झाली आहे का असाही एक प्रश्न मनात उद्भवला! ;-)

(समृद्ध मराठी जालावरील एक अडगळ)-Nile.

गणपा Tue, 25/10/2011 - 13:53

छे पर्‍याचा आयडी हॅक झाला की आधीच कुणी बळकावला?
आमच्या वरीजणल पर्‍या कडुन अधीक चांगल्या विडंबनाची अपेक्षा होती. ;)

राजेश घासकडवी Wed, 26/10/2011 - 08:03

काही प्रतिक्रिया...
१. अक्षरप्रेमीचं स्वागत. मी तिथे जाऊन आलो पण ऐसी अक्षरेपेक्षा वेगळं काहीच न दिसल्यामुळे मी सदस्यत्व घेतलं नाही. आता ज्यांना कोणी माझ्या नावाने तिथे सदस्यत्व घ्यायचं असेल त्यांनी ते घेतलं तर माझंच नुकसान होईल असं वाटतं का?
२. जवळपास ८-९ कोटी मराठी लोकांसाठी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी संस्थळं आहेत. त्यात अक्षरप्रेमीसारखे प्रेमी ब्लॉग तर विरळाच. जितके जास्त होतील तितके चांगलेच.
३. हॅ हॅ हॅ, आमचं धनुष्य मोडलेलं असल्यामुळे सध्या तरी तिकडे आयडी न घ्यायचं ठरवलं आहे.
४. माझी वाचण्यात किंवा समजण्यात काही चुक होत आहे का ?

त्याचा वापर करून घेण्यासाठी हलकटधर्मी सदस्यांना शेकडा खेकडा करण्याची संधी उपलब्ध असेल.

याचा अर्थ नक्की काय?
या प्रश्नांना उत्तरं द्या मग पुढचं बोलू.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 26/10/2011 - 08:39

आम्ही आमच्या 'ऐसी अक्षरे'शीच लॉयल असल्यामुळे आम्ही काय तुमच्या ब्लॉगावर येणार नाही. तसेही तिथले भारतीय, नेत्रसुखद रंग मला आवडले नाहीत; मला तडकफडक रंगच आवडतात. ना तिथे जॉन अब्राहमचं चित्र आहे. आमचे परमपूज्य, प्रातःदवणीय नंदानंद आण्णा (_/\_ आण्णांच्या चरणी साष्टांग नमस्कार) यांचा फोटोही तिथे डाव्या बाजूला नाही.

मी तुमच्या प्रेमी ब्लॉगाचं सदस्यत्त्व घेतलेले नाही हे मी ओरडून सांगते आहे; जा ज्याला कोणाला माझ्या नावाने खातं उघडायचं आहे त्याने करून टाका! मी आणखी तिसर्‍याचं नाव घेऊन येईनच.

विरोचन Wed, 26/10/2011 - 10:23

या ब्लॉगवर हलवॆंटियर म्हणून काम करायला आवडेल :)